थोडक्यात परिचय
अगदी या उक्तीला साजेस आणि स्वातंत्र्यापेक्षा दुसरे काही नको या ध्यासाने झपाटलेले क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरराव सावरकर.
मंडळी मी हे नाव उच्यारलं की, समोर एक धडाडून पेटलेले यज्ञकुंड दिसते. पेटलेला यज्ञही तेच आणि त्यात स्वतः जाणीवपूर्व अर्पण केलेली समिधा म्हणजेही त्यांचच आयुष्य. मुळात सावरकरांविषयी बोलताना त्यांचा जीवनपट म्हणजे नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळी मूस तयार केली होती की काय? हा प्रश्न मला पडतो.
कारण चढ, उत्तरांच्या अनियमित घटना सामान्यांच्या आयुष्यामध्ये सामान्यतः नसतेच. ह्या सावरकरांच्या आयुष्यात होत्या, म्हणून ते कदाचित असामान्य ठरले असावेत. असो एकीकडे प्रचंड मानसम्मान, नावलौकिक, प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली, तर दुसरीकडे कमालीचा मनस्थाप, अवहेलना, पराजय आणि सक्तीचा एकांतवासही त्यांनी अनुभवाला.
राष्ट्रभक्त समूहाची स्थापना
शेवटी, भाग्याने महानायकाच्या भूमिका जी त्यांना दिली होती. त्यामुळेच, गुप्त संघटना स्थापन करून भारतमातेच्या मुक्तिकार्याला प्रारंभ करायचं त्यांनी ठरवलं. राष्ट्रभक्त समूह स्थापन झाला, त्याचं मित्रमेळ्यात रूपांतरही झालं. राष्ट्रामुक्तीसाठी देशभक्ताकडे जशी बौद्धिक उंची असावी लागते ना, तसेच त्यांचे मन आणि मनगटात सामर्थ्यही असावे लागते, जे सावरकरांच्या ठायी होतं.
१९०१ ला सावरकर फर्ग्युसन कॉलेजला आले, मित्रमेळ्याची “अभिनव भारत” संघटनेत रूपांतर झालं. तेव्हाच, “कृतभू पोटात, घालूद्या खुशाल थैमान! कुरतडू द्या आतडी, करू द्या रक्ताचं पान! संव्हारककाळी तुझं देती बळीच आव्हान, बलशाली मरणाहून आहे आपुला अभिमान”. असे तरुणांना सांगून त्यांनी लाखो तरुणांना राष्ट्रीय चळवळीत आणले.
विदेशी कापडावरील बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले असे व्यक्ती होते, ज्यांनी विदेशी वस्त्रांची होळी केली. याच घटनेने ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नावारूपास आले. टिळकांच्या राष्ट्रवादी विचारसरणीपासून प्रेरणा घेऊन ते लंडनला गेले. भारताची राष्ट्रीय समस्या आंतरराष्ट्रीय क्षितिजावर मांडण्याचे तेथेही सशस्त्र हालचाली सुरु केल्या.
भारतीय तरुणांना संघटित करून ब्रिटिशविरोधी मोहिमा
मुळात इंग्रज अधिकाऱ्यांना कायम मरणाच्या छायेत ठेवायचं आणि राज्यकारभार करणं अशक्य करून सोडायचं, हाच त्याचं मानस. त्यामुळेच त्यांनी अनेक परदेशातील भारतीय तरुणांना संघटित केलं. याचाच परिणाम म्हणून मदनलाल धिंग्रा यांनी जॉर्ज कर्झनची हत्या केली होती.
बॉम्ब तयार करण्याचे तंत्र
एवढाच काय “देशासाठी मारता मारता, मरेल तो झुंजे”, अशी शपथ घेत या देशभक्ताने बॉम्ब तयार करण्याचंही तंत्रज्ञ अवगत केलं.
कलेक्टर जॅक्सनची हत्या
या तंत्रज्ञसह २२ ब्राउनिंग पिस्तुले त्यांनी भारतात धाडली, त्यामधील एका पिस्तुलाने अनंत कानडेने कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. दुसरे म्हणजे खुदिराम बॉसने मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड या अधिकाऱ्यावर बॉम्ब टाकला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार
“असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.”
“देशासाठी मारता मारता, मरेल तो झुंजे!”
“कृतभू पोटात, घालूद्या खुशाल थैमान! कुरतडू द्या आतडी, करू द्या रक्ताचं पान! संव्हारककाळी तुझं देती बळीच आव्हान, बलशाली मरणाहून आहे आपुला अभिमान”
“अनादी मी, अनंत मी, अवद्य मी भला, मारील कवण रिपु असा जन्माला!”
– स्वातंत्र्यवीर सावरकर
साहित्याद्वारे तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली
अशारितीने, स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित असणारी क्रांतिकारी कृत्यांची मालिका भारतामध्ये सुरु झाली. त्यांनी १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम हा ग्रंथ लिहून भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत केली. भारतीय क्रांतीकारकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी इटालियन क्रांतिकारक म्याझिनी यांच्या जीवनचरित्राचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद (भाषांतर) केले. याचे मूळ कारण एवढेच, त्यांच्या लेखणीबरोबर त्यांची जिभा सारख्याच शक्तीने चालत.
स्वातंत्र्यलढ्याचं लक्ष- पूर्ण स्वातंत्र्य
ते असे प्रथम व्यक्ती होते, ज्याची पदवी त्यांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्याने हिसकावून घेतली. ते प्रथम असे भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी इंग्लंडया राज्याप्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला. आणि तेच असे प्रथम व्यक्ती होते ज्यांनी ज्यांनी पूर्ण स्वातंत्र्य हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं लक्ष घोषित केलं.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवून विकासासाठी प्रेरणा
जन्मठेपेची शिक्षा
दुर्दैवाने त्यांनी मार्सेलीस बंदरामध्ये मारलेली उडी निष्फळ ठरली आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या या महामेरुला जन्मठेपेची शिक्षा झाली. सावरकर हे जगातला एकमेव योद्धा असतील, ज्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. परंतु, तेव्हाही “अनादी मी, अनंत मी, अवद्य मी भला, मारील कवण रिपु असा जन्माला!”
हे त्यावेळी त्यांनी महाकाव्य रचले. समाजातील तर्करूष्ट रूढी, चालीरीती, प्रथा, परंपरेच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाचे निर्मूलन करण्याचे कामही केले. भारताला विकासाच्या दृष्टीने, विज्ञानाच्या जोरावर आधुनिक शस्त्र विकासाला त्यांनी नेहमी प्रेरणा दिली. भारतीय राष्ट्राच्या या उत्तुंगतेच्या राष्ट्रभक्ताला पाहून क्रांतीचे यज्ञकुंड चेतवून जीवनाची समिधा वाहणाऱ्या या महापुरुषाकडे पाहून एवढंच कळतं की, सावरकर म्हणजे एक धगधगतं यज्ञकुंडच!