शहाजी राजे भोसले – मध्ययुगीन भारतातील महत्वपूर्ण लष्करी नेते

by डिसेंबर 30, 2023

परिचय

शिवकालीन इतिहास तर सर्वाना माहित आहे. पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे.

बहुतेक लोकांच्या मते,

परिवर्तन हा जगाचा सिद्धांत आहे.

पण हे परिवर्तन मर्यादित स्रोतांचा वापर करून प्रतिकूल परिस्थितीत करायचे असेल तर त्याला मजबूत पार्श्वभूमी आणि पाठबळ हवे असते.

माझ्या मते, शिवरायांना तो भक्कम आधार देणारे त्यांचे वडील शहाजी राजे होते. शहाजी राजेंनी आपल्या मुलाला स्वतंत्र राजा होण्यासाठी आवश्यक वातावरण दिले.

वेरूळच्या मालोजीराजे यांचे पुत्र शहाजी राजे यांनी स्वकर्तृत्वाने मराठयांमधील भोसले घराण्याचे वर्चस्व वाढवले. त्यांचे वडील मालोजीराजे हे विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात सर गिरोह होते.

शहाजीराजेंनी विजापूरच्या आदिलशाह आणि अहमदनगरच्या निजाम शाह यांच्या दरबारात सरदार म्हणून काम केले. त्यांच्या काळात त्यांनी अनेक लढाया लढल्या. दख्खनमधील वडिलोपार्जित जहागिरीसह त्यांना दक्षिणेतील विजयानंत कर्नाटकची जहागिरी मिळाली.

शहाजी राजे भोसले
शहाजी राजे भोसले

शहाजी महाराजांचे पूर्वज

सिसोदिया राजघराण्यातील वंशज, भोसाजीच्या कारकिर्दीत सिसोदे भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले. यशने सामायिक केलेल्या पुस्तकातील मजकुरानुसार, भोसाजीच्या कालखंडानंतर, भोसले घराण्यातील खेलकर्णजी महाराज आणि मालकर्णजी महाराज प्रथम दक्षिणेत आले.

ते दोघे भाऊ पादशहा अमेदशा दौलताबादकर यांच्याकडे आले. बहुधा ते दौलताबादचे राजे असावेत आणि त्यांनी त्यांना त्या वेळी पंधराशे सैनिकांची सरदारकी आणि मनसबदारी दिली होती. तेव्हापासून त्यांना पादशाही उमराव म्हणत. त्यांच्या नावावर चाकण, पुरंदर व सुपे असे तीन प्रांत दिले.

शहाजी राजे यांच्या कारकिर्दीत, त्यांना त्यांच्या राजकीय डावपेचांमुळे आणि गनिमी युद्धातील कौशल्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच, सिसोदे घराणे आता भोसले मराठा घराणे म्हणून प्रसिद्ध झाले होते.

दौलताबाद येथे स्थायिक झालेले हे भोसले घराणे खेलकर्णजी महाराजांपासून ते शहाजी राजे यांच्यापर्यंत चालत आले होते.

आपण सध्या घाईत असाल, तर उर्वरित विभाग नंतर वाचण्यासाठी हे पृष्ठ बुकमार्क करा. तसेच नवीन अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या मोफत वृत्तपत्राचे सदस्य व्हा.

संक्षिप्त माहिती

घटक
माहिती
ओळख
शहाजी राजे भोसले हे भोसले घराण्यातील एक प्रभावशाली सुरुवातीला निजामशाही तर नंतर आदिलशाही सरदार होते.
धर्म
हिंदू धर्म
जन्मतारीख
१८ मार्च १५९४
पालक
माता: दीपाबाई (उमाबाई), पिता: मालोजीराजे भोसले
व्यवसाय
लष्करी सरदार
पत्नी
जिजाबाई भोसले, तुकाबाई, नरसाबाई
पुत्रे
संभाजी राजे, शिवाजी राजे, व्यंकोजी राजे
एकूण आयुर्मान
७० वर्षे
मृत्यू
२३ जानेवारी १६६४

शहाजी भोसले यांच्या जीवनातील क्रमवार विशेष घटना

घटना
वर्ष
शहाजी राजे भोसले यांचा जन्म
इ.स. १५९४
निजामशहाच्या अप्रत्यक्ष आदेशाने सेनापती लुखुजी जाधव यांची दरबारात हत्या
इ.स. १६२९
शहाजी राजांचा निजामशाही सोडून आदिलशाहीत प्रवेश आणि त्यांनी पुणे व सुपे परत मिळवले
इ.स. १६३२
अली आदिलशाहने शहाजी महाराजांना पकडले
इ.स. १६४८
शहाजी भोसले यांचा मृत्यू
इ.स. १६६४ (वय ६९-७०)

जन्म आणि प्रारंभिक जीवन

अहमदनगर येथील सूफी मुस्लिम पीर शाह शरीफ दर्ग्यात मालोजी राजे आणि उमाबाई यांनी मुलासाठी प्रार्थना केली.

काही कालावधीनंतर दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर परत आल्यावर त्यांना आनंदाची बातमी मिळाली. महाराष्ट्रातील वेरूळ येथे १५९४ मध्ये उमाबाईंनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी दुसरा मुलगा झाला. मोठया

शाह शरीफ दर्ग्याच्या नावावरून मालोजी राजांनी मोठया मुलाचे नाव “शहाजी” आणि धाकट्या मुलाचे नाव “शरीफजी” ठेवले.

ते त्याकाळच्या शक्तिशाली भोसले घराण्याचे प्रतिनिधी होते. त्यांचे कुटुंब दख्खन भागातील राजकारण आणि लष्करी कार्यात खूप आघाडीवर होते.

त्याच्या वडिलांकडे निजामशहाच्या दरबारात महत्त्वाचे लष्करी पद होते. त्यामुळे साहजिकच, लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून आणि कुटुंबाकडून सरकार, युद्ध आणि वाटाघाटीबद्दल बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्यात जन्मत:च नेतृत्वगुण होता.

मालोजी राजांनी शहाजी राजांना शिकवण्यासाठी एक प्रशिक्षित गुरूंची नेमणूक केले होती. उत्तम लष्करी सेनापती होण्यासाठी त्यांनी त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लष्करी रणनीती यासारखी उर्वरित पूरक कौशल्ये शिकवली.

शहाजी राजे बालवयात असताना असताना दख्खनमधील राजकारण खूप बदलले.

दक्षिण भारतात, विजयनगर साम्राज्य कोसळले आणि आदिलशाहने दक्षिणेत साम्राज्यविस्तार केला. तसेच उत्तरेत मुघल साम्राज्य शक्तिशाली होते जे दक्षिणेत साम्राज्यविस्तार करण्यासाठी तत्पर होते. त्यामुळे दख्खनमधील मोठया प्रदेशाचे राजकारण बदलले.

या घटनांनी त्यांच्या आगामी भविष्यावर परिणाम केला आणि त्याचे भविष्य ठरवले. तरुणपणात, या घटनांनी त्यांना राजकारणाबद्दल बरेच काही शिकवले.

पाया मजबूत करणे हा त्यांचा स्पर्धेवर मात करण्याचा साधा नियम होता. त्यामुळे दख्खनमध्ये अपराजित होण्यासाठी त्यांनी प्रथम दख्खनला चांगले समजून घेतले.

त्यांच्या कर्नाटक मोहिमेनंतर, ते भारतातील एक प्रसिद्ध लष्करी नेते होते. त्यांनी स्वतःच्या जीवनाचा मार्ग बदलला आणि मराठा साम्राज्याचा इतिहासही घडवण्यात मदत केली.

शहाजी महाराजांचे कौटुंबिक जीवन

शहाजीराजे यांनी त्यांच्या हयातीत एकूण तीन विवाह केले. त्यांच्या पत्नींची नावे जिजाबाई, तुकाबाई, नरसाबाई अशी होती. जिजाबाई या पहिल्या पत्नी, नंतर तुकाबाई या दुसऱ्या तर नरसाबाई या तिसऱ्या त्यांच्या पत्नी होत्या.

पीपलपील डॉट कॉमच्या वृत्तानुसार, शहाजीराजे आणि जिजाऊंचे लग्न ५ नोव्हेंबर १६०५ रोजी सिंदखेड येथे झाले होते.

एनडी हिस्ट्रीजनुसार शहाजीराजे सूर्यवंशी आणि जिजाबाई जाधव यदुवंशी किंवा चंद्रवंशी होत्या. त्यांच्या काळातील परंपरेनुसार शहाजी राजांचे लहान वयातच जिजाबाईंशी विवाह झाला होता. लग्नाच्या वेळी ते ११ वर्षांचे होते आणि जिजाबाई अवघ्या ७ वर्षांच्या होत्या.

दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांचे वडील मालोजीराजे तिथे नव्हते. कारण, इंदापूरच्या युद्धात मालोजीराजेंचे आधीच वैकुंठगमन झाले होते.

त्यांच्या लग्नाने भविष्यातील मराठयांचे स्वराज्य साकार होणे शक्य झाले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना येणाऱ्या आव्हनांसाठी प्रभावित केले, तसेच त्यांचे चरित्र आणि कर्तृत्व घडवण्यात मार्गदर्शन केले.

त्यांचा थोरला मुलगा संभाजी शहाजी भोसले यांचा इतिहासात उल्लेख आढळतो. संभाजींबद्दलच्या आई बद्दल लोकांमध्ये द्विमत पाहायला मिळते. फेसबुकवरील काही स्त्रोतांनुसार, काहींचे मत आहे की ते जिजाबाईंचे पुत्र होते, तर विकिपीडियानुसार ते तुकाबाईचे पुत्र होते.

भोसले घराण्याची केंद्रे

पुणे, सातारा, कोल्हापूर, तंजावर हे मराठ्यांमधील भोसले घराण्याचे केंद्रे होती. मालोजीराजेंप्रमाणेच त्यांचे पुत्र शहाजी राजे भोसले यांनीही त्यांच्यासारखीच सुरवातीला अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारात नोकरी पत्करली. त्यामुळे, मालोजींचा वारसा म्हणून पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी शहाजींकडे आली.

विजापूर सेनापती रणदुल्लाखान आणि शहाजीराजे यांच्या कर्नाटक मोहिमेनंतर, कर्नाटक प्रदेश शहाजीराजांना जहागिरी म्हणून देण्यात आला. दख्खनमधील राजकारणापासून शहाजीराजांना दूर ठेवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता.

त्यामुळे त्यांनी आपला मुलगा शिवाजी आणि पत्नी जिजाबाई यांना दख्खनमधील पुणे आणि सुपे परगणा सांभाळण्यासाठी पुण्याला पाठवले.

विठोजी राजांनी जहागीर मिळवण्यास आणि सांभाळण्यास मदत केली

तुळजा भवानी मंदिराचे राजे शहाजी महाद्वार
तुळजा भवानी मंदिराचे राजे शहाजी महाद्वार

महाराष्ट्रातील तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिराचे राजे शहाजी महाद्वार. हे शहाजी महाराजांच्या नावाचे जुने स्मारक आहे.

विठोजी राजे यांना सुलतान आणि मलिक अंबर भोसले घराण्याकडून जहागीर परत घेतील अशी भिती वाटत होती. विशेषत: मालोजी राजे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर आणि त्यात त्यांचा वारस मुलगा शहाजी हे अल्पवयीन असल्यामुळे मालोजींचा वारसा राखणे विठोजींना आव्हानात्मक वाटले.

हुशार असलेल्या मलिक अंबरला विठोजी भोसले शूर आणि प्रतिभावान असल्याचे माहीत होते. भोसले कुळात खूप दूरदृष्टी आणि धैर्य आहे, हे त्याला माहीत होते. संघर्षाच्या वेळी ते खरोखर उपयुक्त ठरतील असा त्यांचा विश्वास होता.

याकारणाने मलिक अंबरने जहागीरी भोसले परिवाराकडेच ठेवण्यासाठी सुलतानकडे शिफारस केली.

प्रलंबित धोका असल्याने आता मात्र विठोजी राजांची चिंता काहीशी कमी झाली. सुलतान निजामशाहने त्यांना एका खाजगी न्यायालयात सुनावणीसाठी बोलावले. मालोजीराजे भोसले यांच्या मृत्यूनंतर शाही सिंहासनाची झालेली हानी त्यांना दूर करायची होती.

सुलतानने मालोजी राजेंच्या युद्धातील असाधारण पराक्रमाचे कौतुक केले. तथापि, त्यांना माहित होते की केवळ शब्द स्वतःहून त्यांच्यावरील परिस्थितीचा मार्ग बदलू शकत नाहीत.

न्यायालयीन सुनावणीनंतर सुलतान निजामशाहने जहागिरी शहाजी महाराजांच्या नावे केली. पण शहाजी राजे अजून अल्पवयीन होते. त्यामुळे शहाजी मोठे होईपर्यंत जहागिरीची जबाबदारी विठोजींवर टाकण्यात आली.

शहाजी राजे यांना विठोजींच्या प्रयत्नांमुळे निजामशाहीकडून जहागीरदार ही पदवी मिळाली, त्यावेळी ते फक्त पाच वर्षांचे होते.

त्यामुळे भोसले घराण्याची जहागीरी पुढच्या पिढ्यांपर्यंत कायम राहणार याची खात्री झाली.

युद्धे आणि मुत्सद्दीपणा

शाहू महाराजांची माहुलीची लढाई आणि तह

निझामशाहचा खात्मा करण्यासाठी शाहजहान मोठी मुघल सेना पाठवतो. त्यावेळी, आदिलशहा मुघलांशी तह करतो. शहाजीराजे तेव्हा माहुलीच्या किल्ल्यावर होते.

यादरम्यान, निझाम राजकुमार मुर्तझाचे अपहरण करण्यात मुघल यशस्वी होतात. शहाजीराजे पोर्तुगीजांकडे मदत मागतात, पोर्तुगीज मदत करण्यास नकार देतात.

राजकुमार मुर्तझाचे प्राण वाचविण्याकरिता शरण जाण्याशिवाय निझामाकडे दुसरा पर्याय उरत नाही. त्यानंतर, शहाजी राजे मुघलांशी युती करून निझाम राजकुमार मुर्तझाला सोडवतात.

त्यानंतर, मुघल सम्राट शहाजहान शहाजींची दक्खनपासून दूर दक्षिण भारतात रवानगी करतो. तेव्हा त्यावेळी दरबारात एक घटना घडली त्यामध्ये शहाजींचे सासरे लखुजीराव जाधवांची दरबारातच हत्या झाली.

त्यानंतर, रागात येऊन शहाजीराजेंनी निजामशाही सोडून अदिलशाहकडे जहागीरदारी स्वीकारली.

शहाजीराजेंचा आदिलशाही सरदारांवर विजय

मालोजीराजेंसारखेच शहाजीराजेदेखील खूप पराक्रमी होते. निजामशाहच्या बाजूने शहजीराजेंनी खूप लढाया लढल्या होत्या. मुघल बादशाह शाहजहान याने दक्षिण जिंकण्यासाठी जेव्हा दक्खनवर आक्रमण केले.

त्यावेळी शहाजींनी दक्खन जिंकण्यामध्ये मुघलांना मदत करून सन १६३२ मध्ये अदिलशाहचा पराभव केला होता. या युद्धामधील जिंकलेले बंगलोर जहागिरी म्हणून शहाजीराजेंना मिळते.

महाराणा प्रताप यांनी हल्दीघाटीच्या युद्धामध्ये छापामार युद्धप्रणालीचा वापर केला होता.

त्यांचाच पिढीतील असल्याने शहजीराजे देखील छापामार युद्धामध्ये खूप कुशल होते. यानंतर पुणे आणि सुपे या जहागिरीवर शहाजींचे चांगले नियंत्रण होते.

हडसर किल्ला जो पर्वतगड म्हणूनही ओळखला जातो
हडसर किल्ला जो पर्वतगड म्हणूनही ओळखला जातो

शहाजीराजेंचे दक्षिण मोहीम

अदिलशाहकडे आल्यानंतर सन १६३८ मध्ये शहाजीराजेंनी आणि रणदुल्ला खान यांनी दक्षिण परगणे जिंकण्याच्या इराद्याने विजापूरमधून कूच केले.

त्यांनी दक्षिणेतील अनेक राजांना हरवून त्यांच्या अधीन केले, परंतु त्यांची राज्ये त्या राजांना परत करून त्यांच्याशी सलोख्याचे आणि शांतीपूर्ण संबंध ठेवले.

त्यामुळे, शहाजींना भविष्यात मदत लागली, तेव्हा या राजांची मदत मिळू लागली.

शहाजीराजेंचे कर्नाटक मोहीम

ज्या कर्नाटक प्रांतात केम्पेगौडा पहिला यांसारख्या महान शासकाने सम्राट कृष्णदेवराय या महान राजाचे अधिपत्य स्वीकारून शासन केले.

त्या कर्नाटकातील प्रांतात आता केम्पे गौडा तिसरा हा विजयनगर राज्याच्या अधिपत्याखाली कर्नाटक प्रांतावर राज्य करीत होता.

सन १६३८ मध्ये शहाजीराजे आणि रणदुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली केम्पे गौडा तिसरा ला विजापूरचे सैन्य पराभूत करते.

राजकारण

शहाजी राजे आदिलशाहीसाठी कार्यरत होते. त्यादरम्यान, शिवाजी महाराजांनी एक-एक करून किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली.

शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांनी एकामागे एक तोरणा, राजगड, प्रतापगड, कोंढाणा, पुरंदर, रोहिडा, पन्हाळा असे गड जिंकण्याचे सूत्र चालू ठेवले.

आदिलशाहच्या दरबारात असणारे त्यांचे वडील शहाजीराजेंना आदिलशाहने त्याबद्दल चौकशी केली. तेव्हा “जहागिरीला सांभाळण्याच्या दृष्टीने एकही किल्ला नव्हता, म्हणून कदाचित शिवाजीने किल्ला घेतला असेल” असे म्हणून शहाजींनी परिस्थिती सांभाळली.

इकडे शिवाजी महाराजही अदिलशाहला खबऱ्यामार्फत कळवितात, “हे गड जहागिरीच्या प्रदेशाचे चांगल्या प्रकारे कामकाज करता यावे म्हणून घेतले असावेत”. अशा प्रकारे प्रसंगावधान राखून शिवरायांचे कामात बाधा न आणता शहाजींनी चातुर्याने हे प्रकरण हाताळले.

शिवाजी महाराजांनीही आदिलशहाला पत्र लिहून त्यात, “मी फक्त पुणे आणि सुपे यांच्या रक्षणासाठी किल्ले घेतले.” असे नमूद केले. अशा प्रकारे शिवरायांनी चतुराईने स्वराज्याचा कारभार सुरु ठेवला.

शिवरायांशी भेट

जेजुरी गडावर शहाजी राजे आणि शिवाजी महाराजांची भेट दर्शवणारे चित्र
जेजुरी गडावर शहाजी राजे आणि शिवाजी महाराजांची भेट दर्शवणारे चित्र. पिता-पुत्राची ही भेट खूप दिवसांनी झाली होती, त्यामुळे संपूर्ण मराठा इतिहासात ती स्मरणीय आहे.

शहाजीराजेंची शिवरायांशी झालेल्या दोन भेटी प्रसिद्ध आहेत. पहिली भेट शिवरायांच्या जन्मानंतरची तर दुसरी कर्नाटकवरून परतल्यावर प्रदीर्घ काळानंतर झालेली भेट.

शिवरायांच्या जन्मानंतर पहिली भेट

शिवरायांच्या जन्मावेळी शहाजीराजे मोहिमेवर होते. तेथून काही काळानंतर ते शिवनेरीवर परतले.

शहाजी राजे जेव्हा शिवनेरीवर आले तेव्हा संपूर्ण किल्ल्यावर आनंदाचे वातावरण होते. पुत्रभेटीचा तो दिवस मोठा रोमांचक होता.

त्यांनी जिजाऊंच्या महालात प्रवेश करून पहिल्यांदा शिवरायांना पाहिले. त्यावेळी आनंदी अंतःकरणाने शहाजींनी किल्ल्यात भेटवस्तू आणि मिठाई वाटण्यास सांगितले.

शिवनेरीच्या किल्ल्यात सर्व लोक सुखाची अनुभूती घेत होते. काही काळ शहाजींनी आनंदी दिवस घालवले. पण काही काळात आदिलशाही फर्मान मिळाले त्यांना मोहिमेकरिता परत जावे लागणार होते. १ मार्च १६३० रोजी सम्राट शाहजहान आणि त्याचे शाही सैन्य दख्खनमध्ये आले. त्यामुळे त्यांना बुरहानपूरला जावे लागणार होते.

निजामशाहने आपल्या पत्नीच्या विनंतीवरून मलिक अंबरचा मुलगा फतेहखान याला दौलताबादचा मुख्य वजीर बनवले. पदभार स्वीकारल्यानंतर फतेहखानने निजामशाहला तुरुंगात टाकले, तेथे त्याचा दुःखद मृत्यू झाला. त्यानंतर फतेहखानने राजकुमार हुसेनशाह याला गादीवर बसवले.

शहाजी महाराजांद्वारे शिवाजी महाराजांना भेटस्वरूपात राजमुद्रा प्रदान

शहाजी राजे यांनी त्यांच्या स्वराज्याला नेहमी प्रोत्साहन दिले, स्वराज्य कायदेशीर आणि अधिकृत बनवत त्यांनी शिवरायांकडे शासनासाठी आवश्यक असलेला शाही शिक्का दिला.

“शिवरत्नाकर” आणि “सभासद बखर” नुसार, शहाजी राजे भोसले यांनी संस्कृतमध्ये स्वराज्यासाठी नवीन शाही शिक्का तयार करवून घेतला होता. पुण्यात येताना त्यांनी ती भेट शिवाजी महाराजांकडे सुपूर्त केली.

राजमुद्रेवर कोरलेले शब्द आणि त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे होते.

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता |

शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

याचा अर्थ असा,

प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी शहाजीचा मुलगा शिवाजीची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी राज्य करते.

शहाजींना आदिलशाही सल्तनतद्वारा तुरुंगवास

मुघल साम्राज्याच्या एका दमदार नेत्याने शहाजी राजे भोसले यांना काही काळ पकडून ठेवले. मुघलांच्या अनेक वर्षांच्या सेवेनंतर हे घडले.

मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून इ. स. १६४९ मध्ये शहाजी राजांना कैद केले. प्रचलित राजकीय परिस्थितीमुळे त्याला ताब्यात घेतले.

काही कथांनुसार, शहाजी राजे खूप शक्तिशाली झाले होते आणि इतर स्थानिक नेत्यांशी त्यांचे मजबूत संबंध प्रस्थापित झाले होते. एकंदरीत सांगायचे झाले तर, सत्ता संघर्ष आणि राजकारणामुळे शहाजी राजे भोसले यांना तुरुंगावास भोगावा लागला. त्यामुळे दख्खन प्रदेशावर नियंत्रण ठेवणे मुघलांना कठीण झाले.

काही वर्षे तुरुंगात असताना त्यांनी त्यांना दौलताबादच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. ही वेळ त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी कठीण होती. त्याच्या तुरुंगवासामुळे शिवरायांनी त्यांच्या सर्व मोहीम अमर्यादित काळासाठी स्थगित केल्या.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, तुरुंगवासानंतरही शहाजी राजे यांचा दख्खन आणि कर्नाटक प्रांतावरील प्रभाव कायम होता.

त्यांचे पुत्र शिवरायांनी त्यांच्या सुटकेनंतर परत स्वराज्याची घौडदौड चालू ठेवली. शिवाजी महाराज कठोर परिश्रम आणि रणनीतीमध्ये कुशल होते. त्यांनी मराठा साम्राज्य न केवळ निर्माण केले तर दक्षिणेत राज्यविस्तारही केला.

मृत्यू

शहजीराजे कर्नाटकात, होदिगेरे या गावात असताना त्यांची शिकार करण्याची इच्छा होते. तेव्हा ते दिशेने निघतात, तो दिवस होता २३ जानेवारी १६६४ चा शहजीराजे जंगलामध्ये शिकार करीत असताना, एक अपघात होतो, ते घोड्यावरून जमिनीवर पडतात.

जोरात मस्तक जमिनीवर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी पसरते. रायगडावर जिजाबाईंना पत्र मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

शहजीराजे त्यांच्या काळातील भारतामधील सर्वात प्रभावशाली सरदार होते. शहाजीराजेंच्या काळातच भोसले घराण्याचे भारतातील वर्चस्व वाढून ते भरभराटीला आले होते.

तंजावरमधील मराठा साम्राज्य आणि त्याचे संथपक म्हणून एकोजी प्रथम किंवा व्यंकोजी यांची ओळख होती. त्यांनी वडील शहाजींच्या स्मरणार्थ कर्नाटकात चान्नागिरी तालुक्याजवळ होदिगेरे गावात त्यांची दर्गा उभारली.

कर्नाटकातील होंडिगेरे येथील शहाजी महाराजांची समाधी
कर्नाटकातील होंडिगेरे येथील शहाजी महाराजांची समाधी

मला आशा आहे की तुम्हाला शहाजी राजे यांचा हा इतिहास मराठा लेख आपल्याला आवडला असेल.

भविष्यात आणखी मराठी भाषेतील लेख वाचण्यासाठी हा लेख आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा. आपला प्रत्येक प्रतिसाद आम्हाला माहिती विनामूल्य प्रकाशित करण्यास मदत करतो.

बहुचर्चित प्रश्न

शहाजी राजांनी निजामशाही का सोडली?

एके दिवशी, निजामशाहीच्या दरबारात, महत्वाची आणि भयानक घटना घडली. एका तंट्यात, लखुजीराव जाधव यांचा एका सरदाराद्वारा शिरच्छेद झाला.

संतप्त मनस्थितीत शहाजी राजे दरबार सोडून गेले. त्यानंतर, त्यांनी निजामशाही दरबाराचा कायमचा निरोप घेत राजीनामा दिला. ते पुन्हा कधीही निजाम दरबारात गेले नाही.

शहाजी राजे भोसले यांचा मृत्यू कसा झाला?

शहाजी राजे भोसले यांचे अचानक एका अपघातात निधन झाले. कर्नाटकात असताना त्यांना शिकार करण्याचे मन झाले ते त्यावेळी होडिगेरे गावाजवळ होते. शिकारीकरिता ते घनदाट वनात प्रवेश केला.

भरधाव वेगात असताना अचानक ते घोड्यावरून ताबा सुटून खाली जमिनीवर पडतात आणि तेथेच जखमी होऊन त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर व्यंकोजींनी होडिगेरे गावात वडिलांच्या स्मरणार्थ समाधी बांधली.

शहाजी राजांच्या जीवनातील सर्वात महत्वाची लढाई कोणती होती?

शहाजी राजे भोसले यांनी कर्नाटकात केम्पेगौडा तिसरे यांच्याशी लढा दिला आणि त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची घटना होती.

इ. स. १५६५ मध्ये तालिकोटाच्या लढाईनंतर विजयनगर साम्राज्याचे प्रांतीय सेनापती मुक्त झाले. यामुळे स्वतंत्र बंगलोर आणि आसपासचा परिसर निर्माण झाला.

विजयनगर साम्राज्याकडे अनेक संसाधने होती. त्यांनी थेट मदत करणे बंद केल्यावर कर्नाटक ताब्यात घेणे जरुरी झाले.

कर्नाटकातील त्यांची विजयी मोहीम ही लक्षणीय कामगिरी होती. या विजयाने ते एक सेनापती म्हणून त्यांचे महत्व त्यांनी दाखवून दिले.

मुघल सम्राट शहाजहानने आणि आदिलशाहीद्वारे शहाजी राजे यांना कर्नाटकात जिंकलेली जमीन बक्षीस म्हणून दिली.

या घटनेने त्यांच्या आयुष्याची दिशा आणि भविष्यातील योजना बदलल्या. शहाजी राजे दख्खन परिसराच्या जहागिरीचा कार्यभार सांभाळत होते. आता त्यांनी कर्नाटकाच्या जहागिरीच्या प्रदेशाला आपल्या प्रभावाचे मुख्य क्षेत्र बनवले.

शहाजी राजे यांनी केम्पेगौडा तिसर्‍याशी लढताना आपले सामरिक कौशल्य दाखवले. या लढ्यामुळे शहाजी राजांना नवीन किल्ला आणि अधिक संसाधने मिळण्यास मदत झाली. त्यामुळे मध्ययुगात अनेक महत्वाच्या बदलांच्या काळात भारतात त्यांचे वर्चस्व होते.

बऱ्याचअंशी यामुळे त्यांना नवीन संधी मिळाल्या आणि भविष्यातील लष्करी यशासाठी त्यांनी स्वत:ला उभे केले.

प्रथम शहाजी राजे पुणे जहांगिरीचा कारभार पाहत होते; मग ते शिवाजी राजांना कोणत्या साली देण्यात आले?

माझ्या मते, २७ एप्रिल १६४५ रोजी शिवाजी राजांनी रायरेश्वर मंदिरात प्रतिज्ञा केली. विकिपीडियानुसार शिवाजी राजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा करून किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे १६४८ मध्ये आदिलशाहने शहाजी भोसले यांना ताब्यात घेतले.

बहुदा त्यांच्या सुटकेनंतर जेव्हा त्यांनी शिवरायांना राजमुद्रा प्रदान केली, त्यावेळी शहाजी महाराजांनी पुणे आणि सुपे जहागिरीचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला असावा.

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest