Contents Table Show Content

लक्ष्मीबाईंबद्दल संक्षिप्त माहिती:

घटकमाहिती
ओळखलक्ष्मीबाई या ब्रिटिशकालीन महान क्रांतिकारक होत्या. त्यांनी ब्रिटिशांविरोधात तीन वेळेस लढा दिला. शेवटच्या लढ्यात त्या सर्व भारतीय क्रांतीकारक आणि तत्कालीन स्वातंत्र्यसेनानी यांना एकत्र आणण्यास असफल झाल्या. या लढाईत अपुरा शस्त्रसाठा, आणि सैन्यबळाच्या कमतरतेने त्यांचा पराभव झाला. याच लढाईत लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाल्याचे समजते.
नावेलग्नाआधीचे नाव: माणिकर्णिका तांबे, लग्नानंतरचे नाव: लक्ष्मीबाई
जन्मवाराणसी येथे १९ नोव्हेंबर १८३५ रोजी
पालकमाता: भगीरथीबाई, पिता: मोरोपंत तांबे
विवाह१८४२ साली झाशी संस्थांचे राजे गंगाधरराव नेवाळकर
मृत्यू१८ जुन, १८५८ ग्वालियार, मध्यप्रदेश येथे

प्रस्तावना:

“झाशी की राणी” अशी ओळख असलेल्या राणी लक्ष्मीबाई या भारतीय इतिहासामध्ये कुशल शासक आणि निष्ठावंत देशभक्त म्हणून ओळखल्या जातात. स्त्री म्हणजे चूल आणि मुल असे मानणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीत माणिकर्णिकाने बदल केला. जगामधील झालेल्या युद्धांमध्ये स्त्री सहभागी झालेली मोजक्या उदाहरणांमध्ये राणी लक्ष्मीबाईंचे नाव येते.

राणी लक्ष्मीबाईंच्या कथेमागील पार्श्वभूमी:

तो काळ होता, जेव्हा ब्रिटिश राजसत्तेने भारतामध्ये पाय रोवले होते. ब्रिटिश राजसत्तेपुर्वी जवळपास ५० वर्षे अजिंक्य असलेले मराठेदेखील ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन होते. मराठा साम्राज्याचे सरसेनापती असलेले पेशव्यांचे लष्करी तळ असलेला शनिवारवाडादेखील ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला होता.

त्यामुळे पेशवे बाजीराव दुसरे यांना शरणागती पत्करल्यानंतर वाराणसीला जावे लागले. चिमाजी अप्पा हे पेशव्यांचे लहान भाऊ होते. मोरोपंत तांबे हे चिमाजी अप्पा यांचे जवळचे मित्र होते. तसेच, मोरोपंत हे पेशव्यांचे राजकीय सल्लागार आणि प्रशासकीय सहकारी होते.

 

राणी लक्ष्मीबाईंचा जन्म:

वाराणसीला असताना मोरोपंत आणि भगीरथीबाई यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. मोरोपंतांनी त्यांच्या या कन्येचे नाव “माणिकर्णिका” असे ठेवले. माणिकर्णिका म्हणजे रत्नजडित कर्णभूषण असा होतो. माणिकर्णिकाला घरी मनू या नावाने संबोधत.

यादरम्यान, वाराणसीला असतानाच चिमाजी अप्पांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर पेशवे हे उत्तरप्रदेशमधील बिथूरला गेले. पेशव्यांच्या तेथील जहागिरीच्या कामात सहकार्यासाठी मोरोपंतदेखील बिथूरला रवाना झाले.

राणी लक्ष्मीबाई यांचे बालपण:

मानिणीकर्णिकांचे बालपण पेशव्यांच्या महालातच गेले. तात्या टोपे आणि पेशव्यांचा (दत्तक) मुलगा नाना साहेब हे माणिकर्णिकाचे लहानपणापासूनचे मित्र होते.

माणिकर्णिका तिच्या लहानपनापासून खेळाडू वृत्तीची आणि धाडशी स्वभावाची होती. त्यामुळे, पेशवे तिला “छबिली” असे म्हणत. मोरोपंतांनी बालपणापासून माणिकर्णिकाला छत्रपती शिवराय आणि त्यांच्या विषयीच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. तसेच देशभक्ती आणि स्वतंत्रतेचे महत्व पटवून सांगितले.

त्या काळी, लोक मुलींना शिक्षण देत नव्हते. पण, मनूला लिहिण्या-वाचण्याची आवड होती. एवढेच नव्हे तर तिला तलवारबाजी, मल्लखांब आणि घौदौड यांसारख्या खेळांमध्ये ती अग्रेसर होती.

लक्ष्मीबाई यांचा झाशीच्या महाराजांशी विवाह:

माणिकर्णिकाचा मे १८४२ रोजी झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर झाशीच्या राजघराण्यातील परंपरेनुसार माणिकर्णिकांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले.

घुडसवारीची विशेष आवड:

लग्नानंतरही लक्ष्मीबाई घुडसवारी करत. त्यांच्या राजमहालाच्या आवारात पागा होता, ज्यामध्ये, जातिवंत घोडे होते. त्यामधील पावन, सारंगी, बादल हे घोडे राणी लक्ष्मीबाईंना विशेष प्रिय होते. इतिहासकारांच्या मते या घोड्यांमधील बादलने किल्ल्यावरून उडी मारून राणी लक्ष्मीबाईंना शत्रूंपासून सुरक्षित किल्ल्याबाहेर काढले होते. सन १८५१ मध्ये गंगाधरराव आणि लक्ष्मीबाईंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. या मुलाचे नाव त्यांनी दामोदर असे ठेवले. पण मुलाचे अकाली निधन झाले.

राणी लक्ष्मीबाईंचे चित्र
Image Credits: the lost gallery

मुलाच्या अकाली निधनानंतर गंगाधररावांनी चुलत भावाचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेतले. पुत्राच्या स्मरणार्थ महाराजांनी आनंदरावांचे दामोदरराव असे नाव ठेवले.

राणी लक्ष्मीबाईंचा डॉक्टरीन ऑफ ल्यापसीच्या धोरणाला प्रखर विरोध:

महाराज गंगाधररावांचा नोव्हेंबर १८५३ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर, गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने दामोदरराव हे दत्तक पुत्र असल्याने झाशीच्या गादीवरील हक्क अमान्य केला. लॉर्ड डलहौसीने डॉक्टरीन ऑफ ल्यापसी (Doctorine of Lapse) चे धोरण लागू केले. याची सूचना जेव्हा लक्ष्मीबाईंना दिली तेव्हा लक्ष्मीबाई रागाने ओरडल्या,

मैं मेरी झाँसी नही दूंगी|

लक्ष्मीबाईंची शब्दाने दरबारात शांतता पसरली. मार्च १८५४ साली, लक्ष्मीबाईंना ब्रिटिश फर्मानांतर्गत वार्षिक ६०००० रुपये पेन्शन घेऊन, राजमहाल आणि किल्ला सोडावा लागला. लक्ष्मीबाई झाशीमध्ये राहून पुढील उठावाची तयारी करू लागल्या.

राणी लक्ष्मीबाई यांचे व्यक्तिमत्व:

विष्णू भट्ट गोडसे या मराठी लेखकाप्रमाणे राणी लक्ष्मीबाई यांना स्टिपलचेस (घोड्यावरील शर्यत), कुश्ती यांची आवड होती. तसेच, त्यांना नाश्त्याआधी पहाटे व्यायाम करण्याची सवय होती. त्यांच्या व्यक्तित्वामध्ये साधे राहणीमान आणि त्यावर शोभेल अशी कुशाग्र बुद्धिमत्ता आणि नम्र स्वभाव त्यांना इतर स्त्रियांपासून वेगळे करायचा.

१८५७ च्या उठावामागील राणी लक्ष्मीबाईंची पार्श्वभूमी:

या उठावाची सुरवात मिरटमध्ये १० मे १८५७ साली झाली. कॅप्टन अलेक्सन्डर स्केने याला लक्ष्मीबाईंनी स्वसंरक्षणाकरिता सैन्याची तुकडी पाठवण्यास सांगितले. इकडे शहरामध्ये ब्रिटिश हे भ्याड असून त्यांच्यापासून भिण्याची गरज नाही अशी प्रेरणा देण्यासाठी लक्ष्मीबाई हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करतात. ज्या मध्ये झाशीतील सर्व महिला सामील झाल्या होत्या.

बंडखोरांकडून स्टार फोर्ट येथे ब्रिटिश अधिकाऱ्यांची कत्तल:

या क्षणापर्यंत, ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याच्या विचारावर राणी लक्ष्मीबाई नाखूष होत्या. १८५७ च्या जूनमध्ये बंगालच्या स्थानिक पायदळाचे बंडखोरांनी ब्रिटिशनचा स्टार फोर्ट नावाचा किल्ला ताब्यात घेतला. तेथील खजिना आणि दारुगोळा लुटून, ब्रिटिश अधिकाऱ्यांना हत्यारे टाकण्यास सांगून त्यांच्या पत्नी आणि मुलांसह त्यांची हत्या करण्यात आली. ब्रिटिश आर्मी डॉक्टर थॉमस लोवे यांच्या मते राणी लक्ष्मीबाईंचाही या हत्याकांडात समावेश होता.
शेवटी, राणी लक्ष्मीबाईंनाही अशाप्रकारे बदनाम करण्याची संधी कसे बरे सोडतील?

लक्ष्मीबाईंकडून झाशीच्या गाडीचे संरक्षण:

असो, यानंतर त्या बंडखोरांनी लक्ष्मीबाईंकडून खंडणी गोळा केली आणि राजमहाल उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर सौगोर डिव्हिजनचे कंमिशनर मेजर एर्स्कीने याला पत्र लिहून लक्ष्मीबाईंनी घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. उत्तरामध्ये एर्स्कीने त्यांना ब्रिटिश सरकारतर्फे नवीन संचालक येईपर्यंत शहराची व्यवस्था सांभाळण्यास सांगितली. त्यानंतर, झाशीच्या सैन्याने लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली त्यांचा प्रतिस्पर्धी राजकुमार आणि गंगाधररावांचा भाचा याचा झाशीची गादी काबीज करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.

झाशीच्या किल्ल्यावरील हल्ला:

जानेवारी १८५८ मध्ये झाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्यदल पाठवत असल्याची ब्रिटिश सरकारने घोषणा केली. परंतु, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचे सल्लागारांना ब्रिटिशांच्या सत्तेपासून स्वतंत्रता मिळवाची इच्छा होती. तसेच इंग्रज सैन्याला यायला विलंब लागल्याने, राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढला. तसेच या वेळेमध्ये झाशीच्या सैन्याने दारुगोळा आणि चांगल्या तोफा यांचा चांगला बंदोबस्त केला.

ब्रिटिश जनरल ह्यूग रोज यांच्याविरुद्ध राणी लक्ष्मीबाईंचे बंड:

शेवटी मार्चच्या महिन्यात इंग्रज सैन्य झाशीमध्ये पोचले. झाशीच्या किल्ल्यावरील संरक्षण व्यवस्था वाढल्याचे पाहून जनरल ह्यूग रोज यांनी राणी लक्ष्मीबाईंची शरणागती पत्करण्यास सांगितले, अन्यथा सर्वत्र विध्वंस होईल. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी विचार करून लढण्याचा निर्धार केला.

लक्ष्मीबाई म्हटल्या की,

“आम्ही स्वातंत्र्यासाठी लढू, विजय जर आमचा झाला, तर स्वातंत्र्याची चव आम्हाला कळेल, आणि जर पराभव झाला, तर रणभूमीत प्राण देऊन आमच्या आत्म्याला गती मिळेल”. राणी लक्ष्मीबाईंनी स्वतः झाशीच्या बचावाचे नेतृत्व हाती घेतले.

राणी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटिशांविरुद्ध पहिले युद्ध:

२४ मार्च १८५८ पासून किल्ल्यावर इंग्लिश तोफांचा भडीमार सुरु झाला. राणीच्या पक्षाकडूनही भारी प्रमाणात तोफा डागण्यात आल्या. झाशीच्या सैन्याने एका रात्रीत पडलेल्या भिंतींची दुरुस्ती केली. तसेच राणींनी त्यांचे लहानपणीचे मित्र तोट्या टोपे यांची मदत मागितली. तात्या टोपेंनी २०००० सैन्य पाठवले. परंतु ते झाशीला वाचण्यात अपयशी ठरले. इंग्रजांनी शेवटी २ एप्रिल १८५८ रोजी झाशीच्या किल्ल्याच्या भिंती पडल्या आणि सैन्याच्या दोन तुकड्या किल्ल्यात शिरल्या. राजवाडा आणि बाहेर प्रत्येक ठिकाणी प्रखर विरोध झाला.

राणी लक्ष्मीबाई किल्ल्यातून सुखरूप बाहेर:

यादरम्यान राणी त्यांचा घोडा बादलला घेऊन किल्ल्यावरून उडी मारली, त्यावेळी घोड्याचा मृत्यू झाला. नंतर, एका सैनिकांच्या तुकडीबरोबर त्या तात्या टोपेंच्या इंग्रजांविरोधी बंडखोर सैन्याला जाऊन मिळाल्या. राणीच्या नेतृत्वामध्ये कल्पी हे शहर ताभ्यांत घेऊन त्याच्या चांगल्या बचावाची तयारी केली.

ब्रिटिश सैन्याने २२ मे ला पुन्हा आक्रमण केले. यावेळी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतः नेतृत्व केले. परंतु, दुर्दैवाने पुन्हा लक्ष्मीबाईंच्या सैन्याचा पराभव होतो.

ग्वालीयारच्या किल्ल्यातून राणी लक्ष्मीबाई यांचा अखेरचा संघर्ष:

त्यानंतर, राणी लक्ष्मीबाई, नवाब बंडा, तात्या टोपे आणि राव साहेब यांच्यासमवेत ग्वालियारच्या किल्ल्याला सैन्यतळ केले. थेतील सर्व सैन्याच्या सहमतीने नाना साहेबांना पेशवा घोषित केले. भारतातील इतर बंडखोरांना एकत्र करून ग्वालियारच्या किल्याला इंग्रजांविरुद्ध वापरण्याचा राणी लक्ष्मीबाईंचा प्रयत्न विफल झाला. इतर बंडखोर राजी न झाल्याने ब्रिटिशविरोधी सैन्याच्या कमतरतेमुळे पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला.

राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू:

हा आणखी एक विवादास्पद विषय आहे. ब्रिटिश रेकॉर्ड्सप्रमाणे त्यांचा मृत्यू हा पिस्तूलद्वारे गोळी लागल्याने झाला. तर दुसऱ्या मान्यतेप्रमाणे, राणी लक्ष्मीबाईंनी ख्रिस्ती साधूंना त्यांच्या शरीराला जिवंतपणी अग्नी देण्यास सांगितले होते.

डॉक्टरीन ऑफ ल्यापसी (Doctorine of Lapse):

ही एक हक्क रद्द करण्याची तत्त्वप्रणाली होती जिला डॉक्टरीन ऑफ ल्यापसी असे इंग्रजीमध्ये म्हणतात. या ब्रिटिशांच्या सामीलीकरण धोरणांतर्गत भारतातील कोणतेही राज्यकर्ते जर राज्य सांभाळण्यास असमर्थ असतील किंवा शासक वारसाशिवाय मरण पावला असेल, तर त्या राज्याला संपुष्टात आणले जात.

डॉक्टरीन ऑफ ल्यापसी या या ब्रिटिश धोरणांतर्गत शिकार झालेली भारतीय राज्ये:

या धोरणाअंतर्गत १८४७ पासून अनेक लहान राज्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन करण्यात आले. लॉर्ड डलहौसीच्या १८४८-१८५६ च्या कारकिर्दीमध्ये या धोरणाची कठोरपणे अंमलबजावणी केली गेली.

सातारा (१८४८), जैतापूर आणि संबळपूर (१८४९), नागपूर आणि झाँसी (१८५४), टोरी आणि अरकॉट (१८५५) आणि उदयपूर (छत्तीसगड), औध (१८५६) यांसारख्या महत्वपूर्ण राजसत्तांचे याच धोरणांतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सामिलीकरण केले गेले.

Featured image credits: Lakshmibai, Source: British Library, Rani of Jhansi – Gallery

Similar Posts