आज मी आपल्यासमोर चंद्रशेखर आझाद यांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगणार आहे. चंद्रशेखर आझाद यांना भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक विलक्षण क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
चंद्रशेखर आझाद यांचे नाव भारतीय स्वातंत्र्ययुद्धात एक ज्वलंत विचारांचा क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचा कमांडर इन चीफ होते. त्यांच्या मनात अन्यायाविषयी अतोनात चीड होती. ब्रिटिशांचा भारतीय लोकांवरील केलेला अन्याय त्यांना सहन होत नसे. ते भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांचे समकालीन होते.
चंद्रशेकर आझादांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सार्थ अभिमान होता. इंग्रज सरकारला जागे करायचे असल्यास आव्हानात्वक समस्या निर्माण केल्या पाहिजेत. असे चंद्रशेखर आझादांना वाटायचे. त्याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक संकटे आणि समस्या निर्माण केल्या.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी सीता राम तिवारी आणि जागरानी देवी या दाम्पत्यांच्या घरी झाला. चंद्रशेखर आझाद यांनी पंडित कुटुंबात जन्मले. त्यामुळे, त्यांच्या आईला त्याचा मुलगा संस्कृतमध्ये पारंगत व्हावा असे वाटायचे. चंद्रशेखर झाबुआ जिल्यातील (सध्याच्या अलिराजपूर जिल्यात) भवरा (भाभरा) गावात झाला.
चंद्रशेखर आझाद यांचे बालपण
या गावातील भिल्ल समाजातील लोकांबरोबर वाढल्याने त्यांच्या कला चंद्रशेखर आझाद यांनी आत्मसात केल्या. ते कुस्ती, धनुर्विद्या, भालाफेक, नेमबाजीसह पोहण्यात निपुण बनले. भगवान हनुमानाचे लहानपणीपासून भक्त होते. साहजिकच त्यांच्या भक्ताला शोभेल असे अद्वितीय शरीर विकसित केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवरा (भाभरा) येथेच झाले.
चंद्रशेखर आझाद यांचे शिक्षण
शैक्षणिक क्षेत्रात एक विद्यार्थी म्हणून ते सरासरी होते. पण, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी संस्कृतमध्ये पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. संस्कृतमधील उच्य शिक्षणासाठी वाराणसीला आल्यानंतर ते अनेक राष्ट्रवादी क्रांतिकारकांच्या संपर्कात आले.
“द फ्री मॅन” म्हणजेच “आझाद” अशी ओळख असणारे चंद्रशेखर लहानपणीपासून धाडसी होते. त्यांना चार भिंतींमध्ये राहणे आवडत नसे. त्यापेक्षा ते घराबाहेर राहणे जास्त पसंत करीत. देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्या विचारांतून आपल्याला पाहायला मिळते.
वेशभूषेत पारंगत असल्याने ब्रिटिश सरकारला त्यांना पकडणे म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे होते.”दुश्मानो के गोलीओ का सामना हम करेंगे | हम आझाद है, और आझाद ही रहेंगे |”. ज्याचे मराठीत भाषांतर करायचे झाले तर असे होईल.
शत्रूंच्या गोळ्यांचा सामना आम्ही करू. आम्ही आझाद आहोत, आणि आझादच राहू.
– चंद्रशेखर आझाद
सन १९१९ साली जालियानवाला बाग हत्याखंडात हजारो निरपराध लोक मारले गेले. घटनेतील मूलभूत मानवाधिकारांना काळिमा फासून ब्रिटिश राजवट एका निर्दयी हिंसाचाराची साक्षी झाली. शांतताप्रिय आणि निशस्त्र जमावावर इंग्रज अधिकारी स्टॉक याने गोळीबाराचा आदेश दिला.
या अमानवीय कृत्यानंतरही ब्रिटिश शासनाने या घटनेकडे दुर्लक्ष्य केले. संबंधित इंग्रज अधिकाऱ्यावर कारवाई न केल्याने, भारतीयांचा ब्रिटिश शासनाबद्दलचा द्वेष आणखी वाढला.
जालियानवाला बागमधील हत्याकांडानंतर संपूर्ण भारत राष्ट्रवादी चळवळीने पेटून उठला. “आपल्या प्रिय मरतुभीमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे.” या एकाच ध्येयासाठी सर्व क्रांतिकारकांनी त्यांचे आयुष्य समर्पित केले होते.
स्वराज्यनिर्मितीच्या या महायज्ञात प्राणाची आहुती द्यायलाही हे क्रांतिकारक एका पायावर तयार होते. चंद्रशेखर आझाद हेदेखील अशाच क्रांतिकारकांच्या गटात राहून कार्य करीत होते.
चंद्रशेकर तिवारीपासून ते चंद्रशेखर आझादपर्यंतचा प्रवास
हा प्रवास चंद्रशेकर तिवारी यांच्या क्रांतिकारी कार्याची सुरुवातमात्र होती. इसवी सन १९२०-२१ या वर्षात गांधीजींच्या असहकार चळवळीने राष्ट्रवादाच्या भावनेला प्रेरणा मिळाली. या चळवळीतील निषेधामध्ये एका तरुणाला अटक करणार आली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला त्याचे नाव, वडिलांचे नाव आणि निवास स्थान विचारले.
तेव्हा त्या तरुणाने उत्तर दिले, नाव “आझाद”, वडिलांचे नाव “स्वतंत्रता” आणि निवासस्थान “कारावास”. या १६ वर्षीय तरुणाचे नाव होते “चंद्रशेखर तिवारी.” इंग्रज अधिकाऱ्यांनी याला १५ आसुडाचे फटाके मारण्याची शिक्षा सुनावली. पुढील काळात या तरुणाला चंद्रशेखर आझाद या नावाने ओळखले गेले.

हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन
५ फेब्रुवारी १९१२ साली गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. या निर्णयाने तरुण क्रांतिकारी संघटनांना धक्का बसला. आझाद यांना यापुढील लढा कसा द्यावा या चिंतेने ग्रस्त केले. आझाद यांना नेहमी वाटायचे की, मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी आक्रमक पावित्राच योग्य आहे.
राम प्रसाद बिस्मिल हे हिंदुस्थान सोसिअल रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष होते. प्रणवेश चटर्जी यांच्यामार्फत आझाद यांनी राम प्रसाद बिस्मिल यांची भेट घेतली.
त्यापुढील कार्याची सुरुवात त्यांनी एचआरए मध्ये प्रवेश घेऊन सुरु केली. त्यांनी एचआरए या संघटनेसाठी निधी एकत्रित करण्यावर त्यांचे संपूर्ण लक्ष्य केंद्रित केले.
त्यासाठी त्यांनी सरकारी तिजोरी लुटून निधी उभा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या योजनेप्रमाणे अंमलबजावणी करून तिजोरी लुटण्यात आली.
काकोरी येथील कारस्थान
विविध क्रांतिकारी कार्ये करण्यासाठी एचआरए संघटनेला निधीची आवश्यकता होती. त्यासाठी राम प्रसाद बिस्मिल यांनी सरकारी खजाना नेणारी रेल्वे लुटण्याची कल्पना दिली.
चंद्रशेखर आझाद यांनी यासाठी एक योजना आखली. त्यांनी शहाजहापूर ते लखनौला जाणारी आठ नंबरच्या गाडीला लक्ष्य केले. सरकारी कोषागारात पैसे घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीत वेषांतर करून काही क्रांतिकारक घुसले. क्रांतिकारकांनी साखळी खेचून रेल्वे काकोरी येथे थांबवली. रेल्वेतील गार्ड कॅबिनकडून ८००० रुपये लुटण्यात आले.
परंतु, दुर्दैवाने सशस्त्र सुरक्षारक्षक आणि क्रांतिकारकांच्या चकमकीत एका प्रवाश्याचा मृत्यू झाला. इंग्रज सरकारने झालेल्या मृत्यूला मानवहत्या घोषित करून सर्व क्रांतिकारकांना पकडण्याची मोहीम सुरु केली.
ब्रिटिशांच्या नजरेत न येता आझादांनी त्यानंतर झाशी येथून त्यांच्या पुढील मोहीम राबवल्या.
लाहोर षडयंत्र
चंद्रशेखर आझाद त्यानंतर प्रवास करत कानपूरला पोचले. कानपुर हे त्यावेळी एचआरएचे मुख्यालय होते. याच ठिकाणी त्यांना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारखे प्रभावशाली तरुण भेटले. ते चंद्रशेखर आझाद यांचे चांगले मित्र बनले.
त्यांच्यामुळे त्यांना नवीन जोश मिळाला. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचा जीर्णोद्धार केला. आझाद यांनी या संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे केले.
लाला लजपत राय यांचा मृत्यू
३० ऑक्टोबर, १९२८ साली लाला लजपत राय यांनी शांततेत निषेध करत होते. तरीही पोलीस अधिकारी जेम्स स्टॉक यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. या अन्याय्य कारवाईत लालाजी जबर जखमी झाले. शेवटी १९ नोव्हेंबर १९२८ या दिवशी लालाजींचा दुःखद मृत्यू झाला.
एचआरए सदस्यांकडून लालाजींच्या मृत्यूचा बदल घेण्याचा निर्धार
आझादबरोबर त्यांच्या साथीदारांनी लालाजींच्या मृत्यूला जबाबदार पोलीस अधिकारी स्टॉक कडून बदला घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्टॉक विरुद्ध एक कट रचला.
१७ डिसेंबर, १९२८ या दिवशी क्रांतिकारकांनी त्यांच्या योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली. परंतु बरोबर ओळखीच्या अभावाने चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केले. त्यामुळे पोलीस सहाय्यक अधिक्षक जॉन पी सँडर्सची हत्या झाली.
दुसऱ्या दिवशी एचएसआरए या घटनेची जबाबदारी स्वीकारली. या घटनेत सर्व व्यक्तींना ब्रिटिशांच्या मोस्ट वॉन्टेड यादीच्या वरच्या स्थानी सामील केले.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसह २१ जणांना अटक
भगतसिंग यांनी दिल्लीच्या विधानसभेत निदर्शने केली. त्यामुळे त्यांना ८ एप्रिल १९२९ या दिवशी अटक झाली. लाहोर आणि सहारनपुरमधील एचएसआरए बॉम्ब कारखान्याचे दिवाळे निघाल्यानंतर मोजक्या सदस्यांनी राज्यासाठी मान्यता घेतली. त्यानंतर राजगुरू, सुखदेव यांसह २१ जणांना अटक झाली. लोहारच्या षड्यंत्रात आझादसमवेत इतर २८ क्रांतिकारकांचा समावेश होता.
चंद्रशेखर आझादांच्या ठिकाण्याची माहिती
चंद्रशेकर आझाद आणि त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी तयार पोलीस पथक त्यासाठी खूप मेहनत घेत होते. परंतु, त्यांना पकडण्यात इंग्रज पोलीस बऱ्याचदा अपयशी ठरले. त्यामुळे, शेवटी चंद्रशेखर आझादांना जिवंत किंवा मृत्यू पकडण्यासाठी ३०००० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैश्याच्या लालसेने शेवटी ब्रिटिश पोलीस पथकांना चंद्रशेखर आझादांच्या ठिकाण्याची माहिती मिळाली.
चंद्रशेखर आझाद यांची ब्रिटिश पोलिसांबरोबर चकमक
चंद्रशेखर आझाद आपल्या मित्रांना भेटण्यासाठी २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये गेले होते. याची पूर्वसूचना ब्रिटिश पोलिसांना मिळाली होती. या उद्यानला पोलिसांनी घेरले आणि आझादांना शरण येण्यास सांगितले.
आपल्या मित्रांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या दृष्टीने त्यांनी शौर्याने ब्रिटिशांशी झुंज दिली. त्यांची निशाणेबाजी खूप अचूक होती. या गोळीबारात त्यांनी तीन पोलिसांचा खात्मा केला. उद्यानाच्या बाहेर पडताना मात्र ते गंभीर जखमी झाले.
चंद्रशेखर आझाद यांचा दुःखद मृत्यू
बराच वेळ चाललेल्या या चकमकीत चंद्रशेखर आझाद यांच्याजवळी मर्यादित दारुगोळा संपत आला होता. याशिवाय, बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. परिस्थिती पूर्णपणे विपरीत असल्याने त्यांनी शेवटच्या गोळीबरोबर स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अखेरची गोळी स्वतःच्या माथ्यावर मारली. अशारितीने चंद्रशेखर आझादांचा दुःखद मृत्यू झाला.
चंद्रशेखर आझाद यांचे देशप्रेम
चंद्रशेखर आझादांनी अखेरच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांच्या होती न लागण्याचे वचन दिले होते. शेवटपर्यंत मातृभूमीला स्वतंत्र करण्याच्या त्यांच्या इच्याशक्तीने ब्रिटिश राजसत्तेची पाळेमुळे हलवली. स्वातंत्र्यलढ्यात तन-मन-धनाने संपूर्ण जीवन समर्पित करणारे ते आझाद.
त्यांचे कार्य हे त्यांच्या समकालीन आणि येणाऱ्या नवीन पिढयांसाठी नक्कीच प्रेरणादायक होते. ब्रिटिशांसमोर ते एक मोठी समस्या बनले होते. ब्रिटिश साम्राज्यवादाच्या दडपशाहीतून मुक्त होण्याची इच्छा त्यांनी प्रत्येक देशवासीयांच्या हृदयात निर्माण केली.
चंद्रशेखर आझाद यांच्या स्वप्नातील भारत
गांधीजींची स्वराज्यनिर्मितीसाठी अहिंसक मार्गाची स्वीकृती आणि आझाद यांचा क्रांतिकारी मार्गाचा अवलंबाने देशवासियांमध्ये देशभक्तीच्या भावना पेटून दिल्या. आझाद यांना भारतीय क्रांतिकारकांमधील एक धाडसी आणि अद्वितीय क्रांतिकारक म्हणून आजही आठवले जाते.
समाजवादी आदर्शांवर आधारित स्वतंत्र भारताचे स्वप्न त्यांनी पहिले. ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वचनबद्ध केले होते. शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा खरा अर्थ आझाद यांनी आयुष्यभर मातृभूमीसाठी संघर्ष केला. त्यांच्या अमूल्य योगदानाने तत्काळ स्वातंत्र्य मिळू शकले नाही. परंतु, त्यांच्या बलिदानाने ब्रिटिशांचा तीव्र प्रतिकार करण्यासाठी भारतीय क्रांतिकारक पेटून उठले.
आझाद भारतीयांच्या मनात अजूनही जिवंत
भारतीय स्वातंत्र्यानंतर आझाद यांच्या अद्भुत शौर्य आणि बलिदानाला सलामी म्हणून आल्फ्रेड पार्कचे नाव बदलून चंद्रशेखर आझाद असे ठेवण्यात आले.
भारतीय देशभक्तीपर चित्रपट
भारतीय देशभक्तीपर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या कलाकारांनी त्यांचे पात्र केले आहे.
द लिजेंड ऑफ भगतसिंग
२००२ साली “द लिजेंड ऑफ भगतसिंग” या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा यांनी आझाद यांची भूमिका रेखाटली होती.
रंग दे बसंती
२००६ साचा सुपरहिट “रंग दे बसंती” या चित्रपटात चंद्रशेखर आझाद, पंडित रामप्रसाद बिस्मिल, आणि अश्फाक उल्ला यांचे पात्र करण्यात आले होते. अमीर खान या बोलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने या चित्रपटात चंद्रशेखर आझादांची व्यतिरेखा साकारली आहे.
मला आशा आहे की, चंद्रशेखर आझाद यांचे जीवनचरित्र आपल्याला आवडले असेल. तरी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. जर आपल्याला अशा प्रकारच्या नवीन पोस्ट्स वाचण्यासाठी आपण आमच्या विनामूल्य ईमेल सदस्यता घेऊ शकता.
वैशिष्ट्यीकृत छायाचित्राचे श्रेय: Wikimedia