Dhirubhai Ambani Life Story In Marathi – Inspiring Tycoon

by मे 15, 2020

Hi guys, today I am going to share with you a biography of one of the famous business tycoon of India called Dhirubhai Ambani. Read Dhirubhai Ambani life dtory in Marathi specially written for marathi readers. So, let’s jump in to it and see how he was able to achieve undeniable success in business?

ओळखभारतीय उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक
जन्म२८ डिसेंबर, १९३२ मध्ये ब्रिटिश भारतात गुजरात मधील चोरवड या गावी
पत्नीकोकिळा धीरूभाई अंबानी
मुलेनीना अंबानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, दीप्ती अंबानी
पुरस्कारपद्म विभूषण (२०१६)
मृत्यू६ जुलै, २००२ साली मुंबईत

परिचय

धिरुभाई अंबानी यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे होते. ज्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ मध्ये ब्रिटिश भारतात गुजरात मधील चोरवड या गावी झाला. अत्यंत सामान्य घरातील धिरूभाईंचे वडील पेशाने शिक्षक होते. घरातील एकूण पाच भावंडांपैकी धिरुभाई अंबानी हे तिसरे होते.

Reliance company established by Dhirubhai Ambani
Image Credits: Wikistar007

धिरुभाईंनी केलेली नोकरी

१७ वर्षाचे झाल्यावर नोकरीकरता ते एडनच्या ब्रिटिश वसाहतीत स्थलांतरित झाले. जेथे आधीपासून त्यांचे बंधू कार्यरत होते. अ. बेसी & कॉ. कंपनी जी १९५० च्या दशकात सुएझच्या पूर्वेस असणारी मोठी कंपनी होती. याच कंपनीमध्ये धिरुभाई अंबानी हे क्लर्क म्हणून कार्यरत होते.

धिरूभाईंनी आत्मसात केलेली व्यावसायिक कौशल्ये

याच कंपनीत त्यांनी उद्योग धंद्यासाठी लागणारी मूलभूत कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. या कौशल्यांमध्ये त्यांनी व्यापार करण्याच्या पद्धती, कंपनीतील खात्यांविषयीची माहिती सुरक्षित ठेवणे, अशा गोष्टी शिकल्या.

धिरुभाई अंबानींच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी

सन १९५८ मध्ये भारतामध्ये परतल्या नंतर त्यांनी मुंबईमध्ये वास्तव्य केले. मुंबईत स्थायिक झाल्यानंतर मसाल्याचा व्यापार सुरु केला. धीरूभाईंच्या या व्यवसायाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
त्यानंतर, लागोपाठ त्यांनी त्यांचा व्यवसाय इतर व्यासायांबरोबर विस्तारण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यासाठी त्यांनी दर्जेदार मालाचे वितरण इतरांपेक्षा कमी नफ्यात सुरु केले. त्यामुळे, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झपाट्याने झाला.

धिरुभाई अंबानींनी व्यवसायामध्ये केलेली वृद्धी

सध्याच्या व्यवसायाची पर्याप्त वृद्धी झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष सिंथेटिक कापड व्यवसायाकडे वळवले. कापड व्यवसायात पदार्पण करण्यासाठी त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीजची स्थापना १९६६ केली.
त्यानंतर रिलायन्सचे पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज या मागे पडलेल्या उद्योगामध्ये एकीकरण आणि वेळोवेळी फेरबदल करून तिला भारतातील प्रतिष्टीत कंपनी म्हणून म्हणून नावारुपाला आणले. रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये त्यानंतर प्लॅस्टिक आणि ऊर्जा निर्मिती प्रकल्पही सामील करून घेतले.

धिरुभाई अंबानींवरील आलेले आर्थिक संकट

त्यांच्या एक यशस्वी उद्योजक होण्यापूर्वी त्यांना असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. असेच एक संकट सन १९७७ मध्ये आले. आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी त्यांनी कर्ज काढण्याचे ठरवले. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्यास साफ नकार दिला. त्यामुळे धीरूभाईंनी रिलायन्सला सार्वजनिक केले.

धिरुभाई अंबानींवर झालेले आरोप

त्यांच्या चपळ कारभारामुळे कंपनीत आर्थिक स्थिरता निर्माण होऊ लागली. त्यांच्या काही विचारांमुळे त्यांच्यावर अनेक आरोपही झाले. त्यामध्ये राजकीय फेरफार, भ्रष्टाचार आणि प्रतिस्पर्ध्यांवर छापे टाकण्याचे आरोप सामील होते.

गुंतवणूकदारांचा विश्वास

एवढा विरोध होऊनही त्यांच्या गुंतवणूकदारांचा कंपनी वरील विश्वास डगमगला नाही. त्याचे कारण म्हणजे आकर्षक लाभदर आणि धीरूभाईंची दूरदृष्टी. सरासरी गुंतवणूकदारालाही शेअर बाजाराची माहिती व्हावी या विचाराने त्यांनी वार्षिक सभा घेतल्या. कधी- कधी स्टेडियम मध्ये झालेल्या या सभेला हजारो लोकांनी येऊन प्रतिसाद दिला. या सभेचे टेलेव्हीजनवरही ब्रॉडकास्टींग करण्यात आले होते.

धिरुभाई अंबानीची निवृत्ती

सन १९८० मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचा कार्यभार त्यांची दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्याकडे सोपवून स्वतः कंपनीची देखरेख करणे पसंत केले.

धिरुभाई अंबानींचा मृत्यू

यानंतर त्यांना फेब्रुवारी १९८६ मध्ये हृदयघाताने त्यांचा उजवा हात पॅरालाईज झाला. ज्यामुळे ते जवळपास एक आठवडा कोमा मध्ये गेले.

अशा विलक्षण उद्योजकाचा मृत्यू ६ जुलै २००२ साली हृदयघाताने झाला. धिरूभाईंना आलेला हा दुसरा स्ट्रोक होता.

I hope you read the article and like it. Please feel free to share this article over social media. It encourage us to write more content.

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest