जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र

by नोव्हेंबर 16, 2023

प्रस्तावना

वाङमय क्षेत्रातील भारतीय संतांचा वाटा मोलाचा आहे. त्यात अभंग म्हटले की संत तुकाराम महाराज हे एक समीकरण बनले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गेले तीन शतके त्यांच्या भजनांनी आणि अभंगांनी आध्यात्मिक जगताचे वातावरण भक्तिमय केले आहे. त्यांना मराठी लोक प्रेमाने तुकोबा किंवा तुकोबाराया या नावाने संबोधतात.

लोकांनाही त्यांनी विठ्ठलभक्तीची प्रेरणा दिली. त्यांच्या या प्रयत्नाने भक्ती चळवळीला चालना मिळाली.

त्यांनी कीर्तने करून समाजप्रबोधनातून भूतदया, सात्विक आणि साधी जीवनशैली, प्रामाणिकपणा, सकारात्मक आणि शुद्ध विचार यांची शिकवण दिली. त्यामुळे भक्ती चळवळीतील त्यांचा वाट मोठा होता. त्यांनी वारकरी संप्रदायालाही चालना देत त्यांच्या काळात या संप्रदायाला सर्वोच्य शिखरावर पोचवले.

असे मानले जाते कि, त्यांच्या स्वप्नात एक दिवस चैतन्य साधू आले, ज्यांनी “रामकृष्ण हरी।” हा गुरुमंत्र दिला.

संसारात राहून एक सामान्य माणूस संत कसे बनले. त्यांनी प्रत्येकाच्या मनात अतूट भक्ती, सदाचार यांचे पालन करून आत्मज्ञान प्राप्त करून आत्मविकास करू शकतो.

तुकाराम महाराजांचा जन्म इ. स. १६०८ साली देहू या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराजवळील छोट्याशा गावात झाला. हिंदूइसमफॅक्टस नुसार, त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे) होते.

संत तुकाराम महाराज मंदिर, देहू, महाराष्ट्र
संत तुकाराम महाराज मंदिर, देहू, महाराष्ट्र

तुकाराम महाराजांचे कुटुंब

ते एका मराठा जातीतील कुणबी म्हणजेच शेतकरी कुटुंबातील होते. संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे होते. द फेमस बायोग्राफी इन्फो या ब्लॉगनुसार, त्यांना धरून एकूण पाच भावंडांमध्ये ते दुसरे होते. तसेच मुक्ताबाई आणि तुकाबाई या दोन त्यांच्या बहिणी होत्या.

शंकर बांगर यांनी क्योरा या प्रश्न-उत्तर प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या उत्तरानुसार सावजी हे त्यांचे मोठे भाऊ तर कान्होबा हे त्यांचे धाकटे भाऊ होते.

कुटुंबाची अध्यात्मिक कार्यांमधील साथ

तुकाराम महाराजांच्या कुटुंबाने त्यांच्या अध्यात्मिक कार्यात खूप साथ दिली. त्यांनी दोन विवाह केले आणि त्यांच्या दोन्ही पत्नींनी आर्थिक अडचणींमध्ये असतानाही त्यांना अध्यात्मविषयीची त्यांची आवड जोपासण्यात मदत केली.

शिकवण आणि विचार

त्यांच्या विचारानुसार, अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणारे मनुष्य सात्विक जीवन जगण्यास प्रेरित होतात. बहुदा सात्विक जीवन जगणारे लोक भक्तीचा मार्ग स्वीकारतात. ते लोक हळूहळू मनुष्यातील सहा विकारांवर नियंत्रण मिळवून पूर्णतः परमात्म्याला शरण जातात. शेवटी याच लोकांना परमेश्वर आणि मोक्षाची प्राप्ती होते.

अनेक प्रकारचे महाराष्ट्रातील साहित्य हे तुकाराम महाराजांच्या रचनांवर बनले आहे. भारतीय साहित्यावर त्यांचा प्रभाव दिसतो. त्यांच्या शिकवणी आणि विचार सर्व वयोगटातील लोकांना लागू होतात. त्यामुळे वैष्णव लोकांनी त्यांचा वारसा आजही त्यांच्या परंपरांद्वारे जपला आहे.

वैवाहिक जीवन

संत तुकाराम वैवाहिक जीवन दुष्कर होते. त्यांनी रखमाबाई यांच्याशी विवाह केला, ज्या धार्मिक अनुयायी होत्या. काही काळानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तुकाराम महाजराजांनी या मुलाचे “संतू” असे नाव ठेवले. त्यांनी तुकाराम महाराजांना त्यांच्या अध्यात्मिक कार्यात खूप साथ देत.

रखमाबाईंकडून अध्यात्मिक संकल्पासाठी प्रोत्साहन

यावेळी मला त्यांच्याबद्दलची एक प्रसिद्ध घटना आठवते. एकदा तुकाराम महाराजांनी दैवी मार्गदर्शन मिळेपर्यंत उपवास करण्याचा कडक संकल्प केला. पण बरेच दिवस उलटले पण कोणताही दैवी मार्गदर्शन मिळेना.

शेवटी कंटाळून तुकोबांनी उपवास सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी आपली पत्नी रखमाबाईंना भोजनाचे ताट घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी रखमाबाई उसाचे तुकडे घेऊन येतात आणि त्यांना अध्यात्मिक एकनिष्ठतेची शिकवण देत उपवास सुरु ठेवण्यास प्रोत्साहित करतात.

तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ

अचानक १६३० ते ३२ दरम्यान आलेल्या एका भयंकर दुष्काळात त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू होतो.

परिवाराच्या काळाआड जाण्याने तुकाराम महाराजांवर मोठा परिणाम झाला. त्यांनी समाजापासून स्वतःला वेगळे केले. ते आता आपला बहुतांश वेळ अध्यात्मासाठी देत आणि धार्मिक चिंतनात व्यस्त राहत. त्यांनी स्वतःला पूर्णपणे प्रभूभक्तीमध्ये वाहून घेतले.

संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज

या आत्मपरीक्षणाच्या काळात त्यांना कळून चुकले की, भक्तीतील उत्कर्ष हा संसाराचा त्याग न करता करणे जास्त योग्य असते. भगवंतांच्या भक्तीमुळे ते हळूहळू दुःखातून बाहेर आले.

तुकाराम महाराजांची गृहस्तीत पुनर्वापसी

त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते अवलाई जिजाबाई. त्यांना पुढे चार मुले झाली ज्यांची नावे होती. त्यांपैकी महादेव, विठ्ठल, नारायण अशी तीन मुले आणि भगीरथी नावाची एक मुलगी होती.

अवलाई जिजाबाईंचा रस अध्यात्मिक गोष्टींपेक्षा सांसारिक वस्तूंमध्ये जास्त होता. तरीही त्यांनी तुकाराम महाराजांना दुःखातून सावरण्यात आणि अध्यात्मिक प्रगती सुरु ठेवण्यात साथ दिली.

तुकाराम आंबिले (मोरे) ते संत तुकारामांपर्यंत

त्यांची विठ्ठलाप्रतीची निष्ठा आणि कौटुंबिक साथ यामुळे समाजात अध्यात्मिक नेता, एक महान संत आणि कवी म्हणून ओळख निर्माण होणे शक्य झाले. असे मानले जाते की, त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. जो वारसा आजतगायत त्यांच्या पिढीने राखला आहे. सध्या त्यांचे वंशजांना समाजात सन्मानीय स्थान आहे आणि आजही ते महाराष्ट्रातील देहू येथे राहतात.

भगवंताच्या सेवेतील परमानंद

तरुण असताना सुरुवातील काही काळ त्यांनी दुकानदार म्हणून काम केले. या काळात त्यांनी त्यांची धार्मिक साधना चालू ठेवली. याच काळात त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांमुळे त्यांना वैयक्तिक स्वार्थ आणि सांसारिक सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची दृष्टी मिळाली. भगवान विठ्ठलभक्तीमध्येच परमानंद असतो याची प्रचिती त्यांना झाली आणि भगवान विठ्ठलाप्रती त्यांची श्रद्धा दृढ बनली.

तुकाराम महाराजांची विठ्ठलभक्ती

तुकाराम महाराजांना अगदी लहानपणीपासूनच त्यांना भगवान विठ्ठलभक्तीची आवड आणि अध्यात्मिक कार्यात ओढ होती. ते शेतकरी असल्याने शेतात गेल्यानंतरही त्यांचा बहुतांश वेळ ध्यान, प्रार्थना आणि कीर्तनात जात असे.

पंढरपूरचे भगवान विठ्ठल

महाराष्ट्रात भगवान कृष्ण यांचे रूप असलेले भगवान विठ्ठलाची पूजा केली जाते. त्यांचे नाव भगवान विठ्ठल पडण्यामागे एक प्रसिद्ध भक्त कुंडलिकाची कथा आहे.असे मानले जाते द्वारपारयुगापासून महाराष्ट्रात भगवान विठ्ठलाची पूजा केली जाते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राची महान संस्कृती आणि त्यावर भक्ती चळवळीची असलेली छाप सोडते.

पंढरपूर येथील विठ्ठल पेंटिंग
पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाचे चित्र

संत तुकाराम महाराजांद्वारे जगप्रसिद्ध अभंगरचना

दुकानदारीचा व्यवसाय सोडल्यानंतर त्यांनी शेती करत बहुतांश वेळ भगवंताच्या सेवेला समर्पित केला. याच काळात त्यांनी विश्वप्रसिद्ध भक्ती अभंगांची रचना केली.

भारतीय संत आणि कवी अशी ओळख असलेल्या तुकाराम महाराज मुख्यतः त्यांच्या महान शिकवणींसाठी आणि अभंगांसाठी आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनकाळात त्यांनी ५००० पेक्षा जास्त अभंग लिहिले, त्यांना सध्या मराठी साहित्याचा उत्कृष्ट नमुना मानतात.

या भक्तिमय कवितांमध्ये भगवान विठ्ठल यांच्याप्रती त्यांची भक्ती, आत्म-साक्षात्काराची भावना, नम्रता आणि प्रेम यांच्याविषयी त्यांचे विचार पाहायला मिळतात. त्यांच्या निस्वार्थ भक्तीची चर्चा भराभर पसरली होती. त्यांनी लोकांना भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले.

संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लोकप्रिय कथा

पुण्याजवळील देहू हे स्थान त्याकाळी राजे छत्रपती शिवाजी यांच्या अधिपत्याखाली होता. जेव्हा शिवरायांना त्यांच्याबद्दल कळाले, तेव्हा ते म्हणाले, “कोणताही मनुष्य निस्वार्थी असूच शकत नाही..” तेव्हा त्यांनी तुकाराम महाराजांच्या घरी भेटीस्वरूपात रत्नजडित सोन्याच्या दागदागिन्यांनी भरलेली पेटी तुकाराम महाराजांच्या घरी पाठवली.

तेव्हा अहिल्याबाई जिजाबाईंना आणि मुलांना खूप आनंद झाला. त्या सर्वांनी लगेच ते दागिने घालून पाहिले. थोड्यावेळात तुकाराम महाराज घरी आले, तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला. तेव्हा त्यांनी कुटुंबातील सदस्यांना प्रेमाने समजावत म्हणाले, “हे आपल्यासाठी बरोबर नाही. ते विष आहे जे माणसाचे डोके भ्रमित करते, त्यामुळे ते काढून टाका.”

त्यांच्या पत्नी आणि मुलांनी देखील त्यांची इच्छेचा मान राखून सर्व दागिने काढले. तुकाराम महाराजांनी सर्व दागिने पेटीत टाकून ते परत केले. त्यामुळे असा नेमका कोण संत आहे ज्याच्याकडे सांसारिक गोष्टींप्रती कणभरही लालसा नाही, अशा संतांची भेट घेण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज देहू येथे गेले.

त्यांचे आगमन झाले तेव्हा तुकाराम महाराज एका मंदिरात कीर्तन करत होते. त्यांचे कीर्तन ऐकून शिवराय मंत्रमुग्ध झाले. त्यांनी तुकाराम महाराजांचे पाय धरून त्यांच्याकडे संन्यास धारण करून त्यांची आणि प्रभूच्या सेवेत उर्वरित आयुष्य घालवण्याची ईच्छा व्यक्त केली.

परंतु, तुकाराम महाराजांनी शिवरायांना समजावले कि, “आपण क्षत्रिय आणि राजे आहात, आपल्यावर सर्व जनता विसंबूत आहे, त्यामुळे आपल्याकडे सर्व रयतेची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण कर्तव्य आणि संसाराचा त्याग न करता, संसाराबरोबर भगवंताची सेवा करणे योग्य राहील.”

पुष्पक विमानावर बसून स्वर्गात जाताना संत तुकाराम
पुष्पक विमानावर बसून स्वर्गात जाताना संत तुकाराम

तुकाराम महाराजांचा उपदेश ऐकल्यानंतर शिवरायांनी त्यांना अध्यात्मिक गुरु मानले. पुढे त्यांनी त्यांचे रयतेचे रक्षण करत अध्यात्मिक कार्य आणि भगवंताची सेवा केली.

निष्कर्ष

संत तुकाराम महाराज, भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण संत म्हणून मानले जाते. त्यांचं जीवन सत्कारात्मक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देते. त्यांच्या अभंगांमुळे भक्तिमय विचारधारा आणि जीवनशैली विकसित झाली.

तुकाराम महाराजांनी भक्तिचे महत्व सांगितले त्यांच्या आणि महाराष्ट्रातील इतर संतांच्या प्रयत्नांमुळे भक्तिमय समुदाय म्हणजेच “वारकरी संप्रदाय” निर्माण झाला. त्यांनी सदाचार, भूतदया, करुणा, परमात्म्याप्रती प्रेम यांविषयी शिकवण दिली. त्यांनी समाजप्रबोधन करताना सात्विक आणि साधे जीवन जगण्यासाठी प्रेरित केले.

त्यांनी लिहिलेल्या अभंगांतून भगवान विठ्ठलाच्या खऱ्या भक्तीचे महत्त्व, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, मानवी जीवनातील आव्हाने, भौतिक जगाची अनिश्चितता यांविषयी त्यांचे विचार कळतात. त्यांच्या अभंगांद्वारे प्रस्तापित त्यांच्या विचारांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली.

शेवटी त्यांचे विचार थोडक्यात सांगायचे झाले तर, जगातील दिखावटी गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. कारण, अशा गोष्टींचे सत्य कधी ना कधी जगासमोर येतेच. त्यामुळे खोटेपणाचा आधार घेऊन सांसारिक लांबपर्यंत जाता येत नाही.

उद्धरण

प्रतिमा श्रेय

संत तुकाराम महाराज मंदिर, देहू, महाराष्ट्र, श्रेय: Udaykumar PR

संत तुकाराम महाराज, श्रेय: Prabhat

पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाचे चित्र, श्रेय: Nevil Zaveri

पुष्पक विमानावर बसून स्वर्गात जाताना संत तुकाराम, श्रेय: Ravi Varma Press

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest