आज मी आपल्यासमोर कर्मवीर भाऊराव पाटिल यांची माहिती त्यांच्या जीवनचरित्राच्या द्वारे आपल्याबरोबर शेअर करत आहे. ज्यांनी “रयत शिक्षण संस्था” या सातारा येथील संस्थेचा पाया रचला. अस्पृश्य जातीतील मुले ही शिक्षणावाचून वंचित राहता काम नये, या विचाराने त्यांनी ही संस्था उभारली. त्यांनी मुलांना काम करून शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले आणि त्यासाठी “कमवा आणि शिका” अशी योजना सुरु केली.
घटक | माहिती |
---|---|
ओळख | सामाजिक कार्यकर्ते |
पुरस्कार | भारत सरकारकडून १९५९ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले, पुणे विद्यापीठाकडून डी.लिट. ही पदवी, महाराष्ट्रातील जनतेने “कर्मवीर” म्हणजेच कामांचा राजा असे संबोधले |
जन्म तारीख | २२ सप्टेंबर, १८८७ |
जन्मस्थान | कुंभोज, कोल्हापूर |
कर्मवीर भाऊराव पाटिल यांचा परिवार
कुंभोज या कोहापूरमधील ठिकाणी भाऊराव पाटिल यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव गंगाबाई आणि वडिलांचे नाव पायगौंडा पाटिल होते. त्यांचे लहानपणी त्यांना भाऊ हे त्यांचे लहानपणीचे नाव. मोठे झाल्यावर आदराने त्यांना भाऊराव असे संभोदले गेले. भाऊरावांना तीन भाऊ, तात्या, बाळगोंडा उर्फ बळवंत, बडेंद्र उर्फ बंडू आणि दोन बहिणी द्वारकाबाई, ताराबाई ह्या होत्या.

भाऊरावांचे बालपण
त्यांचे वडील पायगौंडा पाटिल हे मुलकी परीक्षा पास होऊन महसूल खात्यामध्ये कारकून म्हणून काम करायचे. पायगौंडा पाटिल हे कामाला गेल्यावर गंगाबाईंना झोपडीत राहावे लागत. त्यामुळे, भाऊराव लहान असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या आजोळी म्हणजेच कुंभोजला राहावे लागले.
भाऊराव घरात सर्वांत जास्त लाडके असल्याने त्यांचे लक्ष्य अभ्यासापेक्षा खेळण्या-बागडण्यात जास्त होते. त्यामध्ये, सत्यप्पा यांची अस्पृशांचा कैवारी, गोरगरिबांचा सहाय्यकर्ता अशी त्याची ख्याती होती. सत्यप्पामुळे, भाऊरावांमधील निर्भयपणे वाढला.
अन्यायाविरुद्ध बंडखोर वृत्ती
त्यांचे दोन पूर्वज नेमगौंडा आणि शांतनगौंडा हे नांदणी येथील जैन मठाचे पिठाचार्य तसेच दिगंबरपंथी जैन मुनी होते. त्यामुळे भाऊरावांमध्येदेखील संन्यासी वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध बंडखोरवृत्ती लहानपणीपासूनच होती.
भाऊराव पाटिल यांचे शिक्षण
वयाच्या आठव्या वर्षी भाऊरावांना दहिवडीच्या मराठी प्राथमिक शाळा नंबर.१ मध्ये १० फेब्रुवारी १८९६ मध्ये दाखल केले. १९०२ साली इंग्रजी शिक्षणासाठी भाऊरावांना आणि तात्यांना कोल्हापूरला पाठवले. त्याप्रमाणे, राजाराम मिडल हायस्कूल मध्ये त्यांनी १- ३ पर्यंत शिकले. त्यानंतर, राजाराम हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला.
भाऊरावांच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग:
शाहू महाराजांच्या राजवाड्यावर असताना, भाऊरावांना इंग्रजी सहावीच्या वर्गात गणितामध्ये नापास केले. ही गोष्ट शाहू महारांना सांगितल्यावर शाहू महाराजांनी गणिताचे शिक्षक श्री भार्गवराम कुलकर्णी यांना भाऊरावांना गणितात पास करून वरच्या वर्गात ढकलण्यासाठी विचारले.
परंतु, श्री भार्गवराम हे अतिशय प्रामाणिक होते, ते शाहू महाराजांना म्हणाले की, “भाऊ ज्या बाकावर बसतो, तो बाक हवा तर पुढच्या वर्गात ढकलतो, परंतु भाऊला नाही, तसेच दोनशेपैकी सात गुण मिळणाऱ्या मुलाला जास्त गुण देऊन पास करणे माझ्या बुद्धीला पटण्यासारखे नाही. हवे तर मला नोकरीतून काढून टाका.”
त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांची बढती करून वरच्या पदावर नेमले. भाऊरावांनी कुलकर्णी गुरुजींचे ते शब्द त्यांच्या आयुष्यभर लक्षात ठेवले. पुढे वसतिगृहातील मुलांना हा प्रसंग सांगून भाऊराव त्यांना अभ्यासामध्ये कष्ठाची पराकाष्ठा करायला लावीत. सहावीत नापास झाल्यानंतर, भाऊरावांच्या वडिलांनी कोरेगावला परत बोलावले.

अधिकतर वाचकांना इथे भाऊरावांचे अपयश दिसेल, पण महाराजांच्या सहवासातील हेच शेवटची वर्षे भाऊरावांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. महाराजांच्या सानिध्यात त्यांना भावी समाजसुधारक म्हणून समाजकार्य करण्यास प्रेरणा मिळाली.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद!
मला अशा आहे की, वरील कर्मवीर भाऊराव पाटिल यांची माहिती आपल्याला आवडली असेल. आवडल्यास नक्की शेअर करा! जेणेकरून नवीन पोस्ट्स बनवायला आम्हाला प्रेरणा मिळेल.
Featured Image Credit: Rayat Shikshan Sanstha