Purandar Fort

साहसी, उत्साही लोकांना जाण्यास आवडणारी ठिकाण म्हणजे डोंगर, दरी, किल्ले, टेकड्या या सगळ्याच माहेरघर म्हणाल तर अख्ख्या भारतात महाराष्ट्राचं नाव पुढे येईल.

फक्त ऐतिहासिक वस्तू म्हणून नाही तर भौगोलीक दृष्ट्या सुद्धा ही ठिकाणे आपल्याला सहलीचा आनंद देऊन जातात.

जर आपणही असेच साहसप्रेमींपैकी एक असाल तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्राच्या या प्राचीन आणि भव्य डोंगर किल्ल्यांचा शोध घेण्याची मोहीम आखली पाहिजे.

अशाच मनमोहक किल्ल्यांपैकी एक म्हणजे छोटी वस्ती असलेला आणि हिरव्यागार महिरपीने वेढलेला किल्ला म्हणजे ऐतिहासिक पुरंदर किल्ला.

या किल्ल्याचे ऐतिहासिक आणि प्राचीन मूल्य वादातीत आहे. चला तर अशा प्राचीन ठेव्याची माहिती व त्याच्या आसपासच्या नैसर्गिक सभोवतालचे ठिकाण आणि त्यापर्यंत कसे पोहचायचे याबद्दल अधिक खोलात जाऊन तपशीलवार जाणून घेऊ.

पुरंदर गडावर जाण्याचा योग्य कालावधी

पुरंदर किल्ल्याच्या आणि आसपासच्या प्रदेशात वर्षभरच समशीतोष्ण हवामान असते आणि म्हणूनच आपण वर्षाच्या कोणत्याही मोसमात इथे जाऊ शकतो.

तथापि, महाराष्ट्रात उन्हाळ्यात असणारी प्रखरता जर आपल्याला टाळायची असेल आणि आरामदायक वातावरणात किल्ल्याचे सौंदर्य पाहण्याची इच्छा असेल तर ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत गडावर फिरण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

या काळात पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील आणि आसपासचे नैसर्गिक सौंदर्य शिगेला पोचलेले दिसेल.

पुरंदर किल्ल्याचा इतिहास आणि सभोवताल

पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला आणि पुण्यापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असलेला हा पुरंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आणि मराठा साम्राज्याचा दुसरा शासक महान संभाजी राजे यांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते.

म्हणूनच इतिहास अभ्यासकांमध्ये या किल्ल्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, हे अकराव्या शतकात यादव घराण्याच्या कारकिर्दीत बांधले गेले होते. पुढे मराठा आणि इंग्रजांसह इतर अनेक राजवंशांनी यावर राज्य केले.

हिंदू पौराणिक कथेनुसार, या किल्ल्याच्या डोंगर माथ्यावर जो सुळा आहे तो हनुमानाने हिमालयातून आणला आहे असे म्हणतात.

पुरंदर किल्ला हिरव्यागार वेलींनी वेढलेला एक डोंगराळ किल्ला असल्यामुळे, ट्रेकर्स आणि कॅम्पिंग करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. शनिवारी, रविवारी तर किल्ला अशा उत्साही लोकांच्या गर्दीने फुलून आलेला दिसतो.

पुरंदर किल्ल्याची ठळक वैशिष्ट्ये

पहाटेच्या गारव्यासह आणि उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत पश्‍चिम घाटाच्या विहंगम सौंदर्याचा आस्वाद घेत डोंगर चढायला कोणाला आवडणार नाही ? हो ना ?

चला तर या वीकेंडचा प्लॅन नक्की झाला, आपले डेस्टिनेशन आता किल्ले पुरंदर ! इथे पुरंदरेश्वराचे ऐतिहासिक महत्त्व असलेले देऊळ सुद्धा बघायला मिळेल त्याच्याच नावाने किल्ल्याला पुरंदर असे संबोधले जाते त्याचबरोबर मराठा साम्राज्याचे सेनापती मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा देखील इथे आहे.

पुरंदर किल्ल्यावर जाताना आपला कॅमेरा आणण्यास विसरू नका कारण इथली निसर्गरम्य दृश्ये आपल्याला त्यांचे चित्र कॅमेऱ्यात टिपण्यास भाग पाडतात.

ज्यांना साहसी खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी पॅराग्लाइडिंग स्पॉट म्हणूनही हा किल्ला लोकप्रिय आहे. म्हणूनच धाडसी , साहसी लोकांसाठी स्वप्नवत ठिकाण म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

पुरंदर किल्ल्याला कसे पोहोचायचे

हवाईमार्गे: पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे पुणे सुमारे ४५ कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही पुण्यात पोहोचल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी थेट टॅक्सी भाड्याने घेणे किंवा व्हॅन किंवा ऑटो शेअर करून यासारखी सार्वजनिक वाहतूक वापरणे चांगले.

आपण वाहनाने पायथ्याशी पोचतो त्यानंतर किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला टेकडी चढून वर जावे लागते.

रेल्वेमार्गे: पुणे रेल्वे स्टेशन पुरंदर किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे. तुम्ही पुण्याला जाणारी थेट गाडी पकडू शकता आणि तेथून किल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकता.

रस्ता मार्गे: किल्ल्याचा पायथा इतर शहरांशी रस्त्यांद्वारे जोडलेला आहे.

गोसाहीन

पुरंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी साम्राज्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. पुण्याजवळ वसलेल्या या भव्य किल्ल्यात उंच भिंतींवर लिहिलेल्या महान आख्यायिका आहेत ज्या बर्‍याच दर्शकांना या ठिकाणी आकर्षित करतात.

या धर्तीवर, जर आपण योगायोगाने साहसीपणाचा अनुभव घेणार्‍या अशा पर्यटकांपैकी एक असाल तर महाराष्ट्राचा भव्य पुरंदर किल्ला तुमच्यासाठी एक अतिउत्तम पर्यटन स्थळ आहे.

हा पुरातन किल्ला ऐतिहासिक वास्तू म्हणून सुप्रसिद्ध आहे. सुंदर तटबंदीने वेढलेला डोंगरी पुरंदर किल्ला हिरव्यागार सृष्टीचा सुखद अनुभव देऊन जातो आणि त्याचसोबत माथ्यावर जाऊन पोचताच खाली वसलेली छोटी छोटी खेडी पाहायला मिळतात.

पश्चिम घाटाच्या कुशीत विसावलेला हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून गणला जातो. हा किल्ला पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर असून समुद्रसपाटीपासून ४४७२ फूट उंच आहे.

असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आणि मराठा साम्राज्याचे दुसरे नेते – थोर संभाजी राजे यांचा जन्म येथे झाला.

अकराव्या शतकात यादव घराण्याच्या राजवटीत हा किल्ला बांधला गेला. अखेरीस, यावर देखील काही भिन्न राजवटींनी शासन केले. यामध्ये मराठ्यांखेरीज इंग्रजांचा देखील समावेश आहे.

पौराणिक आख्यायिकेनुसार, ज्या टेकाडावर हा किल्ला वसवला गेला आहे तो विशाल टेकू भगवान हनुमान यांनी हिमालयातून आणला होता.

“राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा, फुलांच्याही देशा”

असं आपण थोडक्यात पुरंदर किल्ल्याच वर्णन करू शकतो.

या किल्ल्याच्या दोन विशिष्ट पातळ्या आहेत. गडाचा खालचा भाग माची म्हणून ओळखला जातो. माचीच्या उत्तरेकडील भागात रुग्णालय आणि छावणी आहे.

तेथे पुरंदरेश्वर देवाचं मंदिर आहे आणि त्यावरूनच गडाचे नाव पुरंदर पडले आहे. या किल्ल्यामध्ये आणखी एक मंदिर आहे ते सवाई माधवराव पेशवे यांचे आहे.

वज्रगड किंवा रुद्रमल किल्ला

विजापूरच्या आदिलशाही आणि मोघलांच्या विरोधात शिवाजी महाराजांनी पुकारलेल्या बंडाचा साक्षिदार असलेला हा पुरंदर किल्ला महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या इतिहासप्रेमींचं प्रेरणास्थान आहे.

हा किल्ला पश्चिम घाटात असून समुद्र सपाटीपासून ४४७२ फूट उंच आहे. पुरंदर आणि वज्रगड किंवा रुद्रमल किल्ला हे दुहेरी किल्ले आहेत. तथापि हे पुरंदर किल्ल्यापेक्षा तुलनेने लहान आहेत.

याच्या पायथ्याशी असलेल्या गावाचे नाव देखील गडाच्या नावावरून पुरंदर असेच ठेवण्यात आले आहे. गडाला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे चिरंजीव संभाजीराजे भोसले यांचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते.

किल्ल्याचे दोन वेगळे स्तर असून त्यातील किल्ल्याच्या खालच्या भागाला माची म्हणतात. माचीच्या उत्तरेकडील भागात कॅन्टोन्मेंट आणि हॉस्पिटल आहे.

पुरंदरेश्वरला अर्पण केलेले एक मंदिर आहे ज्यापासून गडाचे नाव पुरंदर असे पडले गेले. या किल्ल्यात सवाई माधवराव पेशव्याचे देखील मंदिर आढळून येते.

तसेच किल्ल्याचे सेनापती मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळाही पाहायाला मिळतो.त्यांनी मोगलांपासून बचावासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

माचीपासून वरच्या दिशेला जाताना जिन्याने जावे लागते आणि आपण मग बालेकिल्ल्याकडे जातो.

बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर एक दिल्ली दरवाजा आहे जो पोचता क्षणीच आपल्या नजरेस पडतो. तेथेच एक प्राचीन केदारेश्वर मंदिर देखील आहे. बालेकिल्ल्याच्या सभोवतली एक धोकादायक उतार आहे.

प्रत्येक किल्ल्याच्या बखरीमध्ये त्या किल्ल्या विषयीच्या आख्यायिका दडलेल्या असतात. या किल्ल्याने शिवाजी राजे आणि औरंगजेब यांच्यात झालेल्या अनेक चकमकी पहिल्या आहेत.

नंतर जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा गडाच्या आत चर्च बांधली गेली. अशा एका माणसाची एक कहाणी देखील आहे ज्याला पर्शियन लोकांनी आपला जन्मलेला पहिला मुलगा आणि त्याची बायको बलिदान देण्यास सांगितले होते.

बुरुजाखाली त्यांना पुरण्यात आले. आणि नंतर त्या माणसाला दोन गावें बक्षीस म्हणून देण्यात आली.

गडाविषयी असणारे कुतूहल

अकराव्या शतकात यादवकालीन काळात या किल्ल्याचे संदर्भ आढळतात. सन १३५० मध्ये, हा किल्ला ज्या राजवटीमध्ये घेतला गेला त्यांनी या किल्ल्याला आणखी भक्कम बनवले.

पुढे किल्ला ब्रिटिश सरकारच्या अधीन आला आणि जहागीरदारांकडे सोपविला गेला नाही. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, रक्षण करणाऱ्या देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि किल्ला कोसळण्यापासून रोखण्यासाठी एका बुरुजाच्या खाली एका मुलाला आणि स्त्रीला जिवंत पुरण्यात आले.

अजून रंजक इतिहास म्हणजे हा किल्ला इंग्रजांच्या राजवटीत कारागृह म्हणून वापरला जात असे.

गडावर पोचण्याचा मार्ग

हे पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर आहे आणि तिथून थेट रस्ता पुरंदर किल्ल्याकडे जातो. हे सध्या सैन्य दलाच्या अखत्यारीत आहे.

प्रवेश शुल्क: गडावर जाण्यासाठी प्रवेश शुल्क नाही, फक्त ओळखपत्र आवश्यक आहे.

पुरंदर किल्ल्याची माहिती

सह्याद्री पर्वतरांगामध्ये असंख्य किल्ले, गडकोट, टेकडया यांच्या अस्तित्वाबद्दल आपण सर्व परिचित आहोत. असाच प्रसिद्धी पासून वंचित राहिलेला किल्ला म्हणजे पुरंदर.

पुरंदर किल्ला समुद्रसपाटीपासून ४४७२ फूट उंचवट्यावर आहे आणि पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर आहे. पुरंदर आणि वज्रगड किल्ला हे जुळे किल्ले म्हणून ओळखले जातात.

पुण्याचा पुरंदर किल्ला वज्रगड किल्ल्यापेक्षा उंच आहे आणि त्याच्या पश्चिमेला वसलेला आहे. जेव्हा आपण गढीवर पोचतो, तेव्हा आपल्याला आसपासच्या प्रदेशातील पुरातन मंदिरे दिसू लागतात.

तसंच पुढे जात जात जेंव्हा आपण गडाच्या माथ्यावर पोचतो तेंव्हा तिथून आपल्याला अतिशय नयनरम्य अशी अनेक दृश्ये नजरेस येतात त्यापैकी एक म्हणजे समोर दिसणारा वज्रगड व बाजूच्या छोट्या छोट्या टेकड्यांचा नजारा!

आपण सुरवातीला नमूद केल्याप्रमाणे साहसी आणि उत्साही लोकांचं आवडत ठिकाण तसेच इतिहास प्रेमींची आवडती अभ्यासिका आता सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहे.

गडावर असलेल्या भक्कम तटबंदीमुळे काही वास्तू आपलयाला जशाच्या तशा पाहायला मिळतात. विजापूरची आदिलशाही राजवट,मोघल यांच्याविरोधात लढून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी उभ्या केलेल्या साम्राज्याचा हा साक्षीदार राहिलेला आहे.

खडा उतार असलेलया पुरंदर किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी यादव वंशातील अकराव्या शतकातील आहे. तेथून पुढे किल्ल्याचा ताबा पर्शियन लोकांनी घेतला व नंतर चौदाव्या शतकात हा शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांना देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज यांचे जन्मस्थानही हा किल्ला आहे. सध्या, तटबंदी उद्ध्वस्त आहे. इतिहासातील काही उत्तम नमुन्यांपैकी एक म्हणजे आपला पुरंदर किल्ला ज्याला पश्‍चिम घाटाच्या नयनरम्य दरी डोंगरांची साथ लाभली आहे आणि तो याच सौन्दर्याने आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतो.

त्यामुळेच एक बावनकशी पर्यटनस्थळ म्हणून याला लोकमान्यता मिळाली आहे.

पुरंदर किल्ल्याची ट्रेकिंगच्या दृष्टीने माहिती

ट्रेकिंगची सुरवात: जिल्हा-पुणे, गाव-नारायणपूर

ट्रेकची धोक्याची पातळी : सोपा. पुरंदर किल्ला ट्रेक ही सतत चढणारी पायवाट आहे ज्यात काही चढे आणि घसरणारे रस्ते आहेत.

पुरंदर किल्ला ट्रेक अंदाजे वेळः दोन तास एकेरी मार्ग

पाण्याचे स्रोत: काहीही नाही. ट्रेक सुरू करण्यापूर्वी कमीतकमी माणशी २ लिटर पाणी सोबत घ्यावे.

गड चढण्यासाठी उत्तम काळ: सह्याद्रीच्या डोंगररांगा सर करायच्या असतील तर सगळ्यात उत्तम ऋतू म्हणजे पावसाळा. धरित्री हिरवा शालू परिधान करून मुक्तहस्ताने तिच्या सौन्दर्याची उधळण करते आहे आणि दुधड्या भरून धबधबे आपल्या अंगावर मुक्त तुषारांची उधळण करत आहेत. हे स्वप्नवत दृश्य खर करायच असेल तर नक्कीच पावसाळ्यात ट्रेक आयोजित करा.

रस्तामार्गे: पुण्यापासून ४० कि.मी.अंतरावर

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: पुणे

पुरंदर किल्ल्यावर जाण्याचा मार्ग

नारायणपूर हे गाव पुण्याला महामार्गाने चांगले जोडले गेले आहे. राज्य परिवहन बसेस पुण्याहून नारायणपूरकडे वारंवार जातात.

पुण्याहून पुरंदर किल्ल्याकडे जाण्याचा सर्वात संभाव्य मार्ग म्हणजे हडपसरमार्गे सासवडला जाणे तिथून आपण नारायणपूर गावातुन पुरंदर घाटमाथ्यावर पोचाल. किल्ला तेथून अगदी जवळ आहे.

पुण्याहून आपण कापूरहोळ / सासवडला जाणारी बस आणि नंतर पुरंदर किल्ल्याचे मूळ गाव असलेल्या नारायणपूरला जाणारी आणखी एक बस पकडू शकता. नारायणपूरहुन आपण अगदी सहजरित्या पुरंदर किल्ल्यापर्यंत जाऊ शकता.

पुणे रेल्वे स्थानकातून पायथ्याला जाणारा मार्ग आगा खान रोड – स्टेशन रोड – साधू वासवानी रोड – दक्षिण कमान मार्ग – प्रिन्स ऑफ वेल्स रोड – एनएच ६५ – एसएच ६४ / पुणे सासवड रोड – एसएच ६४ / एसएच ६३. अंदाजे एसएच ६३/एसएच ६४ पासून १९ किलोमीटरच्या पुढे (भारताच्या पश्चिमी घाटातून) पुरंदर किल्ला आहे.
पुरंदर किल्ला ब्लॉग

नारायणपूर येथून, तटबंदीच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी आपण डांबरी रस्त्याने चढून जावे. तटबंदीच्या मार्गावर येण्यासाठीचा ट्रेकिंग मार्ग बंद झाला आहे, म्हणूनच मुख्य मार्ग म्हणजे हा डांबरी रस्ता.

या रस्त्यावरून आपण निम्म्यापर्यंत आपले वाहन घेऊन जाऊ शकतो. पुरंदर किल्ला एक लष्कर छावणी आहे आणि संध्याकाळी ५ नंतर येथे पर्यटकांसाठी प्रवेश बंद असतो.

त्याचप्रमाणे पुरंदर किल्ल्यावर फोटोग्राफीसाठी परवानगी नाही. किल्ल्यावर भ्रमंती करण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता पायथ्याशी असलेल्या वडाच्या झाडाभोवती नेमलेल्या पार्किंगच्या जागेपासून सुरु होतो.

नारायणपूरच्या रस्त्यावरून आपल्या वाहनाने तुम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोचता. तेथे बिन्नी दरवाजा आहे, जे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथून आतमध्ये येताच ब्रिटिश काळातील कॅथोलिक चर्च आपल्याला दिसते.

याच चर्चच्या मागील भागापासून खरे ट्रेकिंग सुरू होते. तिथून किल्ल्याच्या अत्त्युच भागावर जाण्यासाठी सुमारे एक तास लागतो.

दुसरा रस्ता म्हणजे पायथ्याच्या गावी उतरून म्हणजेच नारायणपूर गावातून हा रस्ता निघून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पोचतो. तिथे हा रस्ता संपतो आणि पायऱ्या सुरू होतात.

तिथूनच ट्रेकिंग सुरू करणे हे ट्रेकिंगप्रेमींना आनंददायी अनुभव देणारे आहे कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला साद घालताना दिसतात आणि आपण नकळतपणे त्यांच्याकडे ओढले जातो.

गढीला दोन विशिष्ट स्तर आहेत. माची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खालच्या भागात काही गड अभयारण्य आहेत जी किल्ल्याच्या फायद्यासाठी आहेत.

याच भागात एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले कॅथोलिक चर्च आहे. किल्ल्याच्या खालच्या भागातून वर जाण्यासाठी पायर्‍या आहेत, ज्या आपल्याला बालेकिल्ल्याकडे नेतात.

याच ठिकाणी आपल्याला गडावरील अत्यंत सुंदर कलाकृती म्हणजेच बिन्नी दरवाजा दिसतो. त्याचप्रमाणे या किल्ल्यामध्ये शंकराचे मंदिर आणि केदारेश्वर अभयारण्य आहे.

तिथेच उतारावर दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील बहुतेक भाग भग्नावस्थेत असूनही, केदारेश्वर, भगवान इंद्र आणि देवी लक्ष्मीची पुरातन अभयारण्ये निर्विवादपणे आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात.

हा किल्ला म्हणजे एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील वज्रगड किल्ला, तोरणा किल्ला, सिंहगड किल्ला आणि राजगड किल्ला या सगळ्याची सफर आपल्याला एकाच दृष्टीपथात या किल्ल्यातून घडते.

पुरंदर किल्ला ट्रेकची ठळक वैशिष्ट्ये

वीकेंडचा प्लॅन काय आहे मग ? काहीच नाही? चला तर मग भटकंती आवडणाऱ्या मंडळींना गोळा करा आणि पुरंदर किल्ला सर करा.

पुरंदर किल्ला आपल्या प्रियजनांबरोबर फिरण्यासाठी किंवा सहल म्हणून जाण्यासाठी एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.

पुण्यापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर हा किल्ला लागतो. आपला आठवड्याचा शिणवटा या किल्ल्याच्या दर्शनाने कुठच्या कुठे पळून जातो.

निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले मन आणि शरीर तणावमुक्त होते. डोंगर कपारीतून वाहणारे छोटे छोटे धबधबे आपले मन प्रफुल्लीत करतात. अगदी जवळून आपण या सगळ्याचा आस्वाद घेऊ शकता.

पुरंदर किल्ल्यावर जाताना तुम्ही वाटेत लागणारे केतकावळे येथील प्रति बालाजी देवस्थान आणि जेजुरी येथील खंडोबा मंदिर सुद्धा पाहू शकता.

Similar Posts