ही एक हक्क रद्द करण्याची तत्त्वप्रणाली होती जिला डॉक्टरीन ऑफ लापसी असे इंग्रजीमध्ये म्हणतात.

या ब्रिटिशांच्या सामीलीकरण धोरणांतर्गत भारतातील कोणतेही राज्यकर्ते जर राज्य सांभाळण्यास असमर्थ असतील किंवा शासक वारसाशिवाय मरण पावला असेल, तर त्या राज्याला संपुष्टात आणले जात.

या ब्रिटिश धोरणांतर्गत शिकार झालेली भारतीय राज्ये

या धोरणाअंतर्गत १८४७ पासून अनेक लहान राज्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन करण्यात आले. लॉर्ड डलहौसीच्या १८४८-१८५६ च्या कारकिर्दीमध्ये या धोरणाची कठोरपणे अंमलबजावणी केली गेली.

सातारा (१८४८), जैतापूर आणि संबळपूर (१८४९), नागपूर आणि झाँसी (१८५४), टोरी आणि अरकॉट (१८५५) आणि उदयपूर (छत्तीसगड), औध (१८५६) यांसारख्या महत्वपूर्ण राजसत्तांचे याच धोरणांतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सामिलीकरण केले गेले.

Explore: All Free Tools | Indian Units | Arthashastra Units

Pin It on Pinterest