प्रस्तावना
भारतासारख्या ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध देशातील स्वातंत्र्यसैनिकांबद्दल समजून घेणे नेहमीच आकर्षक असते. या लेखात प्राचीन काळापासून आधुनिक इतिहासामधील स्वातंत्र्यसैनिकांची यादी दिली आहे. या महापुरुषांनी देशाला परकीय जाचक शासनातून मुक्ती मिळण्यासाठी संघर्ष केला. यांचा उद्देश एकाच होता तो म्हणजे येणाऱ्या पिढीला स्वतंत्र भारतात श्वास घेता यावा.
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कार्यकर्ते आणि नेते स्वातंत्र्यासाठी लढले आणि येथे त्यांचा चिरस्थायी वारसा सोडला. या ब्लॉगमध्ये भारतातील काही सन्माननीय स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेरक कथांचा समावेश आहे, ज्यांनी आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी पराक्रमाने लढा दिला.
जहाल व मवाळ या दोन्ही गटांद्वारे या ब्रिटिशविरोधी संग्रामात भाग घेतला. महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनापासून ते भगतसिंगांच्या क्रांतिकारी उपक्रमांपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी देशभक्तांनी स्वातंत्र्य संग्रामात मदत केली.
जहाल स्वातंत्र्यसैनिकांना क्रांतिकारक किंवा क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक म्हणतात. तर मवाळ गटातील स्वातंत्र्यसैनिकांना अहिंसक स्वातंत्र्य सैनिक असे म्हणतात.
क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक सत्ताधारी सरकारविरुद्ध हिंसाचार करून स्वातंत्र्य लढा करतात. त्यांच्या हिंसक क्रियाकलापांमध्ये खून, बॉम्ब हल्ला इत्यादींचा समावेश असू शकतो.
दुसरीकडे, काही अहिंसक स्वातंत्र्यसैनिक सरकारच्या विरोधात अहिंसक आंदोलन करतात पण त्यांच्या क्रियाकलापांमध्ये हिंसाचाराचा समावेश नसतो.
कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतंत्रता संग्रामात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण स्वातंत्र्यसैनिक म्हणतो. मग तो मवाळ गटातील असो वा जहाल त्याने त्यांचे मूल्य कमी होत नाही.
त्यामुळे या लेखात मी जवळजवळ शंभरपेक्षा जास्त स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
अगदी प्राचीन काळापासून भारतावर अनेक परकीयांनी आक्रमणे केली. यापैकी प्राचीन ग्रीक मॅसेडोनियन साम्राज्याचा सम्राट सिकंदर किंवा अलेक्झांडर याने इसवी सन ३२७ मध्ये आक्रमणे केले. या आक्रमणाला इतिहासातील पहिले ज्ञात भारतात झालेले आक्रमण मानतात.
त्याकाळी लोक भारताला भारतवर्ष किंवा भारत असेही संबोधत होते. भारताला प्राचीन काळी सोनेरी पक्षी अशी उपमा मिळाली होती. त्याचे कारणही तसेच होते, भारतात सुपीक जमीन, जलाशय, वन्यसंपदा, खनिजसंपदा या मूलभूत गोष्टी ज्या मानवविकासासाठी कारणीभूत असतात यांची विपुलता होती.
त्याकाळी लोक भारताला भारतवर्ष किंवा भारत असेही संबोधत होते. भारताला प्राचीन काळी सोनेरी पक्षी अशी उपमा मिळाली होती. त्याचे कारणही तसेच होते, भारतात सुपीक जमीन, जलाशय, वन्यसंपदा, खनिजसंपदा या मूलभूत गोष्टी ज्या मानवविकासासाठी कारणीभूत असतात यांची विपुलता होती. त्यामुळे लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न होते.
ज्यामुळे देशातील संपूर्ण विकास झाला, त्यामध्ये मगध, मौर्य, गुप्त यांसारखे बलाढ्य साम्राज्य अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातील विकासासाठी तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, पुष्पगिरी, वल्लभी यांसारख्या शैक्षणिक विद्यापीठांची स्थापना झाली.
अशा सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण परकीय आक्रमणकाऱ्यांना आकर्षित करत.
गझनीच्या मुहम्मदसारख्या अक्रमांकाऱ्यांनी तर केवळ भारतातील धन-संपत्ती लुटण्याच्या उद्देशाने भारतावर आक्रमणे केली. काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये त्याच्या सतरा स्वाऱ्यांचा उल्लेख येतो.
सिकंदरापासून ते इंग्रज आक्रमणापर्यंत झालेल्या अनेक आक्रमणांना भारतीय स्वातंत्र्यसेनानींनी यशस्वीपणे लढा दिला. परंतु या स्वातंत्र्याच्या यज्ञात अनेकांना स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
बहुतेक लोक आधुनिक इतिहासातील देशभक्तांनाच स्वातंत्र्यसैनिक मानतात. त्यामुळे देशभक्तांच्या यादीत फक्त भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या देशभक्तांना सहभागी करतात.
ब्रिटिश आक्रमणकाऱ्यांच्या परतीनंतर जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी परकीय आक्रमणकाऱ्यांमध्ये फक्त ब्रिटन हाच देश होता असे नाही. त्यामुळे, या यादीत प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील देशभक्तांचा समावेश आवश्यक आहे, असे मला वाटते. कारण, तेही तितक्याच जोमाने राष्ट्रासाठी लढले.
त्याचप्रमाणे इंटरनेटवरील बहुतेक लेखांमध्ये महिला स्वातंत्र्यसेनानींचा फार कमी उल्लेख आहे. त्यामुळे त्यांनाही या यादीत योग्य न्याय मिळेल याकडे माझे लक्ष राहील.
चला तर मग प्राचीन काळापासूनच्या सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याविषयी यथाक्रमित तपशीलवार माहिती करून घेऊ.
प्राचीन भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची यादी
सम्राट पुरु किंवा सम्राट पोरस
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. ४ थे शतक | इ. स. ३ रे शतक | झेलमच्या युद्धात अतुलनीय पराक्रम दाखवला. |
पोरसच्या सेनेने सिकंदराच्या सेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. | ||
पोरसद्वारे लढलेल्या झेलमच्या लढाईतील नुकसानीमुळे, ग्रीक सेना त्रस्त झाली. | ||
ग्रीक सेनेच्या आग्रहाने सिकंदरने भारतातील पुढील मोहीम रद्द करून तो माघारी फिरला. |
सविस्तर माहिती
राजा पोरसने अलेक्झांडर विरुद्ध झालेल्या झेलमच्या लढाईत अतुलनीय पराक्रम दाखविला.
झेलमच्या लढाईत जरी अलेक्झांडरला विजयी मानले जाते. तरी, या लढाईत अलेक्झांडरच्या सैन्याची मोठी हानी झाली हे नक्की. कारण, या युद्धानंतर, त्यावेळच्या भारतातील नंद साम्राज्याशी लढा देणे सोपे नव्हते.
तसेच अलेक्झांडरचे सैन्य सततच्या लढाईने थकले होते. भारताच्या प्रवेशद्वारावरच लढाईत झालेल्या मोठ्या हानीमुळे ग्रीक सैनिकांमध्ये आधीच दहशत पसरली होती. त्यामध्ये भारतामधील नंद साम्राज्याचे सैन्य ग्रीक सैन्याच्या जवळजवळ पंधरा पट अधिक होते. ज्यामुळे सैन्याने अलेक्झांडरला माघारी परतण्याची विनवणी केली. ज्यामुळे अलेक्झांडर शेवटी इसवी सन पूर्व ३२५ साली माघारी परतला.
राजा पोरसच्या इतिहासाचा उल्लेख अनेक ग्रीक स्त्रोतांमध्ये आहे. या स्त्रोतांमध्ये प्लुटार्क, एरियन, डायओडोरस या इतिहासकारांचे कार्य आणि टॉलेमी सारख्या भूगोलशास्त्रज्ञांचे कार्य समाविष्ट आहे.
भागवत पुराण, महाभारत, ऋग्वेद या हिंदू धर्मग्रंथात राजा पुरुचा उल्लेख येतो. भागवत पुराणातील ९ व्या स्कंदात पुरू या राजाचा उल्लेख आहे.
परंतु या सर्व ग्रंथांमध्ये त्यांचा कालखंड, तसेच सत्ताधारी क्षेत्र यांमध्ये बरीच तफावत पाहायला मिळते. तर काही गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या विश्वासपात्र नसल्याने त्यांना ऐतिहासिक स्रोत मानता येत नाहीत.
चंद्रगुप्त मौर्य
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
जवळपास इ. स. पूर्व ३४० | अंदाजे इ. स. पूर्व २९७ ते २९३ दरम्यान | चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रबळ मौर्य साम्राज्याची स्थापना केली. |
ग्रीक आक्रमणकाऱ्यांना भारताबाहेर थोपवून ग्रीक सम्राट सिकंदरला माघारी परतण्यास भाग पाडले. | ||
सिकंदरनंतर सेल्युकस निकेटरशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून भारतात शांतता प्रस्थापित केली. | ||
भारतात एकसंघ साम्राज्य स्थापन केल्यामुळे देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात प्रगती झाली. |
सविस्तर माहिती
चंद्रगुप्ताने भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याची स्थापन केली. जे “मौर्य साम्राज्य” म्हणून ओळखले गेले. ते त्या प्राचीन भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी होते ज्यांनी भारताला आक्रमकांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला.
त्यांना प्राचीन भारतातील स्वातंत्र्यसैनिक म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी समकालीन ग्रीक आक्रमणकाऱ्यांना भारताबाहेर थोपवून त्यांच्याशी हितसंबंध कायम ठेवले.
ज्यामुळे देशातील व्यापाराला चालना मिळाली आणि आर्थिकदृष्ट्या देश समृद्ध बनला. चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रबळ मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मौर्य साम्राज्यस्थापनेमुळे जवळजवळ दीड शतके भारतात शांतता नांदली.
अलेक्झांडर ज्याला सिकंदर म्हणूनही ओळखले जाते. त्याचे भारत जिंकण्याचे स्वप्न होते. तक्षशिलेमध्ये विद्यार्जनाचे काम करत असलेले आचार्य चाणक्य यांना सिकंदराच्या या योजनेचे अनुमान होते.
सिकंदरच्या या अनुभवी सेनेविरुद्ध लढा देण्यासाठी अखंड भारताचे निर्माण करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. याचीही चाणक्यांना जाणीव होती. ज्यामुळे चाणक्य नंद साम्राज्याचे राजा धनानंदाकाडे त्यांची योजना सांगतात. परंतु, धनानंद हा खूप धूर्त, कपटी, आणि गर्विष्ठ राजा होता, जो चाणक्यांच्या योजनेकडे दुर्लक्ष करून त्यांचा अपमान करतो.
त्यावेळी चाणक्य प्रतिज्ञा घेतात की, जोपर्यत नंद वंशाचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत ते त्यांचे केस बांधणार नाही.
चंद्रगुप्तने लोभी आणि स्वार्थी मगध राजा धनानंदचा वध केला. परिणामी, मगधचे सिंहासन काबीज करून मौर्य साम्राज्य स्थापन केले.
त्याने पश्चिम आणि उत्तरेकडे साम्राज्याचा विस्तार करून एकसंध भारत निर्माण करण्यात चंद्रगुप्तला यश आले. अशाप्रकारे, चंद्रगुप्त मौर्याने चाणक्यांच्या अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून त्यांची प्रतिज्ञाही पूर्ण केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारताच्या हितामध्ये अनेक उद्दिष्टे साध्य केली.
पुष्यमित्र शुंग
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. पूर्व २ रे शतक | इ. स. पूर्व १५१ | विखुरलेल्या मौर्य साम्राज्याला पुन्हा एकदा प्रबळ शुंग शासनामध्ये परिवर्तित केले. |
बॅक्ट्रियन ग्रीक आक्रमणकाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त केला. | ||
ते प्राचीन काळामध्ये अश्वमेध यज्ञ केलेल्या राजांपैकी एक राजा होते. |
सविस्तर माहिती
मौर्य साम्राज्याच्या अंत होण्यामध्ये आणि या साम्राज्याच्या ऱ्हासानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुष्यमित्राने शुंग वंशाची स्थापना करून राज्यकारभार केला.
भारतीय इतिहासात पुष्यमित्र शुंग यांना जितके महत्व द्यायला हवे, तितके दिले जात नाही. पण ते उल्लेखनीय भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. कारण त्यांनी आळशी आणि भेकड मौर्य सम्राट बृहद्रथचा अंत करून साम्राज्याला पुन्हा एकदा शक्तिशाली मध्यवर्ती शासन दिले.
त्याने बॅक्ट्रियन ग्रीकांशी युद्ध केले आणि त्यांना भारताच्या सीमेवरून हाकलून दिले. काही पुराव्यांनुसार ते एक पराक्रमी राजे होते ज्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता.ते प्राचीन काळामध्ये अश्वमेध यज्ञ केलेल्या राजांपैकी एक राजा होते
पुष्यमित्र शुंग हे हिंदू सम्राट असल्याने बौद्ध आणि जैन धर्मग्रंथात त्यांच्याविरुद्धचे अनेक उल्लेख येतात. जसे की, पुष्यमित्राने बौद्ध मठांवर हल्ले करून अनेक बौद्ध भिक्षूंची निघृण हत्या केली.
परुंतु याविषयी कोणताही शिलालेख किंवा ठोस पुरावा मिळावा नसल्याने बहुतांश बौद्ध भिक्षुक त्यांना बदनाम करण्यासाठी याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला असावा.
गौतमीपुत्र सातकर्णी
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. १ ले शतक | इ. स. २ रे शतक | सातवाहन वंशातील सर्वात प्रसिद्ध राजा होते. |
परकीय आक्रमणकाऱ्यांना सडेतोड उत्तर देत त्यांना भारताच्या सीमेबाहेर हद्दपार केले. | ||
अकराव्या शतकातील मुहम्मद गझनीच्या स्वाऱ्यांपर्यंत भारताला आठ शतके परकीय आक्रमणापासून दूर ठेवण्याचे श्रेय यांनाच दिले जाते. | ||
सातवाहन काळात आईचे नाव लावण्याची पद्धत होती, त्यामुळे गौतमीपुत्र सातकर्णी यांचे नाव गौतमी बलश्री या त्यांच्या आईच्या नावावर होते. |
सविस्तर माहिती
इसवी सन १ ल्या आणि २ ऱ्या शतकात सातवाहन राजांनी दख्खनवर राज्य केले. त्या सातवाहन राजांमध्ये दुसऱ्या शतकातील गौतमीपुत्र सातकर्णी यांची कारकीर्द प्रसिद्ध आहे.
त्याचे कारणही तसेच त्यांनी भारताला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढा दिला. त्यांनी त्याच्या सामर्थ्याने सर्व परदेशी आक्रमकांना भारताबाहेर खदेडले.
या शूर भारतीय स्वातंत्र्यसैनिकांमुळे भारतीय उपखंड परकीय हल्लेखोरांपासून सुरक्षित राहिला. त्यांच्यामुळेच जवळपास आठ शतके भारत परकीय आक्रमणांपासून मुक्त राहिला.
पृथ्वीराज चौहान
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. ११६६ | ११ मार्च, इ. स. ११९२ | त्यांची पराक्रमी, धैर्यवान आणि एक अद्वितीय प्रेमी ओळख आहे. |
परकीय आक्रमणकारी मुहम्मद घोरीचा त्यांनी तीन वेळेस सामना केला. | ||
त्यांना कविता करणे फार आवडत, ते स्वतः एक कवीदेखील होते. | ||
ते दिल्लीच्या तख्तवरील शेवटचे हिंदू राजा होते. |
सविस्तर माहिती
इसवी सन अकराव्या शतकात गझनीच्या महमूदने भारतातून प्रचंड संपत्ती लुटली. त्याच्या आक्रमणामागील हेतू भारतीय संपत्ती लुटण्याचा होता. त्याने साम्राज्यवादाला प्राधान्य दिले नाही.
त्यानंतर इसवी सनाच्या बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले. त्याच्या आक्रमणाचा उद्देश भारतीय संपत्ती लुटणे हा होता. परंतु, त्याने मंदिरे लुटताना भारतीय उपखंडावर राज्य करण्याचा विचार केला. त्याच्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो दिल्ली काबीज करण्यात यशस्वीही झाला.
पृथ्वीराज चौहानांना भारतात शौर्य आणि धैर्याचे प्रतीक मानतात. त्यांनी मुहम्मद घोरीच्या आक्रमणाचा जोरदार मुकाबला केला.
मात्र, तिसऱ्या लढाईत महंमद घोरीने त्यांचा पराभव केला. पण, तरीही त्यांनी मातृभूमीसाठी तीन युद्ध लढले. त्यांच्या या योगदानाला आपल्याला विसरता येणार नाही आणि त्यामुळे ते एक खरे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. ते दिल्लीच्या तख्तवर राज्य करणारे शेवटचे हिंदू भारतीय स्वातंत्र्यसैनिक ठरले.
मुहम्मद घोरीच्या विजयानंतर त्यांना कैद करून अफगाणिस्तानातील गझनी येथे नेण्यात आले. मग, घोरीने त्याच्या सैनिकांना डोळे काढण्यासाठी आदेश दिला आणि त्याचबरोबर त्यांचा शारीरिक छळ केला.
पृथ्वीराज रावसो ग्रंथानुसार, चंद बरदाई हा त्यांचा दरबारी कवी होता. त्याच्यामुळेच पृथ्वीराज चौहान यांना मोहम्मद घोरीचा वध करून बदला घेता आला.
मध्ययुगीन भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची यादी
शेरशाह सुरी
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. १४८६ | २२ मे, इ. स. १५४५ | मुघल राजवटीचा पाडाव करून दिल्ली काबीज केली. |
पाच वर्षाच्या अल्पकालीन शासनात त्यांनी समाज परिवर्तनात मदत केली. | ||
त्यांनी रुपया हे चांदीचे नाणे सुरु केले. हे सध्या भारताबरोबर इंडोनेशिया, मालदीव, मौरिशस, नेपाळ, पाकिस्तान, सेंचेल्लेस, श्रीलंका या देशांचे राष्ट्रीय चलन आहे. | ||
बिहार, बंगाल, माळवा, आणि मारवारसारख्या अनेक प्रांत त्यांनी जिंकले. |
सविस्तर माहिती
बाबरचा मुलगा हुमायून गादीवर आल्यानंतर सुरी घराण्यातील शेरशाह सूरीने मुघल राजवटीचा पाडाव केला. त्यांनी मुघलांना पर्शियाचा रस्ता दाखवला. हद्दपार केल्यानंतर त्यांचा काही काळ गुजरातमध्ये गेला. तसेच राजस्थानच्या रणथंबोर किल्ल्यामध्येही त्यांनी काही काळ शरण घेतली.
बाबरने दिल्ली काबीज करण्याआधी, दिल्लीवर हुकूमत करणारे सुलतान जरी भारताबाहेरून आलेले असले तरी ते भारतात जास्त काळ राहिले. त्यांनी भारतातील संस्कृतीशी जुळवून घेतले. ज्यामुळे कालांतराने त्यांनी भारताला मायभूमी मानले आणि त्यामुळे ते परकीय राहिले नाही.
सोळाव्या शतकात आलेले मुघल हे नवीन परकीय आक्रमक होते. दुसरीकडे, सुलतान दीर्घकाळ भारतात राहिले. त्यामुळे कालांतराने काही पिढ्यांनंतर त्यांनीही भारतीय संस्कृती स्वीकारल्याने त्यांनाही भारतीय म्हणूनच गृहीत धरतात. त्यांना भारतीय पठाण म्हणूनही ओळखतात. त्यामुळे शेरशाह सूरी यांनाही भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
सोळाव्या शतकात आलेले मुघल हे नवीन परकीय आक्रमक होते. दुसरीकडे, दिल्लीत सुलतानशाहीच्या काही पिढ्या गेली होत्या. त्यामुळे कालांतराने काही पिढ्यांनंतर मूळ भारतीय लोकांनीही त्यांना भारतीय म्हणून स्वीकारले. भारतीय त्यांना पठाण म्हणूनही ओळखतात. त्यामुळे शेरशाह सूरी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही ओळखले जातात.
श्री कृष्णदेवराय
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१७ जानेवारी, इ. स. १४७१ | १७ ऑक्टोबर, इ. स. १५२९ | श्री कृष्णदेवराय हे मध्ययुगीन विजयनगर साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट होते. |
त्यांनी १५०९ पासून १५२९ पर्यंत २० वर्ष राज्य केले. | ||
त्यांचा काळ विजयनगर साम्राज्याचा सुवर्णकाळ मानतात, कारण साम्राज्यविस्ताराबरोबर साहित्य, कला, स्थापत्यशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात राज्याने उत्तुंग शिखर गाठले. | ||
त्यांच्या दरबारातील मंत्रिमंडळात अष्टदिग्गज प्रणाली कार्यरत होती, ज्याचा आदर्श शिवरायांसारख्या महान राजाने घेऊन त्यांच्या अष्टप्रधान मंडळात वापरला. |
सविस्तर माहिती
हरिहर I आणि बुक्का राय I यांनी दक्षिण भारतातील विजयनगर या राज्याची स्थापना केली. या प्रसिद्ध साम्राज्यावर श्री कृष्णदेवराय यांनी १५०९ ते १५२९ या कालावधीत २० वर्षे शासन केले.
त्यांच्या कारकीर्दीत राज्यात साहित्य, कला, स्थापत्य रचना इत्यादी विविध क्षेत्रात विजयनगरने शिखर गाठले.
त्या काळी, विजयनगर हे भारतातील समृद्ध ऐतिहासिक शहरांपैकी एक होते. तसेच, मंदिरांच्या उकृष्ठ वास्तुकलेसाठी विजयनगर प्रसिद्ध होते.
दक्षिण भारतातील शक्तिशाली राज्य असल्याने विजयनगर जवळजवळ तीन शतके (इसवी सन १३३६ ते १६४६ पर्यंत) परकीय आक्रमकांपासून मुक्त राहिले.
श्री कृष्णदेवराय हे विजयनगरचे सर्वात पराक्रमी सम्राट होते. त्याच्या काळात त्यांनी विजयनगरचे केवळ अस्तित्व न टिकवता त्यांनी साम्राज्यविस्तारही केला. ज्यामुळे परकीय आक्रमणकारी किंवा शेजारील राज्य त्यांच्या राज्यावर कधी वाकडी नजर टाकत नसत. त्यामुळे ते एक महान राजा तसेच महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.
महाराणा प्रताप
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
९ मे, इ. स. १५४० | १९ जानेवारी, इ. स. १५९७ | ते राजस्थानच्या मेवाड प्रांताचे महाराणा होते, ज्यांनी बादशाह अकबरच्या मुघल सेनेविरुद्ध संघर्ष करून मेवाडची स्वतंत्रता टिकवून ठेवली. |
त्यांनी इ. स. २८ फेब्रुवारी, १५७२ पासून ते इ. स. १९ जानेवारी, १५९७ पर्यंत मेवाडच्या गादीवर शासन केले. | ||
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हार न मानता मुघल राजवटीविरुद्ध संघर्ष करत मेवाडचे अस्तित्व कायम ठेवले. | ||
कित्येकदा प्रयत्न करूनदेखील अकबर ज्याच्याकडे सेनाबळ, दारुगोळा, आणि मुबलक इतर स्रोत असूनही मेवाड पूर्णतः जिंकता आला नाही. | ||
त्यांनी हल्दीघाटीची प्रसिद्ध लढाई लढली, ज्यामध्ये अपयश आल्यानंतरही गनिमी कावा युद्धतंत्राद्वारे लढा चालू ठेवला. |
सविस्तर माहिती
महाराणा प्रताप आजच्या राजस्थानमधील मेवाड या प्रांताचे राजा होते. त्यांनी मुघल बादशाह अकबरसारख्या शक्तीशाली आणि महत्त्वाकांक्षी सम्राट विरुद्ध लढा दिला.
अकबरने मेवाड त्याच्या मुघल साम्राज्याला जोडण्यासाठी संपूर्ण सामर्थ्याने प्रयत्न केले. पण महाराणा प्रताप यांना स्वतंत्रता खूप प्रिय होती, त्यामुळे सर्वस्वाचा त्याग करूनही त्यांनी मेवाडचे त्यांचे राज्य राखले.
एकीकडे स्वार्थी हेतूंसाठी साम्राज्यविस्तार करण्याची लालसा होती तर दुसरीकडे स्वतःच्या मातृभूमीला वाचवण्यासाठी असलेली निस्वार्थ भक्ती.
त्यामुळे शेवटपर्यंत, अकबरला मेवाडचे संपूर्ण साम्राज्य कधीच काबीज करता आला नाही. त्यांच्या कारकिर्दीनंतरही मुघल शासक आणि राजपूत राजांनी सुरू केलेला हा संघर्ष शेवटी दक्खनच्या मराठा साम्राज्याने चालू ठेवला.
छत्रपती शिवाजी महाराज
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१९ फेब्रुवारी, इ. स. १६३० | ३ एप्रिल, इ. स. १६८० | यांनी स्वराज्याची स्थापना करून मराठा साम्राज्याचा पाया घातला. |
भारतात त्यांना स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखतात. | ||
त्यांनी मुघल, आदिलशाह, निजामशाह, जंजिर्याचे सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या प्रबळ सत्तांविरुद्ध लढा दिला. |
सविस्तर माहिती
राज्याच्या चारी बाजूंना शत्रूचा वेढा अशा प्रतिकूल स्थितीत त्यांनी केवळ स्वराज्यस्थापनाच नव्हे, तर मराठा राज्याचा दक्षिणेस राज्यविस्तारही केला.
शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखले आणि त्यावर ताबा मिळवून त्यांना आसपासच्या प्रदेशावर शासन करणे सोईस्कर झाले. ते त्यांच्या अद्वितीय प्रशासनासाठी, गनिमी युद्धाचे तंत्रासाठी आणि दूरदृष्टीसाठी ओळखले जाते.
त्यांनी भारतात पहिल्यांदा स्वराज्याची संकल्पना मांडून स्वराज्यस्थापना केली. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन काळातील आदर्श शासकाबरोबर भारताचे पराक्रमी स्वातंत्र्यसैनिक म्हटले तर वावगे ठरणार नाही.
छत्रपती संभाजी महाराज
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१४ मे, इ. स. १६५७ | ११ मार्च, इ. स. १६८९ | त्यांना स्वराज्याचे म्हणजेच मराठा राज्याचे दुसरे महान आणि पराक्रमी राजा म्हणून ओळखतात. |
मुघल, सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यांसारख्या सर्व शत्रूंना सळो की पळो करून सोडले. | ||
त्यांनी ९ वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत अनेक युद्धे लढली. | ||
अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर करण्यास नकार दिला, ज्यामुळे भारतीय हिंदू लोक त्यांना “धर्मवीर” म्हणून ओळखतात. |
सविस्तर माहिती
शिवरायांच्या अकाल मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली.
मुख्य म्हणजे औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज अशा सर्व परकीय आक्रमणकाऱ्यांबरोबर युद्ध करून त्यांना ठिकाण्यावर आणले. त्यानंतर, संभाजी महाराजांची दक्षिण मोहीम खूप यशस्वी झाली.
पण दुर्दैवाने संगमेश्वर येथे एका गुप्त भेटीची खबर मुघलांना लागते आणि ते मुघलांच्या ताब्यात जातात.
औरंगजेबाच्या हुकूमावर त्यांची शारीरिक यातना देऊन अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांची कारकीर्द लहान असली तरी त्याचे कार्य विलक्षण होते.
त्यांची हत्या करण्यापूर्वी काही अटींपैकी औरंगझेबाची एक अट होती, ती म्हणजे संभाजी राजांनी धर्मपरिवर्तन करून मुस्लिम धर्म स्वीकारावा.
त्यामुळे त्यांना केवळ भारतीय स्वातंत्र्यसैनिकच म्हणून नव्हे, तर त्याबरोबर त्यांना हिंदू धर्माचे रक्षकही म्हणूनही ओळखतात. त्यामुळे ते धर्मवीर संभाजी महाराज अशा नावानेही प्रसिद्ध आहेत.
छत्रपती शाहू महाराज
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१८ मे, इ. स. १६८२ | १५ डिसेंबर, इ. स. १७४९ | मुघलांच्या नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर, त्यांनी ताराराणींविरुद्ध युद्ध करून साताऱ्याची गादी मिळवली. |
यांच्या काळात मराठा राज्याचे दोन अधीकृत राज्य झाले. पहिले साताऱ्याचे राज्य ज्यावर शाहू महाराजांचे अधिपत्त्य होते, तर दुसरे राज्य होते ते कोल्हापूरचे राज्य ज्यावर ताराराणींचा मुलगा शिवाजी दुसरा यांचे शासन होते. | ||
लोक साताऱ्याच्या शाहू महाराजांना त्यांच्या राजनीतिकौशल, अचूक निर्णयक्षमता, आणि प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी ओळखतात. |
सविस्तर माहिती
छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रशासकीय कारभारात पेशवाई पद्धत चांगली रुजली होती. त्यामुळे सरसेनापतीला मराठा प्रशासनात पेशवा असे म्हणत.
पेशवाईची सुरुवात शाहूराजांच्या काळात झाली. त्याआधी म्हणजेच शिवराय आणि संभाजीराजांच्या कारकिर्दीत सेना ही सेनापतींच्या ताब्यात असे.
जरी लढाईमध्ये स्वतः राजे क्वचितच भाग घेत, परुंतु संभाजीराजांपर्यंत रणनीती आणि योजना आखण्यासाठी बहुतांश वेळा छत्रपती स्वतः तेथे उपस्थित असत.
शाहू महाराजांचे बालपण आणि युवावस्था मुघल छावणीत गेली. त्यामुळे, त्यांचा संबंध थेट उत्तर भारतीय आणि मुघलांच्या राहणीमानाशी आला. ज्यामुळे त्यांच्या राजणीमानातही काही प्रमाणात विलासिनता आली आणि कष्टाची सवय कमी झाली.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर, सातारा गादीवरचा हक्क परत मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला ज्यामध्ये त्यांना यशही आले.
त्यामुळे, शाहू महाराजांच्या काळात त्यांनी युद्धसंबंधित सर्व योजनेची जबाबदारी पेशव्यांकडे सोपवली. साताऱ्याची गादी मिळवण्यात मदत केलेले व्यक्ती म्हणजेच बालाजी विश्वनाथांना त्यांनी पेशवा बनवले.
पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या आकस्मिक मृत्यूने सक्षम सेनापती निवडण्याचा प्रश्न निर्माण झाला. ज्यामुळे साहजिकच शाहू महाराजांनी दुसऱ्या सक्षम पेशव्यांची नियुक्ती केली, ज्यांचे नाव होते पेशवा बाजीराव.
पेशवा बाजीराव पहिले यांना मराठा पेशवा म्हणून नियुक्त केल्यानंतर मराठा राज्याचा विस्तार सुरू झाला. त्यांच्या प्रतिभाशाली सैन्यनेतृत्वामुळे, महत्त्वाकांक्षी मानसिकता आणि चपळ निर्णयक्षमता आणि मदतीने त्यांनी जवळपास भारताच्या निम्यापेक्षा जास्त प्रदेशावर अधिपत्य मिळवले.
आधुनिक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची यादी
या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीमध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीविरोधात लढलेल्यांचा समावेश आहे. भारतला स्वातंत्र्य मिळण्यामागे असंख्य भारतीयांच्या बलिदानांचा हात आहे. ब्रिटिशविरोधी आंदोलनात भारतीयांवर लाठीमार व्हायचा, तर काहींना त्यानंतर कारावास, काळ्यापाण्याची शिक्षा, तर काहींनी फाशीची शिक्षा केली जात होती.
अशा प्रत्येक भारतीय माझ्या नजरेत स्वातंत्र्यसैनिक आहे. परंतु या यादीमध्ये अशा आधुनिक स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश केला आहे, ज्यांनी हजारो-लाखो भारतीयांना स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्यासाठी प्रेरित केले.
तात्या टोपे
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१६ फेब्रुवारी, इ. स. १८१४ | १८ एप्रिल, इ. स. १८५९ | इ. स. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी सरसेनापतीचा कार्यभार सांभाळला. |
| | नानासाहेब II आणि राणी लक्ष्मीबाईंचे ते जवळचे मित्र आणि सहकारी होते. |
| | त्यांनी स्वतः सेनेला प्रशिक्षित करून ब्रिटिशविरोधी बंड पुकारले. |
सविस्तर माहिती
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात तात्या टोपे यांचे योगदान अतुलनीय होते. १८५७ च्या उठावात त्यांनी भारतीय सैन्याचे सरसेनापती म्हणून नेतृत्व केले.
तात्या टोपे यांनी प्रभावशाली नेतृत्व कौशल्याने युद्धात त्यांनी ब्रिटीश जनरल विंडहॅमला माघार घ्यायला भाग पाडले. तसेच झाशीला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी त्यांनी राणी लक्ष्मीबाईंना मदत केली, परंतु त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला.
इंग्रजांनी झाशी काबीज केल्यानंतर तात्या टोपे यांनी लक्ष्मीबाईंना ग्वाल्हेरचा किल्ला काबीज करण्यास मदत केली. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी हजारो भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे नेतृत्व केले.
भलेही त्यांच्या प्रयत्नांनी लगेच भारत स्वतंत्र झाला नाही, परंतु त्यांनी केलेले हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. या युद्धानंतर, १८५७ च्या लढाईतील सर्व सहभागींच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून अनेक भारतीयांनी प्रेरणा घेतली. तसेच त्यांना हार न मानता त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाली.
नाना साहेब II
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. १९ मे १८२४ | इ. स. २४ सप्टेंबर, १८५९ | कानपूरमधील आंदोलनात त्यांनी २०,००० सैनिकांचे नेतृत्व केले ज्यामध्ये त्यांना यशही मिळाले. |
| | इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. |
सविस्तर माहिती
नाना साहेब II हे शेवटचे पेशवा बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र असल्याकारणाने ब्रिटिश सरकार त्यांना पेशवा मानण्यापासून नाकारते. याचा परिणाम म्हणून त्यांची पेंशन इंग्रज सरकार बंद करते. ज्यामुळे नाना साहेब II हे स्वातंत्र्यसंग्रामात पडतात.
कानपूरमधील लढ्याचे त्यांनी नेतृत्व केले, ज्यामध्ये ब्रिटिश सैन्याच्या पराभवाने क्रांतिकारकांना स्वातंत्र्याची नवी उमेद मिळाली.
कानपूरमधील या उठावात त्यांनी जवळपास २०,००० सैनिकांचे नेतृत्व केले. त्यामुळे ते १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील ते महत्वाचे भारतीय नेते होते.
राजर्षी शाहू महाराज
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
२६ जून, इ. स. १८७४ | ६ मे, इ. स. १९२२ | ते कोल्हापूर प्रांताचे एक राजा होते. पण त्यापेक्षा ते एक महान समाजसुधारक होते ज्यांनी जनतेचे कष्ट दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. |
| | धरणे बांधणे, औद्योगिक क्षेत्राचा विकास, कला-क्रीडा क्षेत्रातील विकास यांसारखी अनेक कामे त्यांनी केली. |
| | त्यांनी साक्षरतेचे प्रमाण वाढावे यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. त्याचबरोबर त्यांनी दलितांना आरक्षण दिले. |
| | त्यांनी अनेक समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी यांना मदत केली. तसेच त्यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांना मदत करून आश्रयही दिला. |
सविस्तर माहिती
महाराष्ट्रातील कोल्हापूर प्रांताचे राजा म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते. भारतात त्यांच्या कारकिर्दीत ब्रिटीशांचे राज्य होते.
कृषीमधील पाणीपुरवठा व्यवस्थितरीत्या व्हावा म्हणून त्यांनी राधानगरी धरण बांधले. शाहूजी महाराजांनी औद्योगिक क्षेत्रचा तसेच कला आणि क्रीडा क्षेत्राचा विकास केला.
परकीय ब्रिटिशांचे भारतावर शासन असताना ते एक महान सामाजिक कार्यकर्ते आणि छत्रपती होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या अनेक समाजसुधारकांना त्यांनी मदत केली. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मर्यादित प्रशासकीय अधिकार असताना अनेक सामाजिक सुधारणा केल्या.
त्यांनी पहिल्यांदा दलितांना आरक्षण देण्याच्या सनदी काढल्या. तसेच त्यांनी मुलांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, ज्यामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढले. त्यांनी केलेले कार्य जरी थेट स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित नसले, तरी विपरीत परिस्थितीत समाजसुधारणा करणे एक स्वातंत्र्यलढ्यापेक्षा कमी नाही. ज्यामुळे असंख्य भारतीयांचे जीवन सुधारण्यास मदत झाली.
कुंवर सिंग
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१३ नोव्हेंबर, इ. स. १७७७ | २६ एप्रिल, इ. स. १८५८ | सुमारे ८० वर्षाचे असताना वयाची पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला आणि सैन्यदलाचे नेतृत्व केले. |
| | त्यांनी गनिमी कावा युद्धतंत्राद्वारे कॅप्टन ले ग्रॅन्डच्या सैन्याला माघार घ्यायला भाग पाडले. |
सविस्तर माहिती
यांनी भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व केले होते. ते सर्वात वृद्ध भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते गनिमी युद्धात निपुण होते.
सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या लढ्यात त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले, तेव्हा त्यांचे वय सुमारे ८० वर्षे होते. कुंवर सिंग हे त्यांच्या अदम्य साहस आणि शौर्यासाठी ओळखले जात होते.
आपल्या प्रिय मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. कुंवर सिंगने ब्रिटिश कॅप्टन ले ग्रॅन्डच्या सैन्याचा पराभवही केला होता.
बाळ गंगाधर टिळक
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
२३ जुलै, इ. स. १८५६ | १ ऑगस्ट, इ. स. १९२० | भारतीयांनी त्यांना लोकप्रिय नेता मानले ज्यामुळे त्यांना “लोकमान्य” म्हणून संबोधले जात. |
| | शिवरायांच्या विचारांना जागृत करत त्यांनी स्वराज्याचे बीज पुन्हा भारतीयांच्यात रुजवले. |
| | मराठीमधील केसरी तर इंग्रजीमधील मराठा हे इंग्रजी वृत्तपत्रे त्यांनी सुरु करून ब्रिटिश सरकारच्या अन्यायी शासनावर टीका करून जनजागृती केली. |
| | लाल-बाल-पाल यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तीन आधारस्तंभ मानले जात, त्यामधील बाल म्हणजे लोकमान्य टिळक होते. |
सविस्तर माहिती
टिळकांनी त्यांच्या स्वराज्याच्या विचारांद्वारे लोकांना प्रभावित केले आणि काही काळातच ते लोकांमधील प्रिय नेते बनले. ज्यामुळे त्यांना लोकमान्य म्हणून ओळखले जाऊ लागले.
बाळ गंगाधर टिळक यांचा समावेश मवाळ गटामध्ये केला जातो. कारण जरी थेट इंग्रज सरकारविरोधात त्यांच्या वृत्तपत्राद्वारे त्यांनी टीका केली असली, तरी त्यांनी कधीही हिंसक आंदोलन अथवा कार्यांमध्ये भाग घेतला नाही.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!”
अशी गर्जना त्यांनी केली. त्यांनी अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांबरोबर मिळून लढा दिला. टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते.
ते लहानपणापासूनच त्यांच्या बंडखोर स्वभावासाठी ओळखले जात होते. कुणावर झालेला अन्याय त्यांना सहन होत नसे. इंग्रजांद्वारे भारतीयांवर होणारा अन्यायही त्यांना अजिबात सहन होत नसे.
त्यामुळे या अन्यायी शासनाविरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी इ. स. १८८१ मध्ये केसरी हे मराठी आणि इ. स. १८८९ मध्ये मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले.
त्यांच्या मते, इंग्रज बहुतांश भारतीयांना अशिक्षित ठेवून त्यांच्यावर शासन करू इच्छित आहे. त्यामुळे उठावाचा भाग म्हणून त्यांनी नवीन शाळा सुरू केल्या. लाल-बाल-पाल हे स्वातंत्र्यलढ्यातील तीन स्तंभ मानले जात होते. या स्तंभात “बाल” म्हणून गंगाधर टिळकांना ओळखले जात होते.
वीरपांडिया कट्टबोमन
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
जानेवारी, इ. स. १७६० | १६ ऑक्टोबर, इ. स. १७९९ | तो ब्रिटिशविरोधी लढ्यातील त्यांना एक शक्तिशाली पोलिगर मानले जात. |
| | पंचलंकुरीची गावाचे ते पोलिगर होते. |
| | इट्टप्पान या पुदुकोट्टाईच्या राजाने विश्वासघात करून त्यांना इंग्रजांच्या होती पकडून दिले. |
| | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पंचलंकुरीचीच्या किल्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. |
सविस्तर माहिती
थुथुकुडी जिल्ह्याजवळील ओट्टापीदरम तालुक्याजवळील पंचलंकुरीची या गावाचे ते पोलिगर होते. याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता.
राजकंबलम नायककर या जातीचे लोक मेंढपाळ होते. कम्मावार आणि रेडीज यांना वडुगन समुदाय म्हणूनही ओळखले जात. या तिन्ही समुदायाचे ते सदस्य होते.
ब्रिटिशविरोधी कार्यामध्ये व्यस्थ असताना पुदुकोट्टाईचे राजा इट्टप्पान याने धोका देऊन त्यांना इंग्रज पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर १६ ऑक्टोबर १७९९ मध्ये कायथरू येथे त्यांना सार्वजनिक फाशी देण्यात आली.
त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी ज्यांचे नाव होते सुब्रमण्य पिल्लई यांनाही फाशीची शिक्षा झाली. सौंदरा पांडियन यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांचीही निघृण हत्या केली. तर ओमैदुराई यांना कारावासात टाकले.
सध्या पंचलंकुरीची किल्ल्याची सुरक्षा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग करत आहे. १६ मे, इ. स. १९५९ मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित बीओग्राफी चित्रपटही प्रदर्शित झाला ज्याचे नाव होते “वीरपांडिया कट्टबोमन.”
मंगल पांडे
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१९ जुलै, इ. स. १८२७ | ८ एप्रिल, इ. स. १८५७ | ते १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजविरोधी संतप्त सेनानी होते ज्यामुळे त्यांनी सरकारविरोधी क्रांतिकारी कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. |
| | इंग्रज सेनेतील धार्मिक तडजोडीबाबतीत झालेल्या घटनेनंतर त्यांनी इंग्रजविरोधी कार्यात भाग घ्यायला सुरूवात केली. |
| | त्यांच्याकडून अनेक भारतीयांनी प्रेरणा घेतली, त्यांच्या फाशीच्या वेळेस त्यांच्या समर्थकांकडून चुकीच्या घटना टाळण्यासाठी त्यांना फाशी दहा दिवस आधी देण्यात आली. |
सविस्तर माहिती
स्वातंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीच्या काळातील स्वातंत्र्यसेनानींपैकी मंगल पांडे हे एक होते. १८५७ च्या लढ्यात त्यांनी खूप योगदान दिले. त्यांना जहाल गटातील क्रांतिकारक म्हणून ओळखतात.
१८५० मध्ये बराकपूरच्या चौकीत गस्तीवर असताना एन्फिल्ड रायफल आली, ज्यात काडतुसे भरताना त्यांना चावावे लागे. त्यादरम्यान अफवा पसरली की काडतुसांसाठी वापरण्यात येणारे वंगण गाय किंवा डुकराच्या चरबीचे बनले आहे.
गायचे मांस हिंदूंमध्ये तर डुकराचे मांस मुसलमानांमध्ये वर्जित आहे. ज्यामुळे इंग्रजांनी मुद्दाम काडतुसांवर अशा पदार्थांचा वापर केला, असा भ्रम सैनिकांमध्ये निर्माण झाला. धार्मिक विश्वासांविरोधी इंग्रज शासनाचे वर्तन पाहून सर्व भारतीय सैनिकांमध्ये इंग्रज शासनाविषयी मतभेद निर्माण झाले. त्यामुळे बहुतांश सैनिक नोकरी सोडून क्रांतिकारी कार्यांत भाग घेऊ लागले.
२९ मार्च, इ. स. १८५७ च्या घटनेमध्ये भारतीय सैनिकांना इंग्रज अधिकाऱ्यांविरोधात भडकावून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर त्यांच्यावर खटला चालवून त्यांना फाशी झाली.
त्यांच्या फाशीची तारीख १८ एप्रिल, इ. स. १८५७ होती. परंतु, सार्वजनिक तणावाची स्तिती निर्माण होऊन उठाव होण्याची भीती असल्याने त्यांना ८ एप्रिल म्हणजे दहा दिवस आधीच त्यांना फाशी देण्यात आली. त्यांनी सुरू केलेल्या उठावाला भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात मानली जाते.
अशफाकुल्ला खान
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
२२ ऑक्टोबर, इ. स. १९०० | १९ डिसेंबर, इ. स. १९२७ | अशफाकुल्ला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारी कार्यात भाग घेणारे क्रांतिकारक होते. |
| | त्यांनी एच. आर. ए. या संस्थेसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते काकोरी दरोड्यात सामील झाले. |
सविस्तर माहिती
भारतातील सध्याच्या उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूर येथे अशफाकुल्ला खान यांचा खैबर मुस्लिम जमातीमध्ये जन्म झाला.
इ. स. १९२४ मध्ये क्रांतिकारी जहाल विचारांच्या लोकांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. या संघटनेनुसार, इंग्रज शासनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर सशस्त्र लढा देणे आवश्यक आहे. अशफाकुल्ला खान यांनी या ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी संघटनेमध्ये भाग घेतला.
एच. आर. ए. संस्थेमध्ये क्रांतिकारी कार्यांसाठी तसेच शस्त्रे आणि दारुगोळ्यासाठी निधीची आवश्यकता होती. त्यामुळे या संस्थेमधील अध्यक्षांच्या सहमतीने काकोरी येथून ब्रिटिश सरकारच्या खजिन्यावर दरोडा टाकण्याची योजना केली.
त्यांना एक निष्ठावान क्रांतिकारी मानतात ज्यांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्यासाठीही चुकला नाही.
बिपीन चंद्र पाल
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
७ नोव्हेंबर, इ. स. १८५८ | २० मे, इ. स. १९३२ | ते एक प्रसिद्ध लेखक होते, त्यांच्या लेखनाद्वारे त्यांनी भारतातील विविध विचारांच्या, धर्माच्या, जातीच्या लोकांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले. |
ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. तसेच, त्यांना लाल-बाल-पाल या तीन स्तंभांमधील पाल म्हणून ओळखतात. | ||
त्यांनी स्वदेशी मालाला लोकांनी प्राधान्य द्यावे याकरता परदेशी मालावर बहिष्कार घातला. |
सविस्तर माहिती
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे सुरुवातीला मवाळ विचारी असले तरी इ. स. १९१९ सालापर्यंत टिळकांच्या आक्रमक विचारांनी जहाल किंवा झुंजार विचारांजवळ गेले होते.
त्यानंतरच्या काळात बिपीन चंद्र पाल यांनी राष्ट्रवादी विचारांच्या बंगाली सहकाऱ्यांशी युती केली. या सहकाऱ्यांनी मात्र महात्मा गांधींच्या विचारांवर निष्ठेविरुद्ध नाराजी व्यक्त केली.
इ. स. १९१२ ते १९२० दरम्यान त्यांच्या लेखनाद्वारे त्यांनी भारतातील विविध समुदायांमध्ये संघटन घटवून आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, इ. स. १९२० नंतर ते भारतामधील राजकारणापासून दूर राहिले, पण त्यांनी त्यांच्या लेखनाद्वारे बंगाली जर्नल्समध्ये योगदान दिले.
बिपिन चंद्र पाल हे भारताचे स्वातंत्र्यलढ्यातील लाल-बाल-पाल या तीन आधारस्तंभापैकी एक होते. त्याचप्रमाणे, पाल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यदेखील होते.
त्यांच्या महत्वाच्या कार्यांमध्ये त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घातला आणि स्वदेशी मालाला प्राधान्य दिले. त्यांच्या क्रांतिकारी विचारामुळे त्यांना क्रांतिकारी विचारांचे जनक म्हटले जाते.
चंद्रशेखर आझाद
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
२३ जुलै, इ. स. १९०६ | २७ फेब्रुवारी, इ. स. १९३१ | ते “हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक सदस्य होते. |
त्यांनी त्यांच्या जीवनात स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात १५ वर्षाचे असताना केली. | ||
एच. एस. आर. ए. मधील अनेक क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते. | ||
अल्फ्रेड पार्क मध्ये ब्रिटिश पोलिसांविरुद्ध झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले, आणि शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःचा अंत केला. |
सविस्तर माहिती
चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग आणि इतर समविचारी मित्रांसह “हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” ची पुनर्स्थापना केली. आझाद यांना स्वातंत्र्यलढमधील आक्रमक धाडसी क्रांतिकारी कामे करण्यासाठी ओळखले जात होते.
अवघ्या पंधरा वर्षाचे असताना त्यांनी गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यावेळी त्यांना तुरुंगवास झाला, त्यावेळी पोलिसांनी त्यांचे नाव आणि पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव “आझाद” आणि पत्ता “तुरुंग” असे सांगितले.
लहान वयातच त्यांच्या हाजिरजवाबीपणामुळे ब्रिटिश पोलिसांनी रागात त्यांना कोडे मारण्याची शिक्षा केली. चंद्रशेखर आझाद हे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाक उल्ला यांचे जवळचे मार्गदर्शक होते. अल्फ्रेड पार्क येथे इंग्रज पोलिसांशी झालेल्या चकमकीत आझाद गंभीर जखमी झाले.
चकमकीदरम्यान त्यांनी काही पोलिसांना ठार केले. परंतु, पोलिसांची संख्या जास्त होती आणि काडतुसे संपल्याने त्यांनी शेवटच्या गोळीने स्वतःचा अंत केला. त्यांच्या एच. एस. आर. ए. संघटनेत कार्यरत असताना त्यांनी ब्रिटीश पोलिसांच्या हाती कधीही पडणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली होती.
त्यांनी त्यांची ती शपथ शेवटपर्यंत पाळली. त्यामुळे त्यांना निभिड आणि धाडसी भारतीय क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाते.
हकीम अजमल खान
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
११ फेब्रुवारी, इ. स. १८६८ | २० डिसेंबर, इ. स. १९२७ | भारतातील विख्यात चिकित्सकांबरोबर ते देशभक्त, राजकारणीदेखील होते. |
प्राचीन आयुर्वेदिक आणि युनानी वैद्यकीय प्रणालीचे जतन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. | ||
त्यांनी हिंदुस्थानी दवाखाना नावाची संस्था, महिलांसाठीचे युनानी मेडिकल स्कूल, तसेच आयुर्वेदिक आणि युनानी टिबिया महाविद्यालयाची स्थापना केली. | ||
खिलाफत चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. |
सविस्तर माहिती
अजमल खान यांना इ. स. १८६४ मध्ये युनानी पद्धतीच्या भारतीय विद्वान आणि चिकित्सकांमध्ये अतिशय महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जाते. प्रतिष्ठित चिकित्सकाबरोबर ते एक उत्तम साहित्यिक, देशभक्त आणि राजकारणी होते. ते एक मानवतावादी होते आणि त्यांनी नेहमी देशामधील लोकशाहीला प्राधान्य दिले.
इंग्रजांनी प्राचीन आयुर्वेद आणि युनानी वैद्यकीय प्रणालीवर गंभीर आघात केले. अशा वेळी हिंदुस्तानामध्ये जुन्या वैद्यकीय प्रणालींपैकी आयुर्वेद आणि युनानी टिब्ज यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरीफ खान यांनी प्रयत्न केले. ज्यामुळे त्यांचे घराणे दिल्लीमध्ये शरीफ खान घराणे म्हणून प्रसिद्ध आहे.
इ. स. १९०५ मध्ये आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीने जडी-बुटींद्वारे औषधे तयार करण्यासाठी दिल्लीमध्ये त्यांनी “हिंदुस्थानी दवाखाना” संस्थेची स्थापना केली. त्यानंतर इ. स. १९११ मध्ये, हकीम अजमल खान यांनी “मदरसा तिब्बिया निस्वान” (ज्याला मदरसा तिब्बिया निस्वान वा कबलात असेही म्हटले जाते) ची स्थापना केली, ज्याचे भाषांतर महिलांसाठीचे युनानी मेडिकल स्कूल असे केले जाते.
त्यानंतर त्यांनी दिल्लीत आयुर्वेदिक आणि युनानी टिबिया महाविद्यालय स्थापित केले. या त्यांच्या स्वप्नातील महाविद्यालयाचे उदघाटन १३ फेब्रुवारी, इ. स. १९२१ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते करण्यात आले.
अली ब्रदर्स, अॅनी बेझंट, लाला लजपत राय, स्वामी शरदानंद, मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी यांसारख्या प्रख्यात राष्ट्रीय नेत्यांच्या सहवासात त्यांनी काम केले. ते राष्ट्रीय पातळीवर हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक बनले. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रियपणे भाग घेतला.
चित्तरंजन दास
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
५ नोव्हेंबर, इ. स. १८७० | १६ जून, इ. स. १९२५ | त्यांनी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षेतून मुक्ती दिली त्यामुळे त्यांना देशबंधू असेही संबोधतात. |
असहकार आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना इ. स. १९२१ मध्ये सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला. | ||
इ. स. १९२२ त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले. |
सविस्तर माहिती
नागरी सेवा स्पर्धात्मक परीक्षेकरिता काही काळ प्रयत्न केल्यानंतर त्यांनी कायदेशीर व्यवसायात प्रवेश केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिकांचा बचाव केला.
सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केले होते. ते त्यांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे सुभाषचंद्र बोस आणि चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणतात.
अरविंद घोष यांना त्यांच्यावरील ब्रिटिश फौजदारी गुन्ह्यातून बाहेर काढण्याची गरज होती. या प्रकरणात घोष यांचा बचाव करण्याचे श्रेय चित्तरंजन दास यांना जाते.
इंग्रजांच्या पाश्चात्य विचारांवर आधारित आर्थिक विकासाला त्यांनी नकार दिला. प्राचीन भारतीय खेडेगावचे राहणीमान त्यांना भावले आणि त्यांच्या मते तो काळ भारतासाठी सुवर्णकाळ होता.
गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा देताना त्यांनी इ. स. १९२१ मध्ये इंग्रजांनी त्यांना राजकीय गुन्हेगार म्हणून ६ महिने कारावासाची शिक्षा दिली.
इ. स. १९२२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर पक्षाने प्रांतीय परिषदांच्या वसाहत प्रायोजित निवडणुका बंद करण्यासाठीचे प्रयत्न सोडून दिले. त्याऐवजी, सर्व पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी सरकारी पदे मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले, जेणेकरून त्यांना अंतर्गत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करता येऊ शकेल.
सिद्धू मुर्मू आणि कान्हू मुर्मू
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
इ. स. १८१५ | ३० जानेवारी, इ. स. १८५६ | यांनीच इ. स. १८५७ च्या उठावात झारखंडमधील झालेल्या या संताळ चळवळीचे नेतृत्व केले होते. |
या चळवळीत सुमारे १०,००० संताळ लोक सामील झाले. | ||
सिद्धू आणि कान्हू यांना पकडण्यासाठी त्यावेळेस ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. | ||
काही अंशी संताळ चळवळ ही यशस्वी मनाली जाते. |
सविस्तर माहिती
प्रादेशिक राजवंशाचे शासन असलेल्या झारखंडमध्ये इंग्रज सेनेने इ. स. १७६७ मध्ये प्रवेश करून सिंगभूममधील कोल्हान प्रदेश काबीज केला. याआधी येथे रामगढ राज्य पलामूचे चेरो राजवंश, छोटानागपूर खासचे नाग राजवंश, मानभूमचे मानव घराणे, सिंहभूमचे सिंह राजवंश, पंचेत राज्य अशा राजवंशांचे शासन होते.
हा भाग काबीज केल्यावर ब्रिटीश वसाहतवादी प्रशासन आणि स्थानिक जमीनदार संताळ लोकांच्या वडिलोपार्जित जमिनींवर उत्तरोत्तर अतिक्रमण करत होते. आदिवासी समुदायांना या जमिनींवर कठोर आणि शोषणाच्या परिस्थितीत मजूर म्हणून काम करण्यास भाग पाडले गेले. ज्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.
इ. स. १८५५-५६ दरम्यान झालेल्या बंडात झारखंडच्या संताळ गटाने मोठे काम केले होते. सिद्धू मुर्मू, कान्हू मुर्मू तसेच त्यांचे भाऊ चंद आणि भैरव यांनी ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध केलेल्या या बंडात सुमारे १०,००० संताळ लोकांचे नेतृत्व केले होते. १८५७ च्या उठावातील संताळ चळवळ ही एक यशस्वी चळवळ मानली जाते.
सिद्धू आणि कान्हू यांनी इंग्रज पोलिसांची अक्षरशः झोप उडवली होते. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने सुमारे रु.५,००० चे बक्षीस जाहीर केले होते. यावरून, हे क्रांतिकारी इंग्रजांसाठी किती घातक होते हे दिसून येते.
हे बंड पूर्व भारतातील सध्याच्या झारखंड आणि बंगाल येथील पुरुलिया, बिरभूम आणि बांकुरा या ठिकाणी झाले होते. इंग्रज सरकारला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात या क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
बिरसा मुंडा
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१५ नोव्हेंबर, इ. स. १८७५ | ९ जून, इ. स. १९०० | भारतीयांच्या धार्मिक श्रद्धा चळवळींमध्ये उपयोगी पडू शकतात हे त्यांनी ओळखले. |
| | त्यांच्या समुदायातील संस्कृती, नृत्य, संगीत आत्मसात करीत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. |
| | इंग्रज सरकार आदिवासींना तुच्छ वागणूक देत ज्यामुळे त्यांनी त्याविरोधी आंदोलनात भाग घेऊन कडक निषेध केला. |
सविस्तर माहिती
झारखंडच्या रांची जिल्ह्यातील उलिहाटू गावात त्यांचा जन्म झाला. ते आदिवासी लोकांचे प्रख्यात नेते आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे वडील, सुगना मुंडा धार्मिक नेते होते, तर आई, कर्मी हातू गृहिणी होत्या.
प्रदेशातील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायातील मुंडा जमातीतून असल्याने त्यांच्याशी त्यांची मुळे खोलवर रुजले होते. लहानपणापासून, ते त्यांच्या समाजाच्या विविध चालीरीती आणि परंपरेतून ते प्रेरणा घेत.
त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांनी स्वतः मुंडा भाषा, नृत्य, संगीत शिकले. त्यांच्या समुदायातील समृद्ध सांस्कृतिक प्रदर्शनामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
त्यांच्या जमातीतील चालीरीती आणि परंपरांचा अवलंब केल्याने त्यांच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम झाला. कारण, त्यांच्यामधील प्रत्येक व्यक्ती सुख-दुःखात सामान रूपाने सहभागी व्हायचे. आदिवासींच्या सांप्रदायिक जीवनपद्धतीने ते प्रभावित झाले.
त्यांनी आदिवासी लोकांविषयी ब्रिटिशांच्या अन्यायकारक वागणुकीमुळे त्याविरोधी अनेक आंदोलनात भाग घेऊन त्याचा कडक विरोध केला.
सूर्य सेन
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
२२ मार्च, इ. स. १८९४ | १२ जानेवारी, इ. स. १९३४ | त्यांनी असहकार आंदोलनात भाग घेतला तसेच इतर क्रांतिकारी कार्यांमुळे त्यांना २ वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली. |
| | क्रांतिकारकांकडून केलेल्या चितगाव शस्त्रागार हल्ल्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. |
| | जलालाबाद हिल्सजवळील क्रांतिकारकांच्या तुकडीमध्ये आणि इंग्रज भारतीय सेनेच्या तुकडीमधील झालेल्या हिंसक चकमकीत बारा क्रांतिकारक धारातीर्थी पडले आणि क्रांतिकारकांची मोठी तुकडी पकडली गेली. |
सविस्तर माहिती
मास्टरदा म्हणून ओळखले जाणारे सूर सेन यांचे पूर्ण नाव सूर्य कुमार सेन होते. त्यांचा जन्म २२ मार्च, १८९४ रोजी चट्टोग्राम जिह्यातील राउझन उपजिल्हामधील चितगावमधील एका बैद्य कुटुंबात झाला. इंग्रजांविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी बहुमोल भूमिका बजावली.
गांधीजींच्या असहकार चळवळीत सूर्य सेन यांनी भाग घेतला. त्यानंतर ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कार्यांत भाग घेतल्याने त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला. त्यांनी चितगाव शस्त्रागार हल्ल्यामध्ये एका पक्षाचे १८ एप्रिल, इ. स. १९३० रोजी नेतृत्व केले होते. या हल्ल्यामध्ये पोलीस आणि सहाय्यक दल शस्त्रागारावर क्रांतिकारकांनी धाबा बोलला.
त्यांच्या मते,
“मानवतावाद हा क्रांतिकारकाचा एक विशिष्ट गुण आहे.”
शहरातील पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि शस्त्रे चोरणे असा या आंदोलनाचा उद्देश होता. परंतु, हा हल्ला पूर्णतः अयशस्वी ठरला, कारण क्रांतीकारकांना शस्त्रे काबीज करता आली नाहीत.
याउलट, काहीच दिवसांत इंग्रज भारतीय सैन्यामधील एका तुकडीबरोबर जलालाबाद हिल्सच्या शेजारी झालेल्या चकमकीत या कार्यांत सहभागी क्रांतिकारकांच्या बाराला जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये बंडखोरांच्या मोठ्या गटाला पकडण्यात आले.
आसपासच्या गावांमध्ये लपून यानंतरही सूर्य सेन आणि इतर क्रांतिकारकांनी सरकारी लोकांवर आणि मालमत्तेवर छापे टाकणे सुरु ठेवले. १६ फेब्रुवारी, इ. स. १९३३ रोजी त्यांना अखेर इंग्रज पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर, १२ जानेवारी, इ. स. १९३४ या दिवशी त्यांनी फाशी देण्यात आली. त्यांच्याबरोबर पकडण्यात आलेल्या इतर क्रांतीकारकांना दीर्घकाळ कारावासाची शिक्षा दिली गेली.
सुब्रमण्यम भारती
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
११ डिसेंबर, इ. स. १८८२ | १२ सप्टेंबर, इ. स. १९२१ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे इंग्रज सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या गटात ते सामील होते. |
| | त्यांनी बराच काळ स्वदेशमित्र या तमिळ दैनिकांत काम केले. त्यांनी भारतीय साहित्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या लिखाणात देशप्रेमाची भावना दिसते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली होती. |
| | त्यांच्या क्रांतिकारी कार्यांमुळे त्यांना १९०८ मध्ये ब्रिटिश सरकारने सुब्रमण्यम भारती यांचे अटकेचे वॉरंट जारी केले. ज्यामुळे त्यांना पाँडिचेरी येथे शरण घ्यावि लागली. तेथून त्यांनी पुढील क्रांतिकारी उपक्रम चालू ठेवले. |
सविस्तर माहिती
हे एक तमिळ ब्राम्हण कुटुंबातील होते. इ. स. १९०४ मध्ये त्यांनी मद्रास (सध्याचे चेन्नई) मध्ये शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी तमिळ भाषेत मासिकांसाठी इंग्रजी अनुवादन केले. त्यानंतर स्वदेशमित्र या तमिळ दैनिकांमध्ये काम केले.
राजकीय क्षेत्रातील त्यांच्या सहभागामुळे त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सशस्त्र आंदोलन करणाऱ्या ब्रिटिशांविरोधी गटातही ते सामील होते. ज्यामुळे त्यांना पाँडिचेरी (आता पुडुचेरी) मधील एका फ्रेंच वसाहतीत शरण घ्यावी लागली. तेथे त्यांनी १९१० ते १९१९ दरम्यान जवळपास ९ वर्षे वनवासात काढले.
त्यांनी या काळात रचलेल्या कविता आणि निबंध भारतात लोकप्रिय ठरले. १९१९ मध्ये परतल्यानंतर त्यांना इंग्रज पोलिसांनी त्यांना कारावासात टाकले, त्यानंतर परत ते स्वदेशमित्र दैनिकासाठी कामावर रुजू झाले. इ. स. १९२१ मध्ये मद्रासच्या मंदिरात हत्तींनी त्यांना जबर जखमी केले आणि त्यामुळे त्यांचे दुःखद निधन झाले.
दादाभाई नौरोजी
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
४ सप्टेंबर, इ. स. १८२५ | ३० जून, इ. स. १९१७ | १८९२ मध्ये, ते लंडन येथील सेंट्रल फिन्सबरी संसदेतून आमदार म्हणून निवडून आले. |
| | भारतातील गरिबीला कारणीभूत ब्रिटिश सरकारचे प्रशासन त्याबरोबर त्यांचे परिणाम, शासनाद्वारे लादलेले कर आणि भारतीय संपत्तीचे इंग्लंडला होणारे हस्तांतरण यावर त्यांनी मत मांडले लोकांपर्यंत पोचवले. |
| | त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लेख आणि पुस्तके लिहिले. |
सविस्तर माहिती
त्यानंतर इसवी सन १८९२ मध्ये लंडनमधील लिबरल पार्टी मधून ते सेंट्रल फिन्सबरी येथील संसदेसाठी निवडून आले. यामुळे ते पहिले ब्रिटिश भारतीय एम.पी. (आमदार) झाले. इंग्रज प्रशासनामुळे भारतामधील झालेले प्रतिकूल आर्थिक परिणाम त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. ज्यामुळे त्यांना भारतीयांमध्ये प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर इ. स. १८९५ मध्ये त्यांना भारतीय खर्चावर इंग्रज शासनाने बसवलेल्या शाही आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या झालेल्या वार्षिक अधिवेशनांमध्ये इ. स. १८८६, १८९३, आणि १९०६ साली असे तीनदा अध्यक्ष पद भूषवले. याच पक्षाने भारतामधील राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले.
इ. स. १९०६ मधील अधिवेशनात काँग्रेस पक्षातील झालेली जहाल आणि मावळ गटातील फूट पुढे ढकलण्यामध्ये त्यांचे राजकारणातील डावपेच कामाला आले. त्यांच्या अनेक लेखांत, भाषणात आणि “भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट” या त्यांच्या पुस्तकात त्यांनी भारतावरील आकारण्यात येणारे अवास्तव कर आणि भारतातील संपत्ती कशाप्रकारे इंग्लंडला हस्तांतरित होते, याविषयीचे त्यांचे मत मांडले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू
थोडक्यात माहिती
जन्म | मृत्यू | विशेष कामगिरी |
---|---|---|
१४ नोव्हेंबर, इ. स. १८८९ | २७ मे, इ. स. १९६४ | इ. स. १९२० मध्ये जवाहरलाल नेहरूंनी प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात पहिल्यांदा किसान मार्च काढला. |
| | ब्रुसेल्समधील उत्पीडित राष्ट्रीयत्वांच्या काँग्रेसमध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. |
| | इ. स. १९२३ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये ते सरचिटणीस बनले. |
| | त्यांनी इ. स. १९२६ मध्ये इंग्लंड, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, आणि रशिया दौरे केले. |
| | मुंबईला झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात नेहरूंनी भारत छोडो ठराव मांडला. |
सविस्तर माहिती
त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर, इ. स. १८८९ रोजी अल्लाबहाड या ठिकाणी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घरीच पूर्ण केले. इ. स. १८८६ साली झालेल्या संसदेच्या निवडणुकीसाठी ते उभे राहिले परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
इ. स. १९१२ च्या बंकीपुर काँग्रेस अधिवेशनात त्यांनी प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. इ. स. १९१९ च्या अलाहाबादच्या होम रुल लीग मध्ये त्यांनी काही काळ सचिव म्हणून कार्य केले.
इ. स. १९१५ मध्ये गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर, इ. स. १९१६ च्या लखनौ येथील काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा गांधीजींशी ते भेटले. तेव्हा ते गांधीजींच्या अहिंसक संघर्ष आणि सविनय कायदेभंग याविषयीच्या त्यांच्या विचारांमुळे प्रेरित झाले.
उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात त्यांनी इ. स. १९२० मध्ये पहिल्यांदा किसान मार्च काढला. त्यानंतर इ. स. १९२०-२२ दरम्यान झालेल्या असहकार आंदोलनामधील त्यांच्या सहभागामुळे त्यांना दोन वेळेस कारावास झाला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांनी ब्रुसेल्समधील उत्पीडित राष्ट्रीयत्वांच्या काँग्रेसमध्ये भाग घेतला.
सर्वपल्ली गोपाळ यांच्या “जवाहरलाल नेहरू: एक चरित्र” नुसार इ. स. १९२३ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये ते सरचिटणीस बनले. त्यांनी इंग्लंड, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, आणि रशिया या देशांमध्ये इ. स. १९२६ मध्ये दौरे केले.
इ. स. १९२७ मध्ये झालेल्या ४२व्या मद्रास काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी पक्षाला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टासाठी वचनबद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. इ स. १९२८ मध्ये झालेल्या लखनौमधील सायमन कमिशनविरोधी मोर्च्याचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला.
७ नोव्हेंबर, इ. स. १९२७ या दिवशी मॉस्कोमध्ये ऑक्टोबर समाजवादी क्रांतीतर्फे आयोजित दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ते उपस्थित होते.
नेहरू अहवालाला “मुलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचा अहवाल” असेही म्हटले जाते. या अहवालाला ब्रिटीश वसाहत काळात भारताच्या घटनात्मक सुधारणांच्या संघर्षातील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज मानतात.
हा अहवाल तयार करणार्या समितीचे अध्यक्ष त्यांचे वडील मोतीलाल नेहरू होते. ज्यामुळे अहवालाचे नाव त्यांच्या वडिलांच्या नावावरून देण्यात आले. या अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी जवाहरलाल नेहरू हे एक होते.
त्यांनी इ. स. १९२८ साली “इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग” ची स्थापना केली. या लीगने भारताबरोबरचे ब्रिटिश शासनाचे संबंध कायमचे तोडण्यासाठी समर्थन केले. या लीगचे ते अध्यक्ष होते.
इ. स. १९५६ मध्ये त्यांना ४१व्या लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. या अधिवेशनाला “लाहोरचा ठराव” किंवा “पूर्ण स्वराजाचा ठराव” म्हणूनही ओळखले जाते. लाहोर अधिवेशनात ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे, हे पक्षाचे ध्येय म्हणून स्वीकारण्यात आले.
त्यांना इ. स. १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान मिठाच्या सत्याग्रहामध्ये संबंध असल्याकारणाने अटक झाली. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतल्याकारणाने, इ. स. १९३२ मध्ये गांधीजींना कारावास झाला. त्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांना इतर अनेक नेत्यांबरोबर परत तुरुंगवास झाला.
अल्मोरा तुरुंगात असताना १४ फेब्रुवारी, इ. स. १९३५ या दिवशी त्यांनी त्यांचे आत्मचरित्र पूर्ण केले. जेलमधून सुटल्यानंतर इ. स. १९३६ मध्ये ते त्यांच्या कर्करोगाने पीडित त्यांच्या पत्नी कमला नेहरूंना भेटायला स्वित्झर्लंडला गेले.
त्यादरम्यान २८ फेब्रुवारी, १९३६ रोजी त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी त्यांनी लंडनला आणि अमेरिकेतील नेत्यांना भेट दिली. या भेटीमध्ये ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल बोलले.
ते जुलै १९३८ मध्ये स्पेन मध्ये गेले. त्यानंतर १९३९ मध्ये त्यांनी दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी चीनला भेट दिली.
या चीन दौऱ्याचे उद्देश चीनची परिस्थिती समजून घेणे, साम्राज्यवादी विरोधी चळवळींशी एकता, सहकार्यासाठी संधी शोधणे, आंतरराष्ट्रीय संपर्क तयार करणे, आणि शांततेचा प्रचार करणे हे होते.
इ. स. ३१ ऑक्टोबर, १९४० रोजी त्यांना दुसऱ्या महायुद्धात भारताच्या सक्तीच्या सहभागाचा निषेध म्हणून वैयक्तिक सत्याग्रह केल्याबद्दल अटक करण्यात आली.
वैयक्तिक सत्याग्रह ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील चळवळ होती, ज्याचा उद्देश अहिंसक दृष्टिकोन राखून विशिष्ट मुद्द्यांवर निषेध करणे हा होता. कारावास झालेल्या इतर नेत्यांबरोबर त्यांचीही डिसेंबर १९४१ मध्ये सुटका झाली.
७६ व्या बॉम्बे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात त्यांनी “भारत छोडो” ठराव मांडला.
भारतीय स्वराज्याच्या दिशेने प्रगती खुंटली होती. तसेच भारतीय हितसंबंधांचा सल्ला न घेता ब्रिटिश सरकारच्या एकतर्फी निर्णयांमुळे भारतीय नेते आणि जनतेमध्ये असंतोष वाढत होता.
परिणामी, बॉम्बे (मुंबई) अधिवेशनाच्या शेवटी भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आले. ब्रिटिशांकडे “भारत छोडो”ची मागणी करत या चळवळीने भारतातील ब्रिटीश राजवट तात्काळ संपवण्याची मागणी केली.
भारत छोडो आंदोलनाला इंग्रजांच्या तीव्र दडपशाहीचा सामना करावा लागला. या आंदोलनादरम्यान गांधी, नेहरू आणि पटेल यांच्यासह अनेक भारतीय नेत्यांना अटक करून अहमदनगर किल्ल्यावर नेण्यात आले.
ऑगस्ट १९४२ ते १९४५ पर्यंत चाललेल्या भारत छोडो आंदोलनात जवाहरलाल नेहरूंना सुमारे तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या जीवनातील ही सर्वात मोठी आणि शेवटची नजरबंदी होती.
जानेवारी १९४५ मध्ये त्यांची सुटका झाली. तेव्हा आयएनएच्या अनेक अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप होता. या अधिकाऱ्यांसाठी त्यांनी कायदेशीर संरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी मार्च १९४६ मध्ये दक्षिण पूर्व आशियाला भेट दिली.
६ जुलै १९४६ रोजी पुन्हा चौथ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते निवडून आले. त्याचप्रमाणे १९५१ पासून १९५४ पर्यंत आणखी तीन वेळा त्यांना निवडण्यात आले.