महाराणा प्रताप

The ocassion of Maharana Pratap Jayanti has celebrated in India specially in Rajasthan. As we know how he contributed to free motherland from foreign invasions.

विषय सुची दाखवा

महाराणा प्रतापचा यांचा थोडक्यात परिचय:

भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचा इतिहास फार महत्वाचाआहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला दिसतो. महाराणा प्रताप हे एक आदर्श राजा होते ज्यांनी राष्ट्राकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

“महाराणा”चा अर्थ:

महाराणा हे राजपूत राजांच्या राजवटीमध्ये वापरले गेलेले राजसी उपाधी किंवा शीर्षक होते. ही उपाधी राजस्थानमध्ये अभिमान, दृढनिश्चय, पराक्रमाची निशाणी मानली जात असे.
राजस्थानच्या भूमीने वेळोवेळी पराक्रमी देशभक्तांना जन्म दिला. ज्यांनी हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये महत्वाची भूमिका निभावली.
त्यामुळे राजस्थानमधील अशा देशभक्ताचा इतिहास वाचल्याशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे.
तसेच, मेवाड हा एक महत्वाचा आणि मोक्याचा प्रांत होता जो मध्ययुगीन काळापासून सिसोदीया वंशाच्या अधिपत्याखाली होता.

सिसोदिया वंश:

सर्वात लक्षणीय म्हणजे, राजस्थान मधील सिसोदिया घराण्याची उत्पत्ती ही रामायणातील प्रभु श्री राम यांच्या वंशापासून यांच्यापासून झाली असे मानले जाते.
मेवार हे राज्यातील महाराणा कुंभा, महाराणा रतनसिंग, महाराणा प्रताप हे राजे मेवाडच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत.
महाराणा प्रताप हे भारताच्या इतिहासातील एक लोकप्रिय आणि पराक्रमी राजा होते.

महाराणा प्रतापचे बालपण आणि फितुरांबरोबरील शीतयुद्ध:

अपेक्षित असल्याप्रमाणे महाराणा प्रताप त्यांच्या बालपणापासून खूप पराक्रमी होते. त्यांच्या सावत्र आईने नेहमीच प्रतापला सिंहासनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
प्रताप अतिशय नम्र, धाडसी आणि त्याचे शुद्ध चारित्र्य त्यांना लोकांमध्ये प्रसिद्ध बनवते.
त्याच्या लोकप्रियतेमुळे आणि पराक्रमामुळे, घरातील ईर्ष्यावान व्यक्ती आणि बाहेरील लोकांनी त्यांना कित्येकदा मारण्याचा प्रयत्न केला.
महाराणा प्रतापांच्या कुटुंबातील काही व्यक्ती विश्वासघात करणारे होते, पण त्यांच्यावर प्रतापचा खूप विश्वास जास्त विश्वास असल्याने ते कधी समोर आले नाहीत. महाराणा प्रतापाने दोन सावत्र भाऊ होते ते दोघेही महाराणा प्रतापांच्या पराक्रमाबद्दल ईर्षा करायचे.

कदाचित आपल्याला हे लेखदेखील आवडतील:

छत्रपती शिवराय

छत्रपती संभाजी महाराज

महाराणा प्रताप यांची पहिली लढाई:

महाराणा प्रताप नेहमीच लढाईमध्ये उत्साह आणि जोश घेऊन यायचे प्रत्येक युद्धामध्ये सर्व सैनिकांचे ते प्रेरणास्थान होते आणि त्यांनी केवळ 14 वर्षांचे असतानाच त्यांच्या आयुष्यातील पहिली लढाई लढली होती.

विवाहः

राजस्तानमधील त्यावेळच्या परंपरेनुसार, महाराणा प्रताप यांनीही लहान वयात असतानाच अजब्दीबाईंशी विवाह केला होता. अजब्दीबाई ही महाराणा उदयसिंग यांच्या दरबारातील एका सामंतांची कन्या होती.
राजकीय कारणांमुळे महाराणा प्रतापला यांना आयुष्यात आठ वेळा लग्न करावे लागले होते.

चित्तोडगडची लढाई:

इसवी सन 1568 मध्ये मुगल सैन्याने चित्तौगढला वेढा दिला. चित्तोडगडची लढाई महाराणा प्रतापांच्या जीवनातील मोठ्या लढायांपैकी एक होती.
मुघल सेनेने बाहेरून रसद कापली, बाहेरून अन्न पुरवठा बंद झाल्यामुळे किल्ल्यामध्ये भयानक परीस्थितीमुळे झाली होती.

Maharana Pratap History in Marathi
Maharana Pratap Jayanti Celebrated Every Year with Joy at Chittorgarh Fort, Image Credits: Ssjoshi111

चित्तौगढची वैशिष्ट्ये:

चित्तोडगडचा किल्ला हा मेवाडच्या सुपीक जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचा होता.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, हा किल्ला अभेद्य होता. कारण, मुघलांच्या तोफांचे गोळेदेखील किल्ल्याच्या मजबूत भिंती भेदू शकल्या नाहीत.

साका:

शत्रूसंख्या आपल्यापेक्षा खूप जास्त असेल आणि त्यांच्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे माहित असताना शत्रूशी लढून धारातीर्थी पडणे. याला राजस्थानमधील इतिहासात साका असे म्हटले आहे.
आता मुघल सेनेला वेढा देऊन ४ महिने 3 दिवस झाले होते मुघल सेना काही हटेना. बाहेर मुघल सेना आणि किल्ल्यामध्ये अन्नाची कमतरता, इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्तिथी झाली होती. उपासमारीने मरण्यापेक्षा शत्रूशी लढून मरणे चांगले म्हणून महाराणा प्रताप यांनी मुघल सैन्याविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतात. अशा शेवटच्या युद्धाला “साका” म्हणून ओळखले जात.
चित्तोडगडाच्या युद्धातही मुघलांची सेना ही मेवाडच्या सेनेपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. महाराणा प्रताप यांना दरबारातील सरदार आणि सामंतांनी सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली होती.
चित्तोडगडचे सर्व सरदार प्राणपणाने अखेरच्या श्वासापर्यंत लढले. सर्वांनी पराक्रमाची शर्थ केली.
परंतु एवढ्या मोठ्या मुघल सेनेपुढे टिकणे असंभव होते. शेवटी सर्व राजपूत सेना धारातीर्थी पडली.
चित्तौगढ आणि मेवाड आता महाराणा प्रताप यांच्या राज्यामध्ये नव्हते, परंतु तरीही त्यांच्या अधिपत्याखाली उदयपूरचा कुम्भलगड आणि त्याभोवतालचा घनदाट अरण्याचा प्रदेश होता.

“जोहर”: राजस्थानच्या इतिहासात त्या शूर महिला ज्या अपराजितच राहिल्या:

दरबारी सामंतांच्या पत्नी आणि इतर महिला आणि त्यांच्या दासी या सर्वांनी त्यांच्या परंपरानुसार साका होण्यापूर्वी अग्निकुंडामध्ये उड्या मारल्या होत्या. सर्व स्त्रिया त्या पवित्र अग्निमध्ये सामावून अमर झाल्या, राजस्थानच्या इतिहासात या अग्निकुंडाला “जोहरकुंड” आणि या परंपरेला “जोहर” असे म्हटले आहे.
त्यांनी स्वत: ची तत्त्वे, प्रतिष्ठा, सम्मान राखण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले.
इतिहासानुसार, चित्तोरगड किल्ल्यामध्ये त्या वेळी आत सुमारे ३०,००० लोक होते.
काही लोक, इतिहासकार आणि पुस्तके यांनी, अकबरला अकबर-द ग्रेट शीर्षक दिले, अशा लोकांना मला प्रश्न विचारू वाटतो, अकबर खरोखर महान होता का?
जर तो खरोखर महान असेल तर त्याने चित्तोडगडमधील त्या ३०,००० निर्दोष नागरिकांची हत्या का केली? त्याचे हे कृत्य त्याच्या क्रूरतेचे प्रमाण आहे.
विशेषत: मला हे सांगायचे आहे की, जर त्या क्रूर अकबरला अकबर-द ग्रेट अशी शीर्षक जर मिळत असतील तर महाराणा प्रतापांनाही, प्रताप-द-ग्रेट असे शीर्षक मिळायला हवे!
मला याचे वाईट वाटते की, वास्तविक इतिहास लवकर जगासमोर येत नाही येत नाही.

हल्दीघाटीच्या लढाईची पार्श्वभूमी:

अकबरला नेहमी असे वाटायचे की, एक दिवस महाराणा प्रताप मुघलांसमोर झुकतील. महाराणा प्रतापला समजावण्यासाठी उदयपूरच्या दरबारात अकबरने राजपूत दूत पाठवले. अशा वेळी महाराणा प्रताप आणि राजपूत दूत यांच्यामध्ये वादविवाद व्हायचा. महाराणा प्रतापांनी प्रत्येक वेळी मुघल अंमलाखाली यायला नकारच दिला. या प्रसंगी झालेला वादविवाद अकबरला पुढे महाराणा प्रताप आणि इतर राजपूतांना वेगळे करायला उपयोगी ठरला. अकबरने अशाप्रकारे येणाऱ्या प्रत्येक लढाईमध्ये राजपूत राजांचा प्याद्यांप्रमाणे उपयोग केला. महाराणा प्रतापांकडे राजपूत राजे दूत म्हणून पाठवून, महाराणा प्रताप आणि इतर राजपूत राजे यांना वेगळे करण्याचा अकबराचा डाव मात्र यशस्वी झाला. महाराणा प्रतापला झुकवणे शक्य नाही, हे त्याला समजले म्हणून त्याने महाराणा प्रताप विरूद्ध जाहीर युद्ध घोषित केले.

Maharana Pratap's second Capital- kumbhalgarh Fort
Maharana Pratap Jayanti- Kumbhalgarh fort, Rajsamand district buillt by Rana Kumbha, Image Credits: Rohanguj2

हल्दीघाटीचे रणांगण:

हळदीघाटीचे नाव तिथल्या जमिनीच्या रंगावरून पडले, कारण तेथील भूमी हळदीच्या रंगाची आहे. महाराणा प्रतापांचे सैन्यबळ मुघलांपेक्षा खूप कमी होते. त्याकारणाने, हल्दीघाटी एक डोंगराळ प्रदेशमधील घाट असल्याने समोरासमोरील युद्ध येणे शक्य होते. या दृष्टीने महाराणा प्रतापांनी हल्दीघाटीचे रणांगण युद्धासाठी निवडले. या युद्धतंत्रालाच “गोरिला युद्धतंत्र” म्हणून ओळखले जाते. या युद्धतंत्राला मराठीत “गनिमी कावा” असे म्हणतात. हेच युद्धतंत्र पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी डेक्कनच्या प्रत्येक लढाईमध्ये वापरले. त्याचप्रमाणे, मुघलांचा कित्येकदा पराभव करून “स्वराज्य” निर्माण केले.

उदयपूरचे महत्त्व:

Udaipur City Palace, Rajastan
Maharana Pratap Jayanti- Udaipur City Palace, Image Credits: Honzasoukup

उदयपूर सर्व बाजुंनी पर्वतांनी वेढलेले असल्यामुळे तो नैसर्गिकरित्या संरक्षण आहे. त्यामुळे, उदयपूर जिंकणेही सोपे नव्हते. हल्दीघाटीही याच पर्वतरांगांमध्ये आहे.

कुंभलगढचा किल्ला:

इसवी सन १८ जून १५७६ रोजी अकबराने मानसिंग पहिला याच्या नेतृत्वाखाली भली मोठी सेना देऊन उदयपुरवर आक्रमण आक्रमण केले.
हाक्कीम खान सूरी, भीम सिंग दोडिया, रामदास राठोर, बिदा झाला, भामा शाह, राम शाह तोवर, तारचंद, आणि भिल आर्चर कमांडर पुंजा हे सरदार महाराणा प्रतापच्या सेनेचेमध्ये होते.
हकीम खान सूरी हे एक इराणी पठाण होते आणि सुरी साम्राज्याचे संस्थापक शेर-शाह सूरी यांच्या हत्येचा बदला घेण्याकरिता ते युद्धामध्ये सामील झाले.

हल्दीघाटीची लढाई:

Maharana Pratap in War of Haldighati
Maharana Pratap Jayanti- Inspirational Painting of Rana Pratap, Image Credits: Daniel Villafruela

युद्धामधील एक प्रसिद्ध घटनाः

या युद्धामधील एक घटना प्रसिद्ध आहे, जेव्हा महाराणा प्रतापांचा ‘चेतक’ नावाचा धाडसी घोडा सेनापती मानसिंग याच्या लढाऊ हत्तीच्या सोंडेवर समोरचे दोन पाय उचलून चढतो आणि महाराणा प्रताप मानसिंगवर भाल्याचा जबरदस्त प्रहार करतात. पण, दुर्दैवाने भाला माहुताला (हत्तीचालकाला) जाऊन लागतो.
महाराणा प्रतापांचा हा हल्ला इतका शक्तिशाली होता की, भाला माहुताच्या छातीमधून मानसिंगच्या छताला जाऊन लागला. हा हल्ला युद्धाच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये झाला होता. दुसरा हल्ला करण्यासाठी महाराणा प्रतापांकडे वेळ नव्हता. कारण, सर्व मुघल सेनेने त्यांना घेरले होते.
परिणामी, बिदा झाला हा महाराणा प्रतापांचा सहकारी, जो महाराणा प्रतापांसारखाच दिसत होता. त्याने प्रतापांचा शाही मुकुट घालून ताबडतोब महाराणा प्रतापांना युद्धक्षेत्रातून बाहेर पडायला सांगितले.
महाराणा प्रताप अगदी जखमी अवस्तेत तेथून बाहेर बाहेर पडतात, मुघलांची एक तुकडी त्यांचा पाठलागही करते.

भारतीय इतिहासामध्ये मध्ये हल्दीघाटीच्या लढाईचे महत्त्व:

हे युद्ध मुगल शासनाच्या विरोधात हिंदू आणि मुस्लिम यांनी केलेल्या संयुक्त संघर्षचे दुर्मिळ उदाहरण आहे.
हल्दीघाटीची लढाईने छापा-मार युद्धपद्धतीचा वापर वाढला.
महाराणा प्रतापांनी युद्धात जवळपास ३४०० सैनिकांबरोबर मुघलांच्या १०,००० सैनिकांशी युद्ध केले. [सैनिकसंख्या भारतीय इतिहासकारांच्या मते]

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सहभागी स्वातंत्र्यसेनानी:

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील खरे नायक

चेतक- महाराणा प्रतापांबद्दल चेतकची स्वामीनिष्ठा:

महाराणा प्रतापांचा चेतक हा एक घोडा होता. त्याने या लढाईनंतर जे केले, त्यामुळे या युद्धानंतर पुन्हा संघर्ष चालू ठेवता आला.
महाराणा प्रताप युद्धभूमी सोडून बाहेर पडले तेव्हा मुघल सैनिक त्यांचा पाठलाग करत होते. चेटकीलाही युद्धामध्ये ठिकठिकाणी जखमा झालाय होत्या. शिवाय एक पाय पूर्णपणे रक्तभंबाळ झाला होता.स्वतःची, पर्वा न करता, आपले स्वामींचे प्राण संकटात आहेत हे ओळखून रणभूमीपासून दूर नेतो. तरीही मुघलांनी पाठलाग सोडला नव्हता, त्यावेळेस चेतनच्या समोर एक नदी येते. नदी दुथडी भरून वाहत असते. सामान्य घोडे या नदीला पार करू शकत नव्हते, परंतु चेतक हा असामान्य होता. चेतकने आपल्या स्वामींबद्दल अतूट भक्ती, आणि कर्तव्यनिष्ठा दाखवत एका उडीत ती नदी पार केली. चेतकने जखमी अवस्थेत महाराणा प्रतापांना २ मैल दूर नेले होते. उडी मारल्यानंतर मात्र चेतकला वेदना असह्य झाल्या, तो जमिनीवर कोसळला. हळूहळू डोळे बंद होऊ लागले, प्राणपाखरू उडाले!
महाराणा प्रतापांना खूप दुःख झाले. चेतक हा महाराणा प्रतापांसाठी फक्त एक घोडा नव्हता, ते चेतकला आपला मित्र मानायचे. चेटकचे अंतिम संस्कार केल्यानंतर, मुघल सैनिक महाराणा प्रतापांना घेरतात. त्यावेळी महाराणा प्रतापांचा भाऊ शक्तिसिंग प्रतापांना संकटात पाहून त्यांना स्वतःचा घोडा देऊन वाचवतो.
या युद्धानंतर, महाराणा प्रताप हताश झाले, इतके प्रयत्न करूनसुद्धा निराशाच हाती लागली!

दानवीर भामाशा कवाडिया:

भामाशा महाराणा उदयसिंग-II यांच्या दरबारात खजिनदार आणि मंत्री होता. भामाशा हा महाराणा प्रतापांच्या पूर्वजांचा खजाना महाराणा प्रतापांना द्यायला येतो.
भामाशानेही त्याच्या जीवनात खूप संपत्ती कमावली होती. असे म्हणतात की भामाशाने स्वतःहाची सर्व संपत्तीपण या खजिन्यात दान केली होती. त्यामुळे इतिहासात भामाशाला “दानवीर भामाशा” असे म्हणतात.
आणीबाणीच्या परिस्तिथीमध्ये नवीन सैन्याची तयारी, नवीन शस्त्रे खरेदी करण्यात या खजिन्याचा वापर केला गेला.
यानंतर, महाराणा प्रतापाने काही काळ छापामार- युद्धपद्धतीने मुघलांविरुद्ध संघर्ष चालू ठेवला.

हल्दीघाटीच्या युद्धामागील अकबराचा हेतू:

पहिले हेतू, महाराणा प्रतापांना मारणे किंवा कैद करणे असा अकबराचा डाव होता.
दुसरा हेतू म्हणजे, अकबरला उदयपूर ताब्यात घ्यायचे होते, कारण ते गुजरात ते दिल्ली या व्यापाराच्या मार्गामध्ये येते.
प्रात्यक्षिकदृष्ट्या, अकबरने हल्दीघाटीचे युद्ध जिंकले होते. परंतु, या युद्धातून महाराणा प्रतापांनी अकबरचे सर्व उद्दिष्ट्य असफल केली. कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल, ते कसे?
पहिला हेतू कसा असफल झाला ते सांगण्याची गरज नाही, बरोबर?
अकबराचा दुसरा हेतूपण असफल झाला, कारण हल्दीघाटीच्या युद्धानंतर काही वर्षांतच महाराणा प्रतापांनी परत उदयपूरचा कुम्भलगड मुघलांकडून जिंकून घेतला. अशारितीने, महाराणा प्रतापांनी अकबरचे हल्दीघाटीच्या युद्धामागील सर्व हेतू विफल केले.

I hope you like this article written on ocasion of Maharana Pratap Jayanti. We hope you will share this article over social media. Because, we know that you like to share knowledge with others just like us!

Featured Image Credits: Raja Ravi Varma, Source: Wikimedia

Share via

Sharing is a way to encourage us !

Sharing quality content encourage us to keep creating more relevant content for you. So, appreciate us by sharing this piece of content!
I will share it later!

Join our list

Subscribe to our list and get newsletters directly to your inbox

Please check your inbox to confirm your subscription

Something went wrong.

Do not send me a FREE STUFF!

Join our list

Subscribe to our list and get newsletters directly to your inbox

Please check your inbox to confirm your subscription

Something went wrong.

Do not send me a FREE STUFF!
 
Send this to a friend