जामिनी रॉय

Today, I am going to tell you the Indian artist called Jamini Roy. In Paintings of Jamini Roy you will found Folk Art of India & Kalighat Paintings as well as Vishnupur Style Paintings.

जन्म तारीख: ११ एप्रिल १८८७
मृत्यूची तारीख: २४ एप्रिल १९७२
जन्म ठिकाणः बेलियटोर, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यूचे ठिकाणः कोलकाता, भारत
व्यवसाय: चित्रकला
वडील: रामतरण रॉय
पुरस्कारः व्हायसरॉय सुवर्णपदक (१९३४), पद्मभूषण (१९५४), ललित कला अकादमीचे फेलो (१९५५)

Ganesha Art created by Jamini Roy
Image Credits:

प्रस्तावना:

तुम्ही कलाप्रेमी असाल, तर भारतीय कलाकृतींनी तुमचे लक्ष वेधले नाही तर नवलच. भारतभ्रमण करत कधी पश्चिम बंगालला गेलात तर तेथील कलाकृती नक्की पहा आणि त्याविषयी जाणून घ्या. हा तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव राहील. पश्चिम बंगालच्या बहुसंख्य कला रसिकांकडे आताच्या आधुनिक कलाकृतींपेक्षा जामिनी रॉय यांच्या संरक्षित पोर्ट्रेट्स पाहायला मिळतील.

Jamini Roy Sign
Image Credits:

कलाप्रेमी जामिनी रॉय:

जर खरेदीदाराला कलेविषयी आवड नसेल तर ते अशा खरेदीदाराला आपली कलाकृती विकण्यास नकार देत. यातूनही जर अशा कला चांगल्या स्तितीत ठेवण्यास खरेदीदार असमर्थ ठरला तर जामिनी रॉय त्या कलाकृती परत विकत घेत. यावरून,जामिनी रॉय यांचे कलेवर असीम प्रेम होते.
विसाव्या शतकातील आधुनिक जगात नवीन आधुनिक कलांकडे बहुतेक चित्रकार आकर्षित झाले. ज्या कलांना बाजारात जास्त मागणीही होती. चित्रकारांना त्यातून चांगले मानधन मिळे. अशा काळात भारतीय मूळ पारंपरिक कला जोपासून जगापुढे भारतीय कलांचे महत्व प्रस्थापित करण्याचे काम जामिनी रॉय यांनी केले.

Durga Paintings of Jamini Roy
Image Credits:

त्यांनी त्यांच्या कलाकृतींना खूप चांगले मानधन मिळावे याकडे लक्ष दिले नाही. परंतु, खरेदीदारांची कलेविषयीची आवड लक्षात घेतली. कलेची पारख असलेला खरेदीदार कलाकृतीला योग्य प्रकारे जतन करून ठेवेल. असे जामिनी रॉय यांचे मत होते. जामीन रॉय यांच्या कलेवर कालीघाट चित्रकलेमधील साधेपणाने मोठा प्रभाव पडला.

कदाचित हे देखील आवडले आपल्या पसंतीस उतरेल:

भारतीय ऐतिहासिक ठिकाणे

पद्मभूषण जामिनी रॉय:

भारतीय पारंपरिक कलेचा वारसा जपल्याने हजारो लोकांचे त्यांनी मन जिंकले. भारतीय रंगाचा आणि कलासामग्रीचा वापर करण्यासाठी त्यांनी तत्कालीन युरोपीयन रंग आणि सामग्री वापरण्याचे सोडून दिले. कला क्षेत्रात त्यांनी दिलेल्या या विशेष योगदानासाठी त्यांना सन १९५४ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जामिनी रॉय यांचा जन्म:

जामिनी रॉय यांचा जन्म सन १८८७ साली पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा जिल्ह्यामधील बेलियटोर या छोट्याशा गावात झाला.

Kalighat Paintings
Image Credits:

जामिनी रॉय यांचे वडील- रामतरण रॉय:

जामिनी रॉय यांचे वडील रामतरण रॉय हे मोठे जमीनदार होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. रामतरण रॉय हेदेखील कलेचे भोक्ते होते. सरकारी सेवेत असताना कलेमध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांची नोकरी सोडली. त्यामुळे जामिनी रॉय यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांनी दिला यात तिळमात्र शंका नाही.

जमिनी रॉय यांचे शिक्षण:

जमिनी रॉय यांची शैक्षणिक वाटचाल:

असे म्हणतात, महान व्यक्ती त्यांच्या भविष्यातील कार्याची प्रचिती लहान वयातच देतात. त्याचप्रमाणे १६ वर्षाचे वयात त्यांनी घर, गाव सोडून कोलकत्ता येथे आले. सन १९०३ मध्ये जामिनी रॉय यांनी सरकारी कला महाविद्यालयात प्रेवेश घेण्याकरिता प्रयत्न केले. प्रेवेशानंतर अबनिंद्रनाथ टागोर या प्रसिद्ध आधुनिक चित्रकाराच्या सानिद्यात त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. अबनिंद्रनाथ टागोर महाविद्यालयाचे उप- प्राचार्य होते. जामिनी रॉय यांना प्रचलित शैक्षणिक परंपरेनुसार प्रशिक्षण देण्यात टागोर यांनी जातीने लक्ष दिले.

Folk paintings of India
Jamini Roy Paintings in Kalighat Style, Image Credits:

१९०८ साली डिप्लोमाची पदवी:

जामिनी रॉय यांनी इसवी सन १९०८ साली ललितकलेमध्ये डिप्लोमाची पदवी घेतली. ते याठिकाणी शिकलेल्या आधुनिक कलेमध्ये निपुण बनले. परंतु, काही कालांतराने लक्षात आले की त्यांचा ओढा दुसऱ्या प्रकारच्या कलेकडे आहे. त्यामुळे त्यांनी कमाईची, मानधनाची फिकीर न करता भारतीय कलेवर आपले लक्ष केंद्रित केले.

जामिनी रॉय यांच्या कलाकृती आणि कारकीर्द::

पोर्ट्रेट चित्रकार म्हणून कामाला सुरुवात:

जामिनी रॉय यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एक पोर्ट्रेट चित्रकार म्हणून कमिशनवर काम केले. परंतु, या कामामध्ये ते खुश नव्हते. सन १९२५ साली ते प्रसिद्ध कालीघाट मंदिरात गेले.

बंगाली लोककला:

मंदिराबाहेरील रेखीव चित्रकला पाहून त्यांना त्यांच्या आवडत्या कलेचा प्रकार पाहायला मिळाला. त्यांना कळून चुकले की आपला कला क्षेत्रात येण्याचा उद्देश काय आहे. बंगाली लोककला हि तीन वेगवेगळ्या गोष्टींकरिता उपयोगी ठरते हे त्यांना माहित होते. पहिली गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांचे जीवनव्यापण जगासमोर मांडता येथे. दुसरी म्हणजे आपली कला सर्वांना उपलब्ध करता येते. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय कलेची महती जगाला कळते.

Folk Art of India
Image Credits:

कालीघाटची शैली:

कालीघाटची शैली त्यांनी आत्मसात केली. त्यामुळे, यानंतर त्यांच्या चित्रकलेत आपणाला कालीघाटच्या चित्रकलेची शैली दिसून येते. १९३० च्या दशकात त्यांनी केलेल्या मेहनतीची चीज झाले. कारण, त्यांची चित्रकलेची शैली लोक पसंत करू लागले. त्यांच्या चित्रकलेत त्यांना कालीघाट शैलीचे प्रतिबिंब दिसते. त्यांनी या शैलीमध्ये असे प्राविण्य मिळवले की, असे वाटायचे, चित्रे जणू आपल्याशी बोलत आहेत.

Indian Kalighat style Artwork
Image Credits:

जामिनी रॉय यांच्या कलाकृतींची प्रसिद्धी:

याच दशकात त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकृतींची निर्मिती केली. सन १९३८ मध्ये, भारतात ब्रिटिश राजवट असताना जामिनी रॉय यांच्या चित्रकलेच्या कलाकृती कलकत्त्याच्या रोडवर प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकृती होत्या. सन १९४० च्या दशकामध्ये त्यांची चित्रकला भारतीय मध्यमवर्गीयांमध्ये खूप प्रसिद्धीस आली. त्याचबरोबर युरोपियन देशातील लोकही त्यांच्या कलाकृती खरेदी करण्यास इच्छुक होते. जगभरातील त्यांच्या कामाला मिळालेल्या प्रसिद्धीने ते आश्चर्यचकित झाले.

Indian Arworks- Painting of Jamini Roy
Image Credits:

पारंपरिक बिष्णुपूर मंदिराच्या टेराकोटाची कला:

कालांतराने, त्यांच्या चित्रकलेत स्वदेशी पारंपरिक कालीघाट चित्रशैलीबरोबर बिष्णुपूर मंदिराच्या टेराकोटाची कलाही दर्शवत होती. त्यानंतर न्यूयॉर्क तसेच लंडनमधील कार्यंक्रमांमध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले. पाश्चात्य शैलीवरून भारतीय बंगालच्या लोककलेकडे वळताना त्यांच्या मनात जी उद्दिष्ट्ये बाळगली. ती उद्दिष्ट्ये त्यांनी पूर्ण केली होती.

I hope you like this article of Jamini Roy Paintings, Folk Art of India & Kalighat Paintings. Please share this article with your Art lover friends and Family.

Featured Image Credits: cea +

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Join our list

Subscribe to our mailing list and get interesting stuff and updates to your email inbox.

Thank you for subscribing.

Something went wrong.

Don\'t sent me the FREE stuff

Join our list

Subscribe to our mailing list and get interesting stuff and updates to your email inbox.

Thank you for subscribing.

Something went wrong.

Don\'t sent me the FREE stuff
Send this to a friend