आज मी तुम्हाला शहाजी राजे यांचा इतिहास मराठी भाषेत आपल्याबरोबर शेअर करीत आहे. याचे कारण असे की, जरी शहाजी राजे हे महाराष्ट्रातील असले, तरी बहुतेक मराठी बांधवांना त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती नसते. म्हणून मला आशा आहे की, मराठी जाणणाऱ्या वाचकांना हा लेख नक्कीच आवडेल.
शहाजी राजे भोसले यांच्या विषयी संक्षिप्त माहिती
घटक | माहिती |
---|---|
ओळख | शहाजीराजे भोसले हे घराण्यातील एक प्रभावशाली आदिलशाही सरदार होते. |
जन्म | १८ मार्च १५९४ |
मृत्यू | २३ जानेवारी १६६४ |
पालक | माता : दीपाबाई (उमाबाई), पिता : मालोजीराजे भोसले |
पत्नी | जिजाबाई, तुकाबाई, नरसाबाई |
शहाजी भोसले यांचा थोडक्यात परिचय
या लेखामध्ये मी, वेरूळचे मालोजीपुत्र, तसेच स्वराज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजीराजेंबद्दल सांगत आहे. मालोजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारात सर गिरोह होते.
शिवकालीन इतिहास तर सर्वाना माहित आहे. पण शिवजन्मापूर्वीच इतिहास आणि शिवरायांच्या नंतरचा इतिहास खूप कमी लोकांना माहित आहे.
शहाजींचा जन्म आणि नामकरण
तो दिवस होता १८ मार्च १५९४ मालोजीराजे भोसलें यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. सुफी मुस्लिम पीर शाह शरीफ यांच्या नावावरून मालोजींनी त्यांच्या हिंदू धर्मानुसार या पुत्राचे “शहाजी” असे नाव ठेवले.
भोसले घराण्याची केंद्रे
पुणे, सातारा, कोल्हापूर, तंजावर हे मराठ्यांमधील भोसले घराण्याचे केंद्रे होती. मालोजीराजेंप्रमाणेच पुत्र शहाजीनेही त्यांच्यासारखीच सुरवातीला अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारात नोकरी पत्करली. त्यामुळे, मालोजींचा वारसा म्हणून पुणे आणि सुपे परगण्याची जहागिरी शहाजींकडे आली.
शहाजी भोसलेंच्या कारकिर्दीतील त्यांनी लढलेल्या लढाया
शाहू महाराजांची माहुलीची लढाई आणि तह
निझामशाहचा खात्मा करण्यासाठी शाहजहान मोठी मुघल सेना पाठवतो. त्यावेळी, आदिलशहा मुघलांशी तह करतो. शहाजीराजे तेव्हा माहुलीच्या किल्ल्यावर होते.
यादरम्यान, निझाम राजकुमार मुर्तझाचे अपहरण करण्यात मुघल यशस्वी होतात. शहाजीराजे पोर्तुगीजांकडे मदत मागतात, पोर्तुगीज मदत करण्यास नकार देतात.
राजकुमार मुर्तझाचे प्राण वाचविण्याकरिता शरण जाण्याशिवाय निझामाकडे दुसरा पर्याय उरत नाही. त्यानंतर, शहाजी राजे मुघलांशी युती करून निझाम राजकुमार मुर्तझाला सोडवतात.
त्यानंतर, मुघल सम्राट शहाजहान शहाजींची दक्खनपासून दूर दक्षिण भारतात रवानगी करतो. तेव्हा त्यावेळी दरबारात एक घटना घडली त्यामध्ये शहाजींचे सासरे लखुजीराव जाधवांची दरबारातच हत्या झाली.
त्यानंतर, रागात येऊन शहाजीराजेंनी निजामशाही सोडून अदिलशाहकडे जहागीरदारी स्वीकारली.
शहाजीराजेंचा आदिलशाही सरदारांवर विजय
मालोजीराजेंसारखेच शहाजीराजेदेखील खूप पराक्रमी होते. निजामशाहच्या बाजूने शहजीराजेंनी खूप लढाया लढल्या होत्या. मुघल बादशाह शाहजहान याने दक्षिण जिंकण्यासाठी जेव्हा दक्खनवर आक्रमण केले.
त्यावेळी शहाजींनी दक्खन जिंकण्यामध्ये मुघलांना मदत करून सन १६३२ मध्ये अदिलशाहचा पराभव केला होता. या युद्धामधील जिंकलेले बंगलोर जहागिरी म्हणून शहाजीराजेंना मिळते.
महाराणा प्रताप यांनी हल्दीघाटीच्या युद्धामध्ये छापामार युद्धप्रणालीचा वापर केला होता.
त्यांचाच पिढीतील असल्याने शहजीराजे देखील छापामार युद्धामध्ये खूप कुशल होते. यानंतर पुणे आणि सुपे या जहागिरीवर शहाजींचे चांगले नियंत्रण होते.
शहाजीराजेंचे दक्षिण मोहीम
अदिलशाहकडे आल्यानंतर सन १६३८ मध्ये शहाजीराजेंनी आणि रणदुल्ला खान यांनी दक्षिण परगणे जिंकण्याच्या इराद्याने विजापूरमधून कूच केले.
त्यांनी दक्षिणेतील अनेक राजांना हरवून त्यांच्या अधीन केले, परंतु त्यांची राज्ये त्या राजांना परत करून त्यांच्याशी सलोख्याचे आणि शांतीपूर्ण संबंध ठेवले.
त्यामुळे, शहाजींना भविष्यात मदत लागली, तेव्हा या राजांची मदत मिळू लागली.
शहाजीराजेंचे कर्नाटक मोहीम
ज्या कर्नाटक प्रांतात केम्पेगौडा पहिला यांसारख्या महान शासकाने सम्राट कृष्णदेवराय या महान राजाचे अधिपत्य स्वीकारून शासन केले.
त्या कर्नाटकातील प्रांतात आता केम्पे गौडा तिसरा हा विजयनगर राज्याच्या अधिपत्याखाली कर्नाटक प्रांतावर राज्य करीत होता.
सन १६३८ मध्ये शहाजीराजे आणि रणदुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली केम्पे गौडा तिसरा ला विजापूरचे सैन्य पराभूत करते.
शहाजींनी शिवरायांना सोपवलेली राजमुद्रा
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे काम कायदेशीररित्या सुरु करण्यासाठी स्वराज्याला स्वत्रंत्र राजमुद्रेची आवश्यकता होती. तेव्हा स्वतः शहाजी राजांनी संस्कृतमध्ये स्वराज्याची नवी राजमुद्रा तयार करवून शिवरायांकडे सोपवली. ती राजमुद्रा अशी होती,

“प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।”
– मराठा साम्राज्याची राजमुद्रा
याचा अर्थ असा, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी, शहजीचा मुलगा शिवाजी याची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी राज्य करते.
शहाजीराजेंचे राजनीती
शहाजींचा पुत्र शिवाजी महाराज जेव्हा एकामागे एक तोरणा, राजगड, प्रतापगड, कोंढाणा, पुरंदर, रोहिडा, पन्हाळा असे गड जिंकण्याचे सूत्र चालू होते.
आदिलशाहच्या दरबारात असणारे त्यांचे वडील शहाजीराजेंना आदिलशाहने प्रश्न विचारले? तेव्हा “जहागिरीला सांभाळण्याच्या दृष्टीने एकही किल्ला नव्हता, म्हणून कदाचित शिवाजीने किल्ला घेतला असेल” असे म्हणून शहाजींनी परिस्थिती सांभाळली.
इकडे शिवाजी महाराजही अदिलशाहला खबऱ्यामार्फत कळवितात, “हे गड जहागिरीच्या प्रदेशाचे चांगल्या प्रकारे कामकाज करता यावे म्हणून घेतले आहेत”. अशा प्रकारे प्रसंगावधान राखून शिवराय चातुर्याने काम चालू ठेवतात.
मृत्यू
शहजीराजे कर्नाटकात, होदिगेरे या गावात असताना त्यांची शिकार करण्याची इच्छा होते. तेव्हा ते दिशेने निघतात, तो दिवस होता २३ जानेवारी १६६४ चा शहजीराजे जंगलामध्ये शिकार करीत असताना, एक अपघात होतो, ते घोड्यावरून जमिनीवर पडतात.
जोरात मस्तक जमिनीवर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी पसरते. रायगडावर जिजाबाईंना पत्र मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.
शहजीराजे त्यांच्या काळातील भारतामधील सर्वात प्रभावशाली सरदार होते. शहाजीराजेंच्या काळातच भोसले घराण्याचे भारतातील वर्चस्व वाढून ते भरभराटीला आले होते.
तंजावरमधील मराठा साम्राज्य आणि त्याचे संथपक म्हणून एकोजी- १ किंवा व्यंकोजी यांची ओळख होती. त्यांनी वडील शहाजींच्या स्मरणार्थ कर्नाटकात चान्नागिरी तालुक्याजवळ होदिगेरे गावात त्यांची दर्गा उभारली.
मला आशा आहे की तुम्हाला शहाजी राजे यांचा हा इतिहास मराठा लेख आपल्याला आवडला असेल.
यासारख्या शंभरपेक्षा जास्त भारतीय क्रांतिकारकांची माहिती वाचा स्वतंत्रलढ्यातील दिग्गज योद्धे आणि नेते.
भविष्यात आणखी मराठी भाषेतील लेख वाचण्यासाठी हा लेख आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा. आपला प्रत्येक प्रतिसाद आम्हाला माहिती विनामूल्य प्रकाशित करण्यास मदत करतो.
वैशिष्ट्यीकृत छायाचित्र: Wikimedia