आमच्याबद्दल

HistoricNation ने लोकांना इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि संबंधित सामग्री विनाशुल्क उपलब्ध व्हावी हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.

याव्यतिरिक्त ऐतिहासिक विषयात समाजाला प्रेरित करणे या उद्देशाकरिता आम्ही समर्पित आहोत. म्हणून आशा आहे की, या संकेतस्थळाद्वारे आपल्याला ऐतिहासिक विषयांत रस निर्माण होईल.

HistoricNation या ब्लॉगची ठळक वैशिष्टये:

  • HistoricNation.in या संकेतस्थळावर तपशीलवार सखोल ब्लॉग लिहिण्यात येतील.
  • बहुतेक इंग्रजी सामग्री ही हिंदी आणि मराठी भाषांमध्ये देखील अनुवादित आहे.
  • आम्ही सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत.
  • ब्लॉगवरील माहिती ही इतिहास विशेष विचारक्षेत्रातील उत्साही लोकांनी लिहिलेली आहे.
  • आपणही आपल्या आवडत्या ऐतिहासिक विषयांवर लिहून माहिती प्रकाशित करू शकता. त्याकरिता संपर्क या पेजद्वारे संपर्क करा.
  • हा ब्लॉग विशेषतः भारतीय वाचकांना संदर्भ मानून तयार केला आहे.
  • खासकरून भारतीय वाचकांना समजेल अशा भाषेत जगाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न.

आपल्यासारख्या रसिक वाचकांशिवाय या ब्लॉगवरील सामग्री ही पूर्णपणे व्यर्थ आहे. ब्लॉग जरी खासकरून भारतीय वाचकांसाठी बनवण्यात आला असला तरी येथील माहिती आंतरराष्ट्रीय वाचकांसाठीही तेवढेच मार्गदर्शक आहे.

आपल्याला भविष्यातील सर्व अपडेट्स मोफत ई-मेल द्वारे प्राप्त होतील. त्यासाठी या ब्लॉगवर इमेल दाखल करून आमच्या विनामूल्य सेवेचा लाभ घ्या. मला अशा आहे की, या ब्लॉग्सवर इंटरनेटला अधिक चांगले बनवून आपल्या जीवनाला सुलभ करण्याकरिता नक्कीच मदत होईल! 😀

सर्व HN वाचकांना माझा नमस्कार!

HistoricNation मध्ये आपले स्वागत आहे- आपल्याला भूतकाळाबद्दल आणि जगभरातील लोकप्रिय ऐतिहासिक लोकांबद्दल जाणून घेण्यासाठीचे हे एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरील सर्व वाचकांना HN वाचक म्हणून देखील ओळखतात!

खाली आपणास ब्लॉगवर आपल्यासाठी काय उपलब्ध आहे याविषयी थोडक्यात माहिती आहे.

१) येथे आपणास ५०% इतिहास संबंधित आणि ५०% वाचकांना प्रोत्साहन देणारी जगभरातील महान व्यक्तींची चरित्रे मिळतील.

२) आपल्यासारख्या समविचारी इतिहासात आणि वाचनामध्ये रुची ठेवणारा समुदाय.

३) ब्लॉगवर सामग्री वाचण्याचाबरोबरच पॉडकास्ट ऐकण्याचादेखील पर्याय उपलब्ध.

४) तीन (भारतीय) भाषांमध्ये सामग्री उपलब्ध आहे.

कोणताही गंभीर हेतू न ठेवता इतिहासात रुची ठेवणाऱ्या वाचकांकरिता मी या ब्लॉगवर ७ फेब्रुवारी, २०१९ रोजी HistoricNation.in हे डोमेन विकत घेतले.

माझ्या आवडत्या गोष्टींवर ब्लॉग सुरू करणे हा खरोखर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता. दिवसेंदिवस माझ्या ब्लॉगविषयी मला खूप उत्कट आवड निर्माण झाली.

मी या ब्लॉगद्वारे इतिहासासंबंधित छायाचित्रांच्या माध्यमातून अधिक मनोरंजकरित्या आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर वाचण्यात रुची नसणाऱ्यांकरिता पॉडकास्टच्या माध्यमातून ब्लॉगवरील सामग्री सहजरित्या उपभोग्य होईल.

आम्ही ब्लॉग पूर्णपणे चुका मुक्त करण्यासाठी सतत कार्य करत आहोत. परंतु, १००% चुकमुक्त करणे कठीण असते.

तरी, आपल्यास काही चुका आढळल्यास किंवा आपल्या मनात काही तक्रार असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका. मी आपल्‍या अर्थपूर्ण प्रश्नांना ४८ तासांच्या आत निश्चितपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करील.

असं म्हणलं जातं की,

शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकत असते.

कारण आणि वेगळेपण

माझे असे मत आहे की, प्रत्येकाच्या जीवनात अपयश, नैराश्य, नाउमेदी या भावना येत असतात. कधीकधी या भावना इतक्या प्रबळ बनतात की, अशा परिस्थितीतून बाहेर येणे अशक्य वाटू लागते.

अशा व्यक्तींना पारिवारिक आधाराबरोबर, मानसिक आणि शारीरिकरीत्या सक्षम बनवून स्वतःला कामात किंवा इतर उपक्रमांत जास्तीत जास्त व्यस्त ठेवण्याची गरज असते.

माझ्या मते अशा स्थितीत वाचनाची सवय, आपले मन सकारात्मक गोष्टींकडे वाळवण्यास मदत करते. मला माहित आहे की आपण एकविसाव्या शतकात आहोत आणि ज्ञानार्जनाकरिता इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ, इन्फोग्राफिक्स यांसारखे पुढारलेले मार्ग आहेत.

तरीही वाचन हा ज्ञानार्जनाचा मूलभूत मार्ग होता, आहे, आणि भविष्यातही राहणार आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे वाचण्याकरिता पुस्तके आहेत. मग या ब्लॉगला प्राधान्य देण्याची काही विशेष करणे.

  • विनाशुल्क वाचन सामग्री उपलब्ध
  • प्रत्येक लेखाचे तीन भाषेमध्ये अनुवादन
  • ज्या लोकांना लेख वाचायला आवडत नाही त्यांना लेख ऐकण्याचा पर्याय आहे.
  • तज्ञांद्वारे सर्वसमावेशकपणे संकलित केलेली गुणवत्ता सामग्री.
  • पुस्तकासारखा भार वाहण्याची गरज नाही.

पुस्तके ज्ञानाने भरलेली असतात आणि आमचा ब्लॉग पुस्तकांची जागा निश्चितच घेत नाही.

महान लेखक स्टिफन किंग यांच्या म्हणण्यानुसार,

पुस्तके ही सहजरित्या बाळगता येण्याजोगी एक जादू आहे.

म्हणण्याचा उद्देश हाच की, पुस्तकांना नेहमीच त्यांची स्वतःची किंमत असते. कारण पुस्तक लेखक त्रुटी दूर करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम देतात, तसेच सोप्या उदाहरणासह सखोल स्पष्टीकरण देखील देतात.

आयुष्यात सकारात्मक गोष्टींच्या शोधात मी इतिहासातील महान व्यक्तिंचे चरित्रे शोधत असताना, मला ग्रंथालयातून अल्बर्ट आईन्स्टाईन लिखित ऑटोबायोग्राफीकल नोट्स हे छोटे पुस्तक मिळाले.

त्यांच्या या विचारांना तंतोतंत जुळणारा अनुभव माझ्या आयुष्याचा एक भाग बनला. या पुस्तकामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या जीवनातील प्रसंग रेखाटले आहेत.

जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीच्या यादीत ज्यांचे नाव घेतले जाते, त्यांच्या जीवनातदेखील अपयश आणि दुःख होते. पण, त्यांनी अशा परिस्थितीही ते त्यांच्या लक्षावरून भटकले नाहीत.

यावेळी मी विचार केला, इतिहासामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटू शकते.

आईन्स्टाईन यांच्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये प्रचंड आवड होती. परंतु बायोलॉजी आणि भाषा विषयांत फेल झाले.

त्यांचा गणित आणि भौतिकशास्त्र विषयांतील स्कोर पाहून कॉलेजमध्ये निर्धारित काळात विषय सोडवण्याच्या अटीवर प्रवेश मिळतो. गणित आणि भौतिकशास्त्र ज्यामध्ये त्यांची प्रगती अतुलनीय होती. त्यांनी या त्यांच्या आवडीत्या विषयात त्यांनी काम केल्यानेच त्यांना यश मिळाले.

इतिहासात झालेल्या आणि सध्या हयात असणाऱ्या यशस्वी आणि आनंदी व्यक्तींमधील बहुतेक व्यक्ती आपल्या आवडत्या विषयामध्ये काम करण्याचे ठरवतात. ज्यामुळे अशा व्यक्ती अशक्य वाटणारे कामही अगदी हसत-हसत पार पाडतात.

अशाच प्रेरणादायी आणि उत्कट व्यक्तींची जीवनचरित्रे हा विभाग आपल्याला प्रेरित नक्कीच प्रेरित करेल. त्याचबरोबर त्यांच्या कथेद्वारे आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासही मदत मिळेल.

HistoricNation मागील व्यक्ती

असो, मी आशिष साळुंके HistoricNation.in या संकेतस्थळाचा उद्गाता, असे आपण म्हणू शकता! 😊

वरील गोष्ट सोडली तर, मी एक सरळ आणि साधा माणूस आहे. ज्याला आपल्या इतिहासाविषयी जाणून घेण्याकरिता उत्कटता आहे आणि मी यामध्ये खोलवर संशोधन करू इच्छित आहे.

या ब्लॉगवर प्रकाशित माहिती ही तपशीलवार संशोधन करून आपल्यापर्यंत पोचवण्यात येते.

HistoricNation या ब्लॉगचा जन्म कसा झाला यामागील कारण हेच होते.

जीवनचरित्रे विभागाची सुरुवात

इतिहास हा नेहमी माझ्या उत्कटतेचा विषय होता. या विषयाने लोकांनी भूतकाळात केलेल्या चुका जाणून घेण्यासाठी नेहमीच मदत केली.

इतिहासाबरोबरच मला ऐतिहासिक लोकांचे जीवनचरित्रे तयार करण्याची गरज भासली. जेणेकरून अशा महान व्यक्तींकडून आपल्याला प्रेरणा मिळेल. मला आशा आहे की, हा विभाग आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यात मदत करेल.

इतिहासाचे महत्व

ब्रिटीशांच्या जगावरील राजवटीचे मूलभूत कारण तुम्हाला माहित असेल? तर त्यांचे एक कारण म्हणजे आधुनिकीकरण. म्हणून आधुनिक असणे चुकीचे नाही, परंतु आपला इतिहास जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कारण यामुळेच आपल्याला इतिहासात लोकांनी केलेल्या चुका टाळण्यास मदत होते.

उदाहरणार्थ,

मौर्य राज्यकर्त्यांनी भारतात सर्वात व्यापक राज्य स्थापन केले. पण सम्राट अशोका नंतर हेच साम्राज्य प्रबळ नेतृत्वाअभावी कोलमडले. कारण साम्राज्याचा विस्तार अफाट होता, सम्राट अशोकानंतरचे राज्यकर्ते इतक्या मोठ्या साम्राज्याचा कार्यभार सांभाळून त्यावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ होते.

ही चूक भविष्यात कोणी टाळली?

इसवी सणाच्या तिसऱ्या शतकात गुप्त राज्यकर्त्यांनी ही चूक टाळली. त्यांनी त्यांचे साम्राज्य विस्तार मर्यादित ठेवून नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.

मला माहित आहे, वरील उदाहरण आजच्या आधुनिक युगा संबंधित नाही. तरीदेखील आपणाला याबद्दल कल्पना नक्कीच अली असेल.

आशिष साळुंके- माझा प्रवास आणि भविष्यातील लक्ष्य

HistoricNation वर आपणास ऐतिहासिक स्थळे, युद्धे, साम्राज्ये या विभागाद्वारे ऑनलाईन संशोधनाद्वारे सोप्या भाषेत लिहिण्यात येते. जेणेकरून सर्व सर्वसामान्य वाचकांना इतिहासाबद्दल जाणून घेता येईल.

निश्चितच ब्लॉगवरील सामग्री आपण शैक्षणिक अभ्यास साहित्य म्हणून वापरम्याचा सल्ला मी देणार नाही. कारण, या ब्लॉगवरील सामग्री ही शैक्षणिक क्षेत्रातील उपयोगासाठी बनवली नाही. तर, वाचकांना ऐतिहासिक घटना आणि त्याबद्दलची माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सामग्री बनवण्यात आली आहे.

तरी, मी सामायिक केलेली सामग्री, आपल्याला नक्कीच मदत करेल अशी आशा करतो.

आपल्याला HistoricNation.in वर भविष्यातील अपडेट्स मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी, आपण आमच्या मोफत डिजिटल वृत्तपत्राची सदस्यता घ्या.

सोशिअल प्लॅटफॉर्मवरही मोकळ्या मनाने माझ्याबरोबर सामील होण्यासाठी:

माझ्या फेसबुकवर सामील व्हा!

सध्याकरिता मी इथेच थांबून निरोप घेतो आणि पुन्हा भेटू येत्या नवीन ब्लॉग मध्ये, धन्यवाद!

Pin It on Pinterest