प्रस्तावना
पुणे, पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक शहर. जे त्याच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. हे शहर किल्ले, राजवाडे आणि मंदिरांसह अनेक ऐतिहासिक ठिकाणांचे घर आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही पुण्यात भेट देण्यासारख्या ५ आकर्षक ऐतिहासिक ठिकाणांबद्दल माहिती घेऊ.
या लेखात आपण शनिवार वाड्यापासून सुरुवात करू, ज्या वास्तूची एका शुभ शनिवारी पायाभरणी झाली. ज्यामुळे त्याला शनिवार वाडा असे नाव पडले. १८व्या शतकातील ही वास्तू मराठा साम्राज्यातील पेशव्यांच्या अधिपत्याखाली होती.
त्यानंतर आपण लाल महालाला भेट देऊ. लाल महालाची खरी वास्तू काळाच्या पडद्याआड नष्ट झाली असली तरी, पुणे महानगरपालिकेने त्याची प्रतिकृती तयार केली आहे. हा राजवाडा एकेकाळी शहाजी महाराज आणि त्यांची पत्नी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी यांचे घर होते.
पुढे, आपण महादाजी शिंदे यांच्या अंत्यसंस्काराचे ठिकाण असलेल्या शिंदे छत्री या स्मारकाला भेट देऊ. ते मराठा साम्राज्याचे महान सेनापती होते.
त्यानंतर आपण विश्रामबाग वाड्याला भेट देऊ, दुसऱ्या बाजीरावाने या राजवाड्याला शनिवार वाड्यापेक्षा पसंत केले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा पराभव होईपर्यंत ते अकरा वर्षे येथे राहिले.
शेवटी, आपण सिंहगड किल्ल्यावर जाऊ, मराठा साम्राज्यातील जो एक महत्त्वाचा किल्ला होता. इतिहासात तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली कोंढाण्याची लढाई प्रसिद्ध आहे. ते शिवाजी महाराजांचे सर्वात विश्वासू सेनापती होते. त्यांची समाधीदेखील या किल्यावर पाहायला मिळते.
अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत, परंतु पुणे शहरातील त्यापैकी काही ठिकाणे खरोखर भेट देण्यासारखे आहेत. अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकानांबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
चला पुणे शहराचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जाणून घेऊया. कारण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या शहराकडे प्रत्येकाला काही ना काही देण्यासारखे आहे.
१. शनिवार वाडा
व्यस्त शहराच्या मध्यभागी असलेली एक भव्य वास्तू आपल्याला एका गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देते. एकीकडे भुताटकी भयानक कथा तर दुसरीकडे जुन्या काळातील एक लोकप्रिय प्रेमकथा ज्याने किल्ल्याचे वातावरण एकाचवेळी अद्भुतरम्य आणि रक्ताने लाल केले आहे. इतर ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच शनिवार वाडाच्याही अनेक कथा प्रचलित आहेत.
त्याचप्रमाणे शनिवार वाड्यातच अनेक रहस्येदेखील आहेत. थोरल्या बाजीरावांनी मराठा साम्राज्याला नव्या उंचीवर नेले.
१८ व्या शतकात हा किल्ला भारतीय राजकारणाचे प्रमुख केंद्र होता. पेशव्यांच्या पराभवानंतर मात्र इ. स. १८२८ साली या किल्ल्याला दुर्दैवाने आग लागली. किल्ल्याचा बहुतांश भाग लाकडी असल्याने संपूर्ण वाडा जळाला. ज्यामुळे आज या अद्भुत वास्तूचे फक्त अवशेष राहिले आहेत.
पुणे शहराच्या मध्यभागी वसलेले हे ठिकाण उत्तम ऐतिहासिक ठिकानांपैकी एक आहे. त्यामुळे माझ्या मते हे ठिकाण आपल्या वेळेला नक्कीच न्याय देईल.
बांधकाम
या भव्य ऐतिहासिक किल्ल्याची पायाभरणी १० जानेवारी १७३० रोजी झाली. या भव्य किल्ल्याची पायाभरणी शनिवारी झाल्यामुळे या किल्ल्याचे नाव “शनिवार वाडा” पडले.
हा भव्य किल्ला बांधण्याची जबाबदारी राजस्थानच्या ठेकेदारांवर (कुमावत क्षत्रियांकडे) होती. हा किल्ला १७३२ मध्ये बांधला गेला. २२ जानेवारी १७३२ मध्ये शनिवारी किल्ल्याचे उद्घाटन झाले.
आर्किटेक्चर
हा किल्ला कलात्मकता, सर्जनशीलता आणि ऐतिहासिक महत्त्व यासाठी ओळखला जातो. किल्ला मोठा असल्याने प्रवेश करण्यासाठी पाच दरवाजे आहेत. त्यांची नावे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा, जांभूळ दरवाजा किंवा नारायण दरवाजा अशी आहेत.
दिल्ली दरवाजा
दिल्ली दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. ते उत्तर दिशेला दिल्लीच्या दिशेने उघडते, ज्यामुळे त्याचे “दिल्ली दरवाजा” असे नाव आहे.
हा दरवाजा बराच उंच आणि रुंद आहे. या प्रवेशद्वारातून हत्ती सहजपणे आत जाऊ शकतो. दोन्ही दरवाजांवर ४२ टोकदार खिळे आहेत, ज्यांची लांबी १२ इंच आहे. किल्ल्याची शत्रूच्या हल्ल्यादरम्यान हत्तींच्या धडकेपासून संरक्षण करण्यासाठी प्रवेशद्वारावर लांब पोलादी टोकदार खिळे आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे. या लहान दरवाज्यातून कोणीही सहज आणि पटकन आत जाऊ शकत नाही.
मस्तानी दरवाजा
हा दरवाजाही उत्तर दिशेला उघडतो. हा दरवाजा पेशवा बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानी साहिबा प्रवेश करताना अथवा बाहेर जाताना वापरत असे. त्यामुळे याला “मस्तानी दरवाजा” हे नाव दिले गेले.
खिडकी दरवाजा
पूर्व दिशेला हा दरवाजा उघडतो. या द्वाराची निर्मिती खिडकीच्या आकाराची असल्याने त्याला “खिडकी दरवाजा” असे नाव पडले.
गणेश दरवाजा
हा दरवाजा अग्नेय दिशेला उघडतो. कसबा गणपती मंदिरात जाताना या दरवाजाचा वापर मुख्यतः महिला करत असत.
जांभूळ दरवाजा किंवा नारायण दरवाजा
हा दरवाजा दक्षिण दिशेला उघडतो. या द्वारातून नोकर आणि दासी किल्ल्यात ये-जा करत असत. नारायणरावांच्या हत्येनंतर या दरवाजाला “नारायण दरवाजा” असे दुसरे नाव देण्यात आले. कारण, या दरवाजाद्वारे त्यांचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी गडाबाहेर नेण्यात आला होता.
शनिवार वाड्याच्या मुख्य इमारतीच्या बांधकामानंतर किल्ल्यात वेळोवेळी इतर अनेक इमारती, जलाशय, कमळाच्या आकाराचे कारंजे, इत्यादी बांधण्यात आले.
मुख्य आकर्षण
शनिवार वाडा किल्ल्यावर होणारा “लाईट अँड साऊंड शो” खूप प्रसिद्ध आहे. हे प्रदर्शन येथील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यासाठी दूरवरून पर्यटक भेट देतात. हा शो दररोज संध्याकाळी मराठी आणि इंग्रजी भाषेत आयोजित केला जातो.
हा शो दररोज संध्याकाळी मराठीत ७:१५ ते ८:१० आणि इंग्रजी भाषेत ८:१५ ते ९:१० या वेळेत आयोजित केला जातो. या तिकिटाची किंमत २५/- प्रति व्यक्ती असून, ते संध्याकाळी ७:३० पर्यंत खरेदी करता येतात.
तिकीट खरेदी करण्यासाठी असल्याचे अद्याप कोणतेही ऑनलाईन पोर्टल उपलब्ध नाही. परंतु प्रदर्शनाआधी आपण ते खरेदी करू शकता.
पोहोचण्याचे मार्ग
शनिवार वाडा शहराच्या मध्यभागी आहे. तुम्ही बस, ऑटो किंवा टॅक्सी यासारख्या कोणत्याही स्थानिक वाहतुकीने येथे पोहोचू शकता. पुणे महानगरपालिका चालवणारी पुणे दर्शन बस देखील शनिवार वाड्यासह इतर गंतव्यस्थानांसाठी उपलब्ध आहे.
वेळ
शनिवार वाडा सार्वजनिक सुट्ट्यांसह दररोज सकाळी ७:०० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत खुला असतो. मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लाईट अँड साउंड शो आयोजित केला जात नाही.
जर तुम्ही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शनिवारवाड्याला भेट देण्याचा विचार करत असाल. तर मग मी आपणाला या ठिकाणी लवकर पोहोचण्याचा सल्ला देईल कारण, अशा दिवशी स्थानिकांमुळे जास्त गर्दी पाहायला मिळते.
प्रवेश शुल्क
भारतीयांसाठी प्रति व्यक्ती ५ रुपये आणि परदेशींसाठी प्रति व्यक्ती १२५ रुपये प्रवेश शुल्क आहे.
2. लाल महाल
ही ऐतिहासिक वास्तू शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी पुण्यात बांधली होती. महाराष्ट्राच्या आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात लाल महालाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
इतिहास
लाल महाल ही वास्तू भारतामधील पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे. त्याचा रंग लाल असतो. शहाजीराजे भोसले यांनी इ. स. १६३० मध्ये हा राजवाडा बनवला. त्यांनी याचे निर्माण पत्नी जिजाबाई आणि पुत्र शिवाजी राजे यांच्यासाठी केले होते. शिवनेरी येथे जन्मल्यानंतर शिवाजी राजेंचे लहानपण लाल महालात गेले.
इ. स. १६४६ मध्ये मुघल साम्राज्याकडून पहिला किल्ला घेईपर्यंत शिवाजी महाराज लाल महालातच राहिले. त्यांनी याच लाल महालात साईबाईंशी लग्न केले.
शहाजी राजांनी पत्नी व मुलाला पुण्यास पाठवले. त्यावेळी आपले विश्वासू सहकारी दादोजी कोंडदेव यांना त्यांचे पुत्र शिवाजी राजे आणि राणी जिजाबाई यांच्यासोबत पाठवले. पुढे त्यांनी शिवरायांचे गुरू बनून त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.
त्याकाळी पुणे शहराला ‘पुनवडी’ असे नाव होते. ते पुणे सध्याच्या शहरापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्या वेळी जंगलाने वेढलेले शहर आणि वन्य प्राण्यांची दहशत होती. त्यामुळे पुण्याला वसन्यालायक चांगले शहर बनवण्यासाठी शहाजीराजे भोसले यांनी लाल महाल बनवला.
१७ व्या शतकात पुण्यावर अनेकांनी आक्रमण केले. अनेक आक्रमणे झेलेल्याने हा जुना लाल महाल मोडकळीस आला. काही लोकांचे म्हणणे आहे की, लाल महालाचा काही भाग शनिवारवाडा बनवण्यासाठीही वापरण्यात आला होता.
लाल महाल हा शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांच्यात झालेल्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. शिवरायांचे आक्रमण झाल्याची खबर मिळताच शाहिस्तेखान लाल लपून बसला होता. तो सापडताच महालातून पळाला तेव्हा शिवरायांनी पाठलाग करून झालेल्या चकमकीत शिवरायांनी त्याची तीन बोटे कापली. यावेळी त्याने महालाच्या खिडकीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.
या घटनेमुळे हे ठिकाण पुण्यातील एक महत्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक बनले आहे.
सध्याचा लाल महाल मूळ लाल महाल असलेल्या जागेच्या केवळ एका भागावर बांधला गेला आहे. जुना लाल महाल जसा होता तसाच नवा लाल महाल बांधला गेला नाही. कारण जुन्या लाल महालाचे क्षेत्रफळ आणि रचना याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. पुणे महापालिकेने नवा लाल महाल बनवला. त्यांनी १९८४ मध्ये बनवायला सुरुवात केली आणि १९८८ मध्ये पूर्ण केली.
पोहोचण्याचे मार्ग
रस्त्याने: तुम्ही शहरातील कोणत्याही स्थानिक वाहनाने येथे पोहोचू शकता. तुम्ही बस किंवा रिक्षाच्या सुविधेनेही या ठिकाणी पोहोचू शकता.
रेल्वेने: पुणे रेल्वे स्टेशन हे ठिकाण सुमारे ५ किमी अंतरावर आहे.
विमानाने: पुण्याचे लोहेगाव विमानतळापासून हे ठिकाण ११ किमी अंतरावर आहे.
वेळ
हे आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ९:०० ते दुपारी १:०० आणि संध्याकाळी ४:०० ते रात्री ८:०० पर्यंत खुले असते.
प्रवेश शुल्क
राष्ट्रीयत्वाची पर्वा न करता लाल महालच्या राजवाड्यात प्रवेश शुल्क रु. ५ आहे. परंतु, जर तुम्ही विद्यार्थी, सरकारी अधिकारी किंवा लष्करी व्यक्ती असाल तर फी २ रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. परंतु त्यांना त्यासाठी त्यांचे वैध ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. तर ५ वर्षाखालील मुलांना प्रवेश विनामूल्य आहे.
३. शिंदे छत्री
शिंदे छत्रीची एक विशाल ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ज्यामुळे ते पुण्यातील सर्वोत्तम ऐतिहासिक ठिकाणांपैकी ते एक बनले आहे. महाराष्ट्रातील पुण्याजवळील वानवडी येथील बहिरोबा नाल्याच्या काठी वसलेले हे एक स्मारक आहे. स्मारकाची निर्मिती मराठा साम्राज्याचे सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ इ. स. १७९४ मध्ये केली गेली.
महादजी शिंदे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी, १ फेब्रुवारी १८७९ रोजी पुण्याजवळील वानवडी येथे निधन झाले. त्यानंतर या स्मारकाची निर्मिती केली गेली. शिंदे छत्री सुमारे तेरा हजार चौरस मीटर आहे. या परिसरात समाधी, छत्री, मंदिरांचे एकूण चारशे चौरस मीटरचे बांधकाम पाहायला मिळते. समाधीच्या आत पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंत आहे.
या समाधीजवळ गेल्यावर प्रथम नजरेस पडते छोटेसे मारुती मंदिर ज्याचे प्रवेशद्वार पूर्वेला आहे. हे स्मारक मोठ्या दगडी बांधकामावर बांधलेले आहे. ज्याचे अंगण एक घुमटाकार समाधी आहे. समाधीसाठी एक वेगळी छोटी चौकोनी इमारत आहे, जी नेहमी बंद असते. दारातून आतील समाधी दिसेल असे या वास्तूची रचना आहे. येथे महाराज शिंदे यांचा मुखवटा आणि घोड्याचा पुतळा आहे.
शिंदे छत्रीच्या मध्यभागी शंकराचे मंदिर बांधले आहे. ही सुंदर वास्तू सर्व बाजूंनी कोरलेल्या वक्रांनी सजवलेली आहे. मुख्य मंदिर इ. स. १७१५ मध्ये राजस्थानी शैलीत बांधलेले आहे.
तिन्ही बाजूंनी बांधलेल्या बाल्कनीत जाण्यासाठी बाहेरील बाजूस लोखंडी शिडी आहे. सध्या येथे जाण्याची परवानगी नाही. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून येथे शिंदे घराण्यातील पुरुषांची चित्रे बसवण्यात आली आहेत. ग्वाल्हेरचे सिंदिया कुटुंब ट्रस्टच्या माध्यमातून या जागेची देखभाल होते.
टायमिंग
शिंदे छत्री हे स्मारक आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ६:०० ते रात्री ९:०० पर्यंत लोकांसाठी खुले असते. परंतु सुट्टीच्या दिवशी जाणार असाल तर लक्षात ठेवा की सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्मारक बंद असते.
जेव्हा हवामान थंड असते, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी या स्थानाला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ आहे.
प्रवेश शुल्क
शिंदे छत्री येथे मुले, विद्यार्थी, सरकारी अधिकारी, लष्करातील कर्मचारी आणि परदेशी यांच्यासाठी शुल्क वेगळे आहे.
मुले (१२ वर्षांपर्यंत): विनामूल्य
भारतीय नागरिक: ₹५
परदेशी: ₹२५
सरकारी अधिकारी आणि लष्करी व्यक्ती: विनामूल्य (वैध ओळखपत्रासह)
४. विश्रामबाग वाडा
विश्रामबाग वाडा हे मराठा साम्राज्यातील पेशवे बाजीराव द्वितीय यांचे जुने निवासस्थान होते. हे इ. स. १८०७ मध्ये बांधले गेले. सध्याचे “पुनवडी ते पुण्यनगरी” ( जुने पुणे ते आधुनिक पुणेचा ) हा प्रवास येथील विविध चित्रांमधून दिसतो. या चित्र प्रदर्शनात पुण्याचा इतिहास मांडण्यात आला आहे.
यामध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी उभारलेला शनिवार वाडा, पेठ (बाजारपेठे) यांचा जुना नकाशा, कात्रज तलावातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती, इत्यादी दिली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील विविध धार्मिक स्थळे, घाट, त्यांचे भौगोलिक स्थान आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रियाही दिली आहे.
ब्रिटिश काळात त्यांनी विश्रामबाग वाडा एक लाख रुपयांना पुणे नगरपालिकेला विकल्याची नोंद आहे. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधण्यापूर्वी महापालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबाग वाड्यात होते.
हे स्थान पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. आता आपण त्याच्या बांधकाम तपशीलांबद्दल बोलूया.
बांधकाम
इ. स. १८०७ मध्ये बाजीराव द्वितीयने हा राजवाडा रु. २ लाख खर्च करून बांधला. त्याच्या बांधकामासाठी ६ वर्षे लागली. २६ मार्च, इ. स. १८०७ मध्ये राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले आणि इ. स. १८१३ मध्ये पूर्ण झाले. ही इमारत जवळपास १९,००० चौरस फुटांची आहे. हरिपंत फडके हे या जागेचे मालक होते. महाल बांधण्याआधी या ठिकाणी एक सुंदर बाग होती.
पोहोचण्याचे मार्ग
सार्वजनिक वाहतुकीद्वारे येथे सहज सहज पोचता येते. या ठिकाणी आसपासचा सर्वात जवळचा बस स्टॉप “विश्रामबाग वाडा” आहे. पुणे स्टेशनपासून या ठिकाणचे अंतर अंदाजे ५ किलोमीटर एवढे आहे. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट येथून या भागात रिक्षा, बसेसही येतात.
मला आशा आहे की, आपणाला पुणे शहरातील ही ५ ऐतिहासिक ठिकाणे आवडली असतील. आमच्या मोफत नन्यूजलेटर सेवेचा लाभ घ्या, ज्यामुळे आपल्याला भविष्यातील अपडेट्स ई-मेलद्वारे मिळतील. तसेच हा लेख सोशल मीडियावर शेअर करा. ज्यामुळे आपल्यासाठी यासारखीच अधिक दर्जेदार लेख तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित मिळेल.
वेळ
हे आठवड्याचे सर्व दिवस सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत खुले असते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाडा बंद असतो.
प्रवेश शुल्क
वय किंवा राष्ट्रीयत्व याची पर्वा न करता विश्रामबाग वाड्यासाठी प्रवेश शुल्क ५ रुपये प्रति व्यक्ती आहे. आपण लष्करी व्यक्ती किंवा सरकारी अधिकारी असाल तर आपणाकडून २ रुपये एवढा प्रवेश शुल्क आकारला जाईल.
भारतीय नागरिक: प्रति व्यक्ती रु. ५ /-
परदेशी: प्रति व्यक्ती रु. ५ /-
सरकारी अधिकारी आणि लष्करी व्यक्ती: प्रति व्यक्ती रु. २ /-
५ वर्षाखालील मुले: मोफत
विश्रामबाग वाड्यात छायाचित्रण शुल्क घेतले जात नाही. परंतु, आपल्याला येथे फ्लॅश किंवा ट्रायपॉड वापरण्याची परवानगी नाही.
पत्ता
वाडा आरबी कुमठेकर रोड, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११०३०.
५. सिंहगड किल्ला
सिंहगड किल्ल्याला नामांतरापूर्वी लोक कोंढाणा किल्ला म्हणून ओळखत. हा भारतातील पुण्याजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेला एक डोंगरी किल्ला आहे.
हा किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळदेखील आहे. किल्ल्याचे असणारे मोक्याचे स्थान आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व यामुळे तो प्रसिद्ध आहे. इ. स. १६७० मध्ये मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
आज सिंहगड किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आजही तो महाराष्ट्राच्या असणाऱ्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून देतो.
इतिहास
इ. स. १६७० मध्ये मराठा राजे छत्रपती शिवरायांनी हा किल्ला मुघलांकडून परत मिळवला. लढाईचे नेतृत्व त्यांनी त्यांच्या सर्वात विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्याकडे दिले होते. युद्धात तानाजी धारातीर्थी पडतात, पण शेवटी किल्ला मात्र ताब्यात घेतला जातो. तानाजींच्या बलिदानाच्या स्मरणार्थ छत्रपतींनी याचे किल्ले सिंहगड, म्हणजे “सिंहाचा किल्ला” असे नामकरण केले.
सिंहगड किल्ला हा उंच पर्वतावर वसलेला असल्याने येथून संपूर्ण पुणे शहराचे दर्शन होते. तसेच उंचावर असल्याने रणनीतिकदृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. किल्ल्याचा वापर लष्करी कारवायांसाठी तळ म्हणून आणि युद्धाच्या काळात आश्रय म्हणून केला जात असे. हे मराठा सामर्थ्य आणि मुघल राजवटीच्या प्रतिकाराचे प्रतीक देखील होते.
महत्त्व
याच किल्ल्यात इ. स. १६७० मध्ये कोंढाण्याची लढाई झाली. ज्यामध्ये मराठ्यांचा मुघलांविरुद्धचा मोठा विजय झाला होता.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हा किल्ला थोड्या काळासाठी मराठा साम्राज्याची राजधानी होती.
१८५७ च्या भारतीय बंडाच्या वेळी ब्रिटीशांनी याच किल्ल्याला तुरुंग म्हणून वापरले होते.
सिंहगड किल्ला हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचे आणि परकीय राजवटीच्या प्रतिकाराचे प्रतीक आहे.
सत्ताधारी राज्ये
१३ व्या शतकात कोळी सरदार नाग नाईक याने हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर हा किल्ला बहमनी सल्तनत, अहमदनगरची निजामशाही आणि मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांसारख्या सत्ताधाऱ्यांच्या हातातून गेला.
बांधकाम
हा किल्ला सुमारे २००० वर्षांपूर्वी कौंदिन्य ऋषींनी बांधला. असे म्हणतात की या ऋषीनी याच किल्ल्यावरील गुहांमध्ये वास्तव्य केले होते.
आर्किटेक्चर
किल्ला मजबूत भिंती आणि बुरुजांसह विशिष्ट दख्खन शैलीत बांधला गेला आहे. यात चार-स्तरीय प्रवेशद्वार आहे, ज्यामध्ये सर्वात वरच्या स्तरावर शिवाजी महाराजांना समर्पित एक मंदिर आहे.
किल्ल्याच्या आत अनेक पाण्याच्या टाक्या आहेत, ज्याचा वापर शत्रूने वेढा घातल्यावर पाणी साठवण्यासाठी केला जात असे. सिंहगडावर अनेक गुहा आहेत, ज्याचा वापर राहण्याची जागा आणि साठवण क्षेत्र म्हणून केला जात होता.
मुख्य आकर्षण
किल्ल्याच्या तटावरील भिंतीला अनेक मार्याचे झरोके आहेत, जे आजूबाजूच्या ग्रामीण भागाचे अद्भुत दृश्य देतात. इतर आकर्षणांमध्ये रामचंद्र मंदिर, झेनाना महाल आणि कल्याण दरवाजा यांचा समावेश आहे.
पोहोचण्याचे मार्ग
रेल्वेने: जवळचे रेल्वे स्टेशन हे “पुणे रेल्वे स्टेशन” आहे. रेल्वे स्टेशनवरून बस किंवा रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.
विमानाने: सर्वात जवळचे विमानतळ “पुणे विमानतळ” आहे. विमानतळावरून तुम्ही टॅक्सी किंवा बसने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकता.
वेळ आणि शुल्क
किल्ला सकाळी ७:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत खुला असतो.
प्रौढांसाठी प्रवेश शुल्क ₹ 5 आणि मुलांसाठी ₹ 2 आहे.
अतिरिक्त टिपा
आरामदायी शूज घाला कारण, गडाच्या माथ्यावर चढून जावे लागते. त्यामुळे स्पोर्ट्स किंवा ट्रेकिंग शूजने चढाई थोडी सुखकर बनते.
सनस्क्रीन आणि टोपी सोबत ठेवा कारण, दिवसा किल्ल्याच्या माथ्यावर हवामान गरम असू शकते.
किल्ला पाहण्यासाठी किमान २-३ तास द्या.
उद्धरण
वैशिष्ट्यीकृत चित्राचे श्रेय: Wikimedia Commons
शनिवार वाड्याचे गेट मुख्य द्वार, Vasukrishnan57
शनिवार वाड्याचे अंतर्गत बागेचे दृश्य, Vishal Tanna
पुण्यामधील लाल महालाच्या प्रतिकृतीचे बाहेरील दृश्य, Mubarak Ansari
प्रसिद्ध लाल महालाची प्रतिकृती, Shankar S.
पुणे येथील शिंदे छत्री वास्तूबाहेरील दृश्य, Rupeshpjadhav
शिंदे छत्री स्मारकाचे आतील दृश्य, Bikashrd
विश्रामबाग वाड्याचे समोरून काढलेल्या छायाचित्रातील दृश्य, Niraj.12
पुणे येथील विश्रामबाग वाड्याचे मागील बाजूने काढलेल्या छायाचित्रातील दृश्य, Sanket Oswal
विश्रामबाग वाड्याच्या लाकडी वास्तूचे आतील दृश्य, Purushottaam24
सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार, Rait
किल्ले सिंहगडवरील गडाचा नकाशा, Debraj Rakshit