नमस्कार, आज मी आपल्याबरोबर भारताचे खरे क्रांतिकारी नायक म्हणजेच भगतसिंग यांचे जीवनचरित्र शेअर करत आहे. एच. एस. आर. ए. या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य बनल्यानंतर त्यांनी असंख्य चळवळींमध्ये आपले योगदान दिले. एवढेच नव्हे तर अटकेनंतर त्यांनी प्राणांचीही पर्वा न करता हसत “इन्कलाब जिंदाबाद” अशा घोषणा देत फाशी स्वीकारली. चला तर मग भगतसिंग यांच्या इतिहास त्यांच्या चरित्राद्वारे जाणून घेऊ.
घटक | माहिती |
---|---|
जन्मतारीख | 28 सप्टेंबर, 1907 |
जन्मस्थान | बांगा गाव, तालुका: जारणवाला तालुका, जिल्हा: ल्यालपूर, राज्य: पंजाब, ब्रिटिश भारत. त्यांचे हे जन्मस्थान सध्याच्या पंजाब पाकिस्तानात येते. |
पालक | माता: विद्यावती, पिता: किशन सिंग |
जात | सिंधू जाट |
वर्ण | क्षत्रिय |
खालील संघटनेमध्ये सहभाग | 1) नवजवान भारत सभेचे संस्थापक 2) हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मधील क्रांतिकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान. त्यांनी क्रांतिकारक गटात राहून खालील क्रांतिकारी कामे पार पाडली. a) स्कॉटच्या हत्येची योजना: जॉन सँडर्स यांच्या हत्येच्या कटात मधील सहभागी सदस्य: i) शिवराम राजगुरू, ii) सुखदेव थापर, iii) चंद्रशेखर आझाद, iv) भगतसिंग b) ८ एप्रिल १९२९ साली दिल्लीमधील केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकले ब्रिटिश कालीन 3) किशन क्रांति पार्टी संघटनेत सहभाग वरील संघटनेत सहभागी होऊन अनेक क्रांतिकारी कार्य पार पाडली. |
भगतसिंग यांनी खालील वर्तमानपतत्रात काम केले | 1) नवजवान भारत सभेची नवजवान भारत पत्रिका 2) कीर्ती केशन पार्टीचे ( शेतकरी आणि कामगार संघटना) कीर्ती हे वृत्तपत्र 3) दिल्लीमधील वीर अर्जुन वर्तमानपत्र |
वापरलेली टोपण नावे | बलवंत, रणजीत, विद्रोही |
चळवळी | भारतीय स्वातंत्र्य चळवळ |
मी माझे कार्य सर्वोत्तम कार्यासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे, म्हणून कोणतेही सुख किंवा भौतिक आनंद माझे आकर्षण असू शकत नाही
– भगतसिंग
भगतसिंग यांचे विचार
“माझे जीवन मी सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले आहे. देशाचे स्वातंत्र्य हेच माझे ध्येय आहे त्यामुळे कोणताच आराम किंवा भौतिक सुख माझे आमिष असू शकत नाही”, असे त्यांनी एका पत्रात लिहिले आहे.
भगतसिंग यांना त्यांच्या शालेय जीवनापासूनच चांगल्या सवयी होत्या. ते रोज नित्य नियमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना आणि गायत्री मंत्राचा जप करत. ते पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. त्यामुळे त्यांना “आत्मप्रौढी व घमेंड” यांची बाधा झाली आहे, असे उठवले गेले. पण ऑक्टोबर 1930 मध्ये त्यांनी लिहिलेले “मी निरीश्वरवादी का?” हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख पटते.
भगतसिंग यांच्या जीवनातील अविस्मरणीय कहाणी
१० मार्च १९२२ या दिवशी गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली. त्यानंतर अनेक हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. यानंतर तरुण क्रांतीकारकांना ब्रिटिशांविरोधी लढा चालू ठेवण्यासाठी एकत्र आहे. ज्यामध्ये भगतसिंग हेदेखील एक क्रांतिकारक होते. भगतसिंग यांना एकदा १९३० मध्ये अटक झाली.
सन १९३०-३१ दरम्यान भगतसिंग तुरुंगामध्ये असताना त्यांच्याबरोबर रणधीर सिंग नावाचे दुसरे कैदी होते, ज्यांचा ईश्वरावर प्रगाढ विश्वास होता.
भगतसिंग यांचे जवळचे साथीदार शिव वर्मा आणि भगतसिंग यांचा ईश्वरवादावर चर्चा सुरु केली. रणधीर सिंग यांनी अनेक उदाहरणे देऊन ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु कित्येकदा प्रयत्न करूनही त्यांना त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे त्यांनी भगतसिंग यांना उद्देशून म्हटले, “तुम्ही ख्यातीवंत आहात ज्यामुळे तुम्हाला अहंकार झाला आहे. जो आपल्या आणि ईश्वराच्या मध्ये काळ्या पडद्याप्रमाणे उभा राहिला आहे.”
याला उत्तर म्हणून भगतसिंग यांनी ते नास्तिक का? यावर निबंध लिहून त्यांच्यामधील नास्तिकपणा व्यर्थ आहे का? हे स्पष्ठ केले.
भगतसिंग यांचा जन्म
आज मी भगतसिंग या भारतीय क्रांतिकारकांचे जीवनचरित्र आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांचे नाव भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात निडर आणि शूर देशभक्त म्हणून घेतले जाते. या साहसी क्रांतिकारकाचा जन्म २७ सप्टेंबर, १९०७ साली पंजाब प्रातांतील ल्यालपूर (म्हणजेच सध्याच्या पाकिस्तानमधील फैसलाबाद*) जिह्यामधील बंगा या गावी झाला. त्याचे “भागनवाला” असे टोपणनाव होते.
भगतसिंग यांचे कुटुंब
पंजाब, हरियाणा, आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये संधू जाट या प्रसिद्ध जातीतील क्षत्रिय राहत. भगतसिंग हेदेखील संधू जाट शीख कुटुंबातून होते. भगतसिंग यांच्या आईचे नाव विद्यावती तसेच वडिलांचे नाव सरदार किशनसिंग होते. त्याचे कुटुंब नेहमीच राजनैतिक कार्यात भाग घेत.
त्यांचे वडील किशनसिंग आणि काका हे लाला हर दयाल सिंग माथूर आणि कर्तार सिंह सराभा यांच्या गदर सदस्य होते. विशेष म्हणजे भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी देखील आंदोलनामुळे ते नुकतेच करावासातून सुटले होते.
भगसिंग यांचे आजोबा अर्जुनसिंग स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत सहभागी होते. तसेच अर्जुनसिंग हे आर्य समाजाचे सदस्यदेखील होते.
त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य महाराजा रणजित सिंग यांच्या सैन्यात सहभागी झाले होते. तर काही परिवार सदस्य सामाजिक कार्यांत व्यस्त होते. त्यामुळे एकंदर भगतसिंग यांच्यामध्येही देशभक्तीची मशाल आपोआप ज्वलंत झाली.
सरदार किशनसिंग हे गांधीवादी विचारांचे होते. त्यामुळे सुरुवातीला भगतसिंग यांच्यावरही गांधींच्या अहिंसक चळवळींचा प्रभाव पडला.
प्रेमी व्यक्ती, वेडा माणूस आणि कवी एकाच सामग्रीचे बनलेले आहेत.
– भगतसिंग
भगतसिंग यांचे शिक्षण
भगतसिंग यांनी त्यांचे हायस्कूलचे शिक्षण दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूलमध्ये घेतले. या हायस्कूलला आधुनिक हिंदु धर्मातील प्रचलित आर्य समाजाद्वारा चालवले जाई. महात्मा गांधींनी सरकारी अनुदानावर अवलंबून संस्थांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.
लाहोरमधील खालसा हायस्कूलमधील माणसांची ब्रिटिश सरकार प्रती असणारी निष्ठा भगतसिंग यांचे आजोबा अर्जुनसिंग यांना मान्य नव्हती. ज्यामुळे भगतसिंग यांनी त्यांचे पुढील शिक्षण घेणे बंद केले.
1922 मध्ये झालेल्या चौरा-चौरीच्या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली. हे आंदोलन मागे घेतल्याने अनेक तरुण क्रांतीकारकांना पुढे पुढील आंदोलन कसे लढावे हा प्रश्न पडला. तरुण स्वातंत्र्यवीर यांमुळेच यातूनच पुढे जहालमतवादी क्रांतिकारकांचा गट तयार झाला. यासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला याच दरम्यान भगतसिंग यांच्या वडिलांनी त्यांची जामिनावर सुटका केली.
त्यांच्या वडिलांना वाटते की, भगतसिंग यांनी दुग्ध व्यवसाय चालवावा व त्यांच्या पसंतीच्या मनेवाली नावाच्या मुलीशी लग्न करावे. परंतु, भगतसिंग यांनी त्यासाठी साफ नकार देत भविष्यात पुन्हा लग्नासाठी बाध्य करणार नाहीत, असे आश्वासन घेतले. घरी चिठ्ठी लिहून भगतसिंग लाहोरला आले. त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिले होते की त्यांच्या जीवनात देशप्रेम सर्वात पहिल्यांदा येते. त्यानंतर, त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी अर्पण करण्याचे ठरवले.
त्यानंतर भगतसिंग यांनी युरोपियन क्रांतिकारक चळवळींचा अभ्यास करण्याच्या हेतूने नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर मात्र भगतसिंग गांधींच्या अहिंसक लढ्यातून विरक्त झाले. त्यानंतर मात्र भगतसिंग यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि सशस्त्र हिंसक आंदोलनाला सुरुवात केली.
भगतसिंग यांचा स्वातंत्र्यसंग्राम
वयाच्या बाराव्या वर्षी तो जालियनवाला बाग हत्याकांड परिसर पाहिला. त्यावेळी जणू ते ब्रिटिशविरोधी मोहिमांसाठी सामर्थ्य एकवटत होते.
गुरुद्वारामध्ये “नानकाना साहिब” किंवा “साका नानाकाना” या स्थानी ब्रिटिशांनी २६० पेक्षा जास्त शीख लोकांना
त्यानंतर, वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी झालेल्या हत्याकांडाविरोधातील आंदोलनात सामील झाले.

अगदी तरुण वयातच वयाच्या १३ व्या वर्षी स्वातंत्र्याचे महत्व जाणत त्यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध करण्यास सुरुवात केली. “इंकलाब जिंदाबाद” हा त्यांचा नारा आजही भारतात प्रसिद्ध आहे.
ब्रिटिश राजकीय अपमानाच्या दृष्टीने झालेल्या अनेक हिंसक आंदोलनात त्यांनी सक्रियरित्या भाग घेतला. ज्यामुळे कित्येकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. परंतु, त्यांच्या जीवनातील ब्रिटिश विरोधी दोन हिंसक आंदोलने मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
माझी कलम माझ्या भावनांविषयी इतकी परिचित आहे की, जर मला प्रेम लिहायचे असेल तरी क्रांती लिहिली जाते.
– भगतसिंग
ब्रिटिशांविरुद्धचे पहिले हिंसात्मक कृत्य
इटलीमधील लोकप्रिय नेते आणि इटलीमध्ये क्रांती घडून आणण्यासाठी आणि कारणीभूत जोसेफ मॅझिनी यांनी “यंग इटली” या गटाची स्थापना केली होती. भगतसिंग यांनी सण १९२६ मध्ये “नौजवान भारत सभे”ची (यूथ सोसायटी ऑफ इंडियाची) स्थापना केली.
त्याचप्रमाणे, त्यांनी “हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन”मध्ये सहभागी होऊन ब्रिटिशविरोधी कारवाया केल्या. तेथे भगतसिंग अनेक क्रांतिकारकांना भेटले त्यांपैकी चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान, इत्यादी.
त्यानंतर ऑक्टोबर, १९२६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी में, १९२७ मध्ये अटक झाली. त्यानंतर, काही आठवड्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

मार्क्सवादी सिद्धांत
कार्ल मार्क्सचा मार्क्सवादी सिद्धांत ज्यात भांडवलदार आणि श्रमिक वर्गातील संघर्षात अखेर क्रांती होऊन श्रमिक वर्गाचा विजय होतो. या सिद्धांतावर भगतसिंग यांचा पुरेपूर विश्वास होता. त्यामुळे १९२७ मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणासाठी झालेल्या करावासातून सुटल्यानंतर त्यांनी पंजाबी आणि उर्दू भाषेतील क्रांतिकारक वृत्तपत्रांत लेखक आणि संपादक म्हणून काम केले.
सायमन कमिशन
नोव्हेंबर १९२७ मध्ये ब्रिटनमधून सात खासदारांना भारतात घटनात्मक सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. हा गट सरकारला शिफारस करण्यासाठीही जबाबदार होता. या आयोगाला वैधानिक कमिशन असे असे नाव देण्यात आले. परुंतु, सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेनंतर या आयोगाला सायमन कमिशन म्हणून ओळखले गेले.
लाला लजपत राय यांचे मोर्चे
लोकप्रिय भारतीय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधात अहिंसकरित्या मोर्चे काढले. परंतु, ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश दिल्याने ते जबर जखमी झाले. ज्यामुळे जखमा पूर्णपणे बऱ्या न झाल्याने लाला लजपत राय यांचा दोन आठवड्यानंतर हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला.
लालाजींच्या मृत्यूचा बदला
डिसेंबर १९२८ मध्ये लाला लजपत राय यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी त्यांच्या विश्वसनीय सहकाऱ्यांबरोबर जेम्स स्कॉट यांना ठार मारण्याची योजना आखली. या कटात शिवराम राजगुरू, सुखदेव थापर, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग हे सहकारी सामील होते.
या हत्येची योजना असताना त्यांनी एच. एस. आर. ए. संघटनेत कार्यरत राजगुरू यांना बरोबर घेतले. राजगुरू हे संघटनेतील कुशल नेमबाज होते. त्यामुळे शिवराम राजगुरू यांच्या अचूक नेमबाजी मुळे पहिल्याच गोळीत सँडर्स जमिनीवर कोसळला. त्यानंतर सिंग यांनी सात वेळा जॉन सँडर्सवर गोळ्या झाडल्या. पोस्ट मार्टम रिपोर्ट मधूनही एकूण आठ गोळ्या झाडल्याचे स्पष्ट होते. खऱ्या ओळखी अभावी जेम्स स्कॉट ऐवजी चुकून जॉन पी. सँडर्स या २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली.
त्यानंतर भारतीय पोलीस कॉन्स्टेबल छानन सिंग याने भगतसिंग आणि राजगुरू यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु या हत्येसाठी ठरलेल्या त्यांच्या सहकार्यांमध्ये चंद्रशेखर आझाद होते. त्यांनी पाठलाग करणाऱ्या छान छानन सिंग याला शूट करून त्याचीही हत्या केली.
ब्रिटिश भारतातील लाहोर येथे झालेल्या या हत्याकांडामुळे सर्वांना पकडण्यासाठी अधिपत्र जारी करण्यात आले. ब्रिटिशविरोधी कारवाया सुरु ठेवण्यासाठी त्यांनी पलायन केले.
कोर्सच्या हत्येच्या अपयशानंतर एच एस आर ए च्या सदस्यांनी आपल्या निशाण्यावर सँडर्सच होते, हे दाखवण्यासाठी संपूर्ण लाहोरमध्ये पोस्टर्स लावले. तसेच लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचेही त्यांनी पोस्टर्स मध्ये नमूद केले.
माणसाचे कर्तव्य फक्त प्रयत्न करणे असते, यश तर संधी आणि वातावरणावर अवलंबून असते.
– भगतसिंग
ब्रिटिशांविरुद्धचे दुसरे हिंसात्मक कृत्य
भगतसिंग यांनी केलेले दुसरे हिंसात्मक कार्य एक साहसी देशभक्तच करू शकतो. भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त या साथीदाराबरोबर दिल्लीमधील केंद्रीय विधानसभेत जाऊन 8 एप्रिल 1929 रोजी बॉम्ब फेकले. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्बस्फोट करताना कोणतीही जीवितहानी होणार नाही, त्यादृष्टीने त्यांनी रिकाम्या बाकांवर बॉम्ब फेकले. बॉम्बस्फोट करण्याचा उद्देश जीवितहानी करणे हा नव्हता तर, डिफेन्स ऑफ इंडिया ऐक्टचा निषेध करणे एवढाच होता. या हल्ल्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आत्मसमर्पण केले.

भगतसिंग सारख्या तरुण क्रांतिकारकांनी केलेल्या हिंसक आंदोलनांचा गांधीच्या अनुयायांनी कठोर विरोध दर्शवला. पण, भगतसिंग यांचा पूर्ण विश्वास होता कि, ब्रिटिश राजवटीविरोधी सशस्त्र आंदोलन हाच स्वातंत्र्याचा मूलमंत्र आहे. भगतसिंग यांनी हजारो क्रांतीकारकांना आंदोलनांसाठी प्रेरणा दिली.
भगतसिंग यांचे छंद
भगतसिंग यांना वाचनात विशेष रस होता. सचिंद्रनाथ संन्याल यांचे बंदी जीवन हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे “व्हेश दि नेव्हीलिस्ट”, क्रोपोटकिनचे “मेमॉयर्स”, मॅझिनी आणि गॅरीबाल्टी यांची चरित्रे, वॉल्टेर, रुसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. यावरूनच समजते की भगतसिंग यांचा वाचन व्यासंग किती दांडगा होता.
क्रांती साहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती त्या यादीत विक्टर ह्यूगोची “ला मिसरेबल”, हॉलकेनचे इटर्नल सिटी, अपटन सिंक्लेअरची “क्राय फॉर जस्टिस”, रॉस्पीनची “व्हॉट नेव्हर हॅपन्ड”, गार्गीची मदर ह्या कादंबऱ्या होत्या.
त्यांनी सावकार लिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. साम्यवादी समाजरचना व व शोषणमुक्त सक्षम समाज घडवण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गार्गी, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत यांचे चरित्र वाचले होते.
जर क्रांती व्हायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्यादृष्टीने घडवली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांती वाड्मयाचा प्रसार अपरिहार्य आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.
भगतसिंग यांचा मृत्यू

भगतसिंग यांनी ब्रिटिश साम्राज्या विरुद्धच्या लढ्यात केलेल्या हिंसात्मक कार्यांमुळे ब्रिटिश सरकारची अक्षरशः झोप उडाली.
केंद्रीय विधानसभेतील बॉम्बस्फोटानंतर त्यांच्यावर खटला चालवला गेला. यादरम्यान, त्यांनी बंड करून कारवाईत व्यत्यय आणला. ते दोषी सापडल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सॅंडर्सच्या हत्येच्या तपासादरम्यान ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांना भगतसिंग यांचा संबंध सापडला. ज्यामुळे, त्यांच्यावर परत कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान भगतसिंग यांनी उपोषण सुरु केले. या कारवाईत सॅंडर्सच्या हत्येमध्ये सामील इतरही सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांनाही अटक केली. शेवटी, न्यायालयात भगतसिंगबरोबर, व इतर सहकार्यांनाही फाशीची शिक्षा सुनावली.
२४ मार्च, १९३१ रोजी या तीन क्रांतीकारकांना फाशी देण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, एक दिवस आधी म्हणजेच २३ मार्च, १९३१ रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली.
त्यांच्या मृत्यूनंतर भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. त्यांच्या समर्थकांनी त्यांना देशासाठी हसत-हसत बलिदान देणारे अद्वितीय क्रांतिकारक मानले. तर, गांधीवादी विचारांच्या लोकांनी त्यांना जहालमतवादी आणि स्वातंत्र्याच्या शोधातील त्रस्त व्यक्ती मानले.
त्यांच्याबद्दलचे लोकांचे विचार जरी वेगवेगळे असले तरी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान महत्वाचे होते यात तिळमात्रही शंका नाही.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
तत्वज्ञान केवळ मानवी दुर्बलता आणि मर्यादा यांचे परिणाम असतात.
– भगतसिंग
भगतसिंग यांच्यावरील चित्रपट
द लिजेंड ऑफ भगतसिंग
बॉलीवूडच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील “द लिजेंड ऑफ भगतसिंग” या चित्रपटात भगतसिंग यांचे जीवन चरित्र साकारले आहे. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या इतर क्रांतिकारकांनी बरोबर भगतसिंग यांच्यावर आधारित हा चित्रपट होता. लोकप्रिय अभिनेता अजय देवगन यांनी या चित्रपटात मुख्य पात्र केले आहे. त्यांच्याबरोबर सुशांत सिंग, डी. संतोष अखिलेंद्र मिश्रा यांनी इतर महत्त्वाची पात्रे पार पाडली आहेत. तर सहाय्यक भूमिकेत अमृता राव राज बब्बर फरीदा जलाल ही पात्रे आहेत.
भगतसिंग हे रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचे साक्षीदार होते. या घटनेबरोबर भगतसिंगांच्या जीवनाचा इतिहास या चित्रपटाद्वारे आपणा समोर उभा राहतो. २००२ साली रमेश थोर आणि कुमार यांच्या टिप्स इंडस्ट्रीज सुमारे 2.2 दशलक्ष डॉलर्स एवढ्या बजेट बजेटने या चित्रपटाची निर्मिती केली. रमेश तोरानी आणि कुमार या चित्रपटनिर्मितीत सहभागी झाले.
या चित्रपटाचे कथा लेखन संतोषी यांनी तर संवाद लेखन पियुष मिश्रा यांनी केले आहे. पटकथा अंजुम राजवली यांनी तयार केली आहेत. छायांकन के. व्ही. आनंद द्वारा तर संपादन व्ही. एन. मयेकर यांनी केले. डिझाईन निर्मिती नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली आहे. चित्रपटाचे शुटींग २००२ साली जानेवारी ते मे दरम्यान मुंबई, पुणे, आग्रा, मणाली येथे करण्यात आले
या चित्रपटात “मेरा रंग दे बसंती” व “सरफरोशी की तमन्ना” सरफरोश सरफरोश सरफरोया गाण्यांना ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर जरी धमाल करू शकला नसला तरी देशभक्तांना देशभक्त तरुणांना प्रेरित करण्यासाठी खास मेजवानी आहे या चित्रपटाने 2.7 दशलक्ष डॉलर्स एवढी कमाई केली.
या चित्रपटाला हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्काराने संपादित केले. त्याचप्रमाणे अजय देवगन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या चित्रपटाला तीन फिल्मफेअर अवॉर्ड्सही मिळाले. भगतसिंग हे लहानपणापासूनच ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराचे परिचित होते.
लाहोरमधील सेंट्रल जेल मध्ये थापट बरोबर भगतसिंग आणि राजगुरू यांनीही भारतीय कायद्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अवघ्या 63 दिवसांचे उपोषण केले.
याच दरम्यान तिकडे चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांनी ब्रिटिश पोलिसांच्या जिवंत हाती लागू नये यासाठी पिस्तूल च्या शेवटच्या गोळीतून स्वतःचा अंत केला त्यांच्या आत्महत्येने क्रांतिकारी चळवळीला पाठबळ मिळाले दरम्यान पोलिसांना भगतसिंग यांचा सहभाग सँडर्सच्या हत्येमध्ये असल्याचा तपास लागला.
भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना अशी आशा होती की गांधीजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या सुटकेसाठी लोर्ड इरविन यांच्याशी करार करतील परंतु गांधीजींनी असे करण्यास साफ नकार दिला तर या करारामध्ये खालील प्रमाणे थोडा बदल केल्यास गांधीजी या करारावर स्वाक्षरी करण्यास असहमती दर्शवित होते
“हिंसाचारात सामील असलेल्या राजकीय कैद्यांची सुटका”
त्यामुळे या तीन क्रांतिकारकांच्या अंतानंतर या घटनेने अनेक विवादांना तोंड फोडले. महात्मा गांधी हे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची सुटका करू शकत होते किंवा नाही हा एक चर्चेचा विषय बनला. महात्मा गांधी आणि जहाल मतवादी तरुण क्रांतिकारक यांचे विचार जरी वेगळे असले त्यांचे ध्येय मात्र एकच होते
भगतसिंग हे तडफदार भारतीय समाजवादी क्रांतिकारक होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी दोन मोठी हिंसक क्रांतिकारी कार्य पार पाडली. दुसऱ्या क्रांतिकारी कार्य नंतर ब्रिटिश सरकारने त्यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. परंतु निश्चित तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजेच 23 मार्च 1931 या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. भगतसिंग यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नायक बनले.
बॉम्बे फेकल्यानंतर या क्रांतिकारकांनी गॅलरी मधून आमदारांवर पत्रकांचा वर्षाव करत इन्कलाब झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. अटकेनंतर भारतभर भगतसिंग यांना प्रसिद्धी मिळाली या वाढत्या लोकप्रियतेमुळे पोलिसांनी सेंटरच्या हत्या त्यांच्या सहभागाबद्दल तपास लावला. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला. यादरम्यान ते जितेंद्र दास यांच्या उपोषणात सामील झाले. ते उपोषण भारतीय राजकीय कैद्यांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी होते. भगतसिंग हे या उपोषणात सहभागी झाल्यामुळे त्यांना सामाजिक मान्यता मिळाली.
त्याकाळच्या दिग्गज नेत्यांपैकी एक जवाहरलाल नेहरू त्यांच्याबद्दल लिहितात, “ भगतसिंग हे त्यांच्या हिंसक कृत्यामुळे लोकप्रिय झाले नाहीत परंतु कारण ते खुनशी होते, चळवळींसाठी लाला लजपत राय यांच्या आणि त्यांच्यामार्फत देशाच्या प्रतिष्ठेसाठी.
ते प्रतीक बनले कायदा विसरला गेला प्रतीक मागे राहिले आणि काही महिन्यातच पंजाब मधील प्रत्येक शहर आणि गाव तसेच काही प्रमाणात उत्तर भारतातील उर्वरित भाग त्यांच्या नावाने बदलले.
सिंग हे त्यांच्या जीवनात नास्तिक आणि समाजवादी होते त्यांचे कम्युनिस्ट आणि दक्षिण पण ती राष्ट्रवादी या पक्षातूनही अनेक समर्थक बनले.”
घरात मुख्यतः हिंदु आणि शीख कुटुंब सदस्य होते. नवानशहर जिल्ह्यात खटलं कलान हे भगतसिंग यांचे खानदानी गाव ज्याला आज लोक शहीद भगतसिंग नगर म्हणून ओळखतात.
तुरुंगातील सुटकेनंतर १९१० साली लाहोरमध्ये स्वराज सिंग यांचा मृत्यू झाला तर अजित सिंग यांना कोर्ट मधील चालू घटल्यामुळे त्यांना अज्ञातवासात राहावे लागले
भगतसिंग यांचे समवयस्क मुले जात असलेल्या खालचा हायस्कूल येथील कर्मचारी ब्रिटिशांबरोबर निष्ठावान होते. त्यामुळे त्यांनी या हायस्कूलमध्ये जाण्यास नकार दिला. विवाह टाळण्यासाठी सिंग कानपूरला निघून गेल्या.
भगतसिंग यांचा तरुणां वरील वाढता विश्वास आणि प्रभाव कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी ऑक्टोबर 1926 मध्ये लाहोर बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवले. पाच आठवड्यानंतर पाच हजार रुपये दंड भरल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
डॉक्टरांच्या मते लालाजींच्या शरीरावरील मोठा झाल्यामुळे त्यांचा लवकर मृत्यू झाला असावा. लालाजींचे निधन हृदय घाताने झाले. युनायटेड किंग्डमच्या संसदेत हा विषय जेव्हा मांडण्यात आला तेव्हा ब्रिटिश शासनाने त्यांच्या मृत्यू मध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगण्यात आले.
व्यक्तीचे विचार आणि कठोर टीका ही क्रांतिकारक विचारांची दोन वैशिष्ट्ये आहेत.
– भगतसिंग
नेहरूंचे भगतसिंग यांच्याबद्दलचे विचार
त्यांच्याबद्दल असंख्य गीत तयार झाले आणि त्यांनी जी लोकप्रियता मिळवली अद्वितीय आहे. एच एस आर ए च्या सदस्यांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली.
लालाजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटने लाठीचार्जचा आदेश दिला. या लाठीचार्ज मुळे लालाजी गंभीर जखमी झाले, त्यानंतरही जेम्स स्कॉट याने वैयक्तिकरित्या त्यांना मारहाण केली.
भगतसिंग यांनी लाहोरच्या नॅशनल हायस्कूलमध्ये साहित्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला तेथे हिंदी साहित्य संमेलनात त्यांनी १९२३ मध्ये पंजाबमधील समस्यांवर प्रकाश टाकला व निबंध स्पर्धा जिंकली.
भगतसिंग हे समाजवादी क्रांतिकारक होते त्यामुळे बहुदा एच. आर. ए. चे नामांतरण एच. एस. आर. ए. मध्ये करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असावी.
गांधीजींनी असहकार आंदोलन बंद केल्यानंतर हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. ज्यामुळे भगतसिंग यांच्या धार्मिक विचारसरणी वर मोठा परिणाम झाला भगतसिंग यांना प्रश्न पडला की सुरुवातीला ज्या हिंदू-मुस्लीम बांधवांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध ठामपणे एकत्र राहून लढा दिला शेवटी हेच लोक फक्त धर्मांच्या आधारावर एकमेकांच्या प्राणावर उठले.
हे सत्य पचवत त्यांनी अशा धार्मिक श्रद्धा सोडून दिल्या. जो धार्मिक विश्वास स्वातंत्र्यलढ्यात बाधा बनत असेल, तर असा विश्वास सोडून देणे चांगले. त्यांनी क्रांतिकारी कार्यात प्रेरणा मिळावी यासाठी बाकुनिन, लेनिन, ट्रॉटस्की यांसारख्या नास्तिक क्रांतिकारकांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास केला. कॉमन सेन्स हे सोहम स्वामींचे पुस्तकही त्यांना विशेष आवडे.
भगतसिंग यांना आदरांजली वाहताना कुसुमाग्रजांच्या खालील ओळी सार्थ वाटतात. भगतसिंग यांचे विचार खूप मोलाचे होते ते म्हणत,
आयुष्य स्वतःच्या हिमतीने जगायचे असते, दुसऱ्यांच्या खांद्यांवर तर केवळ तिरडी उचलली जाते.
– भगतसिंग
मूळ शब्द: “जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान!”
I hope you like this in depth Bhagat Singh information in Marathi language. As we specially created this stuff for Marathi people, so please appreciate our efforts by sharing this piece of content.
इन्कलाब जिंदाबाद!
जय हिंद!
*नोंद: ल्यालपूर जिल्ह्याचे नाव १९७९ साली बदलून फैसलाबाद करण्यात आले आहे.
Featured image credit: Wikimedia, Source: Ramnath Photographers, Delhi