Mughal Religious Policy in Marathi | मुघल सम्राटांचे धार्मिक धोरण

by फेब्रुवारी 3, 2024

प्रस्तावना

साम्राज्याच्या इतिहासाला आकार देण्यात मुघल राजांच्या धार्मिक धोरणाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. काही सम्राटांनी सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले तर काहींनी असहिष्णुतेचे धोरण स्वीकारले. त्याचा प्रेजेवर मुघल शासकाविषयी विचार निर्माण होण्यामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम झाला.

भारतीयांच्या हृदयात नसले तरी पुस्तकात तरी असे सम्राट महान झाले.. उदाहरणार्थ, अकबराच्या मनात इतर हेतू असले होते.

परंतु सार्वजनिकरित्या अकबरने धार्मिक सहिष्णुतेचे धोरण लागू केले जे “सुलह-ए-कुल” म्हणून ओळखले जाते, ज्याचा उद्देश विविध धार्मिक समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा होता.

औरंगजेबापर्यंत राज्यकर्त्यांनी इतर धर्मांबद्दल सहिष्णुता जाहीरपणे स्वीकारली.

दुसरीकडे, औरंगजेबाच्या कारकिर्दीत गैर-मुस्लिमांवर पुन्हा जिझिया कर लादले आणि हिंदू मंदिरे नष्ट केली. त्याच्या काळात धार्मिक धोरण अधिक असहिष्णु दृष्टिकोनाकडे वळले.

मुघलांच्या धार्मिक धोरणात पुढे जाण्यापूर्वी, मुघल भारतात कशाकरता आले होते याची कारणे पाहुयात.

मुघल भारतात येण्याची कारणे

भारत या सर्वसंपन्न देशात सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक स्त्रोतांची विपुलता होती.

१. येथील जमीन सुपीक असल्याने अन्नधान्यापासून ते खनिजस्त्रोतांची चांगली उपलब्धता होती. त्यामुळे खाद्यसामग्रीपासून ते युद्धसामग्री बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व गोष्टी भारतात होत्या.

२. सर्वांगीणदृष्ट्या संपन्न भारतात अनेक संपन्न राज्य होते, त्यामुळे येथील संपत्ती लुटणे हे त्यांचे एक लक्ष्य होते. त्यांचा दीर्घकालीन हेतू सांगायचा झाला तर, भारतावर शासन करून येथे साम्राज्यविस्तार करणे हा आणखी एक उद्देश होता.

३. अल्लाउद्दीन खिल्जी, मुहम्मद बिन तुघलक, बाबर, शाह जहान, औरंगजेब यांसारख्या अनेक कट्टर मुस्लिम शासकांनी त्यांच्या कारकिर्दीत इतर धर्मियांचे इस्लाममध्ये सक्तीने धर्मांतर केले. 

४. मुस्लिम नसणारे लोकांना ते काफिर म्हणत, या कट्टरपंथी शासकांच्या मते जोपर्यंत सर्व काफिरांना (गैर मुस्लिम) मुस्लिममध्ये धर्मांतरीत करत नाहीत, तोपर्यंत हे कार्य चालू राहील.

या लेखामध्ये मी पहिले सहा प्रसिद्ध मुघल शासकांची धार्मिक धोरण आणि धार्मिक सहिष्णुतेविषयी त्यांचे विचार यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत.

१. बाबर

बाबरला हे माहित होते कि, दिल्ली हे भारतातील शक्तिशाली केंद्र आहे आणि त्यावर शासन करून भारतात सत्ता प्रस्थापित करणे सोयीस्कर आहे. त्यानंतर त्याने दक्षिण आणि पूर्व भारतात पाय पसरायला सुरुवात केली.

राज्यविस्ताराबरोबर त्याने हळूहळू उर्वरित दोन उद्देशही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. बाबरने राजपुतांशी तह करून त्यांच्याकडून नजराणे आणि ठरलेला हिस्सा घेत. संपत्ती लुटण्यातही ते सफल झाले यात काही शंका नाही.

पण तिसरा उद्देश पूर्ण करणे सोपे नव्हते. त्याला याची जाणीव होती कि जास्तीत जास्त लोकांना मुस्लिम धर्मात परिवर्तित करायचे असेल तर काहीतरी वेगळे आणि मोठे करणे जरुरी आहे. परंतु त्याच्या छोट्या चार वर्षांच्या कारकिर्दीत ते काही शक्य झाले नाही.

२. हुमायून

त्यानंतर हुमायून गादीवर आला त्याच्या कारकिर्दीत गुजरातवर कब्जा केला. त्यानंतर सुरच्या शेर शाहने चौसा येथे इ. स. १५३९ मध्ये तर कनौजच्या लढाईत इ. स. १५४० मध्ये हुमायूनला पराभूत केले. त्यामुळे त्याचे उर्वरित बहुतांश आयुष्य भटकंतीमध्येच गेले.

भगवान गणेशच्या मूर्तीचे मुघल काळात झालेला विध्वंस
उत्तर प्रदेशमधील कालिंजर किल्ल्यातील नीलकंठ मंदिरामधील भगवान गणेशच्या मूर्तीचा मुघल काळात विध्वंस झाल्याचे फक्त एक उदाहरण. या किल्ल्यात यासारखे अनेक मुर्तीं, कोरीवकाम, प्रतिमांची तोडफोड करण्यात आली होती.

मूर्तींकडे पाहिले तर आजही त्या सुस्थितीत वाटतात. त्यावरून आपण विचार करू शकता, कि तोडफोड करण्याआधी त्या किती अप्रतिम दिसत असतील. तसेच, हा विध्वंस करण्यासाठी मुघलांना संपूर्ण शक्ती लावूनही त्या दगडात कोरलेल्या असल्याने संपूर्ण नष्ट करता आल्या नाही. आजही त्यांचे अवशेष भारतीय कला आणि उच्चकोटीचे कोरीवकाम यांमधील भारतीयांची अग्रेसरता प्रेक्षेपित करते.

त्याने एकूण सुमारे ११ वर्षे राज्य केले. त्यांनी वनवासात बराच काळ घालवला. शेरशाहकडून पराभूत होण्यापूर्वी त्याच्या पहिल्या कारकिर्दीत त्याने अशी अनेक मंदिरे पाडली.

मग त्याच्यानंतर विराजमान झालेल्या मुघल राजांच्या स्थिर कारकिर्दीत धार्मिक स्थळांचा किती विनाश झाला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.


३. अकबर

अवघ्या १३ वर्षाचा असताना बैरम खान या मुघल सेनापतीने अकबरला गादीचे वारस घोषित केले. हेमूने बंगालच्या मुहम्मद शाहूला युद्धात पराजित करून बंड शांत केले. त्याने आग्रावर हल्ला करून आग्रा, एतावाह, कलपी तसेच बिहार आणि उत्तर प्रदेश असा मोठा भाग काबीज केला. त्यानंतर त्याने दिल्लीवर आक्रमण करून दिल्ली जिंकली, यावेळी ३००० हुन अधिक मुघल मारले गेले.

हेमूने ७ ऑक्टोबर, १५५६ मध्ये पुराना किला येथे राज्याभिषेक करून सम्राट हे शीर्षक धारण केले. सम्राट हेम चंद्र विक्रमादीत्य याने पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर जवळजवळ ३५० वर्षांच्या मुस्लिम शासनानंतर पुन्हा एकदा हिंदू साम्राज्य स्थापन केले.

त्यानंतर हेमूने काबूलवर आक्रमणाची तयारी केली आणि सैन्यात काही बदल करून तो दिल्लीवरून काबुलकडे निघाला. पंजाबमध्ये असलेला अकबरला सेनापती आणि सरदारांनी सल्ला दिला कि आपण वापस काबूलमध्ये जावे. परंतु, त्यांचे न ऐकता तो दिल्लीच्या दिशेने कूच करतो.

Panipat.gov.in अनुसार, शेवटी नोव्हेंबर ५, इ. स. १५५६ या दिवशी ऐतिहासिक पानिपतच्या मैदानात दोन्ही सैन्यांची गाठ पडली. या युद्धात हेमूच्या बाजूने ३०,००० अनुभवी घोडदळ, १५०० लढाऊ हत्ती आणि तोफखान्यातील कुशल सैनिक होते.

तर मुघल सेनेत १०,००० घोडदळ त्यापैकी ५००० अनुभवी घोडदळ सैन्य होते. प्रसिद्ध पुस्तक अकबरनामा यात अकबरच्या दरबारी इतिहासकार आणि चरित्रकार अबू फझल याच्या वर्णनानुसार मुघल सेना पराभूत होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा अचानक धनुर्धारीचा एक बाण हेमूचा डोळा छेदून डोक्याच्या मागच्या बाजूने बाहेर पडतो.

बदाओनी याने या बाणाला मृत्यूचा बाण असे म्हटले. कारण या बाणाच्या एका प्रहाराने हेमुसारखा अनुभवी योद्धा धारातीर्थी पडला. त्यानंतर संपूर्ण युद्धाचे चित्र पालटले.

आपला नेता हत्तीवरील अंबारीमध्ये दिसत नसलेला पाहून सेनेचे धैर्य तुटते. सर्वत्र गोंधळ माजतो सैनिक अस्थाव्यस्त पळतात. मुघल सेनेचे काही हजार सैनिक हेमूच्या राहिलेल्या २५००० सैनिकांमधील बरेचसे सैनिक शरणही काही पलायन करताना मारले जातात.

त्याने बाबरच्या नितीमध्ये काहीअंशी बदल केला. त्याने दक्षिणी आणि पूर्व भारतातील राज्यविस्तार चालू ठेवला, परंतु इतर धर्मीय लोकांशी थेट वैर न ठेवता त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यांना बरोबर घेऊन त्यांचा उपयोग साम्राज्यविस्तार करण्यासाठी केला. हिंदू आणि इतर धर्मांकडून सहानुभूती मिळण्याकरिता जिझिया करदेखील त्याने माफ केला.

अकबराचा हेतू यामागे असा होता हिंदूंना हिंदूंशी लढवायचे. जेणेकरून विजय त्यांचा झाला तर त्यांचा साम्राज्यविस्तार होईल. पराजय जरी झाली तरी त्यामध्ये हिंदू सरदार आणि सेनापती मारले जातील.

दक्षिणेतील अनेक मोहिमेत सेनापती मान सिंग जो एक हिंदू राजपूत होता. यासारखे अनेक राजपूत सरदार आणि राजपूत सेना असे जी मुघल बाजूने लढत. अर्थातच या युद्धांमध्ये मुघल सेनाही भाग घेत. पण म्हणण्याचा उद्देश हा कि, हिंदू धर्मियांविरुद्ध हिंदूंना लढवून त्यांच्यात मतभेत निर्माण करणे आणि त्यांची एकी तोडणे यासाठी अकबर असे करत. ज्यामध्ये तो सफलही झाला.

याविरुद्ध जेव्हा-जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याने त्याचे खरे रूप दाखवायला मागे-पुढे पहिले नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मेवाडचा किल्ला जिंकल्यानंतर त्याने केलेली ३०,००० हिंदू लोकांची कत्तल.

भारतीय इतिहास अनेक वेळा मुघलकालीन स्रोतांसाठी मुघल खाती आणि नोंदींवर अवलंबून असतो. याविरुद्ध आपण प्रांतीय भागातील स्रोतांवर लक्ष टाकल्यास आपणाला खऱ्या इतिहासाची जाणीव होईल. तेव्हा आपण अकबर द ग्रेट ऐवजी त्याला अकबर द इंफेरीअर असे म्हणण्यास बाध्य होताल.

पण त्याच्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने थेट धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न किंवा धार्मिक स्थळांवर आक्रमण केले नाही.


४. जहांगीर

सलीम हा अकबर आणि मॅरिअम-उझ-झामिनी यांचा मोठा मुलगा होता. पुढे हाच सलीम जहांगीर म्हणून गादीवर आला. मॅरिअम-उझ-झामिनी हे त्यांच्या आईला पटराणीच्या रूपात दिलेले नाव आहे. आता जहांगीरच्या आईचे खरे नाव काय, यामध्ये इतिहासकार आणि इतिहास अभ्यासक यांच्यात द्विमत पाहायला मिळते.

जहांगीर याच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तो बहुतांश वेळा नशेत असायचा. त्याचे जीवन भोविलासात गेले. तो कामुख आणि अफूचा शौकीन होता. बहुधा त्याचे प्रशासकीय कामही त्याची मुख्य पत्नी नूर जहाँ पाहायची.

शिवाय अकबरच्या नीतीचाच अवलंब त्यानेदेखील केला. त्यामुळे त्यानेदेखील धर्मपरिवर्तन तर नाही, परंतु त्याच्या सेनेने मोहिमेदरम्यान मंदिरे उद्वस्त केली.

५. शाह जहान

त्यानंतर गादीवर आलेला शाह जहान याने इस्लाममध्ये परिवर्तित करण्यास सक्ती केली नाही. परंतु इस्लाममध्ये परिवर्तनाला नेहमी प्रोत्साहन दिले. तर हिंदू मंदिराविषयी बोलायचे झाले तर त्याने जहांगीर गादीवर असताना पायाबांधणी झालेले, परंतु अपूर्ण बांधकाम असलेले सर्व मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. परंतु शाह जहान गादीवर येण्यापूर्वीची सर्व मंदिरे सुरु ठेवण्यास परवानगी होती.

त्याने ३० वर्षे दिल्लीच्या गादीवर शासन केले. सर्वधर्मसहिष्णुताच्या अकबरच्या नीतीला त्याने स्वीकारले नाही. परंतु IndianetZone लेखानुसार, त्याच्या शेवटच्या काळात त्याने त्याच्या प्रिय मुलाच्या म्हणजेच वली ए अहद दारा शिकोह यांच्या प्रभावामुळे मुस्लिम धर्म परिवर्तन आणि त्याची अंमलबजावणी थांबवली होती.

तसे पाहिले तर शाह जहानचे अनेक मुले होती. परंतु त्यामधील दारा शिकोह, शाहशुजा, औरंगझेब, आणि मुराद बक्ष या चार मुलांचा जास्त प्रभाव होता. या सर्वांमध्ये मोठा मुलगा दारा हा नेहमी चर्चेत असायचे, कट्टर मुस्लिमांविरोधी असल्याने मुस्लिम मात्र त्यांना पसंत करत नव्हते.

शाह जहानच्या शेवटच्या काळात सुरु झाले वारसा युद्ध. ज्यात शेवटी दारा शिकोह आणि औरंगझेब हे दोघे राहिले. समूगढ या ठिकाणी झालेल्या या युद्धात औरंजेब विजयी होतो. दारा शिकोह माघार घेत काठियावारच्या गव्हर्नरकडून मदत घेऊन सुरत ताब्यात घेत पुन्हा अजमेरला औरंजेबाबरोबर युद्ध करतो. परंतु याही युद्धात त्याचा पराभव होतो.

शेवटी दारा शिकोह काठीयावारचा गव्हर्नर मलिक जीवान या बलुचिस्थानच्या सरदाराकडे मदत मागतो. परंतु धोका देत दारा शिकोहला तो औरंजेबकडे सुपूर्त करतो. औरंजेब फाशीची शिक्षा सुनावतो, परंतु त्याआधीच त्याची ३० ऑगस्ट, १६५९ मध्ये त्याची हत्या होते. ही हत्या औरंजेबानेच घडवून आणली असावी, त्याचाशी संबंधित अनेक चित्रेही आपल्याला पाहायला मिळतात.

६. औरंजेब

वारसा युद्धात विजयी झाल्यानंतर त्याने प्रत्येक मोहिमांत शरणार्थी, युद्धात वाचलेले सैनिक यांचे धर्मांतर केले. त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक मंदिरांत मूर्ती आणि कलाकृतींची मोडतोड ही तर त्याच्यासाठी सामान्य गोष्ट होती. तो भारतातील मुघल संस्थापक बाबरच्या तत्वांना प्राधान्य देत.

तडीपत्री येथील चिंतला व्यंकटरमण स्वामी मंदिराला मुस्लिम सैन्याच्या अनेक हल्ल्यांचा सामना करावा लागला
तडीपत्री येथील चिंतला व्यंकटरमण स्वामी मंदिराला मुस्लिम सैन्याच्या अनेक हल्ल्यांचा सामना करावा लागला.

ज्यामुळे हिंदूंचे सर्वात होते देवस्थान असलेल्या अयोध्या बेचिराख केल्यानंतर मंदिर पाडून तेथे दर्गा उभारण्याचा आदेश त्याने दिला. तो सर्वधर्मसहिष्णू नव्हता त्यापेक्षा, तो एक कट्टर इस्लामिक होता.

अतिशय कपटी आणि निर्दयी असलेला औरंजेबने हळूहळू धर्मपरिवर्तनाच्या सक्ती केली. जो धर्मपरिवर्तन करण्यास तयार होणार नाही त्याकडून जास्तीत जास्त कर वसूल करत त्याविरोधात मुस्लिम स्वीकार केल्यानंतर त्यांना भत्ता दिला जाई. त्यातूनही बरेचशे हिंदू एवढे अत्याचार करूनही तयार होत नसत.

या लोकांकरिता तो शेवटी दोन पर्याय देत मुस्लिम स्वीकारा किंवा मृत्यूचा स्वीकार करा. शीख धर्मीय गुरु तेघ बहादूर आणि त्यांच्या शिष्यानाही हेच दोन पर्याय देण्यात आले. शेवटपर्यंत गुरु त्यासाठी तयार झाली नाहीत आणि शेवटी औरंजेबने रागात त्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला.

दख्खनमध्ये संभाजी महाराजांनी मुघलांच्या मोहिमा विफल करत मुघलांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे औरंजेब स्वतः दख्खनमध्ये येऊन प्रतिज्ञा करतो जोपर्यंत संभाजी महाराजांना पकडत नाही, तोपर्यंत डोक्यावर ताज घालणार नाही.

दुर्भाग्याने त्याची साथ दिली आणि संभाजी राजे त्याच्या हाती लागले. त्यांना अतिशय भयानक चाल आणि शारीरिक यातना देण्यात आल्या. शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांनी मुस्लिम कबूल केला नाही. अखेर त्यांचा शिरच्छेद करून तुकडे नदीत फेकण्यात आले. त्यांच्या या बलिदानाने त्यांना धर्मवीर असे शीर्षक देण्यात आले.

असे मानले जाते कि औरंगझेबाच्या कारकिर्दीत त्याने केवळ हिंदूंबद्दल सांगायचे झाले, तर कमीत कमी ४०,००,००० हिंदूंची हत्या केली होती. यातील बहुतांश लोकांना इस्लाम कबूल न केल्याने मारण्यात आले.

लेखकाबद्दल

Author Image

आशिष साळुंके

आशिष हे एक कुशल चरित्रकार आणि आशय लेखक आहेत. जे ऑनलाईन ऐतिहासिक संशोधनावर आधारित कथन करण्यात विशेषज्ञ आहे. HistoricNation द्वारे, त्यांनी आपले आय. टी. कौशल्य कथाकथनाच्या कलेमध्ये विलीन केले आहे.

Subscribe Now For Future Updates!

Join and recieve all future updates for FREE!

Congrats!! Now you are part of HN family!

Pin It on Pinterest