आज मी आपल्याबरोबर भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंचा संग्रह शेअर करत आहे. स्मारकांबद्दलची ही माहिती तुम्हाला भारतीय ऐतिहासिक ठेवा जाणून घेण्यास नक्कीच मदत करेल.
भारतातील ऐतिहासिक स्थाने
भारत देशाला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, भारतात अमर्याद सुंदर आणि ऐतिहासिक स्थळे आपणाला पाहायला मिळतात. परदेशी तसेच भारतीय लोकांनासुद्धा या स्थळांबद्दल माहित नसते. भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील बंगालच्या खाडीपर्यंत, तसेच उत्तरेकडील हिमालयापासून ते दक्षिणेकडील गंगोत्रीपर्यंत विखुरलेली ऐतिहासिक ठिकाणे अजूनही भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.
या ऐतिहासिक स्थळांमध्ये मंदिरे, किल्ले, राजवाडे, आश्चर्यकारक स्मारके, वस्तुसंग्रहालये येतात. यापैकी, बरीचशी ठिकाणे ऐतिहासिक पुराव्यांअभावी जगापासून गुप्त राहिली. यांपैकी काही प्रचलित ठिकाणांविषयी तुम्ही पुस्तके, टेलिव्हिजनवर तुम्ही ऐकलेही असेल. अशी काही महत्वपूर्ण आणि काही गुप्त ठिकाणे आम्ही गोळा केली आहेत, ज्या ठिकाणांना सर्वानी किमान एकदातरी भेट दिली पाहिजे.
भारताची स्मारके
१) ताज महाल

ताज महालला प्रेमाचे स्मारक म्हटले आहे. भारतामधील आग्रा या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शहरात जगातील सर्वात सुंदर इमारत म्हणून “ताज महाल” प्रसिद्ध आहे. ही वास्तू का बांधली हा विवादास्पद आणि चर्चेचा विषय आहे. तरी, असे मानले जाते की, शहाजहान याने त्याची तिसरी पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली होती. ताज महालमध्ये मुख्यतः मुमताज महल यांची समाधी आहे. शाहजहाँचीही समाधी याच ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. यमुना नदीच्या किनारी संपूर्ण पांढरीशुभ्र संगमरवरी इमारत जगातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
ताज महाल मुघल स्थापत्यकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. मुघल वास्तुकला ही इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा संगम एक प्रकार मनाला जातो. इस्लामिक, पर्शियन ,तुर्किश आणि भारतीय स्थापत्यकलेचा यामध्ये समावेश होतो. मुघल वास्तुकलेची विस्तीर्ण उद्यान, इमारतीला असलेले गोलाकार घुमट, बुरुज आणि जाळीदार नक्षीकाम ही वैशिष्ट्ये मानली जातात. समोरील तीन बाजूंना बांधलेल्या भींती त्यामध्ये मोठे उद्यान, अतिथीगृह आणि मशीद यांचा समावेश होतो.
भारतातील ताज महलला भेट देण्यासाठी जगातून दरवर्षी ७० ते ८० लाख पर्यटक आकर्षित होतात. १७ हेक्टरच्या विस्तृत प्रदेशातील या इमारतीसाठी 52.8 बिलियन रुपये (827 मिलियन डॉलर ) म्हणजेच ५२८००० लाख रुपये खर्च आला होता. ताज महाल हे न्यू सेव्हन वोन्डर्स फौंडेशनने (*) निवडलेल्या २००७ मधील आश्चर्यकारक स्मारक म्हणून विजेता ठरले. सन १६३२ मध्ये सुरु झालेले ताजमहालचे बांधकाम सुमारे 21 वर्षानंतर म्हणजेच १६५३ मध्ये पूर्ण झाले होते.
या दर्ग्याचे बांधकाम आयताकृती असून प्रवेश करण्यासाठी भव्य द्वार आहेत. प्रवेश करताच कारंजे आणि समोरील नेत्रदीपक ताज महाल मनात घर करून बसतात. बाहेरील सुंदरतेबरोबर आतील वास्तुकलाही तितकीच मनमोहक आहे. भारतातील इस्लामिक कलेचा आणि जागतिक परंपरा लाभलेला जगातील एक उत्कृष्ट नमुना म्हणून ताज महलला युनेस्कोने १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित केले.
२) कुतुब मिनार

दिल्लीमध्ये मध्ययुगीन काळामध्ये बांधण्यात आलेले कुतुब मिनार हे पर्यटकांसाठी नेहमीच विशेष आकर्षण राहिले आहे. दिल्लीमधील महत्वाचे स्मारक म्हणून कुतुब मिनार ओळखले जाते. मिनार म्हणजे मशिदीच्या आकाराची वस्तू ज्यामध्ये पाया, वर चढण्यासाठी पायऱ्या, गोलाकार छत, आणि शिखर यांचा समावेश होतो. अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करून आजही हे स्मारक भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभे आहे. युनिस्कोने मेहरौली येथील कुतुब मिनारला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
दिल्लीमध्ये सुल्तानशाहीचे संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक यांनी कुतुब मिनारचे बांधकाम सन ११९२ मध्ये सुरु केले. कुतुबुद्दीन ऐबक यांची कारकीर्द १२०६ ते १२१० पर्यंत होती. कुतुब मिनारचे अर्धवट राहिलेले बांधकाम नंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्ण केले होते. कुटूंब मिनारची उंची सुमारे २३ मीटर असून व्यास १४.३ मीटर (४७ फूट) आहे. शिखराकडे जाताना त्याचा व्यास कमी-कमी होत जातो. मनोऱ्याच्या माथ्याच्या ठिकाणी त्याचा व्यास २.७ मीटर (९ फूट) कमी आहे.
कुतुब मिनार हा वास्तुकलेचा अद्भुत नमुना असून येथील मोहक कोरीव काम पर्यटकांना आकर्षित करतो. याच ठिकाणी या कुतुब मिनारव्यतिरिक्तही इतर वास्तूही मध्ययुगीन वास्तुकलेने केलेली प्रगती सिद्ध करतात. लोहस्तंभ हा मध्ययुगीन धातुकलेचा अतुल्य नमुना आहे. ऊन, पाऊस यांचा या स्तंभावर परिणाम होत नाही. लोखंडी असूनही अद्याप या स्तंभाला गंज लागला नाही, ही या स्तंभाची विशेषता आहे.
याव्यतिरिक्त, याठिकाणी अलाई दरवाजा यांसारख्या अनेक पुरातन वास्तू आहेत.
तुम्ही जेव्हा याठिकाणी फिरता तेव्हा या विस्मयकारक वास्तू आणि त्यावरील नक्षीकाम आपल्याला पुरातन कलेची प्रशंसा करण्यास बाध्य करते. याठिकाणी होणारा कुतुब महोत्सव पर्यटकांसाठी विशेष बाब आहे. ज्यामध्ये, येथील वस्तूंचे महत्व आणि माहिती कळते.
३) इंडिया गेट

इंग्लिश वास्तुविद्याविशारद (अर्चिटेक्ट) सर एडविन लूटयेन्स यांनी रचना केलेले इंडिया गेट हे एक युद्ध स्मारक आहे. इंडिया गेटच्या भव्य स्वरूपाने राजपथ मार्गाची शोभा वाढवली आहे. इंडिया गेटसारखी दिसणारी फ्रान्समधील आर्क दे त्रिंओंफे, रोममधील आर्क ऑफ कॉन्स्टँटाईन, तसेच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ही स्मारके आहे. बऱ्याचदा या स्मारकांतील फरक सांगणे कठीण होते. अवघ्या ४२ मीटर्स उंच असलेले दिल्ली गेट दरवर्षी २६ जानेवारीच्या दिवशी भारतीय प्रजासत्तक दिनाचे शोभा बनते.
इंडिया गेट हे पहिल्या विश्वयुद्ध आणि तिसऱ्या अँग्लो- अफगाण युद्धातील ब्रिटिश आणि भारतीय शाहिद जवानांच्या स्मरणार्थ बनवले होते. भारतीय आणि ब्रिटिशांची जवळपास ८२००० सैनिक शहिद झाले होते. विशेष म्हणजे या स्मारकावरील १३,३०० सैनिकांची नवे कोरलेली आहेत. सन १९२१ साली या स्मारकाचा पाया रचला आणि अवघ्या १० वर्षांनी सन १९३१ साली बांधकाम पूर्ण झाले. लॉर्ड इरविन या भारताच्या त्यावेळच्या ब्रिटिश गव्हर्नरने या स्मारकाचे उदघाटन केले. वास्तुकलाप्रेमींसाठी हे स्मारक खरोखर राहील.
४) सुवर्ण मंदिर

भारत देशाला प्राचीन काळापासून अध्यात्मिक इतिहास लाभला आहे. “हरमंदिर साहिब” किंवा “दरबार साहिब” नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील सुवर्ण मंदिर हे शीख धर्मियांचे एक पवित्र मंदिर आहे. वर्णन न करता येण्याजोगी या मंदिराचे पावित्र्य केवळ अनुभवता येऊ शकते. एकोणिसाव्या शतकातील राजकीय अशांती आणि युद्धजन्य परिस्थितीनंतर महाराजा रणजित सिंग यांनी सन १८३० साली या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. मंदिराचे बांधकाम हे संगमरवर आणि सोन्यापासून केले होते.
मंदिराच्या चारी बाजूस डोळ्याला थंडावा देणारे पाणी आणि मधोमध दैदीप्यमान सोन्याचे मंदिर मनात असीम चैतन्य निर्माण करते. अमृतसर शहराच्या मधोमध असणाऱ्या या सुवर्ण मंदिराला सर्व धर्माचे लोक भेट देऊन एका वेगळ्या धार्मिक सुखाचा अनुभव करतात. या मंदिराला समानतेचे प्रतीक मानले जाते. येथील हजारो लोकांच्या गर्दीतही शिखांच्या प्रार्थनेचा आवाज मनात अध्यात्मिक सुखाची अनुभूती निर्माण करतो.
या सुवर्ण मंदिराला दरवर्षी लाखो लोक भेट देऊन या आध्यत्मिक सुखाचा लाभ घेतात. शिखांचे चौथे गुरु राम दास यांच्या निर्देशावर सन १५७७ रोजी अमृत सरोवर खोदले गेले होते. याच सरोवराच्या मधोमध सुवर्ण मंदिर आहे. अमृत सरोवराच्या भोवती अनेक छोटी-मोठी स्मारके आहेत. या अमृत सरोवरवरूनच येथील शहराला अमृतसर नाव पडले होते.
मुघल, ब्रिटिश यांच्या काळात शिखांवर अनेक अत्याचार झाले होते. अमृतसर मधील क्लॉक टॉवरमधील शीख म्युझिअममध्ये शिखांनी सहन केलेला अन्याय पाहायला मिळतो. अमृत सरोवराच्या दक्षिण-पूर्व भागात आपणाला भव्य रामगढिया बुंगा नावाचा किल्ला पाहायला मिळतो. याच किल्ल्याभोवती मुस्लिम स्थापत्यशैलीचे मिनार (बुरुज) पाहायला मिळतात. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे खरोखर जगातील एक सुंदर कलाकृती आहे.
५) गेट वे ऑफ इंडिया

गेट वे ऑफ इंडिया हे स्मारक पाश्चात्य, अरबी आणि भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत संगम आहे. सन १९२४ मध्ये बांधलेले हे स्मारक अपोलो बंदरवर बांधलेले आहे. ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज विट्टेत यांनी या भव्य स्मारकाची रचना केली होती. किंग जॉर्ज पाचवे व क्वीन मेरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ या अद्भुत स्मारकाची निर्मिती केली होती. मुंबईकरांचे तर हे आवडते पर्यटन स्थळ आहे. भारतातील पर्यटकांबरोबर अनेक विदेशी पर्यटक या स्मारकाला भेट देतात. याच ठिकाणी एलिफन्टा कॅव्हसकडे जाणाऱ्या बोटींग बोटिंग सर्विसेस आहेत.
सन १९११ साली सुरु झालेले गेट वे ऑफ इंडिया चे काम अवघ्या १३ वर्षांनी १९२४ मध्ये पूर्ण झाले. या मजबूत वास्तूचे बांधकाम हे भरीव काँक्रेट आणि बेसाल्टचे बनले आहे.यावर सुंदर नक्षीकाम देखील करण्यात आली आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी सन १९४७ पूर्वी काही काळ हे स्मारक आवागमनासाठी वापरले होते. गेट वे ऑफ इंडिया येथूनच इंग्रजांचे शेवटचे जहाच इंग्लंडसाठी रावण झाले होते.
या स्मारकाच्या परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा तसेच स्वामी विवेकानंदांचा पुतळा होता. आजूबाजूचा परिसरात श्री शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. संध्याकाळनंतर गेट वे ऑफ इंडियाला रंगबेरंगी दिव्यांनी प्रकाशित करतात. ते नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी शेकडो लोक रोज संध्याकाळी गर्दी करतात.
याचबरोबर, याच ठिकाणी तुम्हाला दोन जुने पंचतारांकित हॉटेल्स पाहायला मिळतात. एक म्हणजे हॉटेल ताज आणि दुसरे म्हणजे हॉटेल ओबेरॉय. या हॉटेल्समध्ये उच्य वर्गीय भारतीय आणि विदेशी पर्यटक मुक्काम करणे पसंत करतात.
६) कमल मंदिर

नवी दिल्लीमधील बहापु गावामध्ये स्थित “कमल मंदिर” हे कमळाच्या आकाराचे असल्याने याला कमल मंदिर म्हणतात. कमल उमलत आहे अशी पांढऱ्या कमळाच्या पाकळ्यांपासून केलेली रचना रात्रीच्या रंगबेरंगी दिव्यांमध्ये नेत्रदीपक ठरते. बहाई धर्माला समर्पित आणि सर्व धार्मियांसाठी खुले असणाऱ्या या मंदिरामध्ये कोणत्याही मूर्तीची पूजा केली जात नाही.
हे मंदिर वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. कोणतीही जात, धर्म, पंथ, वंश, राष्ट्रीयता याची पर्वा न करता हे मंदीर जागतिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहे. जगभरातील सात बहाई उपासना स्थळांपैकी हे एक आहे. दिल्लीमधील सौर ऊर्जेचा वापर करणारे दिल्लीमधील पहिलेच मंदिर आहे. सौर ऊर्जेच्या वापराने हे मंदिर दरवर्षी १४४०००० भारतीय रुपये (20422.८० डॉलर) वाचवते.
मंदिराच्या परिसरात प्रवेश करताना गेटवरील मोहक मोराच्या मूर्ती खूप आकर्षक वाटतात. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावरील दोन्ही बाजू हिरवेगार लॉन आणि झाडेझुडपे यांनी सुशोभित केल्या आहेत. तसेच रंगबेरंगी फुले या परिसराची शोभा वाढवतात. मंदिरातील शांत वातावरण जप, तप, ध्यानासाठी पोषक आहे. आतील अद्वितीय वास्तुकला सर्वांसाठी एक आकर्षण ठरते.
आतील शांत वातावरणात आपण कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे अध्ययन, वाचन, लेखन करू शकता. मंदिराच्या परिसरात धार्मिक संगीत गाण्यास, ऐकण्यास अनुमती आहे. आनंदी आणि शांततामय वातावरणात धार्मिक सुखाची अनुभूती घेण्यासाठी कमल मंदिर एक चांगले स्थान आहे.
सेव्हन वोन्डर्स फौंडेशन
सन २००० मध्ये कॅनेडियन-स्विस बर्नार्ड वेबर यांच्या नेतृत्वाखाली स्वित्झरलँडमधील न्यू सेव्हन वोन्डर्स फौंडेशन सुरु केले होते. ही संस्था दरवर्षी अस्थित्वात असलेल्या २०० स्मारकांपैकी लोकमतांच्या आधारे एक आश्चर्यकारक स्मारक निवडत असते.
मला आशा आहे की आपल्याला भारतातील ऐतिहासिक वास्तूंसंबंधित हा लेख नक्कीच आवडला असेल. तरी हा लेख सोशल मीडियावर शेअर करून नवीन सामग्री तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या.