राजमाता जिजाऊंचे जीवनचरित्र- शिवरायांचे प्रेरणास्थान

by एप्रिल 24, 2021

राजमाता जिजाऊ या एक महान माता, देशभक्त, तसेच राजकारणी होत्या. ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणेही कठीण होते अशा वेळी त्यांनी स्वराज्याचा विचार शिवरायांच्यात रुजवला. अशा या महान मातेचे जीवनचरित्र आज मी या लेखाद्वारे आपल्यासमोर मांडत आहे.

राजमाता जिजाऊंचा जन्म

राजमाता जिजाऊ ह्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा मधील सिंधखेड मधील भुईकोट किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, जे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक होते, त्यांच्या मातोश्री होत्या. आज हे स्थळ न केवळ एक ऐतिहासिक स्थळ आहे पण त्याचबरोबर एक पर्यटन स्थळ देखील आहे.

किल्ल्यावरील राजवाडा ज्याचे एक भव्य दिव्य असे आकर्षक प्रवेशद्वार आहे, मुंबई-नागपूर महामार्गावर सिंधखेड राज्यामध्ये स्थित आहे. तिथेच नगरपालिकेचे एक उद्यान देखील आहे.

Image Credits: Afrinshaikh

राजमाता जिजाऊंचे बालपण

लखुजीराव जाधव ह्यांचे पूजास्थान ह्या ठिकाणी आहे. ही भव्य वास्तू भारताच्या हिंदू राष्ट्र समाधीपेक्षा कित्येक पटीने मोठे आहे. जिजाउंनी ज्याठिकाणी रंग खेळला ते म्हणजे राजवाड्यांचा राजवाडा. जिजाउंनी कधीही त्यांच्या नातेसंबंध आणि भावनांना त्यांच्या कर्तव्याच्या आड येऊ दिले नाही आणि उत्तमपणे आपली सर्व कर्तव्ये पार पडली.

जिजाऊंचा विवाह

शिवरायांची संपूर्ण जवाबदारी त्यांच्याच खांद्यांवर होती. कर्तव्यनिष्ठतेचा गुण शिवाजी महराजांनी त्यांच्या मातोश्रींकडूनच शिकला.

जिजाबाईंचा विवाह

त्या काली विवाह कमी वयात होत, जिजाबाईंचेदेखील कमी वयात लग्न झाले. सिंधखेडच्या महालामध्येच शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची चर्चा करण्यात आली.

एका ऐतिहासिक सिद्धांतानुसार, जिजाबाई लग्नानंतर शहाजीराजेंबरोबर त्यांच्या दक्षिणेतील जहागिरी बेंगळुरू म्हणजेच सध्याच्या बँगलोरला गेले.

जिजाबाईंकडे पुणे आणि सुपे परगण्याची जबाबदारी

पुणे आणि सुपे परगणा शहाजींच्या ताब्यात आल्यानंतर शहाजींनी त्या जहागिरीची जबाबदारी जिजाबाईंकडे सोपवली. तेव्हा जिजाबाई पुनवडी म्हणजेच सध्याच्या पुण्यात शिवनेरी येथे आल्या. पुण्याच्या जहागिरीची योग्यरीत्या देखरेख करण्याकरिता शहाजीराजेही सुरुवातीचा काही काळ पुण्यात घालवत.

जिजाऊंना पुत्ररत्नाची प्राप्ती

दिवस होता १९ फेब्रुवारी, १६३०, गडावर सगळीकडे आनंदाचे वातारण होते राजमहाल फुलांनीं सजला होता. दारावर तोरणे लागली होती, सगळीकडे लगबग सुरु होती.

इतक्यात नगाडे वाजू लागले, तोफा कडाडल्या त्या युद्धासाठी नव्हे, तर पुत्ररत्नाच्या स्वागतासाठी. जिजाऊंनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला.

राजमाता जिजाऊ नित्याने शिवनेरीवर शिवाईदेवीची आराधना करीत. शिवाईदेवीच्या नावावरून जिजाऊंनी त्यांच्या पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले.

महसूल आकारणीसाठी दादोजी कोंडदेव आणि ब्राह्मणांची नियुक्ती

पुण्याच्या जहागिरीचे योग्यरीत्या व्यवस्थापन करण्याकरिता त्यांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. त्याचबरोबर त्यांनी पुण्यामध्ये बंगलोरच्या प्रशासनात काही ब्राह्मणदेखील नियुक्त केले.

त्यांच्यामार्फत ज्यादा महसूल बंगलोरच्या कोषागारात सुरक्षितरित्या पाठवला जात. दोदोजींनी पुणे आणि सुपा जहागिरीचा महसूल पुन्हा सुस्थितीत आला.

जिजाऊंद्वारे शिवरायांना दिलेली मूल्ये

राजमाता जिजाऊ नेहमी उच्य विचार आणि संस्काराला मानीत. शिवरायांवरही त्यांनी त्यांच्या महान विचार आणि संस्करांनी वाढवले. हेच कारण आहे कि साडेतीनशे वर्षांनंतरही मराठी लोक आजही त्यांना आई न म्हणता “माता” म्हणतात.

शिवरायांची संपूर्ण जवाबदारी त्यांच्याच खांद्यांवर होती. कालांतराने शिवरायही मातोश्रींकडून कर्तव्यनिष्ठतेचे गुण शिकले.

जिजाऊंद्वारे शिवरायांची जडणघडण

काटेकोरपणा, शिस्त, आणि जिद्द यांच्या जोरावर शिवराय भालाफेक, तलवारबाजी, डांगपट्टा, घुडसवारी यांमध्ये तरबेज झाले.

ह्याठिकाणी निलकंठेश्वरचे पुरातन मंदिर देखील आहे, आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लिहिलेले शिलालेख देखील ह्याठिकाणी आहेत. ह्या मंदिराच्या समोर चौरसाच्या पायथ्याशी एक भव्य पायर्यांनपासून तयार केलेला भव्य बारव आहे. हेमाडपंथी रामेश्वर मंदिर ८ व्या ते १० व्या शतकातील आहे.

राजेराव जगदेवराव जाधव ह्यांच्या कालखंडामध्ये विशाल किल्ल्यांच्या बांधणीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काळाकोठ किल्ला होय. ह्या किल्ल्याच्या शाश्वत भिंती अत्यंत उत्कृष्ट आणि मजबूत अश्या २० फूट उंच आणि तेवढ्याच रुंद आहेत.

ह्याव्यतिरिक्त सच्चरखेडा नावाचा एक ४० फूट उंचा भिंत असलेला तटबंदीचा किल्ला देखील आहे. जो एका छेदनबिन्दुवरून स्पष्ट दिसू शकतो, त्या किल्ल्यामध्ये आंतरिक रस्ते, आंतरिक विहिरी, विहिरी, उप-तळघरे, आणि भुयारी मार्ग देखील आहेत. त्यामुळे ह्या वास्तूचे प्रवेशद्वार देखील तितकेच सुंदर आणि भव्य आहे.

मोती तलाव हे एक पाणी सिंचनाचे उत्तम उदाहरण आहे आणि सिंचानासाठीचे पाणी सोडण्याचा चांगले स्त्रोत आहे. ह्या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्यासारखा बांधला आहे आणि उत्खननाचे क्षेत्र देखील फायदेशीर आहे. चैतन्य शिवाय चांदणी तलाव देखील एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. ह्या तलावाच्या मध्यभागी एक तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे.

Image Credits: Bharath12345

हा पुतळा अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने बांधला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की हे शिल्प अनेक छोटे छोटे इतर शिल्प आणि मूर्ती एकत्र करून बनवले गेले आहे. त्याचबरोबर इथे एक भजनाबाई नावाची विहीर देखील आहे, त्या काळी ह्या विहिरीमधुनच कोरड्या कालव्यांना पाणी पुरवठा केला जात असे, तळघरात जाण्यासाठी ह्याठिकाणी एक जिना देखील आहे.

Image Credits: Sanket Suresh Rane

वर्तमानात ह्या तलावाच्या बाजूच्या पठारावर “जिजाऊ सृष्टी” ची उभारणी करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ह्या ठिकाणी महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आखण्याचा मानस आहे. ह्या “जिजाऊ सृष्टी” ला एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

संपूर्ण समाज जिजाऊंनसारखाच कर्तव्यनिष्ठ, कर्मनिष्ठ, समानता बाळगणारा, बंधुत्वाचे आचार विचार असणारा, असावा हे ह्यामागचे मुख्य ध्येय होय.

Featured Image Credits:

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest