Freedom Fighters of India in Marathi

Today, I am going to tell you about the real Heroes and the freedom fighters of India. Its really helpful for native Marathi speakers.

विषय सुची दाखवा

भारतात परकीय आक्रमणांची सुरुवात:

भारतीय इतिहासात अगदी प्राचीन काळापासून भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारतातील अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता परकियांविरुद्ध लढा दिला.

मानवी युद्धांचा आरंभ:

मानव उत्क्रांतीनंतर मानव प्राणी समूहाने राहू लागला. स्वतःच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो दुसऱ्या समूहांवर हल्ले करीत. हळूहळू त्याच्या गरजा वाढू लागल्या. त्याच्या गरजा आता अन्न, वस्त्र, निवारा यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. धन, प्रतिष्ठा, सत्ता यांच्या लालसेने तो आता दुसऱ्या राज्यावर आक्रमणे करू लागला.

नवीन राज्यांचा उदय:

मानवाने अशा प्रत्येक समाजाचे प्रदेशानुसार समाजाचे त्याच्या सोयीनुसार नियम व कायदे बनवले. प्रत्येक प्रदेशातील समूहाच्या सीमा निर्धारित झाल्या. अशाप्रकारे, नवनवीन राज्ये उदयाला आली.
मानव प्राणी हा समाजात एकमेकांच्या आधारे स्वतःच्या गरजा पूर्ण करतो त्यामुळे मानवाला समाजशील प्राणी म्हटले आहे.

सिकंदरचे भारतावरील आक्रमण:

अशीच जग जिंकण्याची लालसा मनात बाळगून अलेक्झांडर मेसिडोन येथून निघाला. अलेक्झांडरला जगात सिकंदर या नावाने ओळखतात. वाटेत येणारे प्रदेश जिंकत तो भारताच्या सीमेवरील झेलम नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोचला. झेलम व त्याच्या पूर्वेकडील प्रदेशावर त्यावेळी पौरवनरेश पुरुचे साम्राज्य होते.

क्रांतिकारक:

मातृभूमीला परकीय राजवटीच्या गुलामगिरीतून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यसेनानी असे म्हटले जाते. हिंसक वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींना क्रांतिकारक म्हटले जाते.

प्राचीन भारतीय राजे:

पौरवनरेश पुरु:

पौराव राज्याचा राजा पुरु हा हैडस्पेसच्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे. अलेक्झांडर (सिकंदर) आणि पुरु यांच्यातील हे युद्ध भारतीय इतिहासातील महत्वाच्या युद्धांपैकी एक आहे.
या युद्धाचा परिणाम पुराव्याभावी माहित नसला तरी सिकंदरला या युद्धाचा विजेता मानतात.
जर सिकंदर विजेतात होता तर भारत जिंकण्यासाठीचा सिकंदराच्या सेनेतील आत्मविश्वास वाढून भारतातील पुढील मोहीम चालू ठेवली असती. परंतु तसे न होता त्याउलट सिकंदरची सेने भयभीत होऊन खचली. सिकंदरकडे परत जाण्याची मागणी करू लागले.

चंद्रगुप्त मौर्य:

चाणक्यांसारखे गुरूंच्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त मौर्याने सिकंदरसारख्या परकीय आक्रमकांच्या विरोधकांची अखंड भारताची मोहीम हाती घेतली.
“जर परकीय आक्रमणांचा सामना करायचा असेल तर भारतात एकछत्री एकसंघ राज्य असणे गरजेचे आहे”
चाणक्याच्या या विचारला मूर्तिरूप देण्याचे काम चंद्रगुप्त मौर्य यांनी केले. गर्विष्ठ, लालची आणि स्वार्थी अशा मगध राजा धनानंदचा वध करून चंद्रगुप्ताने मगधचे साम्राज्य जिंकले. पश्चिमेकडे तसेच उत्तरेकडे साम्राज्यविस्तार करून भारतात एकछत्री अंमल प्रस्तापित करण्यात चंद्रगुप्त यांनी यश मिळवले.

गौतमीपुत्र सातकर्णी:

इसवी सणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकात दख्खनवर सातवाहन राजांनी राज्य केले. इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात झालेले सातवाहन राजे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढा दिला. त्यांच्या पराक्रमाने त्यांनी सर्व परकीय आक्रमकांना भारताच्या सीमेबाहेर हद्दपार केले. त्यांच्या या महत्वाच्या कामगिरीमुळे त्यानंतर सुमारे आठ शतके भारत परकीय आक्रमणांपासून मुक्त राहिला.
त्यानंतर सुमारे आठ शतकानंतर इसवी सणाच्या अकराव्या शतकात गजनीच्या महमूदाने भारतावर स्वाऱ्या केल्या. त्याने भारतातील प्रचंड संपत्ती लुटून नेली. त्याच्या आक्रमणामागील हेतू भारतीय संपत्ती लुटण्याचा होता. त्याने साम्राज्यवादाला प्राधान्य दिले नाही.

त्यानंतर लागोपाठच्या इसवी सणाच्या बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले. त्याचा आक्रमणामागील उद्देश संपत्ती लुटण्याबरोबर भारतावर स्वामित्व प्रस्थापित करण्याचा होता.

पृथ्वीराज चौहान:

यांना भारतात पराक्रम, साहस, कर्तव्यनिष्ठतेचे प्रतीक मानतात. मोहम्मद घोरीच्या आक्रमणांना त्यांनी जोरदार प्रत्योत्तर दिले. परंतु, मोहम्मद घोरीच्या तिसऱ्या आक्रमणमध्ये पृथ्वीराज चौहान यांना पराभूत करण्यात त्याला यश आले. मोहम्मद घोरीने या विजयानंतर प्रथ्वीराज यांना बंदी बनवून गझनी येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांना आंधळे करून त्यांचा अतोनात छळ केला. पृथ्वीराज रावसो प्रमाणे पृथ्वीराज चौहान यांनी त्यांच्या दरबारातील कवी चंद बरदाई यांच्या योजनेने मोहम्मद घोरीला मारण्यात यशस्वी झाले होते.

दिल्ली सल्तनत आणि राजवंश:

पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवाबरोबर दिल्लीत सुल्तानशाहीची सुरुवात झाली. त्यानंतर लागोपाठ खिल्जी, स्लेव्ह/ इलबरी/ मामेल्युक/ घुलम, तुघलक, सईद, लोदी या राजवंशानी दिल्लीच्या गादीवर राज्य केले. इब्राहिम लोदी या शेवटच्या सुलतानाचा पराभव करून बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुघल राजवंशाला उखडून घराचा रस्ता दाखवण्याचे काम सूरी घराण्याच्या शेर शाह सूरी याने केले. त्याच्या मुलगा इस्लाम शाह सुरीच्या मृत्यूनंतर मात्र हुमायूनने परत दिल्लीची गादी मिळवण्यात यशस्वी झाला.
हुमायूनचा मुलगा अकबर अवघ्या १३ वर्षाचा असताना दिल्लीच्या गादीवर आला. हेमूसारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव करून त्याने त्याचे सामर्थ्य दाखवले. अकबराने त्याच्या क्रूरतेवर हिंदू राजांच्या सहानूभुतीची शाल ओढली होती. हिंदू राजे खासकरून राजपूत राजाच्या पाठिंब्यामुळे अकबर भारतावर साम्राज्यवाद करण्यात यशस्वी झाला.

आणखी वाचा:

भारतीय स्मारके

मध्ययुगीन भारतीय राजे आणि स्वातंत्र्यसैनिक:

श्री कृष्णदेवराय:

हे दक्षिण भारतातील एक सामर्थ्यवान सम्राट होते. त्यांनी “विजयनगर” नावाच्या ऐतिहासिक राज्यावर 20 वर्षे राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीत विजयनगर हे साहित्य कार्य, कला, स्थापत्य कला इ. वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रगतीच्या शिखरावर पोचले. विजयनगरला भारतातील एका समृद्ध ऐतिहासिक शहरांपैकी एक मानले जाते. हे शहर मंदिरांच्या अप्रतिम सुंदरसाठी सुप्रसिद्ध होते. दक्षिणेतील विजयनगरसारख्या शक्तिशाली साम्राज्यामुळे सुमारे तीन शतके (इसवी सन १३३६-१६४६) दक्षिण भारत स्वतंत्र राहिला.
श्री कृष्णदेवराय हे विजयनगरचे सर्वांत शक्तिशाली सम्राट होते.

महाराणा प्रताप:

हे मेवाडच्या गादीचे राजे होते. अकबरासारख्या सामर्थ्यशाली आणि महत्वाकांक्षी सम्राटाविरुद्ध लढा देण्याचे काम महाराणा प्रतापांनी केले. अकबराने त्याच्या लष्करी बळावर मेवाडच्या जिंकण्याचे अनेकदा प्रयत्न केले. पण स्वतंत्रप्रेमी महाराणा प्रतापांनी सर्वस्वाचा त्याग करून मेवाड राखले. अकबर बादशहाला शेवटपर्यंत मेवाडचा संपूर्ण प्रदेश मुघल साम्राज्याखाली आणता आला नाही.

अकबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर दिल्लीच्या गादीवर आला. त्यानंतर शाहजहाँ व त्यानंतर औरंगझेब याने दिल्लीच्या गादीवर हुकूमत केली. औरंगझेबाच्या काळात राजपूत राजांनी सुरु केलेला संघर्ष पुढे मराठ्यांनी यशस्वीपणे चालू ठेवला.

छत्रपती शिवाजी महाराज:

स्वराज्याचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. चारी दिशांनी बलाढ्य शत्रू अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य राखले. त्यांनी आदिलशाह, निजामशाह, मुघल, जंजिऱ्याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या शक्तिशाली सत्तेविरुद्ध लढा दिला. त्यांनी गडकोटांचे महत्व ओळखून जास्तीत जास्त गाद जिंकण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराज हे अद्वितीय प्रशासन, गनिमी कावा, आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जातात.

छत्रपती संभाजी महाराज:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवकाळी निधनानंतर स्वराज्याचे रक्षण संभाजी महाराजांनी केले. औरंगझेब, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज यांना संभाजी महाराजांनी जेरीस आणले. संभाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण मोहिमेत त्यांना चांगले यश आले. परंतु, दुर्दैवाने जवळच्या नातेवाईकांच्या फितुरीमुळे ते मुघलांच्या हाती लागले. औरंगझेबाच्या आदेशाने त्यांना अतिशय वेदनास्पद यातना देऊन मारण्यात आले. त्यांची कारकीर्द जरी लहान असली तरी त्याचे कार्य मात्र असामान्य होते.

ब्रिटिशांचा भारतातील वाढता प्रभाव:

इसवी सन १७६१ सालच्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर भारतात मराठ्यांचा प्रभाव कमी झाला. मराठ्यांचे भारतावरील वर्चस्व कमी झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली. इसवी सन १७५७ सालापासून इंग्रजांचे भारतावरील वर्चस्व वाढायला सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेक स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारकांनी संघर्ष केला. खालील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा दिला.

भारतीय स्वातंत्र्यसंग्राम:

भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची नावे तर अमर्याद आहेत. असे अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांच्याबद्दल कुणालाही माहित नाही. अशा असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीला परकीय गुलामीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले होते. भारतामधील आपसांतील वादाचा फायदा घेऊन राज्यकर्ते बनलेल्या जुलमी ब्रिटिश सरकारविरोधी या क्रांतिकारकांनी रणशिंग फुंकले.
व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीनुसार कार्यकर्त्यांचे दोन गट झाले होते. पहिला म्हणजे मवाळवादी जो गट सहिष्णुता, बंधुता, अहिंसावादी तत्वाला मानणारा होता. दुसरा जहालवादी हा गट मवाळवादी तत्वाला मानणारा नव्हता.
विदेशी साम्राज्यवादाविरुद्ध लढा देण्यासाठी भारतात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात या क्रांतिकारकांचे कार्य थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

आधुनिक भारतातील स्वातंत्र्य सैनिक:

तात्या टोपे:

जन्म: १८१४, मृत्यू: १८ एप्रिल, १८५९
भारतीय स्वातंत्र्ययुद्धामधे तात्या टोपेंचे कार्य अतुलनीय होते. त्यांनी १८५७ च्या उठावात भारतीय सेनेच्या तुकडीचे सेनापती म्हणून काम पहिले. तात्या टोपेंच्या अफाट नेतृत्वकौशल्यामुळे ब्रिटिश जनरल विंडहॅमला माघार घेण्यास भाग पाडले. झाशीला वाचवण्यासाठी त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईंना ब्रिटिशांच्या विरुद्ध मदत केली. परंतु, त्यांचे प्रयत्न विफल गेले. झाशी मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर लक्ष्मीबाईंना ग्वालीयार ताब्यात घ्यायला टोपेंनी मदत केली.

राणी लक्ष्मीबाई:

लक्ष्मीबाईंना भारतीय स्त्रीशक्तीची अद्वितीय उदाहरण मानले जाते. झाशीला वाचवण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात त्यांनी लढा दिला. तात्या टोपे, नानासाहेब पेशवा यांच्यासमवेत राणी लक्ष्मीबाईंनी कानपूरमधून तसेच ग्वालियारमधून लढे दिले. राणी लक्ष्मीबाई ग्वालियारमधील युद्धामध्ये धारातीर्थी पडल्या. लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश गव्हर्नरने झाशीवर डॉर्क्टरीण ऑफ लाप्सीचा अवलंब केला.

नाना साहेब:

जन्म: १९ मे, १८२४, मृत्यू: १८५७
नाना साहेबांनी १८५७ च्या उठावामध्ये भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व केले. ब्रिटिश सैन्याचा कानपूरमध्ये पराभव क्रांतिकाराना त्यांनी स्वातंत्र्याची नवी उमेद दिली. नाना साहेब हे एक सक्षम प्रशासक होते. त्यांनी १८५७ च्या उठावात जवळपास २०००० सैनिकांचे नेतृत्व केले.

राजर्षी शाहू महाराज:

यांच्या काळात भारतात इंग्रज राजवट होती. शाहू महाराजांनी अनेक समाजसुधारक कामे केली. त्यांच्याकडे अधिकार मर्यादित होते. परंतु, त्याचा पुरेपूर सदुपयोग त्यांनी समाजासाठी केला. धरणे बंधने, औद्योगिक क्षेत्रातील विकास, कला व क्रीडा क्षेत्रातील विकास, मागासलेल्या समाजाला शिक्षण देणे यांसारखी असंख्य कामे त्यांनी केली.

कुंवर सिंग:

जन्म: नोव्हेंबर १७७७, मृत्यू: २६ एप्रिल, १८५८
कुंवर सिंग यांनी भारतीय सैनिक तुकडीचे नेतृत्व केले होते. ते गनिमी कावा युद्धतंत्रात निपुण होते. स्वतःच्या वयाची तमा न बाळगता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. या लढ्यात सैन्याचे नेतृत्व करताना त्यांचे वय सुमारे ८० वर्ष होते. प्रिय मातृभूमीच्या स्वतंत्रतेच्या विचाराने झपाटलेले कुंवर सिंग हे त्याच्या अदम्य साहस आणि शौर्यासाठी प्रसिद्ध होते. कुंवर सिंग यांनी ब्रिटिश कॅप्टन ले ग्रॅन्डच्या सैन्याला पराभूत केले होते.

बाळ गंगाधर टिळक:

जन्म: २३ जुलै १८५६, मृत्यू: १ ऑगस्ट १९२०
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी गर्जना करणारे लोकमान्य बालगंगाधर टिळक. टिळक हे लहानपणापासूनच त्यांच्या बंडखोर स्वभावाची प्रसिद्ध होते. एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्यांना ती सहन होत नसे.
इंग्रजांचाही भारतीय लोकांवर होणार अन्याय त्यांना सहन होत नव्हता. या अन्यायी शासनाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरु केले. त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठावाचा एक भाग म्हणून नवीन शाळा सुरु केल्या. लाल-बाल-पाल यामधील बाल म्हणजे बाळगंगाधर टिळक होते.
सर्व भारतीय लोकांनी त्यांना आपला नेता मानले. त्यामुळे त्यांना “लोकमान्य” ही उपाधी मिळाली.

मंगल पांडे:

जन्म: १९ जुलै, १८२७, मृत्यू: ८ एप्रिल, १८५७
सन १८५७ चा उठाव सुरु करण्यासाठी मंगल पांडे यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळीबार चालू केला. ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुप्तपणे ते पकडत. त्यांनी सुरु केलेला हा हल्ला १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात मानली जाते.

बेगम हजरत महल:

जन्म: १८२०, मृत्यू: ७ एप्रिल, १८७९
सन १८५७ च्या उठावामध्ये फैसाबादचे मौलवी अहमदुल्लाह शाह, नाना साहेब या प्रभावी नेत्यासमवेत कार्यरत होत्या. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीविरोधात त्यांनी लखनौमधून बंड पुकारले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मंदिरे आणि मशिदी पाडण्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले. यानंतर त्यांना माघार घेऊन नेपाळमध्ये शरण घ्यावी लागली. त्यांचे कार्य भारतीय स्त्रीशक्तीची जाणीव करून देणारे एक चांगले उदाहरण आहे.

अशफाकुल्ला खान:

जन्म: २२ ऑक्टोबर, १९००, मृत्यू: १९ डिसेंबर, १९२७
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमधील क्रांतिकारी कार्यांना तोंड देणारे ते एक महत्वाचे क्रांतिकारक होते. काकोरी षड्यंत्रात सामील होऊन त्यांनी संघटनेसाठी निधी उभा करण्यासाठी प्रयत्न केले. इतर साथीदारांसह टाकलेल्या या दरोड्यात एका प्रवाशी अनावधानाने मारला गेला. ब्रिटिश शासनाने याला मनुष्यवध घोषित करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यामुळे, या आदेशानंतर दहा महिन्यांनी अशफाकुल्ला खान यांना दिल्लीत पकडण्यात आले. इंग्रज शासनाने त्यांना फाशीची शिक्षा दिली.

राणी गायदिनिल्यू:

जन्म: १८२०, मृत्यू: ७ एप्रिल, १८७९
अगदी लहानपणापासून मातृभूमीसाठी राणी गायदिनिल्यू यांच्या मनात अपार प्रेम होते. हेच कारण होते की, अगदी १३ वर्षाच्या युवती असताना त्यांनी प्रथमतः चळवळीत भाग घेतला. ब्रिटिश शासनाला मणिपूरमधून पूणपणे उखाडण्यासाठी त्यांनी बंड पुकारले. त्यासाठी बराच काळ त्यांनी लढा दिला. त्या एक प्रभावी नेता होत्या.

बिपीनचंद्र पाल:

जन्म: ७ नोव्हेंबर, १८५८, मृत्यू: २० मे, १९३२
बिपीनचंद्र पाल एक प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते.
लाल- बाल- पाल मधील पाल हे बिपीनचंद्र पाल होते. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे त्यांना क्रांतिकारी विचारांचे जनक म्हटले जाते.

चंद्रशेखर आझाद:

जन्म: २३ जुलै, १९०६, मृत्यू: २७ फेब्रुवारी, १९३१
भगतसिंग आणि इतर साथीदारांसह आझादांनी “हिंदुस्थान सोसायलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” ची पुनर्रचना केली. चंद्रशेखर आझाद हे कडक स्वभावाचे क्रांतिकारक होते. भगतसिंग हे त्यांचे चांगले मित्र होते.
आल्फ्रेड पार्कमध्ये झालेल्या इंग्रज पोलीस आणि आझादांच्या चकमकीत ते घायाळ झाले होते. चकमकीत काही पोलिसांना ठार केले. त्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या कधीही हाती न लागण्याची शपथ घेतली होती. ती शपथ त्यांनी शेवटपर्यंत वाहिली.

हकीम अजमल खान:

जन्म: ११ फेब्रुवारी, १८६८, मृत्यू: २९ डिसेंबर, १९२७
हकीम अजमल खान हे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात उतरण्यापूर्वी पेशाने डॉक्टर होते. सन १९२० साली त्यांनी जामिया मिला इस्लामिया विद्यापीठाची स्थापना केली. इतर मुस्लिम साथीदारांसह त्यांनी खिलाफत चळवळीत भाग घेतला. या चळवळीत मौलाना आझाद आणि शौकत अली हे त्यांचे साथीदार होते.

चित्तरंजन दास:

जन्म: ५ नोव्हेंबर, १८६९, मृत्यू: १६ जून, १९२५
चित्तरंजन दास यांनी राष्ट्रीय चळवळीत त्यांचे अमूल्य योगदान दिले होते. त्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना करून राजकीय स्वतंत्रता मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
चित्तरंजन दास हे पेशाने वकील होते. अरविंद घोष यांच्याविरुद्ध ब्रिटिशांनी केलेल्या फौजदारी गुन्ह्यातून त्यांना बाहेर काढणे जरुरी होते. या खटल्यात घोष यांचा बचाव करण्याचे श्रेय चित्तरंजन दास यांनाच जाते. चित्तरंजन दास यांनी बऱ्याचदा सुभाषचंद्र बोस यांचे मार्गदर्शन केले होते. सुभाषचंद्र बोस हे त्यांचे चांगले मित्र होते. यामुळे, सुभाषचंद्र बोस आणि चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून संबोधित केले जाते.

सिद्धू मुर्म आणि कान्हू मुर्म:

झारखंडमधील संताळ गटाने १८५७ उठावात मोठी कामगिरी केली होती. सिद्धू मुर्म आणि कान्हू मुर्म यांनी सुमारे १०,००० संताळ लोकांचे नेतृत्व केले होते. ब्रिटिश वसाहतवाद विरोधात त्यांनी बंड केला होता. संताळ चळवळ १८५७ च्या उठवतील यशस्वी चळवळ मानली जाते. इंग्रज सरकारने सिद्धू आणि कान्हू यांना पकडण्यासाठी सुमारे १०,००० रुपयांचा इनाम जारी केला होता. यामधून, ते ब्रिटिश राजवटीसाठी किती घातक होते, हे दिसून येते.

बिरसा मुंडा:

जन्म: १५ नोव्हेंबर १८७५, मृत्यू: ९ जून १९००
बिरसा मुंडा एक धार्मिक पुढारी नेते म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय लोकांचा असणारा धार्मिक विश्वास चळवळींमध्ये उपयोगी ठरू शकतो हे त्यांनी ओळखले. त्यांनी त्यांच्यावरील आणि देवावरील लोकांचा असणारा विश्वास उठवासाठी वापरला. ते त्यांच्या लढाईमध्ये गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करीत होते. त्यांच्या अचानक केलेल्या आक्रमणामुळे इंग्रज सैन्य गडबडून जात होते. बिरसा मुंडा याना सन १९०० मध्ये त्यांच्या फौजी दस्त्याबरोबर पकडले. ब्रिटिश शासनाने त्यांना दोषी ठरवून रांची येथील कारावासात टाकले.

टिळका मांझी:

या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात भाग घेणाऱ्या पहिल्या बंडखोर होत्या. इंग्रजांच्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी त्यांनी आदिवासींना बरोबर घेतले. यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांना माहित न होऊ देता, पकडून त्यांना ठार मारत. मंगल पांडेनीदेखील १०० वर्ष्यानंतर यांच्यासारखेच कार्य केले होते.

सूर्य सेन:

यांनी सशस्त्र दलाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक तडफदार तरुणांना क्रांतिकारक बनवले होते. क्रांतिकारी कार्यांमध्ये त्यांनी पोलीस दलाची शस्रास्रे छापा टाकून गोळा केली होती. त्यांना चित्तगाव येथील पोलिसांच्या शस्रास्रांचा ठिकाणा लागला होता. या शस्रास्रांचा वापर त्यांनी पुढील मोहिमा राबवण्यासाठी केला.

सुब्रमण्यम भारती:

यांनी भारतीय साहित्यामध्ये स्वतःचे अमूल्य योगदान दिले. सुब्रमण्यम भारती या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसेनानींना प्रेरणा दिली होती. त्यांच्या साहित्यामध्ये देशभक्तीचा भाव आपणाला पाहायला मिळतो. सन १९०८ मध्ये इंग्रज शासनाने सुब्रमण्यम भारती यांना पकडण्यासाठी वारंट काढले. त्यामुळे त्यांना पुडुचेरी येथे शरण घ्यावी लागली. त्यांनी पुढील क्रांतिकारी कारवाया पुडुचेरी येथून चालू ठेवल्या. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.

दादाभाई नौरोजी:

यांचा इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाची स्थापना करण्यात मोठा वाटा होता. ते ब्रिटिश राजवटीतील पहिले भारतीय खासदार (एम. पी.) होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात ब्रिटिशांच्या वसाहतवाद आणि त्याचा हेतू यांवर सविस्तर माहिती मिळते. या पुस्तकातून आपल्याला इंग्रजांचा भारतीय संपत्ती लुटण्याचा हेतू स्पष्ट होतो.

जवाहरलाल नेहरू:

हे भारतातील स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक होते. यांनी “डिस्कवरी ऑफ इंडिया” हे पुस्तक लिहिले. जवाहरलाल नेहरूंना लहान मुले अत्यंत प्रिय होती. लहान मुले त्यांना प्रेमाने “चाचा नेहरू” म्हणून संबोधत होते. हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांच्या कारकिर्दीत स्वतंत्र भारताच्या आर्थिक विकासासाठी नियोजित पद्धतीचा अवलंब केला होता.

खुदिराम बोस:

हे एक तरुण क्रांतिकारकांपैकी होते, ज्याच्या कार्याने इंग्रज राजवटीवर मोठा परिणाम झाला. त्यांनी विदेशी बनावटीच्या औषधांची चव ब्रिटिशांना दिली. अवघ्या १९ वर्षांच्या वयात त्यांना बलिदान द्यावे लागले.

लक्ष्मी सहगल:

या पेशाने एक डॉक्टर होत्या. या सुभाष चंद्र बोस यांच्या फौजेतील कॅप्टन होत्या. त्यांनी नवीन महिलांना प्रेरित करून त्यांना सैन्यात करण्याचे कार्य केले. त्यांनी स्थापनेसाठी पुढाकार घेऊन झाशीची राणी रेजिमेंट असे नाव दिले. लक्ष्मी सहगल या एक धाडसी महिला होत्या. स्वातंत्र्ययुद्धात त्या त्वेषाने लढल्या होत्या. परंतु, १९४५ मध्ये त्यांना अटक झाली.

लाला हर दयाल:

भारतीय स्वातंत्र्ययुद्धामधे लाला हर दयाल यांनी शेकडो आदिवासींमध्ये एकी निर्माण केली. तसेच त्यांना इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास त्यांनी उद्युक्त केले. त्यांनी १९०९ मध्ये पॅरिस इंडियन सोसायटी स्थापित बंदे मातरमचे संपादक म्हणून काम केले.

लाला लजपत राय:

हे इंडियन नॅशनल काँग्रेसमधील सदस्य होते. ते इंडियन नॅशनल काँग्रेस मधील महत्वाच्या सदस्यांपैकी एक होते. सायमन कमिशन विरोधात त्यांनी प्रखर निषेध व्यक्त केला. यावेळी, पोलीस अधिक्षक जेम्स स्कॉट यांनी त्यांच्यावर व इतर कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात लालाजी जबर जखमी झाले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महादेव गोविंद रानडे:

पेशाने न्यायाधीश असलेले महादेव रानडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते. त्यांनी मुंबईच्या उच्य न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले होते. याव्यतिरिक्त, त्यांनी समाजसुधारक म्हणूनही अनेक कामे केली. समाजातील अन्यायी प्रथांना बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि महिला सक्षमीकरण करण्यास त्यांचे योगदान दिले.

महात्मा गांधी:

हे शांती, सत्य, अहिंसा या मार्गांचा निषेधात अवलंब करायचे. त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. त्यांनी काढलेली दांडी यात्रा स्वातंत्र्ययुद्धातील एक प्रसिद्ध निषेध होता. गांधीजींनी स्वातंत्र्यपूर्व अशा अनेक चळवळींचे नेतृत्व केले होते. यांना सर्वात महत्वाचे भारतीय स्वातंत्र्यसैनिक मानले जाते. कारण, यांच्या मार्गाने शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळायला खूप मदत झाली.

मौलाना अब्दुल कलाम आझाद:

यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. ते एक महान क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे १९२३ मध्ये ३५व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनामध्ये ते सर्वांत तरुण अध्यक्ष कार्यकर्ते होते.

मोतीलाल नेहरू:

स्वतंत्र भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पिता म्हणजेच मोतीलाल नेहरू एक महत्वाचे स्वातंत्र्यसैनिक होते. भारतीय राष्ट्रीय चळवळीचे सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमधील हे एक होते. महात्मा गांधींच्या इंग्रजविरोधी असहकार चळवळीमध्ये यांनीदेखील भाग घेतला होता. या चळवळीत त्यांनी केलेल्या निषेधामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.

राम मनोहर लोहिया:

हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये कायम सक्रिय असणारे सदस्य होते. राम मनोहर लोहिया हे काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे सदस्य होते. काँग्रेसच्या ब्रिटिश शासनाविरोधी गुप्तसंदेश प्रसारित करणाऱ्या रेडिओतही यांनी काम केले होते.

राम प्रसाद बिस्मिल:

हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आतुरतेने भाग घेऊन बलिदानाची तत्पर असणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक होते. हिंदुस्थान रिपब्लिकन अससोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रसिद्ध काकोरी दरोड्यातील कारस्थानात यांचा समावेश होता. या घटनेला मूर्तिरूप देणाऱ्या गटात दे महत्वाचे सदस्य होते. या दरोड्यात एका प्रवाशाचा नकळत मृत्यू झाला. यानंतर राम प्रसाद बिस्मिल यांबरोबर त्यांच्या साथीदारांना दोषी ठरवून, त्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला.

राम सिंग कुका:

प्रख्यात समाजसुधारक रामसिंग कुका यांनी ब्रिटीश माल आणि सेवा वापरण्यास नकार दिला. त्यामुळे ते असहकार आंदोलन सुरु करणारे पहिले भारतीय म्हणून ओळखले जात. ब्रिटिशविरोधी चळवळींमध्ये समाजसुधारणेचे महत्व त्यांना कळले, त्यामुळे त्यांनी समाजसुधारक कार्यांना महत्व दिले.

रास बिहारी बोस:

गादर विद्रोह आणि भारतीय राष्ट्रीय सेने यांचे आयोजन करण्यामागे यांचाच हात होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मदत करण्यासाठी जपानी सैन्याला राजी करण्यात यांचा मोठा वाटा होता. ते व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंगे यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये होते.

सरदार वल्लभभाई पटेल:

भारताचे “लोह पुरुष” प्रसिद्ध असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. परंतु, मातृभूमीला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपला व्यवसाय सोडला. बार्डोली सत्याग्रहात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली. त्यांनी जास्तीत जास्त रियासत भारतामध्ये सामील करण्यात मदत केली. स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान होऊन त्यांनी भारताच्या एकीकरणाचा महत्वाची भूमिका बजावली.

भगतसिंग:

यांचे मित्र चंद्रशेखर आझाद व इतर सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. ब्रिटिश सरकारला जागे करून त्यांनी केलेल्या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी भगतसिंग यांनी विधानसभेत बॉम्ब फेकला.
यामध्ये त्यांचा हेतू कुणाचीही प्राणहानी करण्याचा नव्हता. या घटनेनंतर वयाच्या ३०व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा झाली. भगतसिंग यांना भारतात धैर्य, शौर्य, आणि त्यागाचे प्रतीक मानतात. देशासाठी त्यांची असणारी कर्तव्यनिष्ठ आजही प्रत्येक भारतीयांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत आहे.

शिवराम राजगुरू:

हे भगतसिंग, सुखदेव यांचे जवळचे मित्र होते. ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे एक महत्वाचे सदस्य होते.
लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ते मृत्यूला जबाबदार जेम्स स्कॉटला मारण्याची योजनेत सामील झाले. परंतु, यामध्ये जेम्स स्कॉट समजून पोलीस अधीक्षक जॉन सॅंडर्सची हत्या झाली.

सुभाष चंद्र बोस:

सुभाषचंद्र बोस हे भारतातील एक लोकप्रिय नेता होते. त्यामुळे त्यांना नेताजी या नावाने संबोधले जात. ते काँग्रेस युवा संघटनेचे नेते होते. तसेच, त्यांना १९३७ ते १९३९ मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष निवडले होते. त्यांनी राष्ट्रीय सशस्त्र सैन्याचे स्थापना केली. त्यांनी अनेक तरुण स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरित केले. “चलो दिल्ली” आणि “तुम मुझे खून दो, में तुम्हे आझादी दूंगा!” यासारख्या घोषणा त्यांनी दिले.

सुखदेव:

यांनी भगतसिंग, राजगुरू यांचे सहकारी मित्र तसेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य म्हणून कार्य केले. त्यांच्या इतर साथीदारांसह सुखदेवही जॉन सॅंडर्सच्या हत्येत सामील होते. मित्र भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर सुखदेव यांनाही पकडण्यात आले. वयाच्या अवघ्या २४व्या त्यांना फाशीची शिक्षा झाली.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी:

यांना भारतीय राजकारणाचे दीपस्तंभ मानले जाते. ते इंडियन लिबेशन फेडेरेशनचे तसेच इंडियन नॅशनल असोसिएशनचे संस्थापक होते. ब्रिटिश सरकारविरोधी निषेधात त्यांनी “द बंगाली” वृत्तपत्र चालू केले. ब्रिटिशविरोधी टीका प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना १८८३ मध्ये अटक झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून १८९५ व १९०२ मध्ये निवडण्यात आले.

अल्लुरी सीताराम राजू:

यांनी एकामागे एक ब्रिटिश सैनिक अधिकाऱ्यांची हत्या करण्याचे सत्र चालू केले. त्यांच्या साथीदारांबरोबर त्यांनी पोलीस ठाण्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त केला. ब्रिटिश सरकारने मंजुरी दिलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी १९२२ साली रम्पा विद्रोह सुरु केला होता.

विनायक दामोदरराव सावरकर:

हे भारतीय लोकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून प्रसिद्ध होते. ते प्रख्यात लेखक होते, त्यांनी भारतीय स्वतंत्रयुद्ध हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी १८५७ मधील क्रांतिकारकांच्या संघर्ष्याचे वर्णन केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली. सावरकर हे फ्री इंडिया सोसायटीचेही संस्थापक होते. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील सावरकर हे महत्वाचे स्वतंत्रसेनानी होती.

भीम सेन सच्चर:

हे पेशाने वकील होते. दुसऱ्या क्रांतिकारकांपासून प्रेरणा घेऊन अगदी तरुण वयात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यांनाच पंजाब कमिटीचे सेक्रेटरी केले होते. विशेष म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही त्यांचा स्वातंत्र्यलढा चालूच होता. कारण, ते इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीला विरोध करत होते. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये इंदिरा गांधींविरोधात आवाज उठल्याने ते बऱ्यापैकी अडचणीत आले.

आचार्य कृपलानी:

यांचे खरे नाव जीवातराम भगवानदास कृपलानी होते. ते गांधीवादी समाजवादी आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते होते. ते गांधीजींचे अनुयायी असल्याने त्यांनी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला. असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, नागरी अवज्ञा आणि भारत छोडो या महत्वाच्या चळवळींमध्ये ते सहभागी होते.

अरुण असफ अली:

हे काँग्रेस पक्षाचे सदस्य तसेच सक्रिय कार्यकर्ते होते. यांनी भारत छोडो आंदोलन तसेच मिठाच्या सत्याग्रहात त्याचा सहभाग होता. भारत छोडो चळवळीदरम्यान तर यांनी मुंबईत INS (भारतीय राष्ट्रीय चळवळीचा) झंडा फडकावला होता.
त्यांच्या देशप्रेमामुळे त्यांनी वेळोवेळी आपले योगदान दिले. यांना बऱ्याचदा अटक झाली. गांधी इर्विन कराराखाली राजकीय कैद्यांना सोडेपर्यंत त्यांना १९३१ पर्यंत तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी कधीही दिरंगाई केली नाही.

जतींद्र मोहन सेनगुप्ता:

पेशाने वकील असलेले जतींद्र मोहन सेन गुप्ता यांनी त्यांच्या व्यवसायामार्फत स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिले. अनेक क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा देण्यापासून त्यांनी वाचवले. असहकार चळवळ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले. यांनाही त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याचदा अटक झाली होती. यांचा मृत्यू रांची येथील कारावासात झाला.

मदन मोहन मालविया:

हे असहकार आंदोलनातील महत्वाचे सदस्य होते. यांनी दोनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. १९२८ मधील सायमन कमिशन विरोधातील निषेधात मालविया या मध्यवर्ती व्यक्ती होत्या. २५ एप्रिल १९३२ नागरी अवज्ञा चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक झाली.

नेल्ली सेनगुप्ता:

या एक ब्रिटिश नागरिक होत्या. त्यांचे पूर्ण नाव एडिथ एलेन ग्रे हे होते. यांनी जतींद्र सेनगुप्तांशी लग्न केले. त्यानंतर त्यांनी भारतातच राहून अन्यायी ब्रिटिश शासनाविरोधात लढा दिला. त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला होता. त्यासाठी, त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला होता.

पंडित बाळकृष्ण शर्मा:

व्यवसायाने हे पत्रकार होते. यांचा अनेक तरुण स्वातंत्र्यसेनानींना तयार करण्यात यांचा मोठा वाट होता. यांनी अनेक भारतीय नागरिकांना प्रेरित करून स्वातंत्र्यसेनानींमध्ये परिवर्तित केले. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अवघ्या सहा वेळेस अटक झाली. यांनी अनेक चळवळीत भाग घेतला. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सदस्यही होते.
इंग्रज शासनाने त्यांना “धोकादायक कैदी” घोषित केले, यावरून आपल्याला त्यांच्या कार्याचे महत्व समजू शकते.

सुचेता कृपलानी:

या स्वातंत्र्यपूर्व काळातील “अखिल भारतीय महिला काँग्रेस”च्या संस्थापक होत्या. हे भारत छोडो आंदोलनाचे सदस्य झाले. फाळणीच्या वेळी त्या गांधीजींच्या सहकारी झाल्या. स्वतंत्रपूर्व भारतातील त्या एक महत्वाच्या नेता होत्या. त्या देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या.

राजकुमारी अमृत कौर:

या १९३० मधील अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सहसंस्थापक होत्या. त्या गांधीजींच्या दांडी यात्रेतील महत्वाच्या सदस्या होत्या. भारत छोडो आंदोलनातही त्या सामील होत्या. या दोन्ही आंदोलनातील सहभागाबद्दल त्यांनी कारावास भोगला होता.

ई. एम. एस. नंबुदरीपाथ:

हे काँग्रेस सोशालिस्ट पक्षाचे सहसंथपक होते. त्यांचे मूळ नाव एलम कुलम मानक्कल शंकराने नंबुदरीपाथ होते. ते त्यांच्या नावाचे प्रथमाक्षाराने म्हणजेच ई. एम. एस. या नावाने प्रसिद्ध होते. महात्मा गांधींचे जवळचे साथीदार ई. एम. एस. हे केरळचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते कम्युनिस्ट होते. त्यांना कट्टर हिंदूवादीही म्हणत. त्यांच्या महाविद्यालयीन काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक कार्यकर्ते होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

पुष्पलता दास:

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या पुष्पलता दास या लहानपणापासूनच साहसी होत्या. त्यांनी क्रांतिकारी कार्याची सुरुवात बालपणापासूनच केली होती. भगतसिंग यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात त्यांनी शाळेतील मुली एकत्र करवून निषेध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी भारत छोडो तसेच नागरी अवज्ञा आंदोलनात भाग घेतला. या चळवळीतील सहभागासाठी त्यांना अटकही झाली होती.

सागरमल गोपा:

हे अद्वितीय लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी “जैसलमेर का गुंडाराज” व “आजादी के दिवाने” यांसारखी अजोड पुस्तके लिहिली. ब्रिटिश राज्यकर्त्यांचा निषेधाचा परिणाम म्हणून त्यांना जैसलमेर आणि हैद्राबादमधून हद्दपार केले होते. सागरमल गोपा यांना वयाच्या ४६व्या वर्षी कारावासात यातना देऊन ठार मारण्यात आले.

मादाम भिकाजी कामा:

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान स्वातंत्र्यसेनानींपैकी एक होत्या. भारताबाहेरील स्वातंत्र्यचळवळींना प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेऊन भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान यांनीच मिळवला. मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी ऐषआरामाचे जीवन सोडून वनात वास्तव्य केले होते.

दामोदर हरी चाफेकर:

सन १८९६ मध्ये पुण्यामध्ये ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. प्लेगसारख्या भयानक साथीच्या रोगाला रोखण्यासाठी ब्रिटिश सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली. डब्लू. सी. रँड हा अधिकारी या समितीचे अध्यक्ष होता. रँडला ठार मारण्याचे काम दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे भाऊ बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी केले. रँडच्या हत्येने चाफेकर बंधूना अटक झाली. त्यानंतर त्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला.

बाळकृष्ण हरी चाफेकर:

पुण्यातील प्लेगच्या साथीला लढा देण्याच्या उद्देशाने इंग्रज शासनाने एक समिती तयार केली. दामोदर हरी चाफेकर आणि बंधू बाळकृष्ण हरी चाफेकरांनी मिळून रँडला ठार मारले.
सावधगिरीचा पडद्याआड रँड याने प्रशासकीय ताकतीचा गैरवापर करत स्त्रियांचे सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने तपासणी केली. या गैरव्यवहाराला उत्तर देण्यासाठी चाफेकर बंधूनी रँडला मारण्याची योजना आखली होती.

बाबा गुरदीत सिंग:

भारतीय स्वातंत्र्यलढा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी परदेशातूनही हा लढा दिला पाहिजे. यादरम्यान, अमेरिका, कॅनडासारख्या देशांनी आशियायी लोकांचा प्रवेश निषिद्ध केला. या देशांचे कायदा बदलण्याच्या उद्देशाने गुरदीत सिंग यांनी कॅनडाचा प्रवेश सुरु केला. तसेच येथील कोमगाता घटनेत सहभाग घेतला.

उधम सिंग:

हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसेनानींपैकी महत्वाचे कार्यकर्ते होते. १३ मार्च सन १९४० रोजी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी या हत्याकांडाला कारणीभूत सर मायकल ओ’ ड्वायरची हत्या केले होती. यासाठी उधम सिंग यांना जबाबदार ठरवून मृत्युदंड ठोठावण्यात आला.

श्यामजी कृष्णा वर्मा:

यांचे बाबा गुरदीत सिंग यांच्यासारखे विचार होते. यांनीही भारताबाहेरून लढा दिला. भारतीय स्वातंत्र्यसेनानी व क्रांतीकारकांना प्रेरणा देण्याचे काम श्यामजी कृष्णा वर्मा यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी “द इंडियन सोशिओलॉजिस्ट “, “इंडियन होम रुल सोसायटी”, “इंडिया हाऊस” यांची लंडन शहरात स्थापना केली.

गणेश शंकर विध्यार्थी:

हे पेशाने पत्रकार होते. त्याचप्रमाणे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक महत्वाचे नेते होते. त्यांनी अनेक चळवळींत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळींचे ते एक प्रमुख सदस्य होते. महान क्रांतिकारक भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, यांचे हे निकटचे साथीदार होते. त्यांच्या क्रांतिकारी कार्यांमुळे त्यांना सन १९२० मध्ये कारावास भोगावा लागला.

भुलाभाई देसाई:

हे अत्यंत प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी होते. भुलाभाई देसाई वकिलीचा व्यवसाय करत. द्वितीय विश्वयुद्धादरम्यान भारतीय राष्ट्रीय सैन्यातील तीन सैनिकांचा कोर्टामध्ये यांनीच बचाव केला. गांधीजींच्या नागरी अवज्ञा प्रतिकारात सामील झाल्याने सन १९४० मध्ये भुलाभाई यांना अटक झाली.

विठ्ठलभाई पटेल:

स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलभाई पटेल हे स्वराज्य पक्षाचे सहसंथपक होते. विठ्ठलभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जेष्ठ भाऊ होते. तेच सुभाषचंद्र बोस यांचे जवळचे सहकारी होते. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गावर चालण्यासाठी ते सहमत नव्हते. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्या संपत्तीचा स्वातंत्र्यलढ्यात सदुपयोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या संपत्तीचे मूल्य १२०००० इतके होते. ती सर्व संपत्ती त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी कार्यांसाठी अर्पण केली.

गोपीनाथ बार्दोलोई:

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून गोपीनाथ यांनी स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली. ब्रिटिशविरोधी असहकार चळवळीत सहभाग घेऊन निषेध केला. त्यांच्या सहभागासाठी त्यांना एका वर्ष्यापेक्षा जास्त दिवस कारावास भोगावा लागला. ते गांधीवादी होते, तसेच गांधीजींच्या विचारांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते एक प्रबळ नेता असल्याने, ते स्वतंत्र भारताचे मुख्यमंत्री बनले.

गणेश शंकर विध्यार्थी:

हे पेशाने पत्रकार होते. त्याचप्रमाणे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक महत्वाचे नेते होते. त्यांनी अनेक चळवळींत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळींचे ते एक प्रमुख सदस्य होते. महान क्रांतिकारक भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, यांचे हे निकटचे साथीदार होते. त्यांच्या क्रांतिकारी कार्यांमुळे त्यांना सन १९२० मध्ये कारावास भोगावा लागला.

भुलाभाई देसाई:

हे अत्यंत प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी होते. भुलाभाई देसाई वकिलीचा व्यवसाय करत. द्वितीय विश्वयुद्धादरम्यान भारतीय राष्ट्रीय सैन्यातील तीन सैनिकांचा कोर्टामध्ये यांनीच बचाव केला. गांधीजींच्या नागरी अवज्ञा प्रतिकारात सामील झाल्याने सन १९४० मध्ये भुलाभाई यांना अटक झाली.

विठ्ठलभाई पटेल:

स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलभाई पटेल हे स्वराज्य पक्षाचे सहसंथपक होते. विठ्ठलभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जेष्ठ भाऊ होते. तेच सुभाषचंद्र बोस यांचे जवळचे सहकारी होते. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गावर चालण्यासाठी ते सहमत नव्हते. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्या संपत्तीचा स्वातंत्र्यलढ्यात सदुपयोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या संपत्तीचे मूल्य १२०००० इतके होते. ती सर्व संपत्ती त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी कार्यांसाठी अर्पण केली.

गोपीनाथ बार्दोलोई:

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून गोपीनाथ यांनी स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली. ब्रिटिशविरोधी असहकार चळवळीत सहभाग घेऊन निषेध केला. त्यांच्या सहभागासाठी त्यांना एका वर्ष्यापेक्षा जास्त दिवस कारावास भोगावा लागला. ते गांधीवादी होते, तसेच गांधीजींच्या विचारांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते एक प्रबळ नेता असल्याने, ते स्वतंत्र भारताचे मुख्यमंत्री बनले.

आचार्य नरेंद्र देव:

हे काँग्रेस सोशलिस्ट पक्षातील एक प्रमुख सदस्य होते. ते गांधीवादी अहिंसा करुणा यांसारख्या गांधीवादी तत्वांना ते मानत. त्यांनी लोकशाही समाजवादाला प्रोत्साहन दिले. हिंदी भाषा चळवळीत ते एक महत्वाचे कार्यकर्ते होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांना अनेकदा अटकही झाली.

अ‍ॅनी बेझंट:

या जन्मतः ब्रिटिश नागरिक असून सुद्धा भारतीयांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठाम उभ्या राहिल्या. त्यांनी भारतीय स्वराज्यनिर्मितीसाठी वकिली केले. त्यानंतर हळूहळू, त्या महत्वाच्या स्वातंत्र्यसेनानींपैकी एक बनल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या बनल्या. तसेच सन १९१७ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. त्या होम रुल लीगच्या प्रमुख सदस्या होत्या.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे योगदान देण्याकरिता त्यांनी हिंदू शाळांची बनारसमध्ये स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य करण्याकरिता त्यांनी यांसारखे अनेक प्रयत्न केले.

कस्तुरबा गांधी:

या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. महात्मा गांधींप्रमाणेच कस्तुरबा गांधीदेखील महत्वाच्या स्वातंत्र्यसेनानी होत्या. प्रत्येक स्वातंत्र्यचळवळींमधे त्यांनी अहिंसकरित्या निषेध व्यक्त केला. यादरम्यान त्यांना अनेकदा अटक झाली.

कमला नेहरू:

या जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी होते. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी विदेशी वस्तू विकणाऱ्या दुकानांचा निषेध केला. त्यासाठी त्यांनी महिलांना आवाहन करून मोर्चे काढले. महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत त्या सहभागी झाल्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अवघ्या दोन वेळा अटक झाली.

सी. राजगोपालचारी:

पेशाने वकील असलेल्या सी. राजगोपालचारी यांनी सन १९०६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पदार्पण केले त्यांनी पी. वरदलाजुलू यांचा यशस्वीरीत्या बचाव केला. गांधीजींच्या विचाराने ते प्रेरित झाले. महात्मा गांधींचे प्रखर अनुयायी बनून त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. तामिळनाडूमधून काँग्रेसचे राजगोपालचारी हे एक महत्वाचे प्रतिनिधी होते.

जे. पी. नारायण:

सन १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भाग घेतल्यानंतर महात्मा गांधींनी स्वतः त्यांचे मार्गदर्शन केले होते. स्वातंत्र्यसेनानी गंगा शरणसिंग हे जयप्रकाश नारायण यांचे जवळचे मित्र होते. भारत छोडो आणि नागरी अवज्ञा चळवळीतील त्यांच्या सहभागाने त्यांना कारावासही भोगावा लागला.

चेम्पकारमण पिल्लई:

विदेशातून भारतीय स्वातंत्र्यलढा देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींमध्ये चेम्पकारमण पिल्लई हेदेखील होते. त्यांनी जर्मनीमधून स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात केले. सुभाषचंद्र बोस यांचे ते निकटचे साथीदार होते. आजही दिल्या जाणाऱ्या नाऱ्यांमधील त्यांनी दिलेला नारा “जय हिंद” हे भारतीयांचे प्रसिद्ध घोषवाक्य आहे.

वेलू थांपी:

यांचे पूर्ण नाव वेलूधन चंपकरण थांपी हे होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या वर्चस्वावर आक्षेप घेणाऱ्या सुरुवातीच्या बंडखोरात यांचं नाव येते. किलोनच्या प्रसिद्ध लढाईत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी इंग्रजांच्या एक स्थानिक चौकीवर हल्ला केला होता. किलोनच्या लढाईत अवघ्या ३०००० सैनिकांचे त्यांनी नेतृत्व केले होते.

टी. कुमारन:

त्यांनी तरुण वयातच क्रांतिकारी कार्याची सुरुवात केली. ब्रिटिश राजवटीला त्रस्त होऊन त्यांच्या अत्याचाराची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी एक निषेध मोर्च्याचे नेतृत्व केले. यावेळी इंग्रज सैनिकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. परंतु, अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्वजाचा मन राखला.

बी. आर. आंबेडकर:

दीन-दलितांचे नेते म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब आंबेडकर हे पेशाने वकील होते. भारतातील दलित सशक्तीकरणात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. भारतात जातीव्यवस्था वैदिक काळापासून चालत आली आहे. भारतातील याच जातिव्यवस्थेचा वापर ब्रिटिशांनी भारतीयांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी केला. धर्म आणि जातीच्या आधारावर विभाजित लोकांवर राज्य करणे सोपे असते, असा इंग्रजांचा ठाम विश्वास होता.
इंग्रजांचा हा हेतू बाबासाहेब आंबेडकरांना समजला आणि त्यांनी दलित-बौद्ध चळवळीला सक्षम केले. इतरही अनेक आंदोलनांमध्ये आंबेडकरांनी भाग घेतला.

व्ही. बी. फडके:

भारतातील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाने शेतकऱ्यांचे जीवन संघर्षमय झाले होते. या जीवनाला त्रस्त होऊन वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या या जाचक नियमांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एक क्रांतिकारक गटाची स्थापना केली. त्यांनी ब्रिटिश व्यावसायिकांवर अनेक छापे टाकले. फडकेंनी पुण्यातील इंग्रज सैन्यावर केलेल्या हल्ल्याने त्यांना पुणे काबीज करण्यात यश आले.

सेनापती बापट:

त्यांनी ब्रिटनमध्ये अभियांत्रिकीचे अध्ययन करण्यासाठीची शिष्यवृत्ती मिळवली होती. परंतु, देशाला ब्रिटिशांच्या त्रासापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी बॉम्ब बनवण्याच्या कौशल्यांवर लक्ष्य केंद्रित केले. भारतात आल्यानंतर त्यांनी आधुनिक कौशल्यांच्या जोरावर त्यांनी अलीपूर येथील बॉम्बस्फोटात यश मिळवले. त्यांनी भारतातील समाजाला तसेच त्यांच्या गटात येणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर त्यांचे हेतू स्पष्ट केले.

राजेंद्र लहरी:

ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमधील एक महत्वाचे क्रांतिकारक सदस्य होते. एच. आर. ए. चे अध्यक्ष राम प्रसाद बिस्मिल आणि इतर साथीदाराचे ते जवळचे सहकारी होते. राजेंद्र लहरी हे काकोरी रेल्वे दरोड्यात सामील होते. या दरोड्यातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना अटक झाली. राजेंद्र लहरींचा दक्षिणेश्वर बॉम्बस्फोट घटनेतही सहभाग होता. त्यांना वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी मृत्युदंड देण्यात आला.

रोशन सिंग:

रोशन सिंग हेदेखील हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. काकोरी रेल्वे दरोड्यात यांचा सहभाग नव्हता. परंतु, इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील असणाऱ्या संशयामुळे त्यांना अटक त्यांना अटक केली. एवढेच नव्हे, ब्रिटिश शासनाने इतर क्रांतिकारकांबरोबर त्यांनाही दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.

जतिन दास:

यांचे पूर्ण नाव जतींद्र नाथ दास होते. त्यांना त्यांच्या क्रांतिकारी कार्यांमुळे अटक झाली. युरोपीय भागातील कैद्यांच्या तुलनेत भारतातील राजकीय कैद्यांच्या सुविधा आणि वातावरण वेगळे होते. जतिन दास यांनी याविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण चालू केली. ते उपोषण अवघ्या ६३ दिवस चालले. यातच त्यांचा वयाच्या २५व्या वर्षी मृत्यू झाला.

मदन लाल धिंग्रा:

सुरुवातीच्या क्रांतिकारकांपैकी एक मदन लाल धिंग्रा हे अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत बनले. भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. मेकॅनिकल इंजिनीरिंगचे शिक्षण घेण्याकरता ते इंग्लंडला गेले. त्यांच्या शिक्षणादरम्यान त्यांनी सर विल्यम हट्ट कर्झन वायलीची हत्या केली. त्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा झाली.

कतारसिंग सराभा:

हे प्रसिद्ध क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिश सरकारच्या निषेधासाठी त्यांनी १७ वर्षांचे असताना गदर पार्टीमध्ये प्रवेश केला. सर्व साथीदारांबरोबर गुप्त भेट करताना त्यांच्या लपण्याच्या जागेची माहिती त्यांच्याच एका साथीदाराने इंग्रज अधिकाऱ्याला दिली. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्यांना इंग्रज शासनाने मृत्युदंड ठोठावला.

व्ही. ओ. चिदंबरम:

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेता व्ही.ओ. चिदंबरम हे पेशाने वकील होते. ते त्यांच्या नावाच्या प्रथमाक्षराने म्हणजेच व्ही.ओ.सी. या नावाने प्रसिद्ध होते. भारतीय जहाजांद्वारे शिपिंग सर्विस सुरु करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते. ब्रिटिशांच्या जहाजांना टक्कर देऊन अशी सर्विस त्यांनी भारतीयांसाठी सुरु केली. ब्रिटीश शासनाने त्यांचा वाढत्या प्रभावावर अंकुश लावण्याकरिता त्यांना देशद्रोहाचा आरोप लावला. त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

किट्टर चेन्नम्मा:

१८५७च्या उठावापूर्वी लढा देणाऱ्या महिला क्रांतिकारकांमध्ये किट्टर चेन्नम्मा या एक होत्या. त्या कर्नाटक प्रातांतील रियासातच्या राजपरिवारामधील राणी होत्या. ईस्ट इंडिया कंपनीला धडा शिकवण्यासाठी त्यांनी स्वतः एका सैनिकांच्या बटालियनचे नेतृत्व केले. लेफ्टनंट सांगोली रायना आणि चेन्नम्मा यांनी गनिमी कावा युद्धतंत्राचा अवलंब केला. यांनी केलेल्या जोरदार लढाईत ब्रिटिश सैन्याला सळो की पळो करून सोडले होते.

के. एम. मुंशी:

महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते अनुयायी होते. के. एम. मुंशी यांनी केलेल्या निषेधामुळे त्यांना अनेकदा कारावास सहन करावा लागला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि तसेच स्वराज पक्षाचे सदस्य होते. यांनी गांधीजींच्या भारत छोडो आंदोलन त्याचप्रमाणे मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. यांचे पूर्ण नाव कन्हैयालाल मानेकलाल मुंशी होते. त्यांनी “भारतीय विद्या भवन” ची स्थापना केली होती.

कमलादेवी चट्टोपाध्याय:

यांना एक समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखतात. त्यांनी भारतीय स्त्रियांचा सामाजिक आणि आर्थिक स्थर उंचावण्यासाठी प्रयत्न केले. यांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात महत्वाची भूमिका बजावली. त्या काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या महत्वाच्या प्रतिनिधी होत्या. कमलादेवी काही काळानंतर त्या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. मुंबईमध्ये त्यांना निषिद्ध मालाची विक्री केल्याबद्दल अटक झाली.

गरिमेला सत्यनारायण:

हे एक कवी होते. हजारो स्वातंत्र्यसेनानींना आणि क्रांतिकारकांना त्यांनी इंग्रज राजवटीविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्या कविता आणि गीतांमार्फत प्रेरणा दिली. त्यांना नागरी अवज्ञा आंदोलनात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या आंदोलनातील त्यांचा सहभाग आणि त्यांच्या क्रांतिकारी कवितांमुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.

एन. जी. रंगा:

यांनी महात्मा गांधींनी सुरु केलेल्या आंदोलनांपासून प्रेरणा घेतली. त्यांना सन १९३३ मधील निषेधात शेतकऱ्यांच्या गटाचे नेतृत्व केले. त्यांना भारतीय शेतकरी आंदोलनात क्रांती घडविणारे एक महत्वाचे क्रांतिकारक मानतात.

यु. तिरोट सिंग:

यांनी खांसी लोकांच्या एका दलाचे नेतृत्व केले होते. यांनी इंग्रज काबीज करू इच्छिणाऱ्या खांसीच्या पर्वतरांगा राखण्याच्या कामात योगदान दिले. सैन्यबळ कमी असल्याने यांनी गनिमी काव्याचा वापर करून ब्रिटिश सैन्याची धांदल उडवली. इंग्रज चौकीवर तिरोट सिंग यांच्या हल्ल्याने अँग्लो-खांसी युद्धाला चालना मिळाली.

अब्दुल हाफिज मोहम्मद बरकतउल्ला:

परदेशातून लढणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये यांचे नाव येते. हे गदर पक्षाचे सह-संस्थापक होते. हा पक्ष सॅन फ्रान्सिस्को येथून कार्यरत होता. त्यांनी इंग्लंडमधील एका दैनिकात त्यांचे लेखही प्रकाशित केले.

महादेव देसाई:

हे महात्मा गांधी यांचे हे वैयक्तीक सचिव होते. ते एक महत्वाचे स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जातात. गांधींबरोबर त्यांनी मीठ सत्याग्रह, बार्डोली सत्याग्रह यांसारख्या बहुतेक सर्व निषेधात भाग घेतला. निषेधात भाग त्यांना अटक झाली. दुसऱ्या गोलमेल परिषदेत भाग घेणाऱ्या सदस्यांपैकी ते एक होते. त्यांनी राजा जॉर्ज पाचवा यांची भेट घेतल्यानंतर महात्मा गांधींचे जवळचे सहकारी बनले.

प्रफुल्ल चाकी:

ते जुगंतर गटातील एक जेष्ट क्रांतिकारक होते. या गटाने अनेक इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. किंग्सफोर्ट आणि सर जोसेफ बाम्फफिल्ड यांसारख्या इंग्रज अधिकाऱ्यांना मारण्याची जबाबदारी प्रफुल्ल चाकींवर टाकली होती. किंग्सफोर्टला मारण्याचा प्रयत्नात प्रफुल्ल चाकी यांनी खुदिराम बोस, किंग्सफोर्टच्या पत्नी आणि मुलीला चुकून ठार मारले.

मातंगिनी हझरा:

यांना त्यांच्या क्रांतिकारी कार्यांसाठी ओळखतात याना “गांधी बुरी” या नावानेही ओळखले जाते. या एक जेष्ट महिला क्रांतिकारक होत्या. त्या अवघ्या ७१ वर्षांच्या असताना अवघ्या ६००० स्वयंसेवक क्रांतिकारकांबरोबर त्यांनी निषेध केला. यावेळी इंग्रज पोलिसांनी गोळीबार केला ज्यामध्ये मातंगिनी हझरा यांची हत्या झाली. त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी “वंदे मातरम” च्या घोषणा दिल्या.

बिना दास:

यांनी तत्कालीन बंगालचे राज्यपाल स्टॅन्ली जॅक्सन यांच्यावर पिस्तोलच्या पाच फेऱ्या मारल्या. परंतु, त्यांचे लक्ष्य चुकल्याने स्टॅन्ली जॅक्सन थोडक्यात बचावला. या घटनेत त्यांना नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ कारावास भोगावा लागला. यानंतर त्यांना भारत छोडो आंदोलनातील निषेधामुळे पुन्हा अटक झाली.

भगवती चरण वोहरा:

हे चंद्रशेखर आझाद, भगवती, सुखदेव यांचे जवळचे सहकारी मित्र होते. क्रांतिकारी कार्यांसाठी सन १९२९ मध्ये त्यांनी एक घर भाड्याने घेऊन त्यांचे रूपांतर बॉम्ब कारखान्यात केले. त्यांनी लॉर्ड इरविन प्रवास करत असलेल्या गाडीला बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या हल्ल्यातून लॉर्ड इरविन बचावला.

भाई बालमुकुंद:

लॉर्ड हार्डिंगे यांच्या हत्येच्या कारस्थानातील हे एक प्रतिनिधी होते. या घटनेमध्ये क्रांतिकारकांच्या गटाने लॉर्ड हार्डिंगे यांच्या घोडागाडीवर बॉम्ब फेकला. ज्यामध्ये हार्डिंगे थोडक्यात बचावला आणि जखमी अवस्थेत तेथून निसटण्यास यशस्वी झाला. परंतु, चालक मात्र जागीच ठार झाला. या घटनेत भाई बालमुकुंद यांना अटक झाली.

सोहनसिंग जोश:

प्रसिद्ध लेखक सोहनसिंग यांनी कीर्ती या दैनिकासाठी कार्य केले. त्यांनी या दैनिकात भगतसिंग यांचे क्रांतिकारी विचार जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. “जंग ए आझादी” या कम्युनिस्ट पेपरचे ते संथपकही झाले. त्यांच्या अशा क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना तीन वर्षाचा कारावास झाला.

सोहनसिंग भकना:

गदर षड्यंत्रातील महत्वाचे सदस्य सोहनसिंग भकना हे पक्षाचे तसेच अध्यक्षही होते. संपूर्ण भारतातून (पॅन इंडियन) हल्ले सुरु करण्यासाठी त्यांनी गदर कारस्थानात भाग घेतला. भारतीय कम्युनिस्ट पक्षातही त्यांनी काही काळ काम केले. गदर षड्यंत्रामध्ये सहभागी झाल्याने त्यांना अवघ्या १६ वर्षांचा तुरुंगवास झाला.

सी. एफ. अँड्रयूज:

चार्स फ्रीर अँड्रयूज या ब्रिटिश नेत्यांनी काही काळ आफ्रिकेत भारतीय नागरी हक्कांसाठी संघर्ष केला. महात्मा गांधी यांनी भारतात आणण्यासाठी हेच नेते कारणीभूत होते. ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झाले. महात्मा गांधींचे ते चांगले मित्र बनले. यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान दिले.

हसरत मोहनी:

हे पहिले भारतीय होते, ज्यांनी अलाहाबादच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रज राजवटीविरुद्ध आवाज उठवला. कम्युनिस्ट पक्षाचे ते सहसंस्थापक होते. ते अद्वितीय कवी आणि लेखक होते. ब्रिटिश शासनाविरुद्ध लेखन आणि प्रचार केल्याने त्यांना अनेकदा तुरुंगवास झाला.

तारक नाथ दास:

हे एक प्रबळ क्रांतिकारक होते, ज्यांनी वेगळ्या मार्गाने लढा दिला. हे एक बुद्धिमान आणि दूरदृष्टी असणारे क्रांतिकारक होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी अधिक आव्हानात्मक आणि अवघड मार्ग निवडला. त्यांनी अधिक १९०६ मध्ये झालेल्या बैठकीत विदेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सहकारी मित्र जतींद्र नाथ मुखर्जी यांच्याबरोबर ते उच्य शिक्षणासाठी बाहेर पडले. परंतु, त्यांचा देशाबाहेर पडण्याचा उद्देश काही वेगळाच होता. ते पाच्यात्य देशातील लष्करी ज्ञान आत्मसात करण्याच्या हेतूने गेले होते. तसेच त्यांचा दुसरा हेतू पाच्यात्य देशातील नेत्यांची भारताच्या मुक्तीसाठी पाठिंबा आणि निर्माण करणे हा होता.

भूपेंद्रनाथ दत्ता:

यांना जुगंतर चळवळीत भाग घेतल्याबद्दल सॅन १९०७ मध्ये अटक झाली. त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारी वृत्तपत्र “जुगंतर पत्रिका” चे संपादक म्हणून काम केले. त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी “गदर पार्टी” त प्रवेश केला. ते भारतीय स्वातंत्र्य समितीचे सचिवही झाले. यांनी भारतीय स्वातंत्र्याकरिता विदेशातून लढा दिला होता.

मारुथु पंडियार:

१८५७ च्या उठावापूर्वी सुमारे ५६ वर्षांपूर्वी मारुथु बंधूंनी इंग्रज राजवटीविरुद्ध लढा सुरु केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिशांच्या तावडीतून तीन जिल्हे मिळवण्यात मारुथु बंधू यशस्वी झाले. परंतु, इंग्रजांनी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनवरून अतिरिक्त सैन्य मागवले. या सैन्याच्या बळावर ब्रिटिशांनी मारुथु बंधूंना सलग दोन युद्धात पराभूत केले.

शंभू दत्त शर्मा:

राजपत्रित अधिकारी असलेल्या शंभू दत्त शर्मा यांनी त्यांच्या सन्माननीय पदाचा त्याग करून त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात भाग घेतला. या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. स्वातंत्र्योत्तर भारतातील भ्रष्टाचार आणि इतर सामाजिक अहितकारक कृत्यांविरुद्ध त्यांनी लढा सुरूच ठेवला.

मन्मथ नाथ गुप्ता:

एक अद्वितीय लेखक प्रसिद्ध असणारे मन्मथ नाथ गुप्ता हे त्यांच्या लेखांसाठी आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या लेखनाद्वारे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्यदेखील होते. काकोरीच्या दरोड्यातही त्यांचा सहभाग होता. यातील सहभागासाठी त्यांना अवघ्या १४ वर्षांचा कारावास झाला. तुरुंगातून सुटल्यानंतरही त्यांनी क्रांतिकारक कार्ये सुरूच ठेवल्याने पुन्हा १९३९ मध्ये अटक झाली.

बटुकेश्वर दत्त:

भगतसिंग यांचे जवळचे साथीदार बटुकेश्वर दत्त हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे कार्यकर्ते होते. यांचा ८ एप्रिल १९२९ रोजी विधानसभेत झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये समावेश होता. बटुकेश्वर यांनी भारतीय राजकीय कैद्यांना काही हक्क मिळावेत यासाठी उपोषण केले. यामध्ये ते काहीसे यशस्वीदेखील झाले.

प्रीतीलता वड्डेदार:

या स्वातंत्र्यसेनानींनी सूर्य सेन यांच्या अध्यक्षतेखाली अनेक क्रांतिकारक कार्यांत सहभाग घेतला. पाहारताली युरोपियन क्लबवर झालेल्या हल्ल्यात प्रीतीलता वड्डेदार यांचा सहभाग होता. या क्लबने भारतीयांच्या अपमान करण्याच्या उद्देशाने एक पाटी लावली. या हल्ल्यात अटक करताना प्रीतीलता वड्डेदार यांनी सायनाइड खाऊन आत्महत्या केली.

गणेश घोष:

हे सूर्य सेन यांचे जवळचे सहकारी मित्र होते. चित्तगाव येथील सशस्त्र छाप्यातील एक महत्वाचे प्रतिनिधी होते. ते जुगंतर पक्षाचे सदस्यदेखील होते. त्यांना त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे अटक झाली. तुरुंगवासानंतर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश केला. त्यांनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांचा लढा सुरूच ठेवला.

जोगेशचंद्र चटर्जी:

ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सहसंस्थापक होते. यांनीही काकोरी रेल्वे दरोड्यात योगदान दिले. क्रांतिकारकांच्या हिंसक वृत्तीला प्रोत्साहन देणारी “अनुशिलन समिती”चे ते सदस्य या होते. स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसभेचे सदस्य बनले.

बरिंद्रकुमार घोष:

ते जुगंतर पक्षातील प्रमुख सदस्यांपैकी एक होते. प्रसिद्ध अलीपूर बॉम्बस्फोटामध्येही त्यांचा सहभाग होता. क्रांतिकारी कल्पनांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी जुगंतर नावाचे साप्ताहिक प्रकाशित केले. त्यांनी गुप्ता गट तयार केला. तो गट गुप्त ठिकाणी बॉम्ब तयार करण्यास जबाबदार होता.

हेमचंद्र कानूंगो:

अरविंदकुमार घोष व बरिंद्रकुमार घोष यांचे ते जवळचे सहकारी मित्र होते. गुप्त ठिकाणी बॉम्ब कारखाना उभारण्यात यांचाही मोठा वाट होता. ते बॉम्ब बनवण्याची कला शिकण्याच्या उद्देशाने पॅरिसला गेले. पॅरिसमध्ये त्यांचे अनेक रशियन मित्र बनले. त्यांच्याकडून त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी बॉम्ब बनवण्याची कला इतर स्वातंत्र्यसेनानींनाही दिली.

भावभूषण मित्र:

त्यांनी भारत छोडो आंदोलन आणि असहकार आंदोलन यांसारख्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. सामाजिक परिवर्तन ब्रिटिशविरोधी चळवळीतील एक महत्वाचा भाग आहे. असे भावभूषण याना नेहमीच वाटत. त्यामुळे त्यांनी समाजसुधारणेवर भर दिला. एका उत्तम समाजसेवकाप्रमाणे ते महत्वाचे क्रांतिकारक होते. त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे त्यांचा अटकही झाली.

कल्पना दत्त:

या सूर्य सेन यांच्या अनुयायी होत्या. सूर्य सेन यांच्या नेतृत्वात कल्पना दत्त चित्तगाव येथील छाप्यात महत्वाची भूमिका बजावली. त्या प्रीतीलता वड्डेदार यांच्याबरोबर पाहारताली युरोपियन क्लबच्या हल्ल्यामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे त्यांना अनेकदा अटक झाली.

बिनोद बिहारी चौधरी:

ते जुगंतर पक्षाचे सक्रिय सदस्य होते. ते सूर्य सेन यांच्या जवळच्या साथीदारांपैकी एका होते. चित्तगाव छाप्यात यांचाही मोलाचा वाटा होता. त्या प्रसिद्ध छाप्यातील ते शेवटचे जिवंत सहभागी क्रांतिकारक होते.
लियाकत अली:
भारतीय मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी यांनी कार्य केले. भारतीय मुस्लिम लीगचे नेतृत्व करणाऱ्या मुहम्मद अली जिन्ना यांच्यासमवेत तेही सामील झाले.

शौकत अली:

ते एक प्रख्यात मुस्लिम नेते होते. ते क्रांतिकारक मासिके प्रकाशित करीत होते. मुस्लिमांसाठी पोषक राजकीय वातावरण तयार करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान होते. ते महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यांच्या अनेक चळवळींमधील क्रांतिकारक कार्यात सहभागी झाल्याने त्यांना अटक झाली. गांधीजींच्या असहकार चळवळीतील ते महत्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते.

एस. सत्यमूर्ती:

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे सदस्य होते. ते क्रांतिकारक असल्याने त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात निषेध व्यक्त केला. त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. या चळवळीदरम्यान त्यांना अटक केली गेली. ब्रिटिशांनी त्यांचा कारावासात असताना अतोनात छळ केला. ते के. कामराज यांचे मार्गदर्शकही होते. पुढे स्वातंत्र्योत्तर भारतातील ते तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्रीही बनले.

खान अब्दुल गफ्फर खान:

भारत विभाजनाला विरोध दर्शविणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींपैकी ते एक होते. ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते. त्यांना बाचा खान म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष देशाचे स्वप्न पहिले. सन १९२९ मध्ये त्यांनी “खुदाई खिदमतगार” हे चळवळ सुरु केली. त्यांची विचारधारा व तत्वे ही महात्मा गांधींप्रमाणेच होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे कार्य महात्मा गांधीजींच्या सहभागात राहून केले.

I hope this article will help you to know about Freedom fighters of India. We are really grateful if you share this article over social media.

Share via

Sharing is a way to encourage us !

Sharing quality content encourage us to keep creating more relevant content for you. So, appreciate us by sharing this piece of content!
I will share it later!

Join our list

Subscribe to our list and get newsletters directly to your inbox

Please check your inbox to confirm your subscription

Something went wrong.

Do not send me a FREE STUFF!

Join our list

Subscribe to our list and get newsletters directly to your inbox

Please check your inbox to confirm your subscription

Something went wrong.

Do not send me a FREE STUFF!
 
Send this to a friend